Skip to content

धनगर समाज कुळीवंश, गोत्र आणि प्रवर:

भारतात क्षत्रिय पेशाच्या तीन प्रमुख जाती आहेत. १)राजपुत, २)मराठा, ३)धनगर जात. मुळात या तिन्ही जाती एकच आहेत त्यामध्ये रोटी व बेटी व्यवहारही होत असत.

रजपुतांनी उत्तरभारतात मराठे यांनी महाराष्ट्रात व धनगरांनी कर्नाटकात आपली राज्ये स्थापली होती. रजपूतामध्ये ३६ कुळी आहेत. मराठ्यामध्ये मुख्य ३६ असून उपकोळी ६० आहेत. अशा मराठ्यामध्ये एकुण ९६ कुळी आहेत व धनगरामध्ये ३२ कुळी आहेत.

गोत्र व प्रवर :

गोत्र म्हणजे वेद रचनेत आले त्यावेळेपासून आज सुमारे पाच हजार वर्षापासून आर्य लोकांनी ठेवलेली आपली वंशोउत्पत्तीची आठवण होय.


पुस्तकाचे नाव : अहिल्याबाई होळकर यांचे नेतृत्व

खरेदीसाठी BUY NOW वर Click करा.
  • माध्यम : मराठी
  • Category : शोधप्रबंध
  • प्रकाशक :
    (झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग)
  • किंमत : ६०० रु.
  • पाने : ३१२

गोत्र ऋषी म्हणजे आपले कुळीचे मुळ पुरुषांनी ज्याचे जवळ शिक्षण घेतले असा मुळ ऋषी. प्रवर ऋषी म्हणजे ज्यांनी ऋग्वेदातील सुत्र रचली व त्या सुत्राने अग्नीची स्तुती केली असे पुर्वज.

वैदिक धर्मीय हिंदूमध्ये लग्ना, श्राध्दा, पक्ष, उत्त्र क्रीया वगैरे धर्मकृत्यात प्रारंभी गोत्र किंवा प्रवर यांचा उच्चार करावा लागतो. एका वंशात विवाह प्रसंग होतात पण एकाच गोत्रात व कुळांत विवाह हाऊ शकत नाही. (स्कंद पुराण उचसधि)


पुस्तकाचे नाव : होळकर सरदारांचे प्रशासन

खरेदीसाठी BUY NOW वर Click करा.
  • माध्यम : मराठी
  • Category : शोधप्रबंध
  • प्रकाशक :
    (झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग)
  • किंमत : ७५० रु.
  • पाने : ४६२

उपगोत्र म्हणजे ज्यांचे ऋषि गोत्र विसरलेले आहेत त्या गोत्राचे ठिकाणी आपले गोत्रातील दुसरे एखादे प्रसिद्ध पुरुषाचे नांव दिले जाते असे गोत्र

कुळ :

एका कुटूंबातील कर्तापुरूष त्याचे वडील, त्याची मुले अशा तीन पिढ्या नांदत त्याला कुळ असे म्हटले जाते.


पुस्तकाचे नाव : अहिल्याबाई होळकर यांचा चिकित्सक अभ्यास

खरेदीसाठी BUY NOW वर Click करा.
  • माध्यम : मराठी
  • Category : शोधप्रबंध
  • प्रकाशक :
    (झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग)
  • किंमत : ६०० रु.
  • पाने : ३५०

गोत्र :

प्राचीन काळी संपत्ती गाईच्या स्वरुपात मोजली जाई, म्हणून एका कुळात राहणाऱ्या सर्व लोकांच्या गाई एकत्र असत. त्याला गोत्र असे नांव होते. नंतर ते कुळाचे गोत्र असे समजले जाऊ लागले.

गौण अर्थाने गोत्र शब्द कुटूंबातील एखाद्या शूर विद्वान किंवा श्रीमंत पुरुषाला लावतात. नंतर त्यांच्या कुळाला त्या पुरूषावरुन नाव मिळते. त्याला लौकीक गोत्र असे नांव असून ते क्षत्रियामध्ये असते.


पुस्तकाचे नाव : होळकर पेशवे संबंध

खरेदीसाठी BUY NOW वर Click करा.
  • माध्यम : मराठी
  • Category : शोधप्रबंध
  • प्रकाशक :
    (झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग)
  • किंमत : ६०० रु.
  • पाने : २५३

ज्या कुळाचे प्रवर समान नाहित त्या कुळात विवाह व्हावा असे गौतम सुत्रीत म्हटले आहे. सुत्रकाळी चांद्रयान किंवा कृच्छ प्रायश्चित केले की सगोत्र विवाहाचा दोष जात असे. लग्न कार्यात कुलगोत्राचा उपयोग करतात.

आपले गोत्र पाहणेची रीत :

धनगर समाजीतील गोत्र कुळी आडनावे व पडनांवे वंश व प्रवर यांचा तक्ता पुढे दिलेला आहे. त्यात आपले आडनावं मिळाले नाही तर आपले कुळाशी ज्या कुळीचा भाऊपणा येतो व विवाह संबंध होत नाही अशा कुळीचे आडनावावरुन आपले गोत्र निश्चित करावे. आपले कुळीशी भाऊपणा असणाऱ्या कुळी समजातील वृद्ध लोकांना माहित असतात.


पुस्तकाचे नाव : इतिहासातील अहिल्याबाईचे योगदान

खरेदीसाठी BUY NOW वर Click करा.
  • माध्यम : मराठी
  • Category : शोधप्रबंध
  • प्रकाशक :
    (झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग)
  • किंमत : ६०० रु.
  • पाने : ३२४

पुढे दिलेली गोत्रे ही धनगर समाजातील सर्व पोट जातीसह एकच आहेत. मुळचा धनगर समाज एकच असून पोट जाती कालांतराने पडल्या आहेत.

मुख्य कुळ – खरात
कुळगोत्र – परिहार
ऋषी गोत – पुंडरीक
प्रवर – मिळाली नाही
वंश – अग्निवंश
आडनावे

धायगुडे, पांढरे, सूळ, बोरवर, अमाने, ढाके, पालवे, टेळे, तरडे, ढवळे, तामखडे, रत्नपारखे, मळगे, झुरळे, बांदे, गेटे, म्हरकाटे, लांडगे, तोंडगे, पटकारे, भोपळे, थोरवाले, सुरसुळे, पुर्णेकर, गुलदवडे, खराटे, सातकुळे, बनगे, पळसगावडे, चुतकले, गोलारी.


मुख्य कुळ – लवटे
कुळगोत्र – सोळंकी
ऋषी गोत – भारद्वज
प्रवर – अंगिरस वार्हस्पत्या
वंश – अग्निवंश
आडनावे

नरुटे, वडगर, माने मरगळे, हजारे, शेंडगे, वावरे, डबळे, पोकळे, गरवाट, पिसाळ, कासुगडे, नेमाणें, धुलवडे, भानवसे, क्षीरसागर, शेमडे, चारे, हलगे, करगळ, किरवे, गावडे, बिंदूगडे, थिटे, काकडे, गास्के, गारगुडे, रोडे, झिवळ, रेवे, वडरे, बडरे, दरगुडे, बागनवर, झाडगर, बरले, निगुंडे, वध्नवर, मिसाळ, बिरजे, तांदळे


मुख्य कुळ – कोळेकर
कुळगोत्र – कान्वाह
ऋषी गोत – मानव
प्रवर – चावन, आल्पावन जगदग्नी
वंश – सुर्यवंश
आडनावे

मुरडे, सोसे, दाइंगडे, हममखोरे, बोट्याटे, दीडबाग, आगलावे, करपे, बनसोडे, चवधारे, आनावळे, नासके, गाडवे, राऊत कुंडलीक, भागवत (रामाचा मुलगा कुश याचा वंश)


मुख्य कुळ – शिंदे
कुळगोत्र – परीहार
ऋषी गोत – पुंडलीक
प्रवर – 3 मिळाली नाहीत
वंश – अग्नीवंश
आडनावे

झुंजे, काळजाते, कांडूरे, हांडवरे, खडके, बेंदरे, ढोणे, बिचकुले, हराळे, सुटे


मुख्य कुळ – हाके
कुळगोत्र – यादव
ऋषी गोत – कौडिन्या
प्रवर – कौडिन्स अंगिरग भाईस्पख्या
वंश – चंद्रवंश
आडनावे

मदने, खरेज, गोपणे, दहिभाते, घुटकडे, हांडे, दोलवडे, लुबाळे, इबडे, झालगर, मेटकरी, पिसे, बिजुगडे, हिसे, लांडे, बने, बारगाले, वरणे.


मुख्य कुळ – स्वार
कुळगोत्र – गहलोल
ऋषी गोत – कश्यप
प्रवर – कश्यप वत्सनेचु नैध्वा
वंश – सुर्यवंश
आडनावे

सुडनवर, हेगडवार, बलार, बरंगे, डाफ्टवर, गेळे, दिंडे, शिरगिरे, गायेकर, साठे


मुख्य कुळ – सोलनकर
कुळगोत्र – यादव
ऋषी गोत – कौडीन्य
प्रवर – अंगिरस कौंडिन्य मईसात्य
वंश – चंद्रवंश
आडनावे

पारकर, खंडेकर, वाघमोडे, हिरवे, इक्कर, ठवरे, ओगरे, निटवे, इंगळे, डोईफोडे, तांबे (बोकड न खाणारे) खीद, पाडूळे, हागरे, गंबड, घोगरे, घुपे, सरजे, गाडेकर कोळसे, होड, ढमढेरे, बीरकर


मुख्य कुळ – देवकते
कुळगोत्र – चौहान
ऋषी गोत – वत्स
प्रवर – भार्गव आम्तवंश आर्य च्यावन जामदग्या
वंश – अग्निवंश
आडनावे

अर्जुन, गोरड, व्हनमाने, वलेकर, रुपनवर, बरकडे, मेटकरी, ढेरे, तांबे(बोकूड न खाणरे) तळे, डोंगरे, बगडे, भामटे, उतरे, कोले, झाडे, खिलारी, दाबे, अंगुणे, दोरवे, हनुमाने, सुडळक, निगडे


मुख्य कुळ – वाकसे
कुळगोत्र – गहलोल
ऋषी गोत – कश्यप
प्रवर – कायश्वा वत्सा नैध्रुव
वंश – सुर्यवंशी
आडनावे

उसके, मसके, चोरमले, सिरसट, बंगाले, कुऱ्हाडे, मुगुटरा


मुख्य कुळ – सरगर
कुळगोत्र – चौहान
ऋषी गोत – वत्सा
प्रवर – भार्गव बवन वाप्नावन आर्म जामदग्ना
वंश – अग्निवंश
आडनावे

साडनवर, फोंडे, पिपरे, कटरे, मलगोंडे, गडवे, मेटकरी, कुसपे, नांबळकर, सुंपपे, खुपकर, पिंजारी, तुरबारे


मुख्य कुळ – सरक
कुळगोत्र – सोलंकी
ऋषी गोत – भारद्वाज
प्रवर – आंगिदस भारस्पत्वा भारद्वाज
वंश – अग्निवंश
आडनावे

झरक, तारनवर, शेळके, जिद्रे, लकडे, चोपडे, भडके, पेरवले, हराळे, विरजे, पिसाळ, शेलार


मुख्य कुळ – हालनवर
कुळगोत्र – गहलोल
ऋषी गोत – कश्याप
प्रवर – कश्याप वत्सा नैध्रुव
वंश – सुर्यवंश
आडनावे

बीवकर, दिलगुडे, हुलगुंडे, दुधे, सरवदे, येळे, सिध्दगुरू कोडलकर


मुख्य कुळ – कोकरे
कुळगोत्र – राठोड
ऋषी गोत – गौतम
प्रवर – आंगीरस आयास गौतम
वंश – सुर्यवंश
आडनावे

हाजगे, होगले, अस्वले, पिंगळे, सोनटक्के, कऱ्हाडे, माळवदे, राचकर, देवपुंजे, सोंडगे, भुसारे, राजगर, गोरे, वीरकर, लांभाटे, हुलकर


मुख्य कुळ – जानकर
कुळगोत्र – गहलोल
ऋषी गोत – कश्याप
प्रवर – कश्याप वत्सा नैध्रुव
वंश – सुर्यवंश
आडनावे

कारंडे, राऊत मोटे, माळे, धुले, बिडघर, वाघे, करमारे, पडळकर


मुख्य कुळ – काळे
कुळगोत्र – कदम
ऋषी गोत – मानव
प्रवर – च्चावन आन्यावन जामदग्ना
वंश – सुर्यवंश
आडनावे

महिन,गहिने, सारसे, हुबाळे, श्रीराम, गोरे, डोंबाळे, सिनगारे, घरबुडवे, दडस, नामकडे, सिगिरे


मुख्य कुळ – खताळ
कुळगोत्र – सोलंकी
ऋषी गोत – भारद्वज
प्रवर – अंगिरग भारस्पत्य भारद्वाज
वंश – अग्निवंश
आडनावे

शेजाळ, दुधाळ, वाघमारे, गरंडे, गलंडे


मुख्य कुळ – येडगे
कुळगोत्र – गहलोल
ऋषी गोत – काश्याप
प्रवर – काश्याप वत्सा नैध्रुव
वंश – सुर्यवंश
आडनावे

जेउगे, सन्ने, जुगदार, जोंबळे, जवळगे, गरडे, गलंडे, रेडके


मुख्य कुळ – ऐनवर
कुळगोत्र – गहलोल
ऋषी गोत – काश्याप
प्रवर – काश्याप वत्सनेथ नैध्वा
वंश – सुर्यवंश
आडनावे

आईनवर, बुध्नवर, डकनवर, कोयनवर, मकनवर, भाडनवर


मुख्य कुळ – शिंगाडे
कुळगोत्र – शेंगर
ऋषी गोत – गौतम
प्रवर – अंगिरस आयास्या गौतम
वंश – सुर्यवंश
आडनावे

घुरंगळे, तरडे, व्हाटकर, ढवण, माळदे. (श्रृंग ऋषीचा वंश)


मुख्य कुळ – बुटे
कुळगोत्र – प्रभार
ऋषी गोत – वशिष्ठ
प्रवर – वशिष्ठ शक्ती पराशर
वंश – अग्निवंश
आडनावे

ताटे,कचरे, मोरे, कुवळकुडे, बावदान, डोईफोडे, वाघ, पिसे, बिरे, दळवी, केसकर


मुख्य कुळ – लेंगरे
कुळगोत्र – सेंगर
ऋषी गोत – गौतम
प्रवर – आंगिरस, आयास्या गौतम
वंश – सुर्यवंश
आडनावे

पिसुंदरे लिलिंदरे, वगरे, जालिंदरे, सिगारे (श्रुंग ऋषीचा वश)


मुख्य कुळ – आवळे
कुळगोत्र – गहलोल
ऋषी गोत – कश्याप
प्रवर – काश्याप वत्सा, नैध्रुव
वंश – सुर्यवंश
आडनावे

पुकाळे, यमगर यमनवर


मुख्य कुळ – ठोबरे
कुळगोत्र – तवर
ऋषी गोत – गर्गायन
प्रवर – गर्ग अंगिरस बाहिस्पत्या भारद्वाज
वंश – यदुवंश
आडनावे

सोनावळे, व्हटे, काटमारे


मुख्य कुळ – ठेंगल
कुळगोत्र – गहलोले
ऋषी गोत – कश्याप
प्रवर – काश्याप वत्सा नैध्रुव
वंश – सुर्यवंश
आडनावे

सणगणे टुले ठेंगले


मुख्य कुळ – आलदर
कुळगोत्र – गहलोले
ऋषी गोत – कश्याप
प्रवर – काश्याप वत्सा नैध्रुव
वंश – सुर्यवंश
आडनावे

वलदवर, करनवर, कमाडे, डांगे


मुख्य कुळ – टकले
कुळगोत्र – गहलोले
ऋषी गोत – कश्याप
प्रवर – काश्याप वत्सा नैध्रुव
वंश – सुर्यवंश
आडनावे

एरडे, तुपे, टिकले


मुख्य कुळ – भारकड
कुळगोत्र – गहलोले
ऋषी गोत – कश्याप
प्रवर – काश्याप वत्सा नैध्रुव
वंश – सुर्यवंश
आडनावे

शिवरकर मुटकर


मुख्य कुळ – दगडे
कुळगोत्र – गहलोले
ऋषी गोत – कश्याप
प्रवर – काश्याप वत्सा नैध्रुव
वंश – सुर्यवंश
आडनावे

पोले, संसलोटे


मुख्य कुळ – मासाळ
कुळगोत्र – सोळंकी
ऋषी गोत – भारद्वाज
प्रवर – अंगिरस, बहिपत्या, भारद्वाज
वंश – अग्निवंश
आडनावे

मिसाळ, गोंनमासाळ, अमुसिद्ध, खाजणे, साळ, भांडगे, वळूंसे, पलेरी, वडेर


मुख्य कुळ – लोकरे
कुळगोत्र – गहलोल
ऋषी गोत – कश्याप
प्रवर – काश्याप, वत्सा, नैध्रुव
वंश – सुर्यवंश
आडनावे

बेलनवर


मुख्य कुळ – कुलाळ
कुळगोत्र – गहलोल
ऋषी गोत – कश्याप
प्रवर – काश्याप, वत्सा, नैध्रुव
वंश – सुर्यवंश
आडनावे

बिसे, बुचटे


लेखक : कै.गणपतराव बापूराव कोळेकर
मु.लाट, ता.शिरोळ, जि.सोलापूर


काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


राणी अहिल्यादेवी होळकरांनी भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कार्यांची यादी पहा.
अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी कार्य