Skip to content

पानिपत व सुभेदार मल्हारराव होळकर

जेष्ठ इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांच मत

दुसर्यांचा कपटाने आपण नामोहरम होण्यास तो ( मल्हारबां) तयार नव्हता. महाभारताचे सार हेच आहे. श्रीकृष्णाचा वागणुक याप्रमाणेच झालेली दृष्टीस पडते. मग मल्हाररावाने याप्रमाणे वर्तन ठेवण्याचा प्रयत्न केला त्यात चुक कोणती?

बरे, मल्हारराव नजीबाशी कधीच विरुद्ध झाला नाही किंवा लढला नाही हेही खरे नाही. राघोबाने नजीबाला वेढुन दिल्लीत कोंढले तेव्हा सन १७५७ साली मल्हारराव त्याबरोबर होता. पानिपतानंतरसुद्धा सुरजमलाने दिल्लीस नजीबावर स्वारी केली तेव्हा त्याचा मदतगार होता. हेच काय पण सुरजमाच्या मरणानंतर त्याच्या मुलाने नजीबावर बापाच्या मृत्युचा सुड उगवण्यासाठी त्वेषाने मोहीम केली, तीत ही मल्हाररवच जवाहरसिंगाचा सहायकर्ता झाला. मल्हारबा शत्रुपक्षा चे ही स्नेही भासण्याचे कारण, तो कोणतेच गोष्ट तुटेल इतकी ताणणारा तो नव्हता.

शत्रु हातात सापडला तर तो मारुनच टाकावा, अशी त्याची वृत्ती नव्हती. यामुळे त्याचे शत्रुशी सुत असेल अशा आभास करणे शक्य होते; पण राजकरणात तो, सदैव शत्रु किंवा सदैव मित्र कोणीच असत नाही अशा मताचा असल्यामुळे त्याची तसी वागणुक होत असे. सुरजमलाशी त्याने केव्हा स्नेह तर केव्हा शत्रूत्व केले व वजीर गाजीउद्दीन याच्याशी त्याची याच जातीची वर्तणूक होती.

वाईट माणुसही सदाच वाईट राहतो किंवा चांगला माणुस कधीच वाईट होत नाही, असे त्यास वाटत नव्हते. पानिपतच्या लढाईत विरुद्ध बाजुने लढलेल्या शुजासही त्याने पुढे इंग्रजांविरुद्ध मदत केली व मोठा पराभव सोसला. जर आपण पानिपताहुन पळुन येवुन पेशव्याचा घात केला आहे. अशी त्याची समजुत असती तर त्यास १७६२ त दक्षिणेत जाऊन माधवरावाची बाजु घेण्याची कारण काय होते?

तो पळुन आला याबद्दल खुद्द नानासाहेब पेशव्याची गैरमर्जी झालेली दिसत नाही. उलट उत्तर हिंदुस्थानाचा सर्व कारभार त्याने पुर्ववत मल्हारबावर सोपविला. याबद्दल त्याची अनेक पत्रे मल्हारबास लिहलेेली उपलब्ध आहेत. ही गोष्ट नाना फडणीसास सुद्धा गैर वाटलेली नाही. असे त्यांचा पत्रावरुन उघड आहे. म्हणजे पानिपतानंतर उत्तरेतील मराठ्यांची राज्याची जबाबदारी अंगावर घेवुन संभाळण्यास अनुभवाने, शहाणपणाने व पराक्रमाने तोच एक पुरुष लायकसा उरलेला आहे. याची पेशव्यास खात्री होती असे ठरते.

यावरुन उघड आहे की, जर मल्हारबा जिवंत परत न येता तर मराठी राज्याची या आपत्प्रसंगी मोठी कुंचबणा झाली असती.

सदर्भ:
पानिपत १७६१ त्र्यं . शं . शेजवळकर

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]

राणी अहिल्यादेवी होळकरांनी भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कार्यांची यादी पहा.
अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी कार्य
दत्ता शिपलकर
Latest posts by दत्ता शिपलकर (see all)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *