Skip to content

महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक

जहागिरदार भोजराज बारगळ यांच्या तालमीत तयार झालेल्या मल्हारराव होळकर यांनी आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने तलवारबाजी, घोडेस्वारी शिकुन मुलुखगिरी करीत असतांनाच पेशवा बाळाजी विश्वनाथांच्या नजरेत भरले.

रांगड्या जिद्दीच्या मल्हारबाची कसोटी पंचवीस घोडेस्वारांच्या पथकाचे प्रमुख आणि उत्तरेत चढाईची संधी मिळाली, थोरल्या बाजीरावांच्या खांद्याला खांदा लावुन “जरीपटक्या”साठी इमानेइतबारे जीवाची बाजी लावुन उत्तर दिशा सर करणारे मल्हारराव होळकर सुभेदार झाले.

आपला इतिहास वाचा :


माळवा प्रांतात सुभेदारी करणाऱ्या मल्हारबांना गंगाजळनिर्मळ पवित्र अशी सुन मिळाली जिच्या कर्तृत्वासमोर चंद्र सुर्य ही झुकतात त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar).

त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणा-या सुभेदार तुकोजीराव होळकर (Tukojirao Holkar) यांनी अटकेपार पराक्रम केलेला असुन पराक्रमाचा वारसा सांगणा-या होळकर गादीला तुकोजीरावानंतर वारस मिळाला तो महाराजा यशवंतराव होळकर (Yashwantrao Holkar) यांच्या रुपानेच. या अपराजित महाराजांच्या पराक्रमामुळे इस्ट इंडिया कंपनी डबघाईला येवून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत होती.

सुभेदार तुकोजीराव यांच्या नंतर होळकर गादीचा वारस निवडतांना दौलतराव शिंदे आणि दुसऱ्या बाजीरावाने कट कपट करून, होळकर राजघराण्यात कलह निर्माण केला भावाच्या हातुन भावाला ठार केले. उरलेल्या दोघांना ही संपवण्यासाठी शिंदे पेशव्यांनी कपटाची शर्थच केली.

किल्ले वाफगाव (Wafgaon Fort),
यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ

मात्र मल्हारी मार्तंडास काही वेगळेच अपेक्षित होते. पेशव्यांच्या गादीवर अमृतरावांचा अधिकार आहे. हे सांगण्या-या शुर विठोजीराव होळकर यांना ही हत्तीच्या पायी दिले जाते. होळकरांचा वंश संपवण्याच्या नादात असलेल्या शिंदे पेशव्यांनी मराठेशाही कडे दुर्लक्ष केले होते.

बुडणाऱ्या मराठेशाहीला वाचवण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांना थोपवले होते मुकुंदरा घाटीत त्यांना पराजित केले होते, अशा या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या संघर्षाची वाटचाल खुप काटेरी आणि त्रासदायक होती.

ना.स इनामदार यांनी त्यांच्या जिवनावर लिहलेल्या कांदबरीला “झुंज” हे शिर्षक देऊन त्यांचे जिवन कांदबरीतुन रेखाटले होते, तर न.र.फाटकांनी उत्तम असे चरित्र निर्माण करुन त्यांचा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला, तर जदुनाथ सरकार यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्यभिषेकाची ऐतिहासिक घटना आपल्या पुस्तकातून समोर आणली तर केसरबाई होळकर यांनी पती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्यभिषेकाची नोंद शिलालेखात कोरुन ठेवून या ऐतिहासिक घटनेला अबाधित ठेवलेले आहे.

६ जानेवारी १७९९ रोजी रविवार मार्गशीर्ष प्रतिपदा विक्रम संवंत १८५५ रोजी सकाळी गजकेशर योग असतांना महाराजा यशवंतराव होळकर यांचा महेश्वर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधी मंदिरासमोर राजराजेश्वर साक्षीने राज्यभिषेक सोहळा संपन्न झाला.

यशवंतराजेंच्या काळातील चांदीच्या नाण्यांवर
राजमुद्रेतील कोरलेले मजकूर
त्यावर चक्रवर्ती उल्लेख आहे

अंत्यत धामधुमीत हा राज्यभिषेक सोहळा पार पडला असुन महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विश्वासू पण नंतर दगाबाजी करणाऱ्या लाला भवानी शंकर खत्रीने या घटनेची त्याच्या रोजनिशीत नोंद करून ठेवली होती. सुर्य स्वामीस्थानी असलेल्या यशवंतरावांना राज्यभिषेकानंतर “चक्रवर्ती” पदवी लावण्यात आली होती.

श्रीमंत केसरबाई होळकर यांनी शिलालेखात कोरुन ठेवलेला राज्यभिषेक सोहळा श्लोक

तुकोजिनामा नरराजधामा प्राज्यं स्वराज्य समलंचकार !!
ततःसुत स्तस्य चतुःसमुद्र वेलावन व्यापिय शोविशालः
प्रचंड दोर्मदित चंडखगविखंडीता राती गृहीतदंड !!
अराजत श्री यशवंतरावनामा महाराव पदाधिरुढ

किल्ले महेश्वर येथे यशवंतराजेंचा राज्यभिषेख झाला

लाला भवानी शंकर रोजीनिशीतील नोंद

Jaswant Rao marched from Kasrawad to Maheshwar, which is the seat of the government of the Holkars, along with Mir Khan and other followers. At an auspicious moment he sat on the royal masnad of the Maheshwar State, 26 (the sounds of musical instruments filled the atmosphere, and) costly jewels and other valuable articles came into his possession.

Imprisoning all the officials of the place, he took from them about three lakhs of Rupees as nazaranah and then restored them to their former offices. Next, he turned to (f. 68a.) Satisfying his followers and comrades, who had borne all the hardships of these marches and fights and done loyal service. Nearly 700 costly robes of honour, shawls, scarfs (shela) and turbans (pagota) were distributed to each according to his rank.

Bakhshi Bhawani Shankar received a pearl necklace, a palki and a nerwices in the past. the Maharajah, gifts; And was created Bakhshi of the whole ark of reward in his distinguished services, with his usual far-sighted, told the Mahat “Under this government all papers are written in Marathi. It will be impossible for me to know everything, great. And small, unless clerks are able to read Persian, but it is the most difficult to find (Persian – knowing) clerks these days. ASS (f. 68b.) I will always enjoy your favors, you will be rewarded in me. Some other way. “Jaswant Rao, understanding of the meaning of Bhawani Shankar, by the medium of Shyam Rao Mahadik, confessed that on high post (Bakhshigin), Kushaba Bakhshi37whose father, Mukund Rao, had formerly held the charge of Jamadar-Khana (treasure), jewels and wardrobe) under Ahilya Bai and who was an expert in reading Marathi papers.

Amir Khan was rewarded with akhilat, a pearl necklece, and an elephant, and Karam din Khan (Amir Khan’s brother) and his contingent of 400 men received robes of honor. At this time the brother of Anand Rao’s wife came to interview, with 100 horsemen, and said, “Congratulations on your enthronement. We are ready to obay your orders”. Although Jaswant Rao was, at heart, displeased with Anand Rao for his failure to pay a million of Rupees (f. 69) as nazarmah and his raising disturbances, yet he deemed it politic not utter a word about that matter, but treated him with favors and gifts. Saadat Khan, the blind, the brother of jafar ali khan (deceased)in reward of the services of the latter was given a palki and a village yielding Rs 1,200 in jagir.mihrban singh was given a splendid khilat.

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्यभिषेकानंतर त्यांच्या शिलेदारांना जहागि-यासह अनेक मौल्यवान भेट वस्तू, पोशाखासह पदव्या देण्यात आल्या होत्या.

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या वर पोवाडा लिहण्यासाठी शाहीर अमरशेख यांना न.र फाटक यांनी सुचवले होते. अमरशेख यांनी रचलेला वीरश्रेष्ठ यशवंतराव होळकर पोवाड्यातील शेवटचा चौक.

असा महाराष्ट्र भक्तिचा महामेरु झाला क्षणोक्षणी झोडपून काढलं गोऱ्या सायबाला
दुर्दैव राज्यकर्ताच गोरा पुढं झाला इतिहास आमचा त्यानी आमच्यासाठी लिहिलेला
चोर, डाकू, लुटारू होळकर म्हटलेला
तो कुराण , गीता , बायबल आम्हाला झाला
आम्ही घोकुन् घोकुन् तो दिला
सा-या राष्ट्राला गुलामीनं अंध झालो ठोकरलं सत्त्याला गायाचा पवाडा सोडुन शिव्या दिल्या
त्याला अन् धन्य मानुनी घेतलं आम्ही स्वतःला असा इतिहासाचा बट्याबोळ आम्हि केला स्वातंत्र्य मिळ्ता क्षणं
गाळ खालि बैसला निर्मळ – जळ –
इतिहास ओंजळित आला प्रोफेसर फाटकांनी हात ओंजळीला दिला
उगवायचा सूर्य तो सत्य सूर्य उगवला
शिवराया मागं होळकर फक्त एकला महाराष्ट्रध्वजा अति उंच उभारुनि गेला
नव इतिहासाचा नवा सत्य दाखला अमरने दिला । मुजऱ्याला चला ।
बोला चांगभलं बोला बोला
तुम्हि राजे यशवंत राव होळकर

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना –

  • महाराजा यशवंतराव होळकर यांनी ५ डिसेंबर १८०५ ला जेजुरीच्या (Jejuri) मंदिराची उभारणी करणारे सिंधू बापुजी बेलसरे यांना पत्र लिहून मंदिर काम निर्माण बाबत सूचना केली होती.
  • १२ फेब्रुवारी १८०९ रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांची कन्या राजकुमारी भीमाबाईचा विवाह सरदार गोविंदराव बुळे सोबत लावून दिला.
  • ६ डिसेंबर १८०९ रोजी गोविंदराव बुळे यांना महाराजा यशवंतराव होळकर यांनी कारभारी मंडळाचे प्रमुख नेमले.
  • ३१ मार्च १८१० रोजी फितूर झालेला नोकर धर्मा कुवर आणि शोभाराम ला महाराजा यशवंतराव होळकर यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती.
  • थाँर्णे आणि ग्रँट डफ या युरोपीय लेखकांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शरीर यष्टी स्वभाव व चेहर्या बद्दल चे वर्णन लिहिलेले आहे हे दोन्ही युरोपीय लेखक यशवंतरावांच्या समकालीन असावेत.
  • महाराजा यशवंतराव होळकर यांनी कला आणि नावली या भानपुरा जवळ असलेल्या गावात तोफा तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. शोभाराम नावाचा तोपची उत्कृष्ट तोप करणारा लोहार होता. या शोभाराम सोबत महाराजा यशवंतरावांनी अनेक तोफा तयार केल्या इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी जशास तसे उत्तर देण्यासाठी स्वतःच्या तोफा असाव्यात म्हणून महाराजा यशवंतराव होळकरांनी स्वतःचा तोपखाना निर्माण केला होता.
  • तीज की तलाई आणि हिंगलाज गड (Hinglajgrth fort) या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर यांची सैनिकी छावणी होती या सैनिकी छावणीचा सेनापती म्हणून गफूर खान यास नियुक्त केले होते गफुर खान अमिरखाँन चा मेव्हणा होय पुढे दोघांनी इंग्रजांशी हातमिळवणी केल्यामुळे महिंदपुरच्या लढाईत होळकरांचा पराभव झाला.
  • १३ डिसेंबर १८०४ रोजी मुकुंदरा घाटी येथे महाराजा यशवंतराव होळकर यांनी इंग्रजी सेनेचा धुवा उडवल्याने त्याची खबर माणसं ब्रिटनला दिली महाराजांच्या पराक्रमामुळे ब्रिटनमधील जनता भयभीत होऊन त्यांनी भारताचा तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली बदनामी करून त्यास मायदेशी बोलावले. ब्रिटनचे प्रधानमंत्री पीठ यांनी ३० जुलै १८०५ रोजी लॉर्ड कॉर्नवालीस भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केले आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांची धास्ती इंग्रजांची राजधानी असलेल्या ब्रिटन ने घेतली होती हीच गोष्ट या घटनेतुन अधोरेखित होतेय.
  • संदर्भ –
  • देविसींह परमार
  • ऐतिहासिक ग्राम कँवला भानपूरा.
  • महेश्वर येथील शिलालेख
  • भवानीशंकर रोजनिशी
  • वीरश्रेष्ठ यशवंतराव होळकर पोवाडा
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
रामभाऊ लांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *