Skip to content

मुक्ताबाई होळकर – फणसे

मुक्ताबाई होळकर यांचा जन्म डिसेंबर १७३३ रोजी राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पोटी झाला. मुक्ताबाई होळकर या अत्यंत हुशार व चाणक्ष होत्या. राणी अहिल्यादेवींच्या हेर खात्याशी त्यांचा संबंध असल्याचे संदर्भ हि भेटतात.

परिचय :

  • नाव : मुक्ताबाई यशवंत फणसे – होळकर
  • जन्म : सन १७३३
  • वडील : खंडेराव होळकर
  • आई : अहिल्यादेवी होळकर
  • पती : यशवंतराव फणसे
  • मुलगा : नथोबा होळकर
  • धर्म व जात : हिंदू -धनगर
  • मृत्यू : सन १७९१
मुक्ताबाई फणसे – होळकर
(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)

खरेदीसाठी BUY NOW वर Click करा.
  • माध्यम : मराठी
  • Category : शोधप्रबंध
  • प्रकाशक :
  • (झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग)
  • किंमत : ६०० रु.
  • पाने : ३१२

विवाह :

होळकरांच्या जहागिरी क्षेत्रात चोर आणि डाकुंनी हैदोस घातला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अहिल्यादेवींनी घोषणा केली कि “जो कोणी या दरोडेखोर डाकूंचा बंदोबस्त करेल त्या शूर व्यक्तीला वतनदारी देऊन त्याचा विवाह राजकन्या मुक्ताबाईंसोबत लावला जाईल.

अहिल्यादेवींच्या घोषणेला साद देत सुभेदार तुकोजीबाबा होळकर यांच्या सेन्यातील यशवंत फणसे या युवकाने सैन्य हाताशी धरून दरोडेखोरांचा बंदोबस्त केला आणि घोषणेप्रमाणे अहिल्यादेवींनी आपल्या मुलीचा विवाह यशवंत फणसे यांच्यासोबत लावून दिला. अशी कथा सांगितली जाते.



जहागिरी :

सरदार यशवंत फणसे यांना राणी अहिल्यादेवींनी आंदण म्हणून महाराष्ट्रातील लासलगाव व किल्ला, निफाडचा होळकर वाडा सोनेवाडी, चांदवड मधील शिवरे बोऱ्हाके, जुन्नर मधील मडके जांब व जमीन आणि मध्यप्रदेशातील तराणा प्रांताची जहागीरदारीच्या स्वरूपात दिली होती. तराणा प्रांत हा अहिल्यादेवींच्या खाजगी जहागिरीचा होता.

शिवाय सरदार फणसे घरण्याला शिक्षा देणे, कर वसुली, यात्रेचा मान, पाटीलकी असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात होळ्करांतर्फे प्रदान करण्यात आले. नंतर १८१८ मध्ये मराठा सत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात सुध्दा पाटीलकिचे वतन वंश परांपरागत सरदार फणसें कडे तसेच ठेवले.

मृत्यू :

सन १७९१ ला यशवंतराव फणसे यांच्या अकस्मिक निधनानंतर मुक्ताबाई किल्ले महेश्वर येथे सती गेल्या. सन १८३५ पर्यंत यशवंतरावांचे पाचवे वंशज गणपतराव रेवजी फणसे यांच्याकडे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार होता.

गैरसमज :

अहिल्यादेवीनी रूढी परंपरा मोडत आपल्या मुलीचा विवाह यशवंत फणसे या आदिवासी युवकासोबत लावून दिला. अहिल्यादेवींनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले? का नाही? हा वेगळा विषय होऊ शकतो मात्र हि कथा आंतरजातीय विवाहाचे उदाहरण होऊ शकत नाही.



कारण यशवंतराव फणसेंचे सध्याचे वंशज हे जातीने धनगर आहेत. तसेच ज्या इतिहासकारांनी यशवंतराव फणसे यांचा आदिवासी असा उल्लेख केला आहे त्यांनी त्याचे तत्कालीन दाखले दिले नाहीत त्यामुळे सध्याच्या माहितीवरून आपुन असा निष्कर्ष काढू शकतो कि, यशवंतराव फणसे हे जातीने धनगर होते व अहिल्यादेवींनी आपल्या मुलीचा विवाह हा जातीमधील तरूणाशीच लावला होता.

समाधी :

मुक्ताबाई फणसे यांची समाधी किल्ले महेश्वर(मध्यप्रदेश) च्या पायथ्याशी आहे. सन १७९१ ला सरदार यशवंतराव फणसे यांचा मृत्यू झाल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी त्या सती गेल्या होत्या असे सांगितले जाते. राणी अहिल्यादेवींच्या दहनस्थळाच्या बाजूलाच मुक्ताबाईंचे दहनस्थळ आहे मात्र लोकांना त्याबद्दल फारशी माहिती नाही.

मुक्ताबाईंचे दहनस्थळ, महेश्वर

येथूनच काही अंतरावर असलेल्या मातंगेश्वर परिसरात किंवा फणसे वाड्यात सरदार यशवंतराव फणसे व मुक्ताबाई आणि त्यांची सवत नयन यांची सामायिक समाधी आहे. समाधीच्या आत एका चोथऱ्यावर यशवंतराव, मुक्ताबाई व नयन यांची संगमरवरी मूर्ती पाहायला मिळते.    

समाधी वरील होल्करकालीन दगडी नक्षीकाम सुरेख असून त्यामध्ये रामायण व मातृत्वाची छबी दाखवणारी मुर्त्या मनाला भावून जाते. तसेच मुक्ताबाईचे सती शिल्प महेश्वर किल्ल्यावरच्या वाड्यात बघायला मिळते.

मुक्ताबाईंचे सतीशिल्प, महेश्वर राजवाडा.

मातंगेश्वर परिसरात किंवा फणसे वाड्यात आज कोणी तरी साधूबाबाच्या आश्रमाचे अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. त्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

मात्र त्यामुळे तेथील समाधी वास्तूची व अन्य होळकरकालीन वास्तूंची दिवसेंदिवस वाताहत होत आहे.

समाधीवरील मातृत्वाची छबी असलेले शिल्प
समाधीवरील मातृत्वाची छबी असलेले शिल्प
समाधीवरील मातृत्वाची छबी असलेले शिल्प
मुक्ताबाई फणसे-होळकर – दहनस्थळ व समाधीस्थळ, महेश्वर

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi