Skip to content

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – Ahilyabai Holkar Information

प्रस्तावना :

लोकमाता, राजमाता, विरांगणा, पुण्यश्लोक, देवी, गंगाजल निर्मळ, मातोश्री या सगळ्या पदव्या अहिल्याबाई होळकरांना लोकांनी अर्पण केल्या होत्या. मनापासून, हृदयापासून! कुठलाही पदवीदान समारंभ न होताही, या पदव्या आज दोनशे वर्ष टिकून आहेत. टिकणार आहेत. अत्यंत प्रेमाने त्यांनी सामान्य माणसाचे हित बघितले. प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखाने जगात यावं, इकडे लक्ष दिले. त्या धार्मिक होत्या हे तर, सर्वाना माहित आहे, परंतु एक राज्यशासक म्हणून त्यांचे कर्तृत्व फार महत्त्वाचे आहे. अपार शहाणपण आणि तडफ असणारी ती अलौकिक स्त्री होती. खंबीर मन आणि चातुर्य यामुळे, अनेक संकटे त्यांनी पार केली. न्यायदान तर इतके अचूक की, भांडणाऱ्या दोन्ही बाजू त्यांना दुवा देत. रणनीतीची त्यांना जाण होती. एका नजरेत हिशोब करण्यात त्या तरबेज होत्या. प्रजावत्सलता आणि परदुःखाने व्याकूळ होणार मन, त्यांना लाभलं होतं.

हि माहिती याच शोधप्रबंधातील प्रकरण ४ मधील आहे. एकूण ७ प्रकरण आहेत.

त्या स्वतः रणांगणात युद्दाला उतरत, तोफा ओतणे, जंबुऱ्याच्या गोळ्या तयार करणे, तिरबाजी, याचे शास्त्र त्यांना माहीत होते. घोड्यावर स्वार होण्याचे कौशल्य तर होतेच, पण त्यांनी स्त्रियांचे सैनिकदलही तयार केले होते. मातीवर, देशावर निष्ठा, बाणेदार वृत्ती, साधी राहाणी, उच्च चारित्र्य हे त्यांचे विशेष! त्यांचे कौटुंबिक जीवन अत्यंत दुःखी, काळेकुट्ट असे होते. पण प्रशासन धवलशुभ्र, निष्कलंक असे! त्या धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या. ठिकठिकाणी नदीघाट, देवळे, दर्गा, धर्मशाळा, विहिरी, रस्ते असे त्यांचे कार्य आहे. अन्नछत्रे आणि पाणपोया आजही चालू राहिल्या आहेत. अनेक जण आपली भूक-तहान तिथे शांत करीत आहे. हे सारे कार्य जातीधर्मात अडकलेले नाही.


सर्व धर्मीयांसाठी त्यांनी मदत केली. म्हणूनच केवळ ‘धार्मिक’ इतकीच त्यांची ओळख नाही. त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी केलेले कार्य आजही जिवंत आहे कारण मंदिरे, दर्गे, अन्नछत्रे वगेरे ठिकाणी त्या त्या कार्याच्या खर्चासाठी त्यांनी सालीना उत्पन्न करून ठेवले होते तसेच अनेक बारावा लोकांची, पशुपक्षांची आणि शेतीची पाण्याची गरज भागवत आहे. त्यांची ही दूरदृष्टी चकित करणारी आहे. त्यांच्यात अनेक सदगुण बहरास आलेले होते. अठरा सतींच्या किंकाळ्या आणि सर्व जीवलगांचे मृत्यू त्यांना बघावे लागले. शेवटी त्या एकट्या राहिल्या. संसाराचा हा उन्हाळा सोसून, ही बाणेदार स्त्री, कुणालाही शरण न जाता कर्त्यव्यकठोर असा कर्मयोग आचरत राहिली. प्रजेचं सुख बघत राहिली. दुःखाला खंबीरपणे सामोरे जातांनाही आपले कर्त्यव्य ठामपणे त्यांनी केले. हे सर्व वाचकालाही सामर्थ्य,शक्ती देणारे आहे.

परिचय :

  • जन्म : ३१ में १७२५
  • जन्म ठिकाण : चोंडी ता. जामखेड जि. अहमदनगर(महाराष्ट्र)
  • रिजंट कार्यकाळ : ११ डिसेंबर १७६७ – १३ ऑगस्ट १७९५
  • मृत्यू : १३ ऑगस्ट १७९५
  • मृत्यू ठिकण : किल्ले महेश्वर,जि.खरगोण(मध्यप्रदेश)
  • संस्थान राजधानी : किल्ले महेश्वर
  • सासरे : सुभेदर मल्हारराव होळकर(१)
  • पती : शूरवीर खंडेराव होळकर
  • मुलगा : सुभेदर मालेराव होळकर
  • उपाधी : पुण्यश्लोक, मातोश्री, लोकमाता
  • वडील : माणकोजी शिंदे(पाटील)

मल्हारराव होळकरांचा आदीचा काळ :

इ. स. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन हिंदूपदपादशाहीची संस्थापना त्यांनी केली. काही काळाने मराठ्यांचे स्वराज्य भावनेचे रूपांतर मराठा साम्राज्यात झाले. त्या काळात मराठ्यांचे राजे साताऱ्याला राहात असत. इ. स. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपत्री शाहूची सुटका झाली. पुढे शाहू आणि ताराबाई यांच्यात इ. स. १७०८ मध्ये खेडचे युद्ध होऊन ताराबाईचा पराभव झाला आणि शाहू विजयी झाले. परंतु सेनापती चंद्रसेन जाधवांचा कल ताराबाईंकडे असल्याने छत्रपती शाहूंची स्थिती अस्थिर झाली. अशा वेळी श्रीवर्धन येथील बाळाजी विश्वनाथ यांनी सैन्य गोळा करून शाहू महाराजांचे शासन स्थिर करण्यासाठी कठोर परिश्रम केले. म्हणूनच छत्रपती शाहूनी इ. स. १७ नोव्हेंबर १७१३ मध्ये मंजरी या गावी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा पदी नेमले. कारण त्यांनी पश्चिम किनाऱ्यावरील कान्होजी आंग्रे यांना बुद्धी चातुर्याने ताराबाईकडून आपल्याकडे वळविण्यात यशस्वी झाले होते. कान्होजी सारखा दर्यावर्दी सारंग शाहू महाराजांच्या सेवेत रूजू केला. साताऱ्यास जाऊन महाराजांचे दर्शन घेतले आणि कान्होजी आंग्रे यास सारखेलची पद देऊन वस्त्रे व सिक्के कट्यार पाठविली.

बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद बंधूना मदत करून मोगल सम्राट फरूखसियरकडून इ. स. १७ मार्च १७१९ ला तीन सनदा १.स्वराज्य २.सरदेशमुखी आणि ३.चौथाई प्राप्त केल्या. ३ मार्च १७१९ रोजी चौथाई व ता. १५ मार्च १७१९ रोजी सरदेशमुखीचा करार बादशहाने करून दिला व शाहूच्या कुटुंबातील सर्व मंडळीची मुक्तता केली.

२० मार्च १७१९ रोजी बाळाजीनी दिल्ली सोडली आणि ४ जुलै १७१९ ला साताऱ्यास येऊन पोहोचले. परंतु ह्या सनदेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच २ एप्रिल १७२० रोजी बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू सासवड येथे झाला. बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर १७ एप्रिल १७२० रोजी त्यांचा मुलगा बाजीराव यास पेशवा पदी नेमले. चिमाजी अप्पास पंडित ही पदवी दिली आणि दाजी थोरात कडील काढून घेतलेली सरंजाम व सरदारकी दिली. पुरंदरे यास मुतालकीची वस्त्रे दिली ह्याच गोष्टी जुन्या अनुभवी मंडळींना आवडल्या नाहीत. त्यामध्ये नागपूरचे रघुजी भोसले, श्रीपतराव प्रतिनिधी आनंदराव सुमंत, दाभाडे नाशिराम यांचा समावेश होतो.

अहिल्याबाई होळकर पोवाडा | Ahilyabai Holkar Powada
शाहीर बाळासाहेब काळजे

श्रीपतराव प्रतिनिधी आणि पेशवा बाजीरावात मराठा राज्याच्या धोरणाविषयी मतभेद निर्माण झाले. अशा वेळी घरात भांडत बसण्यापेक्षा बाहेर पडावे. मराठी साम्राज्याचा विस्तार होईल. या उत्तरेकडील आक्रमक विस्तारवादी धोरणाला जुन्या जाणकार अनुभवी सरदार मंडळींचा विरोध राहील याची खात्री थोरल्या बाजीरावाला असल्यामुळेच त्याने जुन्या मंडळींना बाजूला सारून आपले नवीन धोरण अंमलात आणण्यास नवीन सरदार निर्माण केले.

बाजीरावांनी मराठा स्वराज्याचे रूपांतर मराठा साम्राज्यात केले. हे साम्राज्य निर्माण करीत असताना बाजीरावाने तरुण नवीन सरदार घडविले. त्यात राणोजी शिंदे, मल्हाराव होळकर, उदाजी पवार इत्यादी होते. राणोजी बाळाजी विश्वनाथाच्या काळापासून पेशव्यांकडे होते. शिंदे-होळकर पेशव्यांचे सरदार असले तरी पालखेडच्या मोहिमेने एकत्र आले आणि मग मात्र जोडी जमून बहुतेक सर्व स्वाऱ्यांत शिंदे-होळकर असत.

अहिल्यादेवी होळकर पोवाडा । Ahilyabai Holkar Powada
शाहिर रामदास

इ. स. १७२० ते १७४० पर्यंत बाजीराव पेशव्यांनी राणोजी शिंदे व मल्हारराव होळकरांच्या मदतीने मराठी राज्याचा विस्तार केला. बाळाजी पंताच्या कारकिर्दीच्या अखेरीस मल्हारराव होळकरांनी पवारांच्या मदतीने माळव्याचे राजकारण सुरू केले होते. बाळाजीने दिल्लीहून परत येताना बाजीरावास उत्तरेतच ठेवले. इ.स. १७२३-२४ च्या दरम्यान मल्हाररावांनी आपले ठाणे इंरोरास नेले आणि उदाजी पवारांनी धारचा कब्जा घेतला.

बाजीरावांकडून मल्हारराव होळकरांना माळव्यांची सनद :

माळवा विजयाने होळकर शिंदेंच्या कर्तृत्वाला सुरुवात झाली. या विजयाचे श्रेय प्रामुख्याने होळकर शिंदे आणि उदाजी पवारांचे आहे. माळवा विजयात उदाजी पवारांची कामगिरी मोलाची ठरली. “वाटणी संबंधी बाद निर्माण झाला. पवारांना माळव्यात अर्धा मोकासा हवा होता.त्यांना अर्धा प्रांत दिला तर होळकर शिंद्यांचे काय करायचे असा प्रश् न होता. या प्रकरणामुळे पवार दुरावले. होळकर शिंदे बळावले. माळव्यांचा स्वतंत्र कारभार होळकर,शिद्यांना देण्यात आला.

२२ नोव्हेंबर १७३१ रोजी मल्हारराव व राणोजीच्या नावे संयुक्त सरंजाम दिला. पेशव्यांच्या उत्तरेकडील राजवटीचे पहिले मोठे सरंजामदार होळकर शिंदेच होते. इ. स. १७३३ साली होळकर शिंदे यांच्या ताब्यात माळव्यातील जो मुलुख होता तो पाच परगणे व साडेतेरा सरदारे पेशव्यांच्या ताब्यात यावेळी आला असून त्यांनी शिंदे व होळकर सरदारांत वाटून दिली. यादी – सन सालासीन (इ.स. १७३२-३३) जमा झाले. मजकूर महात्मा निहाय सुभा प्रांत माळवा, ——– , ९० सफर,सरंजामी राजश्री मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे, श्रीमती राजश्री चिमणाजी बल्हाळ महाल बितपशील.

५. कित्ता परगणे मजकूर
१.परगणे डोंगरपूर यांचे वाटणीपैकी एकूण महाल
१. परगणे दाहाद
१, परगणे सालोत
१. परगणे सुप
१. परगणे आळी
१३. कित्ता सरकारने
१. सारंगपूर व उज्जेन
१. सरकार मंदसोर
१. सरकार पिंडावा कोळी गांगुर्णा
१. सरकार भेलसे
१, सरकार मांडवगड
१. सरकार चंदेरी बुद्रक व खुर्द
१. सरकार अढयाबाद
१. सरकार आलमगीरपूर
१. सरकार गदे
१. सरकार रहाबाद
१. सरकार हांडेपैकी महाल ७ एकूण निमे
१, सरकार कोटे
१. सरकार बुंदी
———————–
१३. सरकार

मल्हारराव होळकरांनी बाजीरावांच्या कारकिर्दीत प्रत्येक युद्धात, मोहिमेत भाग घेऊन मदत केली. माळवा बुंदेल खंड आणि दिल्लीपर्यंत मराठ्यांचे राज्य व प्रभा प्रस्थापित झाली.

मल्हारराव होळकर पोवाडा । Malhar rao Holkar Powada
शाहीर सुरेशराव सूर्यवंशी

कुंभेरी युद्ध आणि खंडेरावांचा मृत्यू :

बादशहाने सफरदरणेगाची वजीर पदावरून हकालपट्टी केल्याने त्या दोघांत संघर्ष सुरू झाला. त्यामुळे बादशहाने मराठ्यांना मदत मागितली. त्यानुसार पेशव्यांनी रघुनाथदादा, होळकर, शिंदेंना पाठविले परंतु मराठे दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच सफरदरजंगाचे पारिपत्य झाले होते. थोड्याच दिवसांत सफरदरजंगाचा मृत्यू झाला. इ. स. १७५४ मध्ये याचवेळी आग्रा अजमेरच्या सुभ्यावरून मराठ्यांचे सुरजमल जाटाशी वितुष्ट येऊन युद्ध सुरू झाले.

रघुनाथराव, मल्हारराव होळकर यांनी कुंभेरीस पेठा दिल्यावर गाजीउद्दीन बादशहाचा तोफखाना घेऊन मराठ्यांच्या मदतीला आला. मराठे व गाजीउद्दीनाचे सख्य पाहून बादशहाने सुरजमलास गुप्त पत्र पाठवून त्यास टिकाव धरण्यास सांगितले व स्वत: बाह्यत मराठ्यांना पण आतून जाटास मदत करण्यास फौजेसह येऊ लागला. पण हे कारस्थान गाजीउद्दीनास कळताच त्यांनी मल्हाररावांना सोबत घेऊन दिल्लीच्या सैन्यावर छापा घालून फडशा उडविला. बादशहा पळून दिल्लीला परत गेला तर होळकर व गाजीउद्दीन यांनी वेढा घातला. कुंभेरीचा किल्ला मजबूत असून वाळवंटामुळे सुरूंग लावणे शक्य नव्हते. जाट चाळीस लक्ष रुपये देण्यास तयार होता, तर रघुनाथरावांची मागणी एक कोटीची होती.

गागरसोल, ता.कुंभेरी जि.भरतपूर(राजस्थान)
येथील खंडेराव होळकर यांची मुख्य समाधी.

कुंभेरीस मोर्चे लावण्याची जबाबदारी खंडेरराव होळकर यांच्यावर होती. खंडेराव खंदक निरीक्षण करीत असताना खंडेररावास जांबोऱ्याची एक गोळी लागली आणि खंडेररावांचा मृत्यू झाला. पुत्राच्या मृत्यूची बातमी ऐकून मल्हारराव होळकर फार दुःखी झाले शेवटी जय्याप्पा शिंद्यांच्या मध्यस्थीने रघुनाथरावांनी ६० लाख रुपये खंडणी घेऊन वेढा उठविला. जय्याप्पा शिंदे रामसिंगच्या मारवडला गेले. या घटनेमुळे होळकर-शिंदे तेढ परत वाढली. सुरजमल जाटाचा शिरच्छेद करून त्याचे शिर यमुनेत टाकण्याची प्रतिज्ञा मल्हाररावांनी केली. ही बातमी सुरजमलाची पत्नी किशोरीदेवीला कळाली. त्यामुळे ती भयभयीत होऊन रूपराम काटारीमार्फत शिंदेंशी तहाची बोलणी लावली. रघुनाथरावांचे मन कुंभेरीचा वेढा उठविण्यासाठी वळविले. प्राप्त परिस्थितीत सूजरमल जटांशी तह करावा असे शिंदेंचे मत होते, आणि मल्हारराव होळकर यांची इच्छा नसतानाही तह झाला आणि अशाप्रकारच्या अनेक प्रसंगांतून शिंदे-होळकर वाद वाढत गेला.

Prajesathi Khanderavani Dile Balidan
Khanderao Holkar Song

अहिल्यादेवींच्या राजकीय व प्रशासकीय नेतृत्वाचा विकास :

मल्हाररावांचा आपल्या सुनेच्या योग्यतेवर पूर्ण विश्वास होता. अहिल्याबाई या बुद्धीमान, कुशाग्र असल्याने राजकारभाराची जबाबदारी अहिल्याबाईवर सोपवत. अहिल्याबाई ती सर्व कामे अतिशय चातुर्याने करीत असत. खंडेरावाच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांच्या विनंतीवरून अहिल्यादेवी सती न जाता राजकारभारात सक्रिय झाल्या. सुभेदार मल्हारराव लढाईवर असताना अहिल्याबाईंना वेळोवेळी पत्र पाठवून राजव्यवहाराचे, रणनितीचे, युद्ध साहित्याचे, प्रजापालन, न्यायदान, प्रशासन याविषयी सूचना करत असत. अहिल्याबाईस राजकीय व प्रशासकीय कारभाराचे शिक्षण मिळत गेले. मल्हारराव होळकर हे अहिल्याबाईचे राजकीय गुरू झाले.
मल्हाररावाने अहिल्याबाईस पाठविले पत्र पुढीलप्रमाणे –“चिरजीव अहिल्याबाई प्रति, मल्हारजी होळकर आशीर्वाद उपरी कुशल जाणोत राजकीय लिहित जाणे. विशेष आपणास पत्र श्रीमंतांचे की, रा. कुसाजी शिंदे मौजे पिंपरखेड येथील संबुगीर गोसावी याने कुसाजी मजकूर याचा शेतमळे व घर जप्त केले म्हणून कळले. त्यास वाफगावी जेथे मुले माणसे त्याची असतील तेथे तुम्हा गोसावी यासी ताकीद उत्तम प्रकार करून इसम मजकुराची जप्ती सेतमळे याची जे असतील त्याची ताकीद करून सोडून द्यावी.” हे पत्र लिहिले आहे(३.१२.१७६२)

वरील पत्राच्या विश्लेषनाचा विचार करता शंभूगीर गोसावीयाने पिंपरखेडच्या कुसाजी शिंदे पाटलाचे शेतमळे व घर जप्त केले होते व त्याच्या पुतण्यास वाफगावी कैदेत ठेवले होते. पेशव्याने दिलेल्या आज्ञेप्रमाणे जप्ती दूर करून शेतमळ्याची मोकळीक करावी व वाफगावाहून त्याच्या पुतण्यास सोडवावे याबाबत मल्हाररावाने अहिल्याबाईस सांगितले होते. मल्हाररावाने आपल्या हयातीतच एखाद्या व्यक् तीस इनाम देणे, रोजगार देणे, अशी राज्यकारभारविषयक कामे अहिल्याबाईकडे सोपविली होती व तिला राज्यकारभारात तरबेज करून पुढील तजवीज करून ठेवली होती. अशा प्रकारे आपल्या सुनेला मुलगा मानून मल्हाररावाने अहिल्याबाईच्या नेतृत्वगुणांना वाव दिला. अहिल्याबाईंच्या सासू गौतमाबाई यासुद्धा कर्तव्य कठोर होत्या. त्याचा प्रभावही अहिल्याबाईंच्यावर पडल्याचे दिसून येतो. मल्हारराव युद्ध मोहिमेवर असताना युद्धाची सविस्तर माहिती अहिल्याबाईस कळवीत असे. दुसऱ्या पत्रात पुढील प्रमाणे उल्लेख मिळतात. सोनपत पानपतचे लढाईवर जाते समयी हरी प्रसाद भट परसोई यांनी प्रश् न दिला होता याज करीता भटची यास २५ बिगे जमीन व चार आणे प्रमाणे रोजींदा करुन देण्याबद्दल अहिल्याबाईचे नावे पत्र होते.(०६.०९.१७६२)

अशा प्रकारे मल्हारराव पानिपतच्या लढाईवर निघते समयी हरिप्रसाद भट परसाई याने ज्योतिष विषय सल्ला दिला होता. त्यामुळे त्यास २५ बिघे जमीन व रोजचे ४ आणेदेण्याविषयी पत्रातून मल्हाररावानी अहिल्याबाईस सांगितले होते. अशा प्रकारे वरील विश्लेषणाचा विचार करता पुस्तकी शिक्षणापेक्षाही प्रत्यक्ष शिक्षण व्यवहाराला अत्यंत उपयोगी पडते व तेच अहिल्याबाईला जास्त मिळाले. पुस्तकी शिक्षण कथा पुराणांच्या माध्यमातून झालेले होते. परंतु प्रत्यक्षरित्या घेतलेल्या व्यवहारी शिक्षणाचा त्यांना राज्यकारभारात उपयोग झाला. इंदोर स्टेट गॅझेटिअरमध्ये असे म्हटले आहे की, मल्हारजी हे जेव्हा जेव्हा बाहेर जात असे तेव्हा ते आपला सर्व कारभार सुनेवरच सोपवून जात असे. त्यावेळची कागदपत्रे पाहिली म्हणजे तोफांच्या गाडीचे पाटे घेणे अथवा संस्थांच्या बगीच्यास लागणाऱ्या बैलगाड्या घेणे ह्या व्यवहारी गोष्टींचा व राजकीय नेतृत्वाचा विकास झाला.

सुभेदार मल्हारराव होळकरांचा मृत्यू :

पानिपताने हताश न होता मराठ्यांनी पुन्हा कंबर बांधली. या कामात भोसले, माधवराव व सुभेदार मल्हाराव होळकर हे अग्रगण्य होते. माधवरावांनी दक्षिणेकडील मोंहीम हाती घेतली व शिंदे, होळकरांनी उत्तरेकडील मोहीम हाती धरली. इ. स. १७६१ पासून इ. स. १७६६ पर्यंत म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या घडीपर्यंत मल्हाररावांनी उत्तरेच्या राज्याला समर्थपणे धरून मराठ्यांची घडी पुन्हा पूर्ववत बसवून दिली. वरील विश्लेषणावरून मल्हाररावांच्या अंगी असलेल्या विविध नेतृत्व गुणांचा परिचय होतो. ते तत्कालीन कालखंडातील अत्यंत शूर, मुत्सदी, धाडसी नेतृत्व मराठ्यांना लाभले होते.

इ. स. १७६६ मध्ये दुसऱ्यांदा मराठ्यांनी उत्तर मोहीम आखली. या मोहिमेचे नेतृत्व रघुनाथरावराव दादाकडे होते. होळकर, शिंदेही सोबत होते परंतु त्याचवेळी मल्हाररावांना कानाची व्यथा झाली. “अलंपूर प्रांत झासी या मुकामास आल्यावर श्रीमंत सुभेदार बहुतच काहली झाले दैवी मानवी उपाय करून अनुष्ठान दानधर्म बहुत काही केले आयुमर्याद करून गुणास न येता शेवटी भूमीवर उतरले, उपरातीक दुसरे रोजी वैशाख श. ११ मंगळवारी पावणे दोन प्रहर दिवस येता देवाज्ञा झाली.”

अशा रितीने मल्हाररावांचा मृत्यू १६ एप्रिल १७६६ ला आलमपूर, ता.लहार जि.भिंड(म.प्र) येथे झाला. मृत्यूनंतर खंडेरावांचा मुलगा मालेराव यांच्या हाती इंदोरचा राज्यकारभार आला. त्यांना होळकरांची सुभेदारीची वस्त्रे मिळाली. सुभेदार मालेराव होळकर ह्यांचे नाव सनद की तुम्हावर सर्व प्रकारे कृपा असे तर कैलासवासी मल्हारजी होळकर याप्रमाणे सरंजाम महाल गाव, खेडी, सुदामतप्रमाणे सरहुकूम सरदारीचा बंदोबस्त करून फौज सरंजामनिशी सेवा एकनिष्ठपणे करीत जाणे. सन १७६६ मध्ये मालेरावास सुभेदारीची वस्त्रे मिळाली. त्यावेळी पेशव्यांनी अहिल्याबाई होळकरांना पत्र पाठविले होते. ते पुढीलप्रमाणे, “सविस्तर गंगाधर यशवंत सांगतील. त्याप्रमाणे तजवीज करून आपला सर्व बंदोबस्त महाल, गाव, खेडी याचा अर्थ पूर्ण करणे.”

पेशव्यांच्या पत्रानुसार मालेरावास फौज देऊन जवाहरमाल जाटाच्या मोहिमेवर पाठविले. जवाहरमल जाटाने गतवर्षाची खंडणी मान्य केल्याने मालेराव या मोहिमेहून इंदोरला परत आले. परत आल्यावर मात्र, त्याची प्रकती बिघडली. १७६७ रोजी मालेरावाचे निधन झाले. यानंतर तुकोजींनी मुलखगीरी करावी आणि कारभार अहिल्याबाईंनी करावा असे ठरले. याबाबतचे महादजी शिंदेंचे पत्र अतिशय बोलके आहे ते लिहितात, “होळकरांच्या घरची चाल सर्वत्र माहितीच आहे. कै. सुभेदार असता गौतमाबाई कारभार करीत होती. ती वारल्यावर पुढे अहिल्याबाई कारभार करू लागली. ही चाल त्यांचे घरी पहिल्यापासोन आहे नवी नाही.” म्हणजे पर्यायाने तुकोजींना होळकरशाहीची वस्त्रे मिळाली तर सर्व कारभाराचे अधिकार मात्र अहिल्याबाईंच्याच हातात होते. केवळ मोहिमेची जबाबदारीच ती काय तुकोजीरावांकडे होती.

आलमपूर, ता.लहार जि.भिंड(मध्यप्रदेश)
येथील सुभेदार मल्हारराव होळकर यांची प्रमुख समाधी.

अहिल्यादेवी होळकरांच्या जहागीरीचे स्वरूप :

होळकरांच्या सरदारीचे राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत जहागिरीचे प्रामुख्याने दोन भाग होते.
१)खासगी जहागीर,
२)जाहगिरी ऊर्फ दौलत,

  • खासगी जहागीर :
    इ. स. १७३३ मध्ये बाजीराव पेशवे यांचेकडून सुभेदार मल्हारराव होळकरांना आपली पत्नी गौतमाबाईच्या नावाने खासगी जहागीर मिळाली. त्या जहागीरीचे उत्पन्न पुढीलप्रमाणे होते, २६३००० प्रो. महेश्वर चोळी प्रो. इंदूर पो (पैकी) हरसोल प्रो. महतपूर पो. जगोटी व करंज माकडोन, वगौरे ३६०१० दक्षिण प्रांती चांदवड पो गाव कोरेगाव मोगलाईकडील वगैरे ३६०१० दक्षिण प्रांती चांदवड पो. गाव कोरेगाव मोगलाईकडील बरहुकूमयाद २९९०१० यावरून असे दिसून येते की, गौतमाबाईंच्या काळात खासगी जहागीरीचे उत्पन्न ३ लाख रुपये होते. नंतर खासगी जहागिरीचा प्रदेश वाढत जाऊन अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत १५ लाख रुपये खासगी जहागिरीचे उत्पन्न झाले होते. गौतमाबाईंच्या काळात खासगी जहागिरीचा विनियोग फारसा झालेला आढळत नाही. अशा प्रकारची खासगी उत्पन्नाच्या जहागिरीचे स्वरूप फक्त होळकरांच्या स्त्रियांसाठीच होते. शिंदे, पवार, भोसले, गायकवाड या सरदारांच्या स्त्रियांना ही व्यवस्था नव्हती. सुभेदार मल्हारराव होळकरांना पेशव्यांकडून ती खास स्वरूपात मिळाली होती. त्यामुळे होळकरांच्या स्त्रिया खासगी उत्पन्नाचे प्रशासकीय काम पहात असत. याचप्रमाणे गौतमाबाईंच्या मृत्यूनंतर खासगी व सरकारी प्रशासन अहिल्यादेवीच पहात होत्या. यातूनच त्यांच्या राजकीय व प्रशासकीय नेतृत्व गुणांना वाव मिळाल्याचे संशोधनातून दिसून येते. गौतमाबाईंच्या तीन सवती आणि अहिल्याबाईंच्या ८ सवती यांना मिळालेले धनही या खासगी मिळकतीत सामावलेले असावे कारण त्या सती गेल्यामुळे त्यांचे किडूकमिडूक असेल ते अहिल्यादेवींच्या गंगाजळीत आपोआप आले असावे. याशिवाय राजपुरुषांना संक्रांत, दसरा या निमित्ताने आणि इतर मंगल कार्याच्या निमित्ताने भेटी मिळत. अहिल्यादेवी स्वतःला या निमित्ताने दर वर्षी चोळीसाठी म्हणून एक लाख तेरा हजार आठशे रुपये मिळत अशारितीने सुभेदार मल्हाररावांच्या मृत्यूसमयी १६ कोटी रुपये खासगी जहागिरीचे उत्पन्न शिल्लक असल्याचे उल्लेख मिळतात. या १६ कोटी रुपये शिल्लक असलेल्या रकमेवर आणि १५ लाख रुपये उत्पन्नाच्या खासगी जहागिरीच्या प्रदेशावर अहिल्यादेवीची संपूर्ण मालकी होती. १६ कोटींचे द्रव्य आणि १५ लाखांची मिळकत तसेच प्रत्येक महालातून येणारी शेरी नजराणा असे उत्पन्न खासगी जहागिरीचे होते. प्रत्येक परगण्यातून अहिल्यादेवीस दरमणी दोन शेर या हिशोबाने शेरी नजराण्याचे उत्पन्न मिळत असे. इ. स. १७८० साली पुढीलप्रमाणे शेरी नजराण्याचे उत्पन्न मिळाले होते.

२४, १४५-९-० प्रांत स्वदेश पैकी
०७८६६-११-० प्रांत नेमाडपैकी
५७, २९७ – ०-० प्रांत माळवापैकी
८९,०३०९, ४-० गावगन्ना
शेरी नजराण्याऐवजी गावे
११६६-१०-० प्रांत दक्षिण भाळनेर येथील मौजे भामरे उखलवाडी
१६१५०-०-० प्रांत हिंदुस्थान
२७, ३१६-११-००
११६६-१०-० प्रांत दक्षिण भाळनेर येथील मौजे भामरे उखलवाडी
१६१५०-०-०
२७, ३११६-११-०० चोळीऐवजी फुटगाव
२६, ३०० प्रांत दक्षिण
८७,५०० प्रांत हिंदुस्थान
१३,५०० परगणे सावेर
७००० तालुके केली विजेता परगणे निंबहेडा
१००० तालुके सोमानी प्रांती नखर
१००० मौजे दुर्जनपुरा परगणे हसलपूर
१०००० परगणे कस रिया
१५००० परगणे भोरू पिंपळी प्रांत जैपूर
२०० मौजे सेत
८५,५००
१,१३,८००-०-० तेरीज एकदर जमेबद्दल
८९,३०९-४-० शेरी नजराणा
१,४३,८००-०-० गावगन्ना चोळी व फूटगाव व जहागीर
२५, ३१६-०-० प्रांतवार गावगन्ना
२,३०,४२५-१५-० शिवाय भेटी व नजराणे भेटीची पातळे व बागांपैकी उत्पन्न.

अशा रीतीने प्रांत स्वदेश, प्रांत माळवा, प्रांत नेमाड, प्रांत हिंदुस्थान, प्रांत दक्षिण येथून येणारी शेरी नजराण्याचे उत्पन्न आणि खासगी जहागिरीतील महत्त्वाचे उत्पन्न खासगीकडे जमा होत असे. खासगी जहागिरीच्या कामकाजासाठी निराळी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती. यातूनच अहिल्यादेवींचे प्रशासकीय नेतृत्व घडत होते. खासगी जहागिरीचा हिशोब सरकारी हिशाबापेक्षा वेगळा ठेवला जात असे. त्यासाठी स्वतंत्र नोकरवर्गाची नेमणूक करण्यात आलेली होती. अहिल्यादेवींच्या काळात गोविंदपंत गानू हे खासगी जहागिरीचे कारभारी म्हणून कामकाज पहात होते. अहिल्यादेवींनी जी लोककल्याणकारी कामे केली जे दानधर्म केला, संपूर्ण भारतभर जी मंदिरे बांधली तो सर्व खर्च खासगीच्या उत्पन्नातून केला, असे संशोधनातून स्पष्ट होते. सुभेदार मल्हाररावांच्या कारकिर्दीत त्यांच्या जहागिरीत वाढ म्हणजे खासगीच्या जहागिरीतही वाढ होत असे हीच पद्धत अहिल्यादेवींच्या काळातही अस्तित्वात होती. त्यामुळे दौलतीच्या उत्पन्नाबरोबर खासगी जहागिरीचेही उत्पन्न वाढे. उदा. इ. स. १७७० माधवराव रघुनाथ कमाविसदार परगणे मजकूर येथील गाव साल. मजुकरापासून खासगीकडे ठेवित असे, एकूण अठरा गावांची लावणी आबादी उत्तम होणेचा बंदोबस्त करणे. तेथील कामकाज तहसील वगैरे निराळी दाखवित जाणे. अशा रीतीने खासगीच्या महालात भर पडत असे. गौतमाबाईंच्या कारकिर्दीत गौतमाबाई आणि सुभेदार मल्हारराव होळकरांच्या इतर पत्नी यांचे द्रव्य खासगीच्या जहागिरीत जमा होत होते. याशिवाय सुभेदार मल्हारराव होळकरांची जी खासगी गावे होती यांचे उत्पन्न सरकारात जमा होत असे, तसेच अहिल्यादेवींना अनेक राजपूत राजे, खुद्द मोगल बादशहा यांच्याकडून खासगी इनाम मिळाले होते. वरील विश्लेषणाचा विचार करता अहिल्यादेवींचे व्यक्तीक राहणी अत्यंत साधी होती. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धन-संपत्ती असूनही त्या कधी विलासी जीवनात राहिल्या नाहीत. हा त्यांच्या व्यक्तिमत्वातील गुण दिसून येतो.

  • सरंजामी प्रांत आणि जहागीर ऊर्फ दौलत :
    सुभेदार मल्हाररावांच्या मृत्यूसमयी ७४११ लाख रुपये उत्पन्न होते. तो अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत १ कोटी ५११ लाखांच्या आसपास झाला. संपूर्ण माळव्याचे उत्पन्न १ कोटी असून त्यापैकी निम्यापेक्षा जास्त माळवा होळकरांच्या ताब्यात होता. महेश्वर, इंदोरे, नेमावर, पंचमहाल, देपालपूर हा संमपूल बेरमा, सुदरणी, नारायणगड, रामपुरा, भानपुरा, सावेर, तराना, कामथा, महिदपूर, जीरापूर, माचलपूर, पिंपलोर इत्यादी उत्तरेकडील परगाणे तर दक्षिणेकडील वाफगाव, चांदवड, संगमनेर, अंबड, वेरूळ, आडगाव(नाशिक), खानदेशात खुलतानपर, नंदूरबार, नेमाडमध्ये खरगोन, सनावद, बढवाल, सेंधवा, भीकनगाव, जामली, इस्लामाबाद, हवेली, राजस्थानात टोक, तोडा, रामपुरा, अन्य प्रदेशात झाबुका, जाबदा, सिरोंज हे प्रदेश होळकरांच्या जहागिरीचे होते. खासगी जहागिरी प्रमाणेच दौलतीच्या उत्पन्नावरही अहिल्यादेवींचे नियंत्रण होते. तथापि राज्यकारभाराच्या सोयीसाठी दौलतीचे तीन भाग करण्यात आले होते. सातपुड्याच्या दक्षिणेचा भाग, स्वदेश व खानदेश, सातपुड्याचा भाग महेश्वर व जवळपासचा प्रदेश, महेश्वरच्या पलीकडचा उत्तर विभाग प्रांत, इंदोर, तराणा व राजपुतन्यातील काही प्रदेश या ठिकाणी अहिल्याबाईंनी प्रशासनात केलेल्या काटेकोर नियोजन लक्षात येते. सुभेदार तुकोजी होळकर जेव्हा दक्षिण भागाची व्यवस्था पाही तेव्हा उत्तर विभागाची व्यवस्था अहिल्यादेवीं पहात. तुकोजी उत्तरेत असेल तर ते उत्तरेची व्यवस्था पहात असे. त्यावेळी अहिल्याबाई मध्यविभाग आणि दक्षिण विभागाची व्यवस्था पहात असे. मध्य विभागावर अहिल्याबाईचे कायम नियंत्रण असले तरी माळव्यातील तीन महाल, नेमाडमधील महाल असे चार महालाखेरीज संपूर्ण माळव्यातील होळकरांचा प्रदेश तुकोजीबाबा आपल्या नियंत्रणाखाली पहात असे. याशिवाय देशीचे व खानदेशाचे २५ लाख उत्पन्नाचे महाल तुकोजीबाबांकडे होते. हिंदुस्थानातील प्रदेशाचा कारभारही श्रीमंत सुभेदार तुकोजराव होळकरांकडेच होता. तुकोजबाबा उत्तरेत स्वारीत असतानाही अहिल्यादेवींनी देशीच्या महालाची व्यवस्था पाहिली. परंतु कारभारात हस्तक्षेप मात्र केला नाही. परंतु निकड भासली म्हणजे देशीच्या कामविसदारांना बोलावून हिशोब केलेत आणि ते तुकोजबाबांकडे रवाना केले आणि खासगी बरोबरच सरकारी दौलतीचे व्यवहार चोख ठेवले. वरील विश्लेषणावरून अहिल्याबाईंचे प्रशासकीय नेतृत्वाचे विविध पैलूया ठिकाणी लक्षात येतात.

अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकारभाराची प्रशासकीय व्यवस्था :

होळकरांच्या राज्याला प्राकृतीक सीमा नव्हती. काही परगणे माळवा, राजपुतांना व नेमाड क्षेत्रात तर उरलेले दक्षिणच्या पठरात होते. एकूण एकशे सव्वीस (१२६) परगणे असून सुभेदार मल्हाररावाच्या काळात राज्याचे उत्पन्न साडे चौऱ्याहत्तर लक्ष रुपये होते. अहिल्याबाईंच्या काळात शांतता व सुव्यवस्था असल्याने राज्याचे उत्पन्न सव्वा कोटी झाले होते.

  1. राज्याच्या उत्तरेस कोटा व उदयपूरची सीमा लागून होती.
  2. दक्षिणेस ग्वाल्हेर, धार, बडवानी, निजाम पेशव्यांचे राज्य होते.
  3. पूर्वेस ग्वाल्हेर, देवास, धार व भोपाळ
  4. पश्चिमेस बडवानी व डुंगरपूर
  5. उत्तर पूर्वीस झालवाडा अशी संस्थान होती.

राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून होळकरांच्या सरदारीचे अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत प्रामुख्याने दोन भाग होते. १)खासगी जहागीर, २)जाहगिरी ऊर्फ दौलत, या दोन पद्धतीविषयी आपण वर सविस्तर उल्लेख केलाच आहे.

राज्यामध्ये प्रशासकीय व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून भारताच्या इतिहासात प्राचीन काळापासून प्रशासकीय व्यवस्थेचे वेगवेगळ्या राज्यात तत्कालीन राज्याने आपल्या सोयीनुसार प्रशासकीय व्यवस्था तयार केली होती. सुभेदार मल्हारराव होळकरांच्या प्रशासकीय व्यवस्थेत काही सुधारणा अहिल्यादेवींनी केल्या होत्या. त्या खासगी व सरकारी खर्चाचा हिशोब अत्यंत चोख ठेवत असत. मल्हाररावाच्या मृत्यूनंतर काही दिवसच अहिल्यादेवींचा पुत्र मालेराव सुभेदार होता नंतर मात्र तुकोजीराव होळकरांकडे सुभेदारी आली होती. म्हणून अहिल्यादेवींनी प्रशासकीय राज्यकारभार करावा आणि तुकोजीरावांनी सुभेदारी घेऊन सैन्याशी राज्यकारभार करावा अशी अधिकाराची दुहेरी व्यवस्था होती.

मल्हाररावांच्या काळात मल्हारराव होळकर लढाईवर असले म्हणजे ते तलवार गाजवून सर्व खर्च बाहेर पाडे. आवश्यकता असल्यास सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करीत असत. परंतु तुकोजीराव होळकर यांचे दिवाण पैशाचा हिशोब व्यवस्थीत ठेवत नसत. त्यांना अहिल्याबाईंना सातत्याने पैसे पाठवावे लागत असत. म्हणून एके ठिकाणी अहिल्यादेवी म्हणतात की पैशाच्या हिशोबात एक कवडी माझ्याकडे निघाली तर मी त्यास पाचकवडी देईन अशा प्रकारचा विश्वास अहिल्यादेवींना स्वतःच्या प्रशासकीय व्यवस्थेवर होता. तत्कालीन अहिल्यादेवींच्या कालखंडातील प्रशासकीय व्यवस्था पुढीलप्रमाणे.

शाज्याचा मोठ्या विभागांना सरकार असे म्हणत. प्रत्येक सरकारात १० ते ४० जिल्हे असत त्यास परगणा अथवा महल म्हणत. प्रत्येक परगण्यात ५० ते ३०० पर्यंत खेडी होती. परगण्याचे तालुक्यात विभाजन केलेले असे प्रत्येक तालुका ६ ते ३० खेडी मिळून बनलेला असे. होळकर शाहीत दिवाण हा सर्वोच्च अधिकारी होता. त्याची नेमणूक पुणे दरबाराकडून होई त्याला ‘पगारापोटी जहागिरी दिली जात असे त्याशिवाय पालखी, हत्ती, नोकर यांचा खर्चही सरकार तर्फे दिला जात असे, परगण्यातून येणाऱ्या महसूलाचा ठराविक हिस्सा दिवाणाला मिळे. प्रत्येक गावातून हंगामाच्या वेळी २ रुपये मागण्याचा हक्क दिवाणास मिळे. अहिल्याबाईस दौलतीच्या जहागिरीसाठी गंगाधर चंद्रचूड तर अल्पकाळ नारो गणेश शौचे आणि पराशर पंत हे दिवाण लाभले परंतु या दिवाणांनी होळकरशाहीचे हीत न पाहता केवळ स्वार्थासाठी निरनिराळ्या लोकांना हाताशी धरून अहिल्याबाईस घरी बसविण्याचे प्रयत्न केले.

परगण्याचा मुख्य अधिकाऱ्याला कमाविसदार म्हणत. हा सरकारी अधिकारी असे, परगण्यातील सर्व जमा खर्चाचे अंदाजपत्रक कमाविसदाराला वर्षाच्या सुरुवातीस फडणविसाकडून दिले जात असे. मंजूर केलेला खर्च वजा जाता बाकी पैसा त्याला सरकारी खजीन्यात भरावा लागे. राज्याच्या गरजेच्या वेळी (उदा.युद्धप्रसंगी) त्यावेळी पुढील एक किंवा दोन वर्षांचा महसूल आगावू देण्यासंबंधीची मागणी महेश्वर दरबाराकडून होत असे. वाटाघाटी करण्यासाठी कमाविसदारांना महेश्वरी बोलविले जाई. कमाविसदारांनी आगाऊ दिलेल्या रकमेवर शेकडो १ टक्का दराने व्याज आकारण्यास मान्यता दिली जाई.

कमाविसदाराला पगारापोटी ३० हजार रुपये व पालखी दिली जात असे. कमाविसदाराने आपल्या प्रजेशी आचरण योग्य ठेवावा याबद्दल अहिल्याबाईकडून वारंवार ताकीद येत असे. जर रयतेला खुद्द अहिल्यादेवींकडे दाद मागता येत असे. चांदवडच्या कमाविसदाराने एक बोहऱ्यास मार दिला असता अहिल्यादेवींनी कमाविसदारास ताकीद केली. “तिर्थरूप कैलासवासी सुभेदारांनी कोणकोणत्या प्रकारे आणून रयतेचे संगोपन केले. अतःपर गैरवाजवी उफसर्ग लागूनये रयतेची दिलभरी करून गैर न करीत जाणे” परगण्यात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी कमाविसदाराची होती त्याला त्याच्या कामात मंडलोई मदत करीत असे. दूरच्या प्रांतातील कमाविसदारास न्यायदान करावे लागे. परगण्यातील जमिनीची मोजणी महसूल याबाबत माहिती कानूगो दफ्तर असे आणि दफ्तर मंडलोईकडून असून सांभाळण्याची जबाबदारी मात्र कानूगोची असे त्याची नेमणूक वंशपरंपरेने केली जाई.

जमीन मोजणाऱ्या अधिकाऱ्यास मिर्धा म्हणत. हे पद बहुदा मुसलमानाकडे रहात असे. पाटील प्रत्येक गावाचा प्रमुख असून हे पद वंश परंपरेने त्याच्याकडे रहात असे. त्याला १०० ते २०० बिघे जमीन इनाम महसूल मुक्त असे. कर व दंड वसूल करण्याचा याला अधिकार होता. गावातील महसूल विषयक दफ्तर सांभाळण्याचे काम पटवारी करीत असे. त्याची नेमणूक सरकारातून केली जाई. चौकीदार, ब्राह्मण, सुतार, न्हावी, धोबी इत्यादी नोकर वर्ग व बलुतेदार यांना जमिनीच्या उत्पन्नातून हिस्सा मिळत असे.

सरदार आणि जहागिरदार :

सुभेदार मल्हारराव होळकरांनी दक्षिणेतून माळव्यात आपल्या बरोबर आणलेल्या शूर लोकांना आपल्या संस्थानात जहागिरीचे वतने दिली होती. त्यांच्या पश्चात अहिल्याबाईंनी तिच व्यवस्था सुरू ठेवली आणि जहागिरदारांना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांना महत्त्व प्राप्त करून दिले होते. जहागिरदारी प्रथा ही अहिल्याबाईच्या राज्यकारभाराचे एक महत्त्व पूर्ण अंग होते. आपापल्या प्रदेशात जहागिरदारांना पूर्ण स्वतंत्र दिलेले होते. या जहागिरदारांना फौज ठेवून प्रसंगी सरकार मदतीस पाठवावे लागे. प्रत्येक सरंजामी सरदारांचा गोट असे त्या गोटात सानिद्ध असलेले शास्त्री पंडित, पुराणिक, वैद्य व ज्योतिषी यांचाही योगक्षेम चाले. पागे, पथक, हिशेबी, कारकून यांचाही समावेश त्यात असे. नालबंदी करणारे चांभार, धोबी, तंबूठोकणारे व शिवणारे या सर्वांचा समावेश व निर्वाह या गोटात होई. हे सरंजामदार अहिल्याबाईचा मानमरातब ठेवत त्यांच्या आज्ञेने शिरसावंध मानत प्रसंगी त्यांच्या हातून चुका झाल्या म्हणजे अहिल्याबाई त्याची कान उघडणीही करीत. महत्पुरूच्या एका सरंजामी सरदाराने रयतेपासून अन्यायाने वसूल करत असे त्यावेळेस तेथील तक्रारी अहिल्याबाईकडे आल्या त्यावेळेस त्यास बोलावून दोघांचेही म्हणणे समोरासमोर ऐकूण घेतले व रयतेस सरदाराकडून न्याय दिला आणि सरदारासही आपल्या चुका दाखविल्या.

अशा प्रकारचे अनेक उदाहरणे त्यांच्या कालखंडात घडल्याचे उल्लेख विविध ग्रंथातून मिळतात. रयत व सरदार यांना समोरासमोर आणल्यामुळे सत्य उजेडात आले. त्यामुळे प्रजेला न्याय मिळाला. सुभेदार तुकोजी होळकरांनी स्वारी खर्चासाठी ऐअजाची आवश्यकता असल्यामुळे आपल्या सरदारांवर पट्टी बसवून ऐवज जमा करावा असे अहिल्याबाईंना कळविले त्यावेळी अहिल्याबाई तुकोजींना म्हणतात. सरंजामी सरदारास त्यांचा खर्च आहे त्यांच्या गोटातील हजेरीप्रमाणे त्यास नेमणूक आहे. ते स्वतः जातिनीशी तळावर सेवेत हजर असताना त्यांच्यावर यादी करावी हा न्याय कोणता. अशा प्रकारे अहिल्याबाई ज्याप्रमाणे आपल्या प्रजेवर अन्याय होऊ देत नसत. त्याप्रमाणे सरदारांना आपल्या राज्याचे महत्त्वपूर्ण घटक मानत असत. तुकोजीसह वेळोवेळी पत्रे पाठवून आपल्या सरदारांचे मनोगत राखावे आणि त्यांच्या हातून कार्य पार पाडावे अशा सूचना अहिल्याबाई करीत असत. एखाद्या सरदाराची सरदारी कर्जबाजारी झाली तर अहिल्याबाई त्यास योग्य मार्ग काढून देत अशा प्रकारचे आचरण अहिल्याबाईचे आपल्या जहागिरदाराशी नोकरवर्गाशी रहात असे.

अहिल्याबाई कालीन वित्तव्यवस्था :

१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण देशात अस्थिरतेचे वातावरण होते. अहिल्याबाईंच्या राज्यात मात्र, शांतता, सुव्यवस्था होती. याचे महत्वाचे कारण म्हणजे शेतीतील प्रगती होय. अहिल्याबाईंनी शेतीच्याबाबत मल्हारराव होळकरांच्या काळच्या अनेक कायद्यात सुधारणा केल्या. करपद्धती कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नानुसार सारा वसूल केला जात असे.

जमीन महसूल :

अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत इंदोर सुभ्याचे उत्पन्नाच्या दृष्टीने पुढील प्रांत होते. स्वदेश, खानदेश, नेमाड मालवा, घडोली, धुंदाड, जातवडा, बुंदेलखंड, नरवर, अंतर्वेद आणि मेवाड. खरीप पिके कापल्यावर महसुलाची निश्चिती केली जात असे. महसुलाची रक्कम रोख आणि धान्याच्या स्वरूपाने स्वीकारली जात असे. मजुरांचा पगार व पुढील वर्षाचे बियाणे यासाठी धान्य काढल्यावर राहिलेल्या धान्यातून निम्मा हिस्सा अथवा २/५ हिस्सा सरकारात कर रूपाने द्यावा लागे यास बटाई महसूल म्हणत. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात बटाई महसुलाची निश्चिती केली असली तरी वाजवीपेक्षा जास्त महसूल कधीच घेतला नाही. पैशाच्या रूपाने महसूल ठरविताना काळ्या बागायती जमिनीवर प्रत्येक बिघामागे सव्वा रुपया निश्चित केला होता. याच काळात इतर संस्थानात मात्र हा कर बिघ्यामागे चार रुपये होता. कमी कर योजनेमुळे प्रजा व शेतकरी सुखी होते. परिणामी उत्पन्न जास्त निघत होते.

अशा प्रकारे शेतकऱ्यावरती शेतसारा देण्याची प्रथा अनेक शतकापासून सुरू आहे. ज्या संस्थानातील राजे जनतेचे कल्याण पाहणारे होते ते जनतेवर अल्पप्रमाणात शेतसारा लावत परंतु काही संस्थानिक हे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतसारा वसूल करीत व शेतकऱ्यांची पिळवणूक करीत. आजही भारतात शेतकरी स्वतंत्र मिळून कित्येक वर्षे झाली तरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. शेतकऱ्याला नेहमी नैसर्गिक परिस्थितीशी तोंड द्यावे लागते आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाला हमी भाव नाही. त्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची लूट करीत आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अहिल्याबाईंनी तत्कालीन कालखंडात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. महापूर, टोळधाड, गारांचा वर्षाव, अवर्षण नैसर्गिक प्रकोप आणि फौजेच्या हालचालीमुळे पिकांची झालेली पायमली अशावेळी अहिल्याबाई आपल्या प्रजेस शेतसाऱ्यात सूट देत असे, महाल मकत्याने देताना कमाविसदाराबरोबर पुढील प्रमाणे करार केला जाई “लष्कराची पायमल्ली झाल्यास चौकशी करून मजरा दिला जातील आफत फितुरी मुलुख शिरस्ता प्रमाणे दिले जातील.”

इ.स. १७६८ मध्ये पेशव्यांच्या फौजेच्या हालचालीमुळे होळकर राज्यातील गांडापूर परगण्यातील नांदगाव येथील पिकाची नासाडी झाली असता सुभेदार तुकोजी होळकरांनी नुकसानभरपाई बद्दल करात सूट दिली परंतु कमाविसादाराने जेव्हा वसूल जमा केला तेव्हा लोक अहिल्याबाईकडे गेले. तेव्हा कमाविसदारास बोलावून समज देण्यात आली. अहिल्याबाई शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी दक्ष असत. शेतकऱ्यांकडून योग्य वसुलाबाबत तुकोजीराव यांना आज्ञा पाठवीत. हंगाम संपल्यावर रयतेकडून वसूल करू नये याबद्दल दक्ष रहात असत. अशी वसुली केली गेली तर शेतकऱ्याजवळ पुढील वर्षाच्या शेती कामासाठी पैसा राहणार नाही परिणामी उत्पन्न बुडेल म्हणून रयतेस राखून राज्याचे कल्याण साधावे अशा सूचना अहिल्याबाई महसूल गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठवित असे. अशा प्रकारचे शेतीविषयक अहिल्याबाईंचे धोरण होते.

सायर :

सायर वसूल करण्याचा हक्क सरकारचा होता. जमिनी अथवा गाव इनाम दिली तरी त्या गावातून सायर वसूल करण्याचा सरकारला हक्क होता. परगण्यातील राजस्व विभागातील कर्मचारी ‘सायर’ वसूल करून राजकोषात जमा करीत. प्रत्येक परगण्यांत सायरच्या स्वतंत्र हिशोब ठेवला जात असे. मौल्यवान वस्तूच्या किंमतीवर, वजनावर सायरचे प्रमाण ठरविले जात असे. धान्य, कापूस इत्यादी पदार्थांच्या आयात-निर्यातीत बैलांचे ओझ्याचे पाठीमागे सायरचे प्रमाण ठरविले जात असे.

अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत शांतता असल्याने चितोड, जावड, भिलवारा, संदसोर, रतलाम, खाचरोद, कोटा, जयपुरा, शुजालपूर, उदेपूर, उज्जैन, अहमदाबाद, बडोदा, भडोच, सुरत, पुणे, जालना, बऱ्हाणपूर, अमरावती, हैद्राबाद इत्यादी शहरांशी व्यापार चालत असे. त्यात प्रामुख्याने कापड, तंबाखू, अफू गुरे इतर किराणा माल व धान्याची निर्यात होत असे तर गुजरात, मुंबई येथून सोने-चांदी, मोती, नारळ, सुपारी, बुंदेल खंडातून हिरे, माणके, निळ इत्यादी पदार्थ आयात होत. अशा प्रकारच्या आयात निर्यातीमुळे अहिल्याबाईंचे कार्रकरदीत सायरचे उत्पन्न मोठे होते.

सायर प्रामुख्याने नद्यांवरील घाट, डोगंरातील घाट आणि राज्याची सरहद्द इत्यादी ठिकाणी वसूल केली जात असे. हिंदुस्थानातून पुण्याकडे आणि दक्षिणेतून उत्तरेकडे जाण्याचे इतर मार्ग होते. परंतु अहिल्याबाईंनी प्रवाशांसाठी केलेल्या सुखसोयीमुळे बरीचशी रहदारी होळकर राज्यातून होत असे. जमीनदार आपल्या परगण्यात, पाटील आपल्या गावी येणाऱ्या-जाणाऱ्या मालावर जकात वसूल करीत. आपल्या गुरावर अथवा मालावर सायर माफ करावी व सुरळीत माल पोहोचवून द्यावा याबद्दल शिंदे, पवार, निजाम यांनी अहिल्याबाईंना त्यांच्या गुरे व मालावर जकात घेण्याचे आदेश आपल्या अधिकाऱ्यांना पाठविले होते.

सायर वसुलीचा मक्ता दिला जात होता. व्यापारासाठी हुंडीचा वापर केला जाई. हुंडी व्यवहारासाठी सावकार आणि सराफ यांचा एक विशेष वर्ग होता. व्यापारी मालाची ने-आण करण्यासीठी वंजारी नावाची एक विशिष्ट जमात कार्यरत होती. मालाची ने-आण बैलगाडी यांच्या सहाय्याने होत असे. व्यापारी लोकांचे समुह असून त्यांच्या संरक्षणासाठी ही बंदी असे.

टांकसाळ व नाणी :

होळकरशाहीत नाणी पाडण्याची सुरुवात सुभेदार मल्हारराव होळकरांनी केली होती. त्यांनी सन १७५१ ला चांदवड येथे टांकसाळ सुरू केली होती. अहिल्याबाईंनी इंदोर येथे नाणी पाडण्याचे इ.स. १७६६ मध्ये सुरू केले होते. ही टांकसाळ मोहरदास सावकार यास मक्त्याने चालविण्यास दिली होती. टांकसाळ चालवण्याची जबाबदारी जरी एखाद्या व्यक्तीवर सोपविली तरी नाण्याचा दर्जा धातूचा कस यावर सरकारचे नियंत्रण रहात असे.

सावकाराकडून सरकारास दर शेकडा १ रुपया मिळत असे. अहिल्याबाईंच्या काळात प्रामुख्याने तांब्याची व चांदीची नाणी पाडली गेली. या नाण्यावर चंद्राचा अथवा सूर्याचा मुखवटा असून गव्हाच्या ओबिचे अथवा अफूच्या झाडाचे चित्र टांकसळीचे नाव, शिवलिंग आणि बेलपत्र अशी चित्रे रहात.

इंदोरप्रमाणे अहिल्याबाईंनी महेश्वर येथेही टांकसाळ सुरू केली होती. एक आणा, दोन आणे, चार आणे, आठ आणे ही नाणी चांदीची असून अर्धाआणा, पावआणा, धेला ही नाणी तांब्याची होती. सोन्याच्या मोहरांचे उल्लेख आढळतात परंतु त्याचा उपयोग नजराणा देण्यासाठी होत असावा. महेश्वरची टांकसाळ इ.स. १८३२ पर्यंत तर इंदूरची टांकसाळ १९०३ पर्यंत चालू होती.

न्याय व्यवस्था :

अहिल्याबाईंच्या न्यायीपणाबद्दल सर्वत्र ख्याती आहे. तत्कालीन कालखंडात आजच्या सारखे लेखी कायदे नव्हते. न्यायबुद्धी ही कायद्यांची पुस्तके वाचून उत्पन्न होते. असा विचार त्यावेळी नव्हता. सारासार विचारशक्ती व शिक्षण यांच्या संयोगाने मनुष्यात जी धारणाशक्ती उत्पन्न होते तिच्या परिपक्व स्थितीत कायद्यांचा जन्म होतो. अहिल्याबाईंची धारणाशक्ती प्रबळ होती. त्यांना अन्यायाचा तिटकारा होता. त्यांचे कार्य उत्तम न्यायाधिशाप्रमाणे होते. मोगलांच्या काळात राज्यात न्यायालये फार कमी होती.

होळकरांच्या राज्यात नियमबद्ध न्यायालयाची मुहूर्तमेढ अहिल्याबाईच्या काळापासून रोव गेली. प्रजेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी न्यायालये स्थापन करून त्यावर योग्य न्यायमूर्तीच्या नेमणुका केल्या. गावोगावी पंचायती स्थापन करून त्यांना न्यायदानाचे विस्तृत अधिकार बहाल केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कडक नियंत्रणाखाली ही न्यायालये व पंचायती न्यायदानाचे काम उत्तम रितीने करीत होती. या न्यायालयात होणाऱ्या प्रत्येक कामकाजाचे वर्णन नियमाने राज्याच्या उच्च अधिकाऱ्याकडे व अहिल्याबाईकडे पोहोचवण्यात येत असे. ज्या लोकांचे या न्यायालयामुळे समाधान होत नसे ते लोक अहिल्याबाईकडे येत. न्यायासनावर बसून त्या सर्व प्रकरणे स्वत: ऐकत आणि मग निवाडा देत असत. त्यांनी दिलेल्या न्यायाने वादी-प्रतिवादी दोघांचेही समाधान होत.

लोकांचा त्यांच्यावर नितांत विश्वास होता की, त्यांनी दिलेला निर्णय अमान्य करणे म्हणजे पाप आहे, असे लोक मानात असत. प्रत्येक परगण्यात कमविसदारास गावात पाटलास न्यायदान करावे लागे. अहिल्याबाईच्या वेळी न्याय देण्याची पंचायत पद्धती होती. त्या लोकांवर अहिल्याबाईंचा चांगला दाब असल्याने न्याय देणारे लोक अहिल्याबाईपर्यंत कागाळी जाऊ नये म्हणून न्यायदानाकडे अधिक लक्ष पुरवित. ज्या मनुष्यास न्याय हवा असेल त्यास निकाल लावून घेण्यासाठी कोणताही खर्च लागत नसे. अहिल्याबाईंच्या वेळी न्यायखाते ही उत्पन्नाची बाब नव्हती.

शिंदे आणि होळकर यांच्यात एका जमिनीच्या तुकड्यावरून बाद होता. या वादाचा निर्णय लावण्यात यावा म्हणून शिंदे यांनी पंच म्हणून अहिल्याबाईंची नेमणूक केली. वास्तविक पाहता यावेळी एका पक्षाची फिर्यादी खुद्द अहिल्याबाई होती. परंतु त्यांचा निपक्षपाती स्वभाव न्यायप्रियता पाहून शिंदे यांनी त्यांची पंच म्हणून नेमणूक केली होती. अहिल्याबाईंनी या भूभागाचा निर्णय लावला की हा प्रदेश ‘गोचर भूमी’ म्हणून सोडून देण्यात यावा आणि ही व्यवस्था दोन्ही पक्षांनी मान्य केली. ही व्यवस्था मध्यप्रदेश राज्यनिर्मिती पर्यंत चालू होती.

शेजारील संस्थानातील लोक आपले खासगी भांडण मिटविण्यासाठी अहिल्याबाईकडे येत होते. याशिवाय पुणे दरबाराकडून जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर ते लोक अहिल्याबाईस शरण येत. नाना फडणविसांनी एका व्यापाऱ्याबद्दल शंका घेतली असता, हे व्यापारी महेश्वर येथे आले. त्यावेळी अहिल्याबाईंनी नानास समजाविले की, अशा प्रकाराने इतर व्यापारांची पत नाहीशी होऊन तुमच्या व्यापारी मंडळास मोठा धक्का बसेल. नाना फडणविसास अहिल्याबाईंचे म्हणणे पटले आणि त्यांनी व्यापाऱ्याला न्याय दिला. अशा प्रकारे अहिल्याबाईंची धारणा शक्ती प्रबळ होती. कोणतेही प्रकरण असले तरी त्या योग्य न्याय देत असत.

संरक्षण व्यवस्था :

सुभेदार मल्हारराव होळकरांच्या काळात असलेली सैन्य व्यवस्थेत अहिल्याबाईंनी काही सुधारणा केल्या व तत्कालीन काही व्यवस्था चालू ठेवल्या. सैन्य भरतीच्या प्रत्येक सैनिकाला एका जबाबदार व्यक्तीचा जामीन द्यावा लागे. सैनिकांचा पगार रोख असून तो त्यांच्या क्षमतेनुसार ठरविला जाई. मोहिमेवर जाण्याअगोदर फौजेच्या तयारीसाठी शिलेदारांना वार्षिक वेतनाचा एक चतुर्थांश किंवा तिनाई रक्कम देण्यात येई. त्याला “नालबंदी” म्हणत. बाकीची रक्कम लष्करात हजर झाल्यावर देण्यात येत असे त्याला ‘राजमुरे’ म्हणत.

मुख्य सरदारांचा पगार त्यांचा लौकिक दर्जा लक्षात घेऊन ठरविला जात असे. त्यास “जात तैनात” म्हणत. सरदारी खर्चात सैन्याचा पगार पुढील प्रमाणे असे. स्वार दर माणशी दरसाल ४५० रुपये, करोल(बंदूकधारी) सैनिकाला दरसाल ३२५ रुपये, भालेकरी यास दरसाल २५० रुपये असा होता. कायमचे सैन्य वेगळे असून मोहिमांच्या वेळी सैन्य भरती केली. त्यामुळे आपल्या जव ही कवायती फौज असावी असे अहिल्याबाईस वाटत होते. इंग्रजाबद्दल अहिल्याबाईंनी पुढीलप्रमाणे मत व्यक्त केले होते. “वरकड व्याग्रदिक श्वापदे बळ युक्ती प्रयुक् तीने मारतील परंतु आस्वलाचे मारणे फार कठीण आहे.” सुरत धरून मारले तरच मरेल नाहीतर आस्वलाचे लपेटीत कोणी सापडला तर गुदगुदल्या करूनच आस्वल त्यास मारील तद्वत हे इंग्रजांची लढाई आहे. पाहता त्याच मारणे कठीण” वरील उल्लेखावरून अहिल्याबईंचा इंग्रजाविषयी नेमके काय मत होते हे लक्षात येते. इंग्रजांबाबत पेशव्यांनी कोणती सावधगिरी बाळगावी याविषयीही त्यांनी वेळोवेळी सूचना दिल्याचे उल्लेख ग्रंथातून मिळतात. अहिल्याबाईकडे जुन्या पद्धतीने लढाई केली जात असे परंतु इंग्रजांसारख्या श्स्त्रूना शह देण्यासाठी कवायती फौज उभारणे त्यांना आवश्यक वाटत होते. पेशव्यांनी व त्यांच्या इतर सरदारांनीही कवायत फौज उभारावी असे त्यांना वाटत होते.

अहिल्याबाईंनी जे. पी. बॉईड सोबत केलेला करार :

इ.स. १७९२-९३ च्या सुमारास कर्नल जे. पी. बॉईड नामक अमेरिकन अधिकाऱ्यामार्फत पाश्चात्य पद्धतीची पलटन तयार केली. अमेरिकन कर्नल बॉइडला सेवेत घेतले. पाश्चात्य लोक नोकरीत येत असता जहागीर मिळावी, आपल्या देशाच्या विरुद्ध आम्ही लढणार नाही अशा अटी घालत परंतु त्यांनी जे. पी. बॉइड बरोबर केलेल्या करारात राजकीय दूरदृष्टी दिसते.

  • पलटन संघटित करण्यासाठी संस्था व वेतन ठरवून दिले.
  • आवश्यक दारूगोळा सरकार आपल्या पैशाने पुरविल.
  • १८११४ रु. ४ आणा यापैकी ११४८९ रुपये पुणे येथे दिले जातील आणि बाकीचे ६६२५ रु. ४ आणे महेश् वर येथे मिळतील.
  • गणवेश व शस्त्रे खराब झाल्यास चौकशी केल्यावरच दिली जातील.
  • कर्नल बॉईडला दोन हजार रुपये पगार राहील.
  • एका पलटण एकाच सरदाराच्या नियंत्रणात राहील, दोन सरदार राहणार नाहीत.
  • हरकऱ्यांना महादजी शिंदे देतात तसे वेतन १११ दिले जाईल.
  • पलटणीने एक महिन्याच्या आत महेश् ्वरला यावे येथे भरतीची चौकशी होईल.
  • तोफा, बैलगाड्या, दारूगोळा तसेच त्यासाठी लागणारे लोक यांची संख्या वेतन निश्चित केले ते २१०० रुपये होते.
  • भरती केलेल्या लोकांना एक वर्ष नोकरी करावी लागेल.
  • दरमहा शिपायांनी हजेरी होईल. त्यावेळी गैरहजर लोकांचा पगार वेतनातून कापला जाईल.
  • सरकारचा आदेश मानून त्यानुसार कार्य करावे लागेल.
  • पलटणीचे काम पाहण्यास दरबारात अप्पाजी ,चिमणाजी राहतील.
  • पलटण महेश्वरला आल्यावर करारावर शिक्का मोर्तब केले जाईल.

महेश्वर येथे करराला स्वीकृती देऊन पलटन इंदोर येथे पाठविली. २५ मे १७९३ कर्नल बॉईडने करार मान्य करून एकनिष्ठेने सेवा करण्याचे कबूल केले. त्यानुसार त्याने १७९५ पर्यंत अहिल्याबाई होळकर यांची सैनिकी सेवा केली.

अहिल्याबाई होळकरांनी जे. पी. बॉईड बरोबर केलेल्या कराराचे वैशिष्ट्य पाहता अहिल्याबाईच्या व्यक्तीगत ज्या मराठा सरदारांनी कवायती पलटणी निर्माण केल्या होत्या तेव्हा त्यांनी जे करार केले होते त्यानुसार त्या पलटणी ब्रिटिशांबरोबर लढणार नव्हत्या. त्यामुळे राष्ट्रीयत्व राखण्याच्या कामी या पलटणीचा उपयोग होणार नव्हता. परंतु अहिल्याबाईंनी केलेला करार वेगळा होता. या फौजेत केवळ एक अधिकारी परकीय असून बाकीसर्व फौज देशी राहणार होती आणि या अधिकाऱ्यासही अहिल्याबाईंनी जहागिरी न देता त्याला मासिक वेतनावर नोकरी वर ठेवले होते. तसेच दारू गोळा व बंदुका आणि इतर युद्धविषयक साहित्य यासाठी कर्नल बॉईडला महेश्वर दरबारावर अवलंबून राहावे लागणार होते. अहिल्याबाईंनी कर्नल बॉईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारकून ठेवला होता.

अहिल्याबाईंनी बॉईडशी केलेल्या या करारात राष्ट्रीय बळ वाढविण्याची भावना दिसून येते. सैन्याचा बाबतीत अहिल्याबाई पेशव्यांनाही सूचना करीत असे. श्रीमंत फौजेची उपेक्षा फार करीतात परंतु गोष्ट कार्याची नाही. फौज चांगली पंचवीस तीस हजार जवळ असावी. चहूकडून गडबड उडाली आहे. अशा समयी आपण आपले फौजेनिशी बळकट असावे. ब्रिटिशांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी पेशव्यांनी काय उपाययोजना कराव्या याबद्दल अहिल्याबाईंनी पेशव्यांच्या वकलांजवळ सूचना सांगितल्या. त्या पुढीलप्रमाणे, देशी इंग्रजांनी गडबड बोरघाटाकडे, चांदवड बारीकडे त्रिंबकाकडे अशी फार जाहली… त्यास या समयांस श्रीमंतांनी शिलेदारांचा व हुजारीतीचा भरणा पुष्कळ करावा आणि इंग्रज जागा, जागा, कोठे फौजे पाठवून ते तेथील तशीच… म्हणजे मागल्याला दहशत पडेल पुढे कोणी येऊ पावणार नाही. नवाब, भोसले सारे जमा होऊन इंग्रजांचे परिपत्य करावे. इंग्रजांच्या विरुद्ध देशी सर्वे शक्तींनी एकत्र येऊन इंग्रजांसी मुकाबला करावा त्यांना हाकलून लावावे, असे अहिल्याबाईंचा विचार होता.

काल्पनिक तेलचित्र

महादजी शिंदे यांना ११ जानेवारी १७८१ रोजी पत्र पाठवून अहिल्याबाईंनी आपली योजना कळविली होती आणि एवढेच नव्हेतर स्वत: मोहिमेवर जाण्याची तयारी दर्शविली होती. याशिवाय युरोपात इंग्रज आणि फ्रेंच हे एकमेकांचे शस्त्रू असून त्यांच्याच आपआपसात युद्ध चालू असते. मराठा राज्यावर इंग्रजांचा वाढता दबाव पाहून अहिल्याबाईंनी पुणे दरबारास कळविले की इंगाजांचा शस्त्रूतो आपला मित्र म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध फ्रेंच सैन्याची मदत घ्यावी. सरकारची फौज व आंगरे, ननटाल व फरासीस एकत्र येऊन फरासीसास मुंबईस लावावे आणि फौज व आंगरे यांनी वसईची पुरत पन्हाई करावी.

आपण मराठमंडळाचे एक घटक आहेत. ही भावना अहिल्याबाईंची होती. फक्त इंदोर-महेश्वर संस्थान सुरक्षित न राहता संपूर्ण मराठा राज्याचे संरक्षण व्हावे ते वाढावे हा विचार अहिल्याबाईंचा येथे दिसून येतो. इंग्रज-मराठ्यांचे पहिले युद्ध १७७५ ते १७८२ या काळात झाले. नाना फडणविसाने महादजी शिंदे व होळकर यांना स्वरसैन्यासी दक्षिणेत ताबडतोब निघून येण्याविषयी पत्रे पाठविली परंतु महादजी शिंदे यांनी उत्तरेकडील संकट निवारण्यासाठी तिकडेच राहण्याचे ठरविले त्यावेळी अहिल्याबाईनी महादजी शिंदेंना कळकळीचा सल्ला दिला. अहिल्याबाईचे इंग्रजांविषयी विचार व्यक्त करणारे विठठल शामराव यांना लिहिले पत्र(१७८१) ते पुढीलप्रमाणे “प्रस्तुत इंग्रजांनी वसई घेतली तेथील बंदोबस्त करून इंग्रज घाट चढले म्हणजे देशात उपद्रव करतील पुणे कसे राहील? आपले घर, निजरमान, आपले पुणे… ते कायम तर तुम्ही जे मसलत कराल ते बरी दिसेल तेथेच अस्ता व्यस्त झाले तर शंभर मसलती तुम्ही केल्या त्या कोण करायच्या? तथापि तुमचे जाण्याचे मानस नसले तर आम्हीच येथून जाऊन त्यास मिळतो आम्हास जे होणे ते हो.” हा विचार ऐकूण तीस हजार फौजेनिशी महादजी शिंदे व वीस हजार फौजेनिशी तुकोजी होळकर युद्धात सामील झाले. या युद्धात वडगाव येथे इंग्रजांचा परभव झाला व सालबाईचा तह करून इंग्रजांनी युद्धातून सोडवणूक करून घेतली.

या ठिकाणी अहिल्याबाईंना शत्रूचा अंदाज बांधता येत होता. त्यांच्यात दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचे पैलू दिसून येतात. इंग्रजांची कुटिलता, आक्रमकता आणि मराठी राज्य काबीज करण्याचा इंग्रजांचा हेतूत्यांना वेळीच समजला होता. अहिल्याबाई फक्त राजकर्त्या होते असे नव्हे तर त्यांच्या ठिकाणी धोरणीपणा, व्यवहारचातुर्य हे गुण होते. सुभेदार तुकोजी होळकर हे पंधरा हजार फौज बाळगून असले तरी अहिल्याबाईजवळ स्वतःची सेना होती. श्रीमंत फौजेची उपेक्षा करतात ही गोष्ट कार्याची नसे अशी सूचना अहिल्याबाईंनी पुण्यास देऊन ठेवली होती. होळकरांची सेना अहिल्याबाईशी अखेरपर्यंत इमान राखून होती. याचा उल्लेख पुढीलप्रमाणे मिळतो. “१७८० ला नारो गणेशाने सैन्यास फितूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सैनिकांनी उत्तर दिले. अन्यांसी व शिद्यांशी एखादे वेळेस श्रीमंताशी आम्ही लढाई केल्यास आम्ही तुमचे चाकर आहो. तुमचे पुढे मरू मात्र अहिल्याबाईशी तुम्ही लढाई करू म्हणाल तर आम्ही तुमचे चाकर नाही.” अशा प्रकारे सैन्याचा अहिल्याबाईंच्या वरती विश्वास होता की इतर कोणी ही सैनिकाला लालूच देऊन फितूर केले तरी ते अहिल्याबाईंच्या विरोधात लढण्यास तयार होत नव्हते.

किल्ले व्यवस्था :

संरक्षणाच्या दृष्टिने अहिल्याबाईंनी महेश्वर, चांदवड, हिंगलाजगड, सेंधवा, असिरगड या किल्ल्यांचे बांधकाम केले होते. या किल्ल्यांना भक्कम अशी तटबंदी असून मोठे मोठे बुरुज आहेत. आतील बाजूला सैनिकांच्या व पहारेकऱ्यांच्या खोल्या आहेत. किल्ल्यांना तळघर आहेत. आतील भागात पिण्याच्या पाण्यासाठी मोठमोठ्या विहिरी आहेत. तसेच उंच मनोरे बांधले होते. संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यांची व्यवस्था उत्तम ठेवली होती. ह्या बाबत नाना फडणवीसांचा कारकून लिहितो, “मातोश्रींनी महेश्वरचा बंदोबस्त केला, बुरुजावर तोफा चढवून ठेवल्या.” यावरून अहिल्याबाईनी सरंक्षण व्यवस्था चोख ठेवल्याची कल्पना येते. अहिल्यादेवींच्या काळात होळकरशाहीत किल्ले, भुईकोट व वाडे असे १०० हुन अधिक होते. अहिल्यादेवींच्या काळातील किल्ले व भुईकोटांची विस्तृत माहिती येथे पहा.

किल्ले महेश्वर(म.प्र) – अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकाळात होळकर संस्थांची राजधानी.

अहिल्याबाई कालीन डाक व्यवस्था :

अहिल्याबाईंचे सामाजिक कार्य संपूर्ण भारतात चालू असे. सुभेदर तुकोजी होळकर दूरच्या मोहिमेवर जात. होळकरांच्या दौलतीचे व खासगी जहागिरीचे अधिकारी निरनिराळ्या प्रांतात कार्यरत रहात. त्यांना वेळेवर आपले आदेश पोहोचविणे आपल्या प्रजेची सुख, दुःख कळणे इतर राज्यकर्त्यांशी संपर्क साधने, या व इतर अनेक कारणांनी अहिल्याबाईंनी पूर्वीच्या डाक व्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून तिची नव्याने रचना केली होती. पुणे ते महेश्वर ही नित्य स्वरूपाची डाक व्यवस्था असून इतर डाक व्यवस्था नैमितीक स्वरूपाची होती. तिला स्थापनेच्या दृष्टीने स्थळाची मर्यादा नव्हती. अहिल्याबाईंना ती आवश्यक वाटे.

त्यावेळी हरकारा, सवार किंवा कासीद यांना पाठवून आपल्या आज्ञा किंवा पत्रे त्या पाठवित असत, तशीच व्यवस्था होळकरांच्या राज्यातील सावकारसुद्धा करीत असत. अहिल्याबाईंच्या वेळी या व्यवस्थेला डाक बसविणे असे संबोधले जाई. राज्यांच्या अंतर्गत ठराविक ठिकाणी डाकी चौकी निर्माण केलेली असे. पत्र घेवून जाणाऱ्या कासीदांचे वर्ग किंवा श्रेण्या निर्माण करण्यात आल्या होत्या. हरकारा, राऊत, पियादा, रसानगिदार, जथेदार, जथेदारांना हेर म्हणून ओळखले जात असे आणि तेच डाक व्यवस्थेचे ठेकदार असून टपाल पोहचविण्याचा मक्ता घेत. कासी सामान्यत: पायी चालत कासीदची दोन व्यक्तीची एक जोडी रहात असे तसेच काही कासीद जोड्या, उंट, घोडे यांचा वापर डाक पोहचविण्यासाठी करीत. पुणे ते महेश्वर आणि महेश्वर ते पुणे या अंतरातील डाक व्यवस्था पुढीलप्रमाणे होती.

  • ४० महेश्वर पासोन थाळनेर पर्यंत कोस,
  • ४० थाळनेरहून चांदवड पर्यंत कोस,
  • ३० चांदवडहून संगमनेर पर्यन्त कोस,
  • ४२ संगमनेरीहून पुण्यापर्यंत कोस,

यासी कासीद जोड्या पाच कोसा कोसांवर जोडी एक प्रमाणे जोड्या ३४ यास, दरमहा रुपये २४० डाक चौकीच्या जोड्या ३० असाव्या. ६० दर ४ रुपये ४८ सरबाईच्या जोड्या ४ असाव्या, ८ दर ६ प्रमाणे २८८.

इ.स. १७९२ मध्ये अहिल्याबाईंनी महेश्वर ते पुणे या अंतरासाठी ३४ कासीद जोड्या नियुक्त करून त्यांना २८८ रुपये पगार दिला होता. या स्वारींनी दर महिन्यास येऊन डाक पोहोचती करावी पाच सात दिवसांच्या अंतराने पुण्याची डाक घेऊन यावी आणि या वेळेत जर कमी जास्त दिवस झाले तर किंवा कागदाची गफलत झाल्यास कासीदाला कामावरून कमी करण्यात येत असे. बऱ्याच वेळा समाचार पत्रे हे विशिष्ट व्यक्ती मार्फत, सांकेतिक भाषेत पाठविली जात असे.

काही महत्त्वाची पत्रे यात्रा करणाऱ्या ब्राह्मणा बरोबर पाठविली जात. बल्लाळ पेशवे यांना अहिल्याबाई यांनी वेदमुर्ती खुशालीराम यांच्या बरोबर पत्र पाठविण्याचे उल्लेख मिळतात. अहिल्याबाईंनी निर्माण केलेल्या या योजनेमुळे परराज्यात त्यांनी नियुक्त केलेल्या वकिलांमार्फत येणारी पत्रे. संपूर्ण भारतात चालू असलेली बांधकामे, अंतर्गत राज्यातील खबरी ताबडतोब मिळून त्यानुसार निर्णय घेता येत असे व आपल्या प्रजेवर आलेले संकट निवारण करता येई. या व्यवस्थेमुळे त्यांचा पुणे दरबाराशी सतत संपर्क राहत असे.

अहिल्याबाईची प्रशासकीय कार्यक्षमता :

अहिल्याबाईंची प्रशासन व्यवस्था चोख असे प्रत्येक आलेल्या दिवशीचा पत्रव्यवहार त्या रात्र रात्र जागून पूर्ण करत याचे उदाहरण पुढीलप्रमाणे आहे. त्यांची दररोजी कचेरी झाल्यावर बिछान्यावर एकचित्त बसून कारभारीयांपैकी राजश्री विनायक बाजीराव व बालाजी कृष्णा यास बोलावून त्याच कडून पत्र अक्षरश. श्रावण केली. सरकारचे पत्र एक व नवाबा कडील वकिलाचे पत्राची नक्कल एक होती. मजकूर ध्यानास आणून सरकार आज्ञेप्रमाणे तेच क्षणी सवाप्रहर रात्रपर्यंत बसून जागा जागा धाटनाके येथील कमविसदार यांस पत्रे लिहून रवाना केली व आसपासचे जवळ होते. त्यांस समझ बोलावून ताकीद करून बंदोबस्त करविला. दक्षिण उत्तर महाडाचे घाट व नाळे चोरवाटा व उभय रेवातीर येथील नावघाट पाय उताराचे तर नेमावर पर्यंत यांजकडील जिल्ह्यांतील झाडून बंदोबस्त करविला. राजश्री रघुनाथ पंत यास बरहाणपूर येथे पत्र पाठविली. येथील कमाविसदार यास व जमीनदार भूमिने वगैरे यास ताकीदी सांगून पाठवून नंतर सवाप्रहर रात्रीस निद्रा केली.
अशा प्रकारे अहिल्याबाई राज्यव्यवस्थेत प्रत्येक दिवसाचे काम त्याच दिवशी पूर्ण करीत. या ठिकाणी त्यांची प्रशासकीय कार्यक्षमता दिसून येते. जनतेविषयी असणारी तळमळ दिसून येते.

अहिल्याबाई होळकरांच्या काळातील सेवक :

कोणत्याही राज्य व्यवस्थेमध्ये धोरणात्मक निर्णय घेणारे नेतृत्व व त्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी प्रशासकीय नोकर वर्ग हा कार्यक्षम व विश्वासू असावा लागतो तर खऱ्या अर्थाचे त्या योजनांची अंमलबजावणी होऊन राज्य व्यवस्थीतरीत्या चालते. भारतासारख्या देशामध्ये प्रशासन व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट प्रशासन व्यवस्था निर्माण झाल्यामुळे प्रशासनात धोरणाची अंमलबजावणी योग्य रितीने होत नाही, असे दिसून येते.

अहिल्याबाई होळकरांच्या कालखंडातही काही प्रशासकीय नोकर विश्वासू तर काही अविश्वासू होते. त्यामध्ये गंगाधर चंद्रचूड, नारो गणेश यासारखे दिवाण अविश्वासू निघाले. ते अहिल्याबाईंच्या विरोधात कटकारस्थान करत असत. पेशवे, तुकोजीराव होळकर व अहिल्याबाई यांच्यामध्ये कलह निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. याचा उल्लेख अनेक ग्रंथातून मिळतो. ज्या प्रमाणे अहिल्याबाईंच्या प्रशासकीय व्यवस्थेत अविश्वासू सेवक होते. त्याप्रमाणे काही विश्वासू सेवक होते. त्यामुळे अहिल्याबाई राज्याचा कारभार लोककल्याणकारी करू शकल्या. ज्याप्रमाणे शिवाजी महाजारांना स्वराज्य निर्माण करताना तानाजी मालुसरे, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यासारखे प्रामाणिक सहकारी लाभले त्यामुळे त्यांना स्वराज्य स्थापन करता आले. त्याप्रमाणे अहिल्याबाईंना काही विश्वासू सेवक लाभले. त्यामध्ये विसाजी शामराज देशपांडे, शिवाजी गोपाळ, शरीफभाई पागाकामदार, भरमलदादा होळकर, सरदार कालगावडे इत्यादी होत.

यापैकी शरीफभाई पागाकामदार हा अत्यंत विश्वासू सेवक होता. तो अहिल्याबाई व तुकोजीराव यांच्यातील भांडण मिटवत असे. ह्या संबंधात कर्नल ल्युअर्ड यांनी जे टिपण तयार करून ठेवले आहे त्यातील माहिती पुढीलप्रमाणे शरीफभाई यांचा जन्म खानदेशात झाला. मल्हाररावांच्या या माळव्यात प्रवेश झाल्यावर शरीफभाई सरकारी पागेत बारगीर होऊन राहिले. तेव्हापासून १७९३ पर्यंत(मृत्यूपर्यंत) त्यांनी चाकरी केली. बारगीरावरून बढती मिळत ते त्या खात्याचे मुख्य झाले. सुभेदार मल्हाररावांच्या सर्व लढ्यात ते हजर असे त्याप्रमाणे तुकोजीरावांच्या लढाईत ही हजर असे. शरीफभाई याची वागण्याची व बोलण्याची हातोटी अद्वितीय होती. सुभेदार तुकोजीराव आणि अहिल्याबाई ह्यांच्यामध्ये जेव्हा मतभेद होत तेव्हा तोंड काढून शेवट गोड करण्याचे श्रेय शरीफभाईसच असे.

घरगुती गोष्टीत अहिल्याबाई त्यांचा सल्ला घेत असे. अशा प्रकारे विश्वासू सेवकामुळे अहिल्याबाई राज्यकारभार योग्य रीतीने पार पाडू शकल्या. विश्वासू सेवकांप्रमाणेच कोणत्याही नेतृत्वात सेवकांत विश्वासू निर्माण करण्याचे संघटित प्रशासकीय नेतृत्व गुण असावे लागतात ते अहिल्याबाईंच्या अंगी होते, असे वरील विश्लेषणावरून म्हणता येईल.

अहिल्याबाई कारकिर्दीतील दरबारी वकील :

अहिल्याबाईचे शेजारील राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. शेजारीच शत्रूनिर्माण झाले तर राज्यात नेहमी अस्थिरता असते. भारताला शेजारी पाकिस्तान, चीनसारखे शेजारी शत्रू निर्माण झाल्यामुळे भारतात नेहमी तणावग्रस्त परिस्थितीत निर्माण होते, म्हणून अहिल्याबाईंनी शेजारील राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते. तत्कालीन कालखंडात धार्मिक युद्धे मोठ्या प्रमाणात असत मुस्लिम राजे व हिंदूराजे यांच्यात सातत्याने लढाई होत. तरी ही निजाम, टिपूयांच्याशी अहिल्याबाईचे राजकीय संबंध मैत्रीपूर्ण होते असे संशोधनातून स्पष्ट होते.

होळकरांचे वेगवेगळ्या संस्थानात असलेले वकील पुढीलप्रमाणे :

  • अयोध्या – खंडो जगदेवराव
  • उदेपूर – भगवंतराव जगताप
  • कोटा – बापूजी आनंदराव
  • ग्वाल्हेर – यमाजी मोरेश् वर
  • जयपूर – मार्तंडराव अप्पाजी
  • डुंगरपूर – व्यंकाजी शिवाजी
  • दिल्ली – बहादूर सिंग
  • देवळे प्रतापगड – विनायक सदाशिव
  • नागपूर – व्यंकाजी कृष्णराव
  • पुणे – अप्पाजी जयदेव
  • लखनौ – जिवाजी गिरमाजी
  • हैद्राबाद – माधवराव लक्ष्मण

होळकर दरबारात इतर संस्थानातील वकिल :

  • पुणे – केसो भिकाजी दातार
  • शिंदे दरबार – शिवाजी नारायण
  • मारवड दरबार – जासकर मेहता व दत्ताराम
  • भरतपूर दरबार – भागवंत गोविंद
  • जयपूर दरबार – सवाईराव, शिवाजी
  • उदयपूर दरबार – काशिनाथ पांचोली
  • सातारा दरबार – रामराव सदाशिव

अशा प्रकारे अहिल्याबाईंचे वकील इतर दरबारात व इतर दरबारातील वकील अहिल्याबाईच्या दरबारात असत. अहिल्याबाईंच्या महेश्वर येथील दरबारी पेशव्यांकडून नाना फडणविसांनी दोन वकील ठेवले होते. त्यांची नावे विठल शामराज व केसो भिकाजी अशी आहेत. त्यांनी महेश्वर येथून अहिल्याबाईंच्या दिनचर्येची व राजकारणांची बातमीपत्रे पुण्यास पाठविण्याचा क्रम ठेवीला होता. हे वकील १७७९ पासून १७९४ पर्यंत महेश्वर दरबारी होते. ह्या दोन वकिलांच्या बातमीपत्रा मध्ये अहिल्याबाईंची दिनचर्या, त्यांचा दरबार, त्यांचे पेशव्यांशी व इतर मराठे सरदारांशी झालेली राजकारण इत्यादी गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यामुळे तत्कालीन मराठ्यांच्या राजकारणावर उत्तमरितीने प्रकाश टाकला आहे.

अहिल्याबाई होळकरांनी हुंडा बंदीसाठी राज्यात केलेला कायदा :

अहिल्याबाईंनी हुंडाबंकी अडीचशे वर्षांपूर्वी बंद करण्याचा प्रयत्न केला याचे उल्लेख मिळतात. एकदा अहिल्याबाई दरबारात होत्या. चार ब्राह्मण येऊन बसले. अहिल्याबाईंना एकजण म्हणाला, “मातोश्री आम्हा गरीब ब्राह्मण जवळ पैसा नाही मुलीचे लग्न जमणे कठीण झाले आहे. द्रव्याखेरीज हुंडा घेतल्याखेरीज कोणी लग्नास तयार होत नाही. जिथे जावे तिथे हेच निराश होऊन परत येतो. पदरी तीन मुली, वये वाढू लागली पण लग्ने जमत नाहीत. यावर अहिल्याबाई म्हणाल्या, “अहो वधूला देवी म्हणावे, लक्ष्मी म्हणावे आणि तिच्या प्रवेशाचे आदिमायेच्या स्वागताचे पैसे घ्यावे हे कसे? स्त्रीच्या कौतुकाची नुसती सोगे नुसता देखावा खोटा ! मातोश्री म्हणूनच आम्ही आलो आहोत यातून काही मार्ग काढावा ही विनंती.

यावरून त्यांनी कारभारी मुकुंद हरीस दऊतलेखणी घेऊन बोलावले सांगू लागल्या श्री शंकर आज्ञेवरून हे जाहीर करण्यात येत आहे की, यापुढे कुठल्याही जाती जमातीत विवाहाच्या समयी कन्येच्या पालन कर्त्यांकडून पैसे घेतल्यास तो गुन्हा समजण्यात येईल. द्रव्य घेईल त्याच्या कडून दामदुप्पट. जो देईल त्याच्याकडून जितके दिले तितके आणि मध्यस्थाकडून त्यास मिळाले असतील तितके सरकारात भरणा करावे लागतील अधिक रक्कमेचा दंड करण्याचा अधिकार सरकारला राहील याच्या नकला करून अहिल्यादेवीने प्रांतो प्रांती पाठविल्या. आजही हुंड्यांच्या प्रकरणाहून अनेक वाद निर्माण होऊन स्त्रियांचा छळ केला जातो. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात दोनशे वर्षांपूर्वी हुंडाबंदी करून एक आदर्श घालून दिला. शासन व्यवस्थेपुढे आदर्श ठेवला.

पशु-पक्षांसाठी केलेले कार्य :

अहिल्याबाईंनी तत्कालीन कालखंडात फक्त मानवत प्राण्यांची सोय केली असे नाही तर पशु, पक्षी, जनावरे यांची ही काळजी घेतली होती त्याचे उल्लेख पुढीलप्रमाणे मिळतात. “ती दररोज गरीब लोकांस अन्न देई व विशेष सणावाराचे दिवशी अत्यंत कनिष्ठ लोकांसही मेजवानी मिळत असे, उष्ण काळात रस्तो रस्ती वाटसरूंना पिण्यासाठी पाणी देण्याकरता अहिल्याबाईचे नोकर उभे रहात असत. शांतकाळाच्या आरंभी बहुतेक आश्रीतांस व पंगू झालेल्यास वस्त्रे प्रावरणे मिळत. रानातील पशु, हवेतील पक्षी, नदीतील मासे हे ही तिच्या दयेचा अनुभव पावत. त्याजकरिता खाणे पाठविले जाई. उन्हाळ्यात महेश्वर जवळचे शेतकरी असे पहात की, जमीन नांगरत असता अहिल्याबाईचे नोकर पाण्यांची भांडी घेऊन येत व ते बैलांना पाणी पाजण्यासाठी नांगर थांबवित. अशा प्रकारे महेश्वर येथील गरीब जनतेला अहिल्याबाई यांच्याकडून भोजन दिले जात असे तर विशेष सनावराला मेजवाणी दिली जाई.

उन्हाळ्यात रस्तो रस्ती वाटसरूंना पाणी देण्यासाठी पाणपोई सुरू केल्या जात होत्या तर हिवाळ्यात अपंग लोकांना व अश्रीतांना वस्त्रे देण्यात येत. हिवाळ्यात ओंकारेश्वर येथे ध्वजोत्सावाचा कार्यक्रम होई त्यावेळी अहिल्याबाईकडून गोरगरिबांना देण्यासाठी हजारो रुपयांची वस्त्रे पाठविण्यात येत याचे उल्लेख खालीलप्रमाणे, “सदाशिव उपाध्ये यांज बरोबर यांचा हजारांचे कापड, काही सफेद काही धिट व पाच खंबाईत व पंचवीस कद रेशमी. भटजी ओकारेशवरला पाठविला”, अशा प्रकारे प्रत्येक वर्षी अहिल्याबाई ओंकारेश्वरला जात आणि त्यावेळी आपल्या हाताने दानधर्म करीत. गरिबांना अन्नाबरोबर वस्त्रे देत परंतु त्याने जाणे झाले नाही तर आपल्या उपाध्याकडे वस्त्रे पाठवून ते दानधर्माचे आदेश पाठवीत. अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या कामाचे उल्लेख कागदोपत्री मिळतात. त्याचा उल्लेख केला आहे.

जिथे आकडेवारी उपलब्ध झाली आहे तिथे ती दिली आहे. मात्र काही कामाचे फक्त उल्लेख आहेत. इतिहास कालीन असल्यामुळे आकडेवारी उपलब्ध नाही असे संशोधनातून दिसून येते. अहिल्याबाईंनी गायीसाठी अनेक कुरणे राखून ठेवीत असत. सरकारी खर्चानी गाय-वासरांना चारा, वैरणीचा खर्च भागविला जात. अशा गायी जंगलात चरण्यासाठी जात. त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी जंगलात अनेक ठिकाणी अहिल्याबाईनी कुंडे व तळी बांधली. गायी, गुरे, मुक्या प्राण्यांसाठी चारा वैरणीची व्यवस्था केली. गायीसाठी जमिनी लावून दिल्या. पंढरपूर नजीक त्या बोहाळी या खेडेगावी या संदर्भात देवस्थानाच्या जमीन आहेत. अहिल्याबाईंनी गायी चरण्यासाठी जमिनी लावून दिल्या होत्या त्यातील काही जमिनी पंढरपूर जवळील बोहाळी या खेडे गावी होत्या. गायीसाठी गवत कापणे, यासाठी स्वतंत्र खर्चाची तरतूद होती. जेजूरी येथील वाघ्या, मुरळी यांना कऱ्हे पठारावरील गवत कापण्याचे काम अहिल्याबाई होळकरांनी दिले आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला होता.

१००० गवत कटाई गाईकडे ७१, इ.स. १७८० साली गायीसाठी लागणाऱ्या गवत कटाईसाठी १००० रुपये खर्च झाला होता. “श्री देवपूजेकडील कपिला गाईस दररोज पुळे १५० व वासरे यास दररोज पुळे ७५ ह्या प्रमाणे घालणे.” महेश्वर येथे अहिल्याबाईची नित्य पूजेची गाय व त्यांचे वासरे होती. त्यांच्यासाठी रोज २७५ पेंढ्या देण्याची आज्ञा अहिल्याबाईची होती. केवळ गरीब प्रजाच नव्हे तर पशु, स्थलचर, जलचर प्राणीही तिने लेकरासारखे पोसले होते. रोज गोसेवा केल्याखेरीज ती अन्नग्रहण करीत नसे. तिने गायीगुरांसाठी कुरणे राखून दिली. यात नवल नाही पण उभ्या पिकावर येणाऱ्या पाखरांच्या धाडी हाकण्यासाठी होणारा गोफण गुंड्याचा प्रकार पाहून त्यांचे हळूवर मनकळवळले. त्यांनी सुगीच्या दिवसांत अंतरा अंतराने पिकल्या शेतांचा एक वाटा पांखरासाठी राखून ठेवण्यासाठी नेमणुका दिल्या.

अहिल्याबाई होळकर धान्याची अनेक कोठारे व उभे पीक असलेली कित्येत शेते विकत घेत आणि पशुपक्षांसाठी ती मोकळी सोडून देत, मुंग्यांसाठी साखर व माशांसाठी कणकेच्या गोळ्या नेहमीच नर्मदेच्या व क्षिप्रेच्या पाण्यात टाकण्यात येत असत. पशुपक्षांच्या अशा संरक्षणासाठी अहिल्याबाई पुष्कळ खर्च करीत. या कामासाठी त्यांनी मोठा स्वतंत्र नोकरवर्ग नेमलेला होता. अहिल्याबाईंची ही कल्पना आजच्या अभयारण्यासारखी होती. सगळ्याच पक्षांची सोय त्या लावू शकत नव्हत्या परंतु जेवढे शक्य होईल तेवढी सोय अहिल्याबाईंनी केली होती.

अशा प्रकारे अहिल्याबाईने राज्यातील जनतेच्या सुख-सुविधाबरोबर पशु, पक्षी, प्राणी ह्यांचीही काळजी घेतली असे संशोधनातून दिसून येते. मानवतेच्या खऱ्या धर्माची व सामाजिक विचारांचा वारसा अहिल्याबाईंनी चालवला असे चिकित्सक दृष्टीने विचार केला असता लक्षात येते.

अहिल्याबाई होळकरांनी केलेले शिक्षण कार्य :

येथे श्री ‘अहिल्याकामधेनू या ग्रंथाचा उल्लेख केला पाहिजे. राजधर्म आपणास यथायोग्य व यथासंग कळावा या हेतूने अनेक विद्वानांच्या साहाय्याने हा ग्रंथ मातोश्री साहेबांनी तयार करविला. कामधेनीचे अठरा ‘वत्स’ आहेत. ग्रंथाची रचना अति चातुर्याची आहे. प्रत्येक विषयावर असलेल्या ग्रंथाचा समावेश करून जरूर तेथे निर्णय दिलेला आहे यामुळे तत्कालीन प्रसिद्ध व मान्य असलेल्या विद्या, कला आणि त्यांचे प्रणेते यांचा हा कोश बनला आहे. ज्ञान प्रसाराचे कार्य या ग्रंथाने तर केले परंतु पूर्वापार पद्धती जिवंत ठेवण्यासही हा ग्रंथ उपयोग झाला आसणार. महेश्वर आणि इतर तीर्थक्षेत्रांच्या ठायी, अन्य प्रांतीय शास्त्री, पंडित वैद्य व वैदिक आणवूनजी वसाहतीची योजना केली.

पर्यायाने ज्ञानसंरक्षण व ज्ञानसंवर्धन याचीच योजना होय, श्री क्षेत्र काशी येथे त्यांनी ब्रह्मपुरी बसविण्याची ख्याती आहे ती पुरी म्हणजे, साधी राहणी व उच्चविचार सरणी आजन्म विधेस वाहिलेल्या समाज नायकाची वसाहत होय. ते एक प्रकारचे विश्वविद्यालय होय. अशा विश्वविद्यालयातून रामशास्त्री प्रभुण्यासारखी विद्वानरत्ने चमकली.

वरील उदाहरणावरून ज्या काळात समाज शिक्षणाबाबतीत अंधारात चाचपडत होता त्यात काळात अहिल्याबाईंनी “अहिल्याकामधेनू” आणि “ब्रह्मपुरी” सारखे विश्वविद्यालय, महेश्वर येथे संस्कृत पाठशाळा काढून आपला शिक्षणाबद्दलचा उदात्त दृष्टिकोन स्पष्ट करून दिला. त्याचे अनुकरण अनेक सरदारांनी व जहागिरदाराने केले व आपआपल्या प्रांतात अशा यथाशक्ती विद्यादानास सुरुवात केली.

स्त्रीला दत्तक मुल घेण्याची दिलेली परवानगी :

१८ व्या शतकात स्त्री अनेक प्रथा, रूढी, अंधश्रद्धा यात अडकली होती. अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यात काही प्रथा मोडीत काढून स्त्रीला न्याय मिळवून दिल्याचे उल्लेख सापडतात. आपल्या प्रजेला अहितकारक ठरलेले पूर्वीचे सर्व कायदे नियम आणि कर त्यांनी रद्द करून टाकले. अपत्यहीन विधवांचे धन सरकार जप्त करत. तो नियम रद्द करून त्यांनी अशा विधवां दत्तक पुत्र घेण्याची आणि आपल्या धनाचा उपयोग करून देणारा नियम केला. या नियमाचे पालन करण्याच्या कामी विधवांना त्या लागेल ती मदतही देत असत. करांची संख्या व प्रमाणही अहिल्याबाईंनी कमी केले. त्यामुळे राज्याचे उत्पादन घटले तरी प्रजेला लाभ झाला.

स्त्रीला दत्तक मुल घेण्याची दिलेली परवानगी :

एकदा एका विधवेने अहिल्याबाईच्या दरबारात कैफियत दिली की, माझ्याजवळ पुष्कळ पैसा आहे परंतु मला मूल नाही. माझ्या या पैशाचा उपयोग मला करता यावा आणि माझा वंश मला पुढे चालवता यावा यासाठी कोणाला तरी दत्तक घेण्याची परवानगी द्यावी. ही कैफियत अहिल्याबाईंच्या हाती पडली तेव्हा त्यांचे काही अधिकारीही तेथे बसले होते. त्यांनी सांगितले की, “या बाईंना दत्तक घेण्याची परवानगी द्यायला काहीच हरकत नाही. ती खूप धनवान आहे परंतु आधी हे ठरवून घेतले पाहिजे की ती यासाठी सरकारला किती नजराणा देण्यास तयार आहे”. इतर सर्व अधिकाऱ्यांचेही मत असेच होते.

त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर बाई म्हणाल्या, दत्तकाची परानगी घ्यावी हे तुमचे म्हणणे मला पटते परंतु तिच्याकडून नजराणा घेण्याचा विचार काही मला रूचत नाही. तिच्याकडून नजराणा का व कशासाठी घ्यायचा? कोणता घ्यायचा? तिच्यापाशी असलेला सर्व पैसा तिच्या नवऱ्याने कमविला आहे. मूल न होताच तो मेला. तेव्हा आता आपल्या मर्जीप्रमाणे दत्तक घेण्याचा अधिकार आपल्या धर्मशास्त्रानुसार त्याच्या बायकोला आहे. तिला दत्तक कसा काय घेता येईल, असे आम्ही राज्यकारभार चालविणारी मंडळी म्हणत आहोत पण आमचे हे म्हणणे धर्मशास्त्राच्या अगदी विरुद्ध आहे. आता जर आपण काही पैसा घेऊन तिला दत्तक घेण्याची परानगी दिली तर आपले तसे करणे हे धर्माविरुद्ध आणि घोर अन्यायाचे होईल. जबरदस्तीने आपण तिचा पैसा घेतला तर तो दरोडा ठरेल. हे मुळीच योग्य नाही. म्हणून त्या बाईकडून एकही पैसा घेता कामा नये. आमच्यातर्फे त्या बाईच्या कैफियतीवर लिहा की, तुम्ही दत्तक घेत आहात हे समजून आम्हाला फार संतोष वाटतो.

अशा प्रकारे १८ व्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी अनेक विधवांचे प्रश्न अडी अडचणी ऐकूण त्या सोडविल्या. त्यांना न्याय मिळवून दिला, असे विविध ग्रंथांच्या अभ्यासावरून दिसून येते. स्त्रिला समाजात बरोबरीचे स्थान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्या या कार्याच्या महतीवरून प्रसिद्ध कबी मोरोपंत म्हणतो,
देवि अहिल्याबाई । झालीस जगत्रयात तूधन्या ॥
न – न्याय धर्म निरता अन्या कलिमाजि ऐकली कन्या ॥

भिल्ल, गोंड या भक्षकांना रक्षक बनविले :

अहिल्याबाईंच्या राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात सुरक्षितता होती यांचे उदाहरण खालील विश्लेषणावरून होते. प्रजेच्या आणि यात्रेकरूंच्या, व्यापाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या लूटमारीच्या तक्रारी बाईंच्या काना येऊ लागल्या. लुटारू, भिल्ल, गोंड लोकांवर जरब बसवण्यासाठी त्यांनी आपले जावई यशवंतराव फणसे यांना सैन्य घेऊन पाठविले. भिल्लांच्या पुढाऱ्यांना पकडून त्याने मातोश्रींपुढे उभे केले. अहिल्याबाईंनी त्यांची बाजू समजून घेतली. उपजिविकेचे अन्य साधन नसल्याने हे भिल्ल व गोड त्यांच्या डोंगरी मुलखातून मालाची ने-आण करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून “भीलकवडी” या नावाचा कर वसूल करीत. सधन यात्रेकरूंना लूटत. सर्वप्रथम मातोश्रींनी भीलकवडी कराला मान्यता दिली. सरकारने कर वसुलीचा अधिकार दिल्याने ते सरकारचे नोकर बनले.

दुसरे उपजिविकेचे साधन म्हणून त्यांच्या वस्ती शेजारच्या सरकारी पडीक जमिनी देऊन त्यांना शेतीच्या व्यवसायास प्रवृत्त केले परंतु या सवलतीच्या मोबदल्यात त्यांच्या डोगरगळ आणि जंगली भागातील रस्तात्यांच्या व प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. यातील महत्त्वाची अट त्यांनी अशी लावून दिली की, जेवढ्या प्रदेशांचे रक्षण त्यांना करावयाचे होते. त्या प्रदेशाच्या दोन्ही सीमांच्या आत जर कोणाचा माल द्रव्य लुटले तर ते लुटारूकडून परत मिळवून मालकाच्या स्वाधीन करण्याचा भार त्या लोकांवर सोपविला ही व्यवस्था अभूतपूर्व होती. तसेच अहिल्याबाईंनी जागोजागी रक्षक दलाच्या चौक्या बसवल्या. लुटालूट कायमची थांबविली. राज्यातील जनतेला सुरक्षितता प्रापत करून दिली.

वरील विश्लेषणावरून असे लक्षात येते की, अपराधी गुन्हा का करतात याच्या पाठीमागची कारणे लक्षात घेऊन त्यांचा बंदोबस्त करून त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. एखाद्या प्रश्नाच्या मूळाशी जावून तो प्रश्न सोडविला पाहिजे ते अहिल्याबाईनी केले.

अहिल्याबाईंच्या कालखंडातील शेतकरी आणि करव्यवस्था :

अहिल्याबाई राज्यातील शेतकरी सुखी व्हावा यासाठी अहिल्याबाईंनी अनेक कायदे केले होते. राजकारभार त्यांच्या हाती येताच, शेती व शेतकरी यांच्या उन्नतीकडे लक्ष पुरविले. शेतीचे महत्त्व त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होते. एखाद्या वर्षी पाऊस नीट न झाल्यामुळे पीक कमी आले तर शेतकऱ्यांना सारामाफी देण्यात येई व इतरही सोयी, सवलती दिल्या जात. लष्करी हालचालीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास ताबडतोब भरपाई करून दिली जात असे. सरकारी अधिकारी व नोकरवर्ग यांच्या जाचा पासून अहिल्याबाईच्या राज्यातील शेतकरी सर्वस्वी मुक्त होता. जमिनीवरील करही अगदीच माफक असे. शेतकऱ्यावर शेतसाऱ्याखेरीज इतर कोणताही कर नव्हता.

शेतसारा व कर वसुली यांच्यासाठी त्यांनी आपल्या राज्याचे उत्तर, मध्य व दक्षिण असे तीन भाग केले होते. उत्तर विभागात इंदोर, मराना व राजपुताना येत असे. मध्य भागात महेश्वर त्याच्या आसपासचा इलाखा मोडत आणि दक्षिण भागात सातपुड्याच्या दक्षिणेकडील भाग येई. राज्यात शांतता व सुव्यवस्था असल्यामुळे बाहेरचे व्यापारीही निर्भयपणे राज्यात व्यापार करीत असत. अहिल्याबाईंनी संरक्षण दिलेल्या वस्त्रोद्योग महेश्वरमध्ये वाढत होता. अनेक अन्यायी करांची प्रथा त्यांनी बंद केली होती. अशा प्रकारे अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात शेतकऱ्याला संरक्षण प्राप्त करून दिले.

अहिल्याबाई होळकरांनी विविध विद्वानांना दिलेला राजाश्रय :

तत्कालीन कालखंडात जे विद्वान, शाहीर, पंडित, कवि यांना प्रामुख्याने आजच्या सारखे शासनातर्फे मानधन, पुरस्कार नसत तर ह्या लोकांना राजे, संस्थानिक धनिक यांचा राजाश्रय होता. विद्वान, विचारवंत, कवी हे लोकांचे दुःख मांडणारे व देशातील नवनवीन शोध घेणारे आहेत हे अहिल्याबाईंनी जाणले होते. अहिल्याबाई धार्मिक प्रवृत्तीच्या असल्या तरी अज्ञानी नव्हत्या. अनुभवाचे ज्ञान त्यांच्यापाशी भरपूर होते. कीर्तन, प्रवचन, पुराण श्रवणाने त्यांना धार्मिक ज्ञान प्राप्त झाले होते. ब्राह्मण भोजने घालण्याबरोबर विद्वान, पंडित, कवि यांची कदर करणारी होती.

रामायण, महाभारत, गीत गोविंद, ज्ञानेश्वरी, स्वयंराख्याने, रस मंजिरी, रघुवंश, विष्णुसहस्ननास, व्यंकटेशस्त्रोम पूजा प्रकार, दान चंद्रिका, मुहूर्तचिंतामणी, निर्णयसिंधु, अनुवेदांत इत्यादी अनेक प्रकारची धार्मिक हस्तलिखित होती. १७६८ मध्ये चांदवडाकडून मातोश्रींने तेवीस पोथ्या मागवून घेतलेचा एक उल्लेख मिळतो. विद्वान पंडितांची, ज्योतिषाची, वैद्यांची, कीर्तन – प्रवचनकारांची, कलाकारांची मातोश्रींकडे नेहमी ये-जा असे. योग्यतेप्रमाणे मातोश्रीं सर्वांचा पाहुणचार नी आदरसत्कार करी, कित्यंकास इनामे दिली तर कित्येकांस दरबारात आश्रय मिळे. पंडित-कवी मोरोपंत आणि शाहीर अनंतफंदी यांचा मातोश्रींने आदरसत्कार केल्याची गोष्ट सर्वश्रुत आहे. मातोश्रींच्या कृपा लोबाला पात्र झालेल्या काही विद्वानांची नावे उपलब्ध आहेत ती पुढीलप्रमाणे : १)मल्हारभट, २)ज्ञानोबा पुराणिक, ३)रामचंद्र कानडे, ४)काशीनाथ शास्त्री, ५)दामोदर शास्त्री, ६)निहाल भट, ७)भड्टाशास्त्री क्रणवेदी, ८)गोटू शास्त्री, ९)मनोहर बर्वे, १०)गणेश भट, ११)त्र्यंबक भट, १२)महंत सुंजगीर गोसावी, १३)त्रिंबक बुवा हरदास, १४)अनंत रामजी, १५)गोविंदराम पांडे, १६)बाळकृष्ण भट जोशी, १७)बाळारामजी, १८)गणेशराम हे सर्व विद्वान विविध शास्त्रांचे अधिकारी होते.

ते सर्व महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, माळवा आदी दूरदूस्च्या भागातील होते. अहिल्याबाईंची ज्ञालालसा आणि औदार्यबुद्धी किती व्यापक होती. गुणीजणांची त्या केवढी कदर करायच्या हे वरील विश्लेषणावरून दिसून येते.

अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले काही नदीघाट :

संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी यात्रेकरूंची सोय व्हावी म्हणून तसेच अनेक गावांच्या ठिकाणी अहिल्याबाईंनी अनेक नदीघाट बांधले असे संशोधनातून दिसून येते. काही ठिकाणी नदीघाटांची बांधलेल्या नोंदी आढळतात. परंतु बरीचशी ठिकाणे अशी आहेत की त्या ठिकाणी अहिल्याबाईंनी लोकांच्या उपयोगासाठी नदीवर घाट बांधले मात्र याची नोंद सापडत नाही. संशोधनाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील व मध्यप्रदेशातील अनेक घाट पाहिले त्यांची सर्वांची स्थिती अद्यापही चांगली आहे. बरेच घाट स्थापत्यशास्त्र सौंदर्याच्या दृष्टीतून अतिशय रम्य व प्रेक्षणीय आहेत. अहिल्याबाईंनी २०० वर्षापूर्वी बांधलेले घाट आजही सुस्थितीत आहेत. त्यामुळे त्याचे बांधकाम करणारे कारागिर यांची कसब याठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे.

तत्कालीन कालखंडात पाऊसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. नदीला पूर आल्यानंतर लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते त्यामुळे लोकांनी पुराच्या वेळेस सोय व्हावी. घाटामुळे काही गावांचे संरक्षण होते. तत्कालीन कालखंडात शासकीय नळयोजना नव्हत्या, बीज नव्हती त्यामुळे लोकांना नदी व विहिरीवरून पाणी आणावे लागे. त्यासाठी नदीवर घाट असणे महत्त्वाचे होते व पक्या बांधीव विहरी असणे गरजेचे मानले जात अशा प्रकारचे विविध दृष्टीकोन समोर ठेऊन अहिल्याबाई होळकरांनी नदीघाट बांधले असे संशोधनातून दिसून येते.

  • मंडलेश्वर येथील घाट – मध्य प्रदेशातील महेश् वर येथून जवळच मंडलेश् वर नावाचे गाव आहे. येथे अहिल्याबाईंनी एक सुंदर घाट नर्मदा नदीला बांधला.
  • गयातीर्थ येथील घाट – गया येथे देखील अहिल्याबाई होळकरांनी एक सुंदर घाट बांधला याचा उल्लेख खालील प्रमाणे मिळतो. “यह मी काले पत्थरसे बना विशाल और मनोरम घाट विष्णुपद मंदिर के सन्मीकट फल्गु नदी के पश्चिमी तीर पर अवस्थित है । इसके निर्माण कार्य मे पाँच हजार रुपये खर्च किये गये थ|
  • श्री कुरूक्षेत्र व श्री नेमीपारण्य येथील घाट – कुरूक्षेत्राला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. अहिल्यादेवीने तेथे एक घाट बांधला. श्री कुरूक्षेत्र दिल्ली नजीक समता कुंडावर घाट व लक्ष्मी कुंडावर घाट श्री
    नैमीसारण्य, चक्रतीर्थ कुंड, धर्मशाळा गोघाट, असा उल्लेख मिळतो.
  • नाशिक येथील घाट – नाशिक या शहराची संस्कृती फारच प्राचीन आहे. महाराष्ट्रात मराठी सत्ता स्थापन झाल्यावर. मुसलमानांनी जी पवित्र क्षेत्रे धुळीस मिळविली. या कामी पेशव्यांच्या पदरी असलेले नामवंत सरदार, व्यापारी आणि मोठमोठ्या धनवंत लोकांनी नाशिक हे शहर मोठ्या वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले. या तीर्थक्षेत्री अहिल्याबाईनी आपल्या कारकिर्दीत घाट व मंदीरे व धर्मशाळा बांधल्या येथील घाटाच्या समोरच अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले अहिल्याराम मंदीर व धर्मशाळा आहे. घाटाच्या वर काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. घाटाची स्थिती चांगली आहे परंतु हा घाट केव्हा बांधला याला किती खर्च लागला याचा उल्लेख सापडत नाही.
  • पुणतांबे येथील अहिल्याघाट – अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक् यातील पुणतांबे एक लहानसे गाव आहे. कोपरगाव शहरापासून २० कि. मी. अंतरावर गोदावरी या नदीच्या काठी हे गाव आहे. येथील एक सरदार अहिल्याबाईच्या पदरी होते. पुणतांबे हे पुण्यक्षेत्र आहे तेथे अहिल्याबाईनी गोदावरी नदीकाठी बांधून दिला. पुणतांब्याच्या गोदावरीला बांधलेला हा घाट म्हणजे प्रयाग, मंडलेश्वर येथील घाटाप्रमाणेच उल्लेखनीय घाट म्हणावा लागेल. या घाटाचे बांधकाम लोकमाता अहिल्यादेवी यांनी करवून घेतले. प्रस्तुत घाट गोदावरी नदीच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर गावाची वस्ती असलेल्या बाजूने बांधलेला आहे. गोदावरी नदी गावाच्या पश्चिमेला असून उत्तरेकडे वाहत या घाटाला सुंदर अशा २६ पायऱ्या आहेत. एका घाटाला दोन्ही बाजुंनी गोल बुरूज बांधले आहेत. एका बुरूजाच्या वरच्या भागाला पुरातन महादेव मंदीर आहे. या महादेव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी अहिल्याबाईंनी बुरजालगतच सुंदर काळ्या पाषाणाच्या पायऱ्या बांधुन दिल्या आहेत. पुणतांब्याचा हा घाट अद्यापही अहिल्या घाट म्हणून प्रसिद्ध आहे.
पुणतांबे येथील अहिल्या गोदावरी नदीवरील नदीघाट

अहिल्याबाई यांनी बांधलेल्या विहिरी किंवा बारव :

भारतात आर्यांनी बहुधा नदीच्या काठी पाण्यासाठी आपली वस्ती स्थाने निवडली. कालांतराने वस्ती जशी वाढत गेली तसा पाण्याचा प्रश्न उपस्थित होऊ लागला. यातूनच विहिरीची कल्पना उदयास आली असावी कारण प्राचीन काळापासून विहिरींचे उल्लेख सापडतात. प्राचीन काळापासून पाणी पुरवठा करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून विहिरीकडे पाहिले जाते. सिंधु संस्कृतीमध्ये सुद्धा विहरीचे उल्लेख आढळतात. पूर्वीच्या काळी सहकारी पाणीपुरवठा योजना, बीज इत्यादी आधुनिक तंत्राचा अभाव असल्यामुळे संभाव्य दुष्काळाला तोंड देणे. लांबच्या प्रवाशाची पाण्याची सोय करणे इ. कारणासाठी प्राचीन काळापासून राज्यकर्ते लोक कर्तव्य बुद्धीने तलाव व विहिरी बांधीत असत.

लढाईवर दौड करणाऱ्या लोकांसाठी तसेच तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांसाठी रस्त्यात पाण्याची सोय व्हावी. तेथील लोकवस्तीची पाण्याची सोय व्हावी यासाठी विहिरी खोदल्या होत्या. असे संशोधनातून दिसून येते. राजा अशोक, शेरशहासूर, अहिल्याबाई इत्यादीने अशा लोकपयोगी विहिरी बांधल्या आहेत. अशा प्रकारे संपूर्ण भारतात अहिल्याबाई होळकरांनी अनेक ठिकाणी विहिरी बांधलेल्या आहेत. त्यातील काहीचे उल्लेख सापडतात परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अहिल्याबाईंनी विहिरी बांधलेल्या आढळून येतात त्यांना लोक अहिल्याबाई काळातील विहिरी किंवा बारव म्हणून उल्लेख करतात.

  • चांदवड येथील नरोटी बारव – चांदवड गावात ही विहीर “नरोटी बारव” म्हणून प्रसिद्ध आहे. ही विहीर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली आहे. पक्की विहीर सदरहूव जुनी बांधलेली असून गंत्री बागेत आहे. सर्वे ५६ नरोटी बारव आजही चांगल्या स्थितीत आहे. या विहिरीला आजही भरपूर पाणी आहे. गावातील लोक आजही या विहिरीचे पाणी वापरतात. ही बारव काळ्या धडी दगडाची बांधलेली आहे. आतमध्ये एक कुंड असून त्यात पाणी आहे.
  • सकरगाव ता. निफाड जि. नाशिक येथील विहिर – निफाड या शहरापासून १५ कि. मी. अंतरावर सकरगाव आहे. या गावाला व भागाला ऊस, कांदे, द्राक्षे यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. हे गाव पूर्वी खानदेश परगण्यात येत होते. या गावाला अहिल्याबाई होळकरांनी एक मोठी पाय विहिर बांधली आहे. आजही ती अहिल्याबाईची बारव या नावाने प्रसिद्ध आहे. सकरगावची ही विहीर आजही चांगल्या स्थितीत आहे. पूर्वी या गावाची ही एकमेव विहिर पाणीपुरवठ्याचे साधन होते. विहिरीचे बांधकाम दगडांनी व चुन्यात केले आहे.
  • भिमाशंकर येथील विहिर – भिमाशंकर हे १२ ज्योतिर्लिंगातील क्षेत्र आहे. पुण्यापासून ७५ मैला वर आहे. हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथील भीमाशंकराचे मंदीर हेमाडपंती दगडी बांधणीचे असून त्यावर दशावताराच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अहिल्याबाईनी जनतेच्या कल्याणासाठी अनेक कल्याणकारी कामे केली आहेत. भीमाशंकर येथेही यात्रेकरूंची पाण्याची सोय व्हावी यासाठी हि विहिर बांधली आहे. “ती भीमाशंकर येथे धर्मशाळा इमारत, बावडी वगैरे आहे, असा उल्लेख येतो.
  • जेजूरी येथील विहिर –पुणे जिल्ह्यात जेजुरी हे खंडोबाचे देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध देवस्थान आहे. जेजुरीचा मल्हारी मार्तंड हे होळकरांचे कुलदैवत. मल्हारराव होळकरांनी मल्हारी मार्तंडांचा किल्ला बांधला. अहिल्याबाई होळकरांनी येथे सरकारी वाडा, श्री गौतमेश्वर छत्री मंदिर, मल्हार तलाव व विठ्ठल रखुमाईचे मंदिर बांधले. याशिवाय एक विहिर बांधली. ‘श्री क्षेत्र जेजुरी पुणे जिल्हा श्री मल्हारे गौतमेश्वर, तालिमखाना, सरकारी वाडा, श्री दत्त पादुतश्पेरे आहित व कुवा आहे.” असा संदर्भ येतो.
  • उज्जेन येथील विहिर –उज्जैन हे प्राचीन काळापासून एक धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. उज्जैन येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग महाकालेश्वर या नावाने ओळखले जाते. तेथील यात्रेकरूंची सोय व्हावी यासाठी अहिल्याबाई होळकरांनी चिंतामणी गणेशाचे मंदिर, जनार्दन मंदिर व घाटाची उभारणी केली. या चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या दृष्टीने अहिल्याबाईंनी विहिर बांधली आहे. “उज्जैन अंगणात श्री चिंतामण गणपती ३ जमीनबाघे, २ धर्मशाळा, ३ बावडी अंदाजे किंमत ५००० श्री कै. अहिल्या मा. साहेब यांनी बांधले”, अशाप्रकारे कागदोपत्री उल्लेख आहे.
कसारा(थळ घाट) मधील अहिल्यादेवींची टोप बारव

अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या धर्मशाळा :

अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या धर्मशाळेचा शोध घेतला असता त्याची काही वैशिष्ट्ये दिसून येतात ती पुढीलप्रमाणे आहेत.

  1. प्रत्येक धर्मशाळेत अन्नछत्र व सदावर्ते चालूकेली होती.
  2. धर्मशाळेची व्यवस्था पाहण्यासाठी कायमस्वरूपी खर्च लावून दिला होता.
  3. धर्मशाळा या नदी अथवा विहिरीच्या जवळ बांधलेल्या होत्या त्यामुळे पाण्याची सोय होत.
  4. प्रत्येक धर्मशाळेत मंदिर बांधले होते.
  5. सर्वच धर्मशाळा पक्क्याविटात बांधलेल्या आहेत.
  6. चारही बाजुनी भिंतीची उंची जास्त ठेवण्यात आलेली होती.
  7. धर्मशाळा समोर तुळशी वृंदावन व बाकीचा भाग मोकळा सोडलेला आहे.
  8. मुख्य प्रवेशद्वार उंच असून पहाऱ्याची व्यवस्था केलेली आहे.

अहिल्याबाई होळकरांनी ज्या धर्मशाळा बांधल्या त्यामागे त्यांचे दूरदृष्टी नेतृत्व दिसून येते. त्यांनी धर्मशाळेत लोकांना जास्तीत जास्त सुख सुविधा व सुरक्षितता प्राप्त करून दिली. सर्वात महत्त्वाची त्यांची प्रशासकीय दृष्टी येथे दिसून येते कि धर्मशाळासाठी कायमस्वरूपी नोकरवर्ग नेमला कारण यात्रेकरूंच्या अडचणी सोडविण्यासाठी हा नोकरवर्ग मदत करत असे अशा प्रकारे अहिल्याबाईनी बांधलेल्या धर्मशाळा अतिशय महत्त्वाच्या ठरतात. अहिल्याबाई होळकरांनी भारतात खालील ठिकाणी धर्मशाळा बांधल्याचे उल्लेख सापडतात ते देवस्थान क्लासिफिकेशन लिस्टमध्ये होळकर सरकारने १९२३ साली प्रकाशित केली.

  • केदारेश्वर येथील धर्मशाळा – माल्कम या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या “दी मेमोरियल ऑफ सेंट्रल इंडिया” या इंग्रजी पुस्तकात केदारेश्वर येथील धर्मशाळेचा उल्लेख सापडतो तो पुढीलप्रमाणे “केदारेश्वर धर्मशाळा ४० फूट लांब १५ फूट रुंद” माल्कम म्हणतो की “माझा पोलिटिकल असिस्टंट कॅप्टन टी. डी. स्टुअर्ट हा इ. स. १८१८ साली केदारनाथाला गेला होता. अहिल्याबाईच्या नावाबद्दल त्या टोकास असलेल्या प्रांतातही किती विलझण आदर आहे हे तो मला वारंबार सांगे, तिथे अजुनही चांगल्या स्थितीत दगडी धर्मशाळा व एक पाण्याचे कुंड आहे. तीन हजार फुट उंच असलेल्या ठिकाणी जेथे मनुष्य वस्तीचे किंचीतही चिन्ह दिसत नाही. तिथे यात्रेकरूसाठी ही
    कामे त्या राणीने आपल्या खर्चांनी केली आहेत.”
  • उत्तर काशी येथील धर्मशाळा – काशी हे हिंदूचे पवित्र तीर्थक्षेत्र. येथे इतर कामाबरोबर अहिल्याबाई होळकरांनी यात्रेकरूसाठी धर्मशाळा बांधली त्याचे उल्लेख पुढीलप्रमाणे मिळतो. “धर्मशाळा ३२ तास, लांब १३ हात खूंद धर्मशाळा आहे.”
  • हरिद्वार येथील धर्मशाळा – या ठिकाणी खालीलप्रमाणे धर्मशाळेचा उल्लेख मिळतो. “हवेली धर्मशाळा १०२ फुट लांब, ७८ फूट रुंद, किंमत २५०००० श्री कै. अहिल्याबाई सो. महाराजांनी सन १७५८ इ.स. बांधली सदरची हवेली फरशी व पक्की बांधलेली असोन खोल्या भाड्याने दिल्या आहेत.
  • श्री क्षेत्र अयोध्या येथील धर्मशाळा – अयोध्या हे प्राचीन कालखंडापासून हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. यात्रेकरू तेथे मोठ्या संख्येने जात असतात. त्यांची निवासाची सोय व्हावी यासाठी अहिल्याबाई
    होळकरांनी तिथे धर्मशाळा बांधली. धर्मशाळा नं. ५ किंमत १५०० श्री के. अहिल्याबाई मासाहेब यांचे कारकिर्दीत एक मजली बांधलेली आहे
  • उज्जैन अंगपात येथील धर्मशाळा – मध्यप्रदेशातील उज्जैन हे १२ ज्योतिर्लिंगातील एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. अहिल्याबाईनी येथे चिंतामणी गणेशाचे मंदिर, घाट, जनार्दन मंदिर या बरोबरच २ धर्मशाळा बांधल्या. अन्नछत्र व धर्मशाळा २६ फूट लांब, २० फूट रुंद अंदाजे किंमत २००० रुपये, या धर्मशाळे समोर ओवऱ्या आहेत. इथे यात्रेकरू, संन्याशी, भिक्षुक राहतात. दुसरी धर्मशाळा चिंतामणी गणेशाच्या मंदिरा शेजारी आहे.

अहिल्याबाई होळकरांनी धार्मिक ठिकाणी बांधलेले वाडे :

  • पंढरपूर येथील वाडा – भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी पंढरपूर एक आहे. भारतातून येथे वर्षातून ज्या दोन मोठ्या आषाढी व कार्तिकी यात्रा भरतात. त्यासाठी यात्रेकरू येतात. पंढरपूरमध्ये अनेक संस्थानिक, सरदार, राज्यांनी वेगवेळ्या भागातून आलेल्या यात्रेकरूंची राहण्याची सोय व्हावी म्हणून येथे धर्मशाळा, वाडे, मठ बांधले आहेत. अहिल्याबाईनेही पंढरपूरचे महत्त्व ओळखून येथे एक भव्य व प्रशस्त वाडा बांधला. या वाड्याचा पाया काळ्या दगडांचा असून भिंतीचे काम चुना आणि विटा यांच्यात बांधले आहे. वाड्याच्या मध्यभागी मोठा चौक आहे. यात्रेकरूंना राहण्यासाठी येथे खोल्या बांधल्या आहेत. पहिल्या माळ्यावर १३ खोल्या आहेत व वरच्या माळ्यावर ११ खोल्या आहेत. वाड्याच्या दर्शनी भागात ६ खोल्या आहेत. वाड्याच्या मागील बाजूने दुसरे द्वार असून येथून चंद्रभागा नदीवर जाता येते. या वाड्यात दोन भुयारी मार्ग असून एक मार्ग विठ्ठल मंदिरात तर दुसरा मार्ग नदीवर जातो. आजही हा वाडा सुस्थितीत आहे त्यामुळे यात्रेकरूंना निवासासाठी राहता येते.
  • चांदवड येथील वाडा – चांदवड हे नाशिक जिल्ह्यात आहे. चांदवड हे होळकरांचे उपराजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे यात्रेसाठी व मजल-दरमजल करीत मोहिमेवर जाते वेळेस ह्या वाड्याचा उपयोग होत असे. चांदवड येथील वाड्याला रंगमहाल असे म्हणतात. प्रवेशद्वार उंच आहे. प्रवेशद्वारला लागूनच वाड्यास भव्य तटबंदी आहे. तंटबंदीस बुरूज आहेत. या तटबंदीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही अंगास खोल्या आहेत. वाड्याच्या मध्यभागी प्रशस्त चौक आहे. या वाड्यात खाजगी ट्स्ट चांदवडचे ऑफीस आहे. वाड्याचा उपयोग चांदवड येथील प्रसिद्ध रेणुका देवीच्या यात्रेला येणाऱ्या लोकांसाठी होत आहे. होळकर ट्रस्ट तर्फे या वाड्यात अहिल्याबाईचा पुतळा चौकात बसविण्यात आला आहे.
  • जेजुरी येथील वाडा – जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध खंडोबा देवस्थान आहे. खंडोबा हे होळकरांचे कुलदैवत आहे. मल्हारराव होळकरांनी खंडोबाचा गड व वाडा बांधला. आज तो होळकर वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. अहिल्याबाई होळकरांनी या वाड्याची डागडुजी केल्याचा उल्लेख आहेत. होळकर वाडा विटा व चुन्यात बांधलेला आहे. होळकर ट्रस्टतर्फे वाड्यात आतमध्ये अहिल्याबाई होळकरांचा संगमरवरी पुतळा बसविलेला आहे. वाड्यात होळकर खाजगी ट्स्टचे कार्यालय असून तेथे मॅनेजर नेमले आहेत. वाडा आजही चांगल्या स्थितीत आहे. वाड्यात दत्ताचे मंदिर आहे व चारही बाजूनी यात्रेकरूसाठी खोल्या बांधल्या आहेत. अशा प्रकारे जेजुरी येत्रील वाड्याची रचना केली आहे.
पंढरपूर येथील होळकर सरकार वाडा.

अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला रस्ता :

तत्कालीन कालखंडात दळणवळणाची प्रवासाची साधने अत्यंत मर्यादित होते. बरेचसे लोक घोड्यावरून दौड करत असत. रस्ता अत्यंत खडतर असे काही राजे, संस्थानिक आपल्या संस्थानात रस्ते तयार करीत असत परंतु ते काम फार खर्चिक असल्यामुळे त्यावर मर्यादा पडत असत. अहिल्याबाई या अत्यंत दानशूर होत्या. हे संशोधनातून दिसून येते. तत्कालीन कालखंडात काशी यात्रा करण्यासाठी फारच कष्ट पडत असत म्हणून प्रवासाच्या सोयीसाठी अहिल्याबाई होळकरांनी कलकत्ता ते काशी हा रस्ता बांधून काढला. कलकत्ताहून काशी पर्यंत पक्की सडक तिनेच बांधून काढली. स्वतःची वाटचाल काटेरी असली तरी इतरांसाठी पायघड्या पसरल्यासारखे रस्ते तिने बनवून घेतले. अशा प्रकारे अहिल्याबाई रस्ता तयार केला. अहिल्याबाई होळकरांनी अनेक ठिकाणी रस्ते तयार केले परंतु त्याची नोंद सापडत नाही असे शोध अंती दिसून येते.

अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले पुल :

  • त्र्यंबकेश्वर कुशावर्लावरीलपूल दुरुस्त करविला – तत्कालीन कालखंडात शासन व्यवस्था नसल्यामुळे आपआपल्या राज्यातील संस्थानिक जनतेकडून जो सारा, चौथाई मिळत त्यातून अनेक लोककल्याणकारी कामे करीत असत. लोकांना दळणवळण करणाऱ्यास नदीवरील तसेच घाटातील पूल बांधले जायचे. त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकरांनी पूल दुरुस्त केल्याचा उल्लेख मिळतो. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. अहिल्याबाईनी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त घाटावर म्हणजे मंदिराकडून कुशावर्ताकडे जाणाऱ्या पुलाचा जीर्णोद्धार केला. श्री त्रिंबकेश्वर नाशिक जिल्हा कुशावर्त, घाटाजवळील पूल दुरुस्त करविला. आज या पुलावर नगरपालिकेने फरशी बसविली आहे. आज हा पूल वापरत नाहीत.
  • मालेगाव येथील मोसम पूल – मालेगाव हे नाशिक जिल्ह्यात आहे ते मुंबई महामार्गावर आहे. मालेगाव येथील नदीवर अहिल्याबाई होळकरांनी लोकांच्या जाण्यायेण्याची, दळणवळणाची सोय व्हावी यासाठी हा पूल बांधला. आजही हा पूल सुस्थितीत आहे. नगरपालिकेने या पुलाशेजारी काही वर्षांपूर्वी पूल बनवून घेतला आहे. मालेगाव येथील मोसम पुलाबाबत होळकर दफ्तरात कुठेच नोंद साडपत नाही. मालेगाव गावातील वयोवृद्ध नागरिक हा पूल अहिल्याबाईंनी बांधला असे सांगतात. हे रुण लक्षात घेऊनच मालेगाव नगरपालिकेने ह्या पुलाजवळ एक पाण्याची मोठी वॉटर टँक व उद्यान उभारले आहे. त्याला अहिल्याबाई होळकरांचे नाव दिले आहे.

अहिल्यादेवी होळकर यांचे भारतभरातील लोककल्याणकारी कार्य

(संकलन स.२०१७ पर्यंतचे असून यामध्ये मौखिक व लिखित निर्माण आणि जीर्णोद्धार कार्यांचा समावेश आहे)

महाराष्ट्र राज्य – Maharashtra:

A. अहमदनगर जिल्हा:
१. अकोले तालुका:
  • वाशेरे – बारव.
  • वीरगाव – बारव.
  • औरंगपूर – बारव.
  • तांभोळ – बारव.
  • ब्राह्मणवाडा – लिंबोणी बारव(मळ्याच्या वाहळाजवळ).
  • लिंगदेव – लिंगेश्वर महादेव मंदिर व बारव.   
  • कुंभेफळ – शेषनारायण मंदिर, बारव.