Skip to content

महाराजा यशवंतराजे होळकर यांच्या चित्राचा इतिहास

Post वाचण्याअदोगर खालील फोटो एकदा अवश्य पहा.

चक्रवर्ती यशवंतराव महाराजांचे प्रसिद्ध चित्र आणि त्यांची माहिती,

फोटो क्रं.१ : हा फोटो यशवंतराव महाराजांच्या भानापुरा, मध्यप्रदेश येथील छत्री (समाधी मंदिर) मधील असून त्यामध्ये त्यांची मूर्ती दिसत आहे. या छत्रीचे निर्माण त्यांच्या पत्नी तुळसाबाई साहेब आणि कृष्णाबाई साहेब ह्यांनी करवून घेतलं असून राजस्थानी मूर्तीकाराकडून त्यांच्या रूपाप्रमाणेच ती मूर्ती बनवून घेतली आहे.

फोटो क्रं.२ : हे चित्र यशवंतराव महाराजांचेच असून ते आमच्या वैयक्तिक नोंदीमधील एका जुन्या वंशावळीतील आहे.

फोटो क्रं.३ : हे चित्र सुद्धा यशवंतराव महाराजांचे असून श्री. प्रतापराव जाधव यांनी चितारले आहे.

फोटो क्रं.४ : हा फोटो श्री. प्रतापराव जाधव यांचा आहे. श्री. जाधव यांना महाराजा शिवाजीराव होळकर ह्यांनी १८९० मध्ये ‘state painter and photographer’ म्हणून नियुक्त केले होते. आणि उपलब्ध संस्थानातील नोंदी, छत्रीमधील मूर्ती, जुनी चित्रे यांचा अभ्यास करून होळकर राज्यकर्त्यांची सर्व चित्रे तयार करायला सांगितले होते.

Ahilyabai Holkar android App

श्री. जाधव ह्यांनी हे सर्व चित्र (पोट्रेट) बनवून महाराजा तुकोजीराव होळकर(तिसरे) ह्यांच्या जन्मदिनादिवशी महाराजाना अर्पण केले. हि सर्व चित्रे सध्या लालबाग पॅलेस, इंदौर येथे असून बघता येऊ शकतात.

वरील तीनही फोटो पहाता त्यामध्ये ८०% साम्य असून क्र.३ चा फोटो अस्सल मानण्यात हरकत नाही असे आम्हास वाटते.

याच पद्धतीने इतर संस्थाने ग्वालियर, बडोदा, मैसूर इत्यादी यांनी वेगवेगळ्या संस्थानाकडून आपल्या पूर्वजांची चित्रे सन १८५० च्या नंतरच्या काळात बनवून घेतली आहेत. आणि काही पॅलेस आणि म्युझियम मध्ये पहाता हि येतात.

टीप – कलाकारानुसार चित्र रंगविण्याच्या तंत्र-कौशल्यात बदल होत गेला आणि प्रत्येक कलाकाराच्या काम करण्याच्या पद्धतीत हि वेगळी शैली असते. म्हणून एकाच व्यक्तीचे दोन वेगळ्या कलाकारांनी काढलेल्या चित्रात फरक असणे स्वाभाविक आहे.

माहितीसाठी आभार : श्री.भूषणसिंह महाराज होळकर

फोटो पहा

फोटो क्रं.१
फोटो क्रं.२
फोटो क्रं.३
फोटो क्रं.४

यशवंतराजे होळकर यांच्याविषयी पुस्तके पहा : Yashwantrao Holkar Books

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]

सुमितराव लोखंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *