Skip to content

सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या लढाया

१८ व्या शतकात होळकर घराण्यातील सुभेदार मल्हारराव होळकर यांनी मोठा पराक्रम गाजवून स्वतःचे माळव्यात छत्रपतींच्या सनदेनुसार पेशव्यांनमार्फत आपले राज्य स्थापन केले. भारताच्या जडणघडणीत स्फूर्तिदायक ठरतील अशा मोजक्याच ऐतिहासिक घराण्यात होळकर घराण्याची गणना केली जाते.

होळकर घराण्याच्या शासकांचे व्यक्तीमत्व हे स्फार्टिकाप्रमाणे स्वयंभू होते. होळकर शासकांनी आपल्या मुत्सद्दी कर्तृत्वाने मराठ्यांच्या इतिहासात त्यांचे नाव निर्माण केले. पेशवे थोरले बाजीराव व चिमाजी अप्पाच्या प्रत्येक स्वारीत मल्हारराव होळकर नेहमी आघाडीवर राहून विजय प्राप्त करीत असत.

होळकर शाही इंदोर येथे मल्हारराव होळकर यांच्या अथक प्रयत्नातून स्थापन झाली. आपल्या पराक्रमाने व धाडसी वृत्तीने संपूर्ण हिंदूस्थानभर आयुष्याचे ५२ वर्ष रणांगणावर विजयी घोडदौड केली. पानिपतच्या पराभवानंतरही उत्तरेतील राजकारणावर आपले वर्चस्व व दबदबा निर्माण केले. आपल्या राज्यकाळात त्यांनी पेशव्यांच्या चार पिढ्या पहिल्या व मराठा साम्राज्याचे पहिले सुभेदार होण्याचा मान त्यांना मिळाला.

मात्र राणी अहिल्यादेवी होळकर यांचे एक वाक्य आहे, “आमच्या लोकांचे हि चांगले पराक्रम आहेत पण ते सर्वान समोर येत नाही”, असेच काही तरी राजश्री मल्हारराव होळकर यांच्या इतिहासबद्दल घडले आहे. आज अशा अनेक लढाया आहेत ज्या तुम्हाला माहित आहेत मात्र त्यात सुभेदारांची आघाडीची भूमिका होती हे तुम्हाला नक्कीच माहित नसणार.

  • सन १६ मार्च १६९२ : जन्म – मुरूम-होळ, ता.फलटण जि.सातारा.
  • सन मार्च १७२३ : सारंगपूर लढाई – गिरीधर बहादूरचा पराभव.
  • सन ०५ डिसेंबर १७२३ : सय्यद बहादुरशहाचा पराभव.
  • सन १७२३ : बुंदेलखंडात लढाई – महंमदशहा बंगशचा पराभव.
  • सन १७२५ : माळव्यात चोथाई व सरदेशमुखीचे हक्क(सातारा छत्रीपतींकडून).
  • सन फेब्रुवारी १७२८ : पालखेडची लढाई – निजामाचा पराभव(मुंगी शेगाव तह).
  • सन २६ मे १७२८ : होळकरशाहीची स्थापना.
  • सन २० नोव्हेंबर १७२८ : अमझेरा लढाई – दया बहादूरचा पराभव.
  • सन १९ मार्च १७२९ : जैतापूरची लढाई – महंमदशहा बंगशचा पराभव.
  • सन १७३१ : शहाजापूर लढाई – विरुद्ध महंमदशहा बंगश(अनिर्णियात).
  • सन ०१ एप्रिल १७३१ : डभईची लढाई – सेनापती त्र्यबंकराव दाभाडेचां पराभव.
  • सन १२ ऑक्टोबर १७३१ : तरल लढाई – दया बहादूरचा पराभव व मृत्यू.
  • सन १७३१ : मोघल सुभेदार सवाई जयसिंगकडून खंडणी वसूल.
  • सन १७३४ : चापानेरवर विजय.
  • सन १७३४ : मोघल सुभेदार सवाई जयसिंगची रसद बंद – खंडणी वसूल केली.
  • सन १७३४ : बढवाईच्या ठाण्याची रसद बंद – खंडणी वसूल केली.
  • सन १७३५ : दिल्लीवर स्वारी – बादशहाकडून जयसिंग कछवाय, मारवाडचा अभयसिंग राठोड, कोटाचा दुर्जनसाल हाडा, मोगल सुभेदार कमरुददीन व खानदौरान तसेच भरतपूरचा सूरजमल जाट यांच्या संयुक्त दोन लाख फौजेचा पराभव. तेव्हा जयसिंगच्या मध्यस्थीने सरदार मल्हारराव होळकर व मीरबक्ष यांच्या सन २२ मार्च १७३५ ला भेटी होवून तह ठरला. माळव्याच्या चैथाई दाखल दरसाल बावीस लक्ष रुपये देण्याचे खानदौराने कबूल केले. मल्हारराव होळकरांच्या प्रचंड विजयामूळे येथून पुढे बाजीरावांनी “राजश्री मल्हारजी होळकर दिम्मत चिमाजी बल्लाळ”. असे जें शीर्षक असे, त्याऐवजी “सुभा मल्हारराव होळकर दिम्मत पंतप्रधान”. यातून असे स्पष्ट होते की मल्हारराव होळकर यांच्या विजयी घोडदौडी मुळे पेशवा बाजीराव जाम खुष होवून स्वतः मल्हारजींस भरजरी पोषाख दिला असून सोन्याचे कडें, मोल्यांचा तुरा, शिरपेंच वगैरे बहुमान दिला आहे. यापुढे त्यांच्या नावाचा अतिशय अदबिने व सन्मानपुर्वक उल्लेख करतात. तसेच या वेळेपासून सरदार मल्हारराव होळकर हे होळकरशाहीचे “सुभेदार” झाले. इ.स. १७३५ पासून होळकरशाहीचा पाया घातला गेला असे धरण्यास हरकत नसावी. येथून होळकरशाहीचा प्रारंभ झाला असें मानल्यास पूर्वीची पंधरा वर्ष “पूर्व तयारी” असें धरुन चालावयाचे.
  • सन १७३६ : मारवाड स्वारी – अभयसिंग राठोडकडून चोथाई वसूल.
  • सन १७३७ : भेलसार लढाई – मोघल तुराणी सॆन्याचा पराभव.
  • सन १७३७ : भदावर लढाई – भदावर राजाचा पराभव.
  • सन १७३७ : दिल्लीवर स्वारी – मोगलाकडून मुज्जफरखान, मीर हुसैन खान, कमरुददीन व कोका राजा शिवसिंह या सर्वांच्या फौजेचा दारुण पराभव.
  • सन एप्रिल १७३७ : सादतखानचा पराभव व मृत्यू.
  • सन ०७ जानेवारी १७३८ : दुराईसराई तह – निजामाची शरणागती. या उतर मोहिमेमुळे जयपूर, जोधपूर, उदेपूर, माळव्यातील जमीनदार, बुंदेल नरेश, अंतर्वेदीतील जाट तसेच दिल्ली दरबार बादशहा, भोपाळचा नवाब, भागानगारचे निजाम हे मराठ्यांना वचकू लागले. शरण आल्याने मराठयांची शक्ती व सामर्थ्य भारतभर पसरली. त्याच प्रमाणे होळकर, शिंदे, पवार या ही सरदाराची कमान चढती होऊन ते प्रांताधिपती बनले.
  • सन डिसेंबर १७३८ : गोव्याचा गव्हर्नर अंटोनियास पराभूत.
  • सन १६ मे १७३९ : वसईची लढाई – पोर्तीगीज पराभूत.
  • सन २८ एप्रिल १७४० : श्रीमंत पेशवे पहिले बाजीराव यांचा मृत्यू.
  • सन ११ मार्च १७४५ : भेलसावर लढाई – भोपाळचा नवाब याद मुहम्मदखाचा पराभव.
  • सन १९ जुलै १७४५ : सरदार राणोजी शिंदे यांचा मृत्यू.
  • सन १७४६ : बुंदेलखंड, कालिंजर, जैतपूर, अजयगड वर विजय.
  • सन १७४७ : ईश्वरसिंग-माधोसिंग प्रकरणाचा निकाल लावला – रामपूर, भानपुरा, टोंक होळकरांना मिळाला.
  • सन १७४८ : करारा जिंकला.
  • सन १५ डिसेंबर १७४९ : सातारचे चोथे छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू.
  • सन २९ सप्टेंबर १७५० : सांगोल्याची लढाई – कोल्हापूरच्या ताराराणींचा पराभव – पेशवे नानासाहेबां विरुद्धचे बंड शमवले.
  • सन मार्च १७५१ : बहादूरपूरची लढाई – दमाजी गायकवाडांचा पराभव, सातारच्या छत्रपतींच्या विरुद्धचे बंड शमवले.
  • सन १७५१ : श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी अधिकृतपणे “माळव्याचे सुभेदार” असे उपपद दिले.
  • सन १७५२ : श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या वचनाची पूर्तता – गाजीउद्दीनचे मृत शरीर दिल्लीला पोहचवले.
  • सन एप्रिल १७५२ : दिल्ली करार – बादशाह व मराठे यांच्यामध्ये.(बादशहाच्या वतीने सफदरजंगाने व मराठ्याांचे प्रतिनिधी म्हणून मल्हारराव होळकर व राणेाजी शिंदे यांनी करार केला.)
  • सन नोव्हेंबर १७५२ : भालकीची लढाई – निजामाचा पराभव.
  • सन १७५४ : कुंभेरीची लढाई – सरदार खंडेराव मल्हारराव होळकरांचा मृत्यू.
  • सन सप्टेंबर १७५७ : दिल्लीत नजीब खानाचा बंदोबस्त.
  • सन डिसेंबर १७५७ : सिंदखेड लढाई – निजामाचा पराभव, निजाम सरदार नागोजी मानेचा मृत्यू.
  • सन एप्रिल १७५८ : लाहोरची लढाई – अब्द्लीचा पुत्र तेमूर व सेनापती जहानखानचा पराभव, अटकेचा किल्ला मराठा साम्राज्यात आला.
  • सन डिसेंबर १७६० : कुंजापूरची लढाई – पेशवे पराभूत.
  • सन जानेवारी १७६१ : पानिपतची लढाई – पेशवे पराभूत.
  • सन मे १७६१ : रामपुऱ्याची लढाई – चंद्रवतांचा पराभव.
  • सन १७६२ : जयपूरच्या माधवसिंगाच्या फौजेचा पराभव.
  • सन १७६२ : मंदसौर कोतवालाचा बिमोड.
  • सन ऑगस्ट १७६३ : राक्षसभुवनची लढाई – निजामाचा पराभव, निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदरचा मृत्यू.
  • सन नोव्हेंबर १७६४ : नजीबखान रोहिल्याचा बंदोबस्त. तह झाला.
  • सन मे १७६५ : इंग्रजांचा पराभव – आयोध्याच्या नवाब सुजाउद्यौला मदत.
  • सन १७६५ : झाँशीची लढाई – दतिया, ओडसे, शेवडे येथील राजे व गोहदच्या जाटांचा पराभव.
  • सन जानेवारी १७६६ : दर्यापूरची लढाई – निजाम व नागपूरच्या जानोजी भोसल्यांच्या संयुक्त फोजेचा पराभव.
  • सन मार्च १७६६ : गोहद-धोलपूरची लढाई – जाटांचा पराभव.
  • सन २० मे १७६६ : श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा देहवास – आलमपूर, ता.लहार जि.भिंड.

या सर्व लढायांची विस्तृत माहिती
“मराठा सरदार होळकरांचे प्रशासन”
या शोधप्रबंधात दिलेली आहे. तुम्ही खालील लिंक वर जाऊन ऑनलाईन खरेदी करू शकता.


  • माध्यम : मराठी
  • लेखक : सत्यपाल बनसोडे
  • Category : शोधप्रबंध
  • प्रकाशक : –
  • पाने : ४६२
  • किमंत : ७४५
    (झेरॉक्स मध्ये उपलब्ध, कव्हर, बायडिंग)

Order – होळकर सरदारांचे प्रशासन

Share This Link:
https://bit.ly/3mGxpPS

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi

राहुल वावरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *