Skip to content

किल्ले लासलगाव : Ahilyabai Holkar Fort

किल्ले लासलगाव (Lasalgaon Fort)
ता.निफाड जि.नाशिक(महाराष्ट्र)

lasalgaon fort
किल्ले लासलगाव

इतिहास :

सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांना सन १७५० च्या दरम्यान चांदवड परगण्याची जहागिरी मिळाली त्यांनंतरच्या काळात या किल्ल्याच्या पायाभरणीला सुरवात झाली असावी पण या किल्ल्याच्या निर्माण हा होळकरकालीनच.

किल्ले लासलगाव, नाशिक.

“लासलगाव” या नावाच्या मागे एक लोककथा आहे ती अशी कि, राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळापासूनचा लासलगावचा प्रदेश सुपीक होता व या सुपीक प्रदेशावर परकीयांचे आक्रमण होण्याचा जास्त शक्यता होती त्यामुळे राणी अहिल्यादेवी यांनी या ठिकाणी लष्करी भुईकोट निर्माण करण्याचे ठरवले व निर्माण केलाही. कालांतराने हे गाव लष्करी नियंत्रणाखालील गाव म्हणून घोषित केले त्यामुळे या गावाला लष्करी गाव म्हटले जाऊ लागले. पुढे लष्करी गावाचा ब्रिटिश काळात अप्रभ होऊन लासलगाव म्हटले जाऊ लागले.

सन १७६६ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांची कन्या मुक्ताबाईचा विवाह सरदार यशवंतराव फणसे यांच्याशी झाला. त्यानंतर सरदार यशवंत फणसे यांना राणी अहिल्यादेवींनी आंदण म्हणून महाराष्ट्रातील लासलगाव व किल्ला, निफाडचा होळकर वाडा सोनेवाडी, चांदवड मधील शिवरे बोऱ्हाके, जुन्नर मधील मडके जांब व जमीन आणि मध्यप्रदेशातील तराणा प्रांताची जहागीरदारीच्या स्वरूपात दिली होती. तराणा प्रांत हा अहिल्यादेवींच्या खाजगी जहागिरीचा होता.

yashwantrao fanse
सरदार यशवंतराव फणसे
(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)

शिवाय सरदार फणसे घरण्याला शिक्षा देणे, कर वसुली, यात्रेचा मान, पाटीलकी असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात होळ्करांतर्फे प्रदान करण्यात आले. नंतर १८१८ मध्ये मराठा सत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात सुध्दा पाटीलकिचे वतन वंश परांपरागत सरदार फणसें कडे तसेच ठेवले.

सन १७९१ ला यशवंतराव फणसे यांच्या अकस्मिक निधनानंतर मुक्ताबाई किल्ले महेश्वर येथे सती गेल्या. यशवंतरावांचे पाचवे वंशज गणपतराव रेवजी फणसे यांच्याकडे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार होता. सन १८३५ रोजी इंदूर येथील होळकरांचे तत्कालीन महाराज हरीराव महाराजांच्या विरोधात त्यांनीच नेमलेल्या फणशेच्या सरदाराने बंड केले.

harirao holkar
महाराजा हरिराव होळकर
(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)

होळकर महालात फणशांचे गारदी घुसले. परंतू त्यांचे नियोजन फसले आणि हरिरावांच्या सैनिकांनी गारद्यांची कत्तल केली. या बंडाचे नेतृत्व करणार्‍या राजाभाऊ फणसे यांना हरीराव महाराजांचा वारसदार तुकोजीराव(दुसरे) यांनी ठार केले. या घटनेमुळे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार सांभाळणारे त्यांचे बंधू गणपतराव सैरभैर झाले.

आपली काही धडगत नाही, शिवाय इंग्रज सरकार या घटनेचा फायदा घेऊन आपल्यावर कारवाई करून आपल्यावर जप्ती आणतील या आशंकेतून गणपतरावांनी लासलगावचा किल्ला अब्बड या व्यापार्‍याला पाच हजार रूपयात विकला. त्यामुळे आज हा किल्ला खाजगी मालकीची संपत्ती आहे.

zunj marathi book
Order करण्यासाठी येथे Click करा

सन १८४८ ला ब्रिटिशांनी नगर जिल्हा होळकरांकडून ताब्यात घेतल्यामुळे फणसे घराणे नामधारी राहिले. लासलगाव व निफाडचा पाटिलकी चा बिल्ला नाशिकच्या कलेक्टरने १९३७ ला दिला होता. नंतर भारत स्वतंत्र झाला. सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. १९५२ ला वंशपरांपरागत पाटीलकी रद्द करण्यात आली. त्यामध्ये सरदार फणसेंची ही पाटीलकी रद्द झाली.

माहिती :

पूर्वी संपूर्ण लासलगावच्या भोवती दगडी तटबंदी व सात वेशी होत्या व त्याच्या आत सध्याचा बालेकिल्ला होता. तटबंदीचे काही अवशेष आजही आपल्याला पाहवयास मिळतात व सात वेशी पैकी आज फक्त एकच वेश नजरेस पडते. त्या वेशी वर श्रीराम मंदिर ट्रस्ट असे लिहिलेले आहे. वेस आजही चांगल्या स्थितीत असून जांग्या व पाकळी कलाकृती वरील बाजूस बघायला मिळते. या वेशीवरून पूर्वीच्या संपूर्ण तटबंदीचा घेरा केवढा असेल याचा अंदाज येतो. तटबंदी मध्ये पाषाण व विटांचा वापर केलेला दिसतो.

ahilyabai holkar marathi information
लासलगावची वेश

लासलगावचा भुईकोट किल्ल्याचे दोन मजबूत प्रवेशद्वार, त्यावर लोखंडी खिळे, सदर, प्रचंड मोठे पाषाणी बुरुज, त्याकाळचे भुयारी मार्ग, बाहेरून आलेल्या शत्रूवर मारा करण्यासाठीच्या बुरूज व तटबंदीमध्ये सज्जे, चौरस आकार, भक्कम तटबंदी तसेच उत्तर बाजूस मुख्य दरवाजा आणि त्याचे दोन बुरुज असे एकूण आठ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छरी आहेत. तोफ किवा बंदुका यांचा शत्रूवर मारा करायला यावा या उद्देशाने या खिडक्या व छरी बुरुजावर आहेत.

मुख्य प्रवेशद्वाराचे लाकडी दरवाजे आणि गजखिळे अजूनही भक्कम आणि शाबूत आहेत, त्यावरील होळकर कालीन लाकडी व लोखंडी नक्षीकाम हि वाखन्याजोगे आहे. शत्रूने हत्तीच्या साहाय्याने दार तोडण्याचा प्रयत्न करू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणजे “गजखिळे”. उत्तरेकडे तोंड असलेल्या याच दरवाज्यातून कित्येक स्वाऱ्यांसाठी होळकरांची घोडी-लष्कर भरदाव वेगाने बाहेर पडली असतील.

information about ahilyabai holkar
लासलगाव किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार
अहिल्याबाई होळकर माहिती
लासलगाव किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार
history of ahilyabai holkar in marathi
प्रमुख प्रवेशद्वारावरील लोखंडी खिळे

किल्ल्याच्या मधल्या भागात आज तसे काहीच नाही मात्र पूर्वी लाकडी महाल अस्तित्वात होता. त्याचे सर्व काम हे लाकडात असल्यामुळे त्याला लाकडी महाल किंवा राणी महाल म्हटले जात. या महालातील लाकडांवर हिरे मोती वापरून सुबक असे नक्षीकाम केले होते. काळाच्या औघात हिरे मोती गायब झाले व ९० च्या दशकात जेव्हा संपूर्ण महाल खांदून काढला तेव्हा त्यामधील लाकडात काही हिरे मिळाले होते असे सांगितले जाते.

punyashlok ahilyabai holkar ke karya
किल्ल्याचा आतील भाग
punyashlok ahilyabai holkar
किल्ल्याचा आतील भाग

हा किल्ला लष्करी दृष्टिकोन ठेऊन बांधला असल्यामुळे स्वतःच्या संरक्षणाची पण होळकरांनी खबरदारी घेतलेली दिसते. या किल्ल्यात भुयारी मार्ग नजरेस पडतात. या भुयारी मार्गाच्या अनेक शाखा आहेत त्यातील काही भुयार हे येथून २० कि.मी अंतरावर असणाऱ्या चांदवडच्या होळकर वाड्यात निघतात व काही निफाडच्या होळकर वाड्यात व काही येथून काही अंतरावर असलेल्या होळकर वस्तीवर. होळकर वस्तीवर असलेल भुयार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जिवीतास धोका असल्याचे कारण तेथील स्थानिक लोक देतात. जीवितास धोका आहे म्हणून एखादा ऐतिहासिक वारसा नष्ट करायचा हा एकमेवच पर्याय आपल्याकडे आहे का?

rajmata ahilyadevi holkar
किल्ल्याच्या आतील भुयारी मार्ग

वीटकामाची व दगडी कामाची सुंदर सज्जे असलेली तटबंदी मजबूत आहेत. सध्या किल्ल्यात खाजगी मालकाचे सहा ते सात कुटुंब राहत आहेत. काही तटबंदीवर आतल्या बाजूने अजूनही चुनेगच्ची पद्धतीची कलात्मक नक्षी शिल्लक आहे, नक्षीमध्ये चिन्हे दिसून येतात. ध्वजारोहनची जागा हि आजच्या घडीला व्यवस्थित आहे.

holkar fort
किल्ल्याचे मजबूत बुरुज व तटबंदी
ahilya fort
किल्ल्याचे मजबूत बुरुज व तटबंदी
राजमाता अहिल्यादेवी होळकर फोटो
किल्ल्याचे मजबूत बुरुज व तटबंदी

सरदार यशवंतराव फणसे व मुक्ताबाई यांचा जीवनातील बहुतेक काळ हा महेश्वरला गेला. महेश्वर दरबारी फणसे घराण्याला मानाचे स्थान होते. राणी अहिल्यादेवी होळकर यांनी इंदोर-महेश्वर ते पंढरपूर अशी आषाडी दिंडी सुरु केली होती. त्या दिंडीची सर्व जबाबदारी हि यशवंतराव फणसे यांची असायची.

अहिल्यादेवी होळकर चे फोटो
किल्ल्याचे दुसरे द्वार
राजमाता अहिल्याबाई होळकर फोटो
या Photo वरून द्वाराची भव्यता समजून येते
दाराच्या चोकटीची भव्यता व नक्षीकाम वाखण्याजोगे आहे

यशवंतराव व मुक्ताबाई त्या दिंडीबरोबर पंढरपूर पर्यंत पायी वारी करत असत. पुन्हा ती होळकरांची दिंडी महेश्वरच्या दिशेने मार्गस्थ झाली कि ते दोघे लासलगावच्या किल्ल्याला मुक्कामी येत असत. मात्र या किल्ल्याचा मुख्य वापर हा लष्करीदृष्ट्याच केलेला दिसतो. आजही होळकरांची दिंडी इंदोर ते पंढरपूर अशी वारी करते व शेवटचा मुक्काम हा पंढरपूरच्या होळकर वाड्यात असतो.

होळकरशाहीचे पहिले महाराजा यशवंतराव होळकर व इंग्रज यांच्यात हि या किल्ल्यावरून अनेक वेळा संघर्ष झालेला कागदोपत्री बघायला मिळतो. यावरून लासलगाव परिसर व किल्ला लष्करीदृष्ट्या किती महत्त्वाचा होता हे समजू शकते.

राणी अहिल्यादेवी यांनी राज्य परराज्यात जलसाठे निर्मिले मग त्याच्या कर्तृत्वातून लासलगावचा परिसर कसा सुटला असेल. या नजरेने आसपासच्या परिसरात अनेक हेमाडपंथी मंदिरे तसेच चिरेबंदी काळ्या पाषाणातल्या बारवा पाहावयास मिळतात. किल्ल्याच्या बाहेर इच्छापूर्ती गणेश मंदिर व एका बारवेचा निर्माण अहिल्यादेवी यांनी केलेला आहे. हे गणेश मंदिर आकाराने लहान असून प्रसिद्ध आहे. बारवेचे संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणात असून दोन मजली आहे. बारवेत दोन कमानी असून दोन्ही बाजूला देवळ्या पाहवयास मिळतात. एकदंरीत बारवेचे बांधकाम उत्कृष्ट व मनाला भावणारे आहे.

अहिल्याबाई की फोटो
किल्ल्याच्या शेजारची बारव
अहिल्याबाई होळकर चे फोटो
किल्ल्याच्या शेजारची बारव

राणी अहिल्यादेवींच्या इतिहासात आपल्याला एक कथा अशी ऐकण्यास मिळते कि, मल्हारराव होळकरांच्या मृत्यू नंतर काही वर्षांनी निमाड प्रदेशात दरोडेखोरांचा सामान्य जनतेला त्रास होऊ लागला होता त्यामुळे राणी अहिल्यादेवीनी किल्ले महेश्वर दरबारी एक पण ठेवला होता, जो कोणी या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल, जबर बसवेल त्याच्याशी मी माझी मुलगी मुक्तबाई हीचा विवाह लावून देईल तेव्हा त्या दरबरातील एक धाडसी भिल्ल किंवा आदिवासी तरुण पुढे आला व त्याने हा पण पूर्ण केला. त्यांनतर अहिल्यादेवीनी आपली मुलगी मुक्तबाई हीचा विवाह यशवंतरावाशी लावून दिला. पण या कथेचा कोठे हि कागदोपत्री उल्लेख मिळत नाही किंवा मला तरी अद्याप मिळाला नाही.

muktabai fanse holkar
मुक्ताबाई फणसे – होळकर
(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)

याच कथेचा फायदा घेऊन काही लोकांकडून अहिल्यादेवींनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले असे सांगितले जाते. अहिल्यादेवींनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले? का नाही? हा वेगळा विषय होऊ शकतो मात्र हि कथा आंतरजातीय विवाहाचे उदाहरण होऊ शकत नाही. कारण यशवंतराव फणसेंचे सध्याचे वंशज हे जातीने धनगर आहेत. तसेच ज्या इतिहासकारांनी यशवंतराव फणसे यांचा आदिवासी असा उल्लेख केला आहे त्यांनी त्याचे तत्कालीन दाखले दिले नाहीत त्यामुळे सध्याच्या माहितीवरून आपुन असा निष्कर्ष काढू शकतो कि, यशवंतराव फणसे हे जातीने धनगर होते व अहिल्यादेवींनी आपल्या मुलीचा विवाह हा जातीमधील तरूणाशीच लावला होता.

अहिल्यादेवी होळकर पोवाडाAhilyabai Holkar Powada

नानासाहेब होळकर हे सध्या फणसे घराण्याचे वंशज आहेत, असे ते सांगतात. सध्या त्यांचे वास्तव्य हे निफाडला असते. नानासाहेब होळकर हे फणसे घराण्याला दत्तक आले आहेत.

माहितीसाठी आभार :
नानासाहेब होळकर, निफाड, जि.नाशिक
फोटोसाठी आभार :
आनंद बोरा, अमर रेड्डी, प्रशांत परदेशी
अधिक फोटो पाहण्यासाठी Click करा

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]

राहुल वावरे

8 thoughts on “किल्ले लासलगाव : Ahilyabai Holkar Fort”

  1. Pingback: अहिल्यादेवी होळकरांच्या दूरदृष्टीमुळे आज कांद्याचं 'लासलगाव' ताठ मानेने उभं आहे.

  2. Dear
    Sir/Madam it’s a very good information and I am so lucky
    To getting above historical knowledge
    thank a lot
    Reguard
    Ulhas B Mahajan
    Yavatmal
    Maharashtra

  3. Bhau Fanase he dhangar nave te bramhin hote asa holkaranchi kaifiyat madhe tyancha ullekh milato fanase he ahilyadevinchya divan hote ani tyancha mulga yashwantrao fanse yanchyashi vivah zala hota he itihas manya ahe teva tumhi mahiti correct karun ghya

    1. तुम्ही लासलगाव किंवा निफाड ला गेला आहे का? होळकरांची कैफियत कोणी लिहिली आहे हे अजून कोणासही ठाऊक नाही. अहिल्यादेवींच्या काळात फणसे हे होळकरांचे दिवाण नव्हते.

  4. राहुल सर अभिनंदन…
    खूप छान माहिती दिली आहे.
    ‘किल्ले लासलगाव’ मनाला भावला.
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मुक्ताबाई फणसे यशवंतराव फणसे यांच्याविषयी माहिती मिळाली तसेच लासलगाव किल्ल्या संबंधी माहिती मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *