Skip to content

होळकरकालीन शिलालेख व पत्रे

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) ते शेवचे १४ वे महाराज यशवंतराव होळकर यांच्या कालखंडातील होळकरशाहीच्या निगडित शिलालेखांचे, ताम्रपटांचे व जुन्या पत्रांचे येथे Collection दिले आहे.

  • प्राप्तीस्थळ – जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे(महाराष्ट्र)
  • शिलालेख क्रं.१ – जेजुरी गडाच्या उत्तेरकडील नगारखान्याच्या डाव्या बाजूला हा शिलालेख आहे.
  • शिलालेखाचा आशय –
    “श्री शके १६७८ धाता
    नाम स्वंछर श्री मा
    र्तंड भैरव चरणी
    खंडोजी सुत मल्हा
    रजी होळकर णीरंतर”
  • वाचन करणारे – होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग-१, पा.२३
  • फोटो –
जेजुरी येथील शिलालेख क्रं.१

  • प्राप्तीस्थळ – जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे(महाराष्ट्र)
  • शिलालेख क्रं.२ – जेजुरी गडाच्या पश्चिमी तटाकडील म्हाळसाबाई मंदिराशेजारी हा शिलालेख आहे.
  • शिलालेखाचा आशय –
    “श्री शके १६६४ दुदु
    भी नाम सवत्सरे
    श्री मार्तंड भैरव
    चरणी खंडोजी सु
    त मल्हारजी होळकर”
  • वाचन करणारे – होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग-१, पा.२३
  • फोटो –
जेजुरी येथील शिलालेख क्रं.२

  • प्राप्तीस्थळ – जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे(महाराष्ट्र)
  • शिलालेख क्रं.३ – जेजुरी गडाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूला, चोथऱ्याशेजारील खांबावर हा शिलालेख आहे.
  • शिलालेखाचा आशय –
    “श्री मार्तंड चरणी तत्पर
    मल्हारजी सुत तुको
    जी होळकर नीरंतर श
    के १६९२ वीकृती नाम
    संवत्सरे श्रावण शुद्ध
    प्रतीपदा सोमवार का
    रखाना कीला व तळे मा
    रफत शामजी ना
    रायण राजापूरक
    र परगणे दीगरज”
  • वाचन करणारे – होळकरशाहीचा इतिहास भाग-१, पा.४१२
  • फोटो –
जेजुरी येथील शिलालेख क्रं.३

  • प्राप्तीस्थळ – नेतळे ता.निफाड जि.नाशिक(महाराष्ट्र)
  • शिलालेख – नेतळे गावातील राणी अहिल्यादेवींनी बांधलेल्या बारवेत हा शिलालेख आहे.
  • शिलालेखाचा आशय –
  • वाचन करणारे –
  • फोटो –