चक्रवर्ती यशवंतराव महाराजांचे प्रसिद्ध चित्र आणि त्यांची माहिती,
फोटो क्रं.१ : हा फोटो यशवंतराव महाराजांच्या भानापुरा, मध्यप्रदेश येथील छत्री (समाधी मंदिर) मधील असून त्यामध्ये त्यांची मूर्ती दिसत आहे. या छत्रीचे निर्माण त्यांच्या पत्नी तुळसाबाई साहेब आणि कृष्णाबाई साहेब ह्यांनी करवून घेतलं असून राजस्थानी मूर्तीकाराकडून त्यांच्या रूपाप्रमाणेच ती मूर्ती बनवून घेतली आहे.
फोटो क्रं.२ : हे चित्र यशवंतराव महाराजांचेच असून ते आमच्या वैयक्तिक नोंदीमधील एका जुन्या वंशावळीतील आहे.
फोटो क्रं.३ : हे चित्र सुद्धा यशवंतराव महाराजांचे असून श्री. प्रतापराव जाधव यांनी चितारले आहे.
फोटो क्रं.४ : हा फोटो श्री. प्रतापराव जाधव यांचा आहे. श्री. जाधव यांना महाराजा शिवाजीराव होळकर ह्यांनी १८९० मध्ये ‘state painter and photographer’ म्हणून नियुक्त केले होते. आणि उपलब्ध संस्थानातील नोंदी, छत्रीमधील मूर्ती, जुनी चित्रे यांचा अभ्यास करून होळकर राज्यकर्त्यांची सर्व चित्रे तयार करायला सांगितले होते.
श्री. जाधव ह्यांनी हे सर्व चित्र (पोट्रेट) बनवून महाराजा तुकोजीराव होळकर(तिसरे) ह्यांच्या जन्मदिनादिवशी महाराजाना अर्पण केले. हि सर्व चित्रे सध्या लालबाग पॅलेस, इंदौर येथे असून बघता येऊ शकतात.
वरील तीनही फोटो पहाता त्यामध्ये ८०% साम्य असून क्र.३ चा फोटो अस्सल मानण्यात हरकत नाही असे आम्हास वाटते.
याच पद्धतीने इतर संस्थाने ग्वालियर, बडोदा, मैसूर इत्यादी यांनी वेगवेगळ्या संस्थानाकडून आपल्या पूर्वजांची चित्रे सन १८५० च्या नंतरच्या काळात बनवून घेतली आहेत. आणि काही पॅलेस आणि म्युझियम मध्ये पहाता हि येतात.
टीप – कलाकारानुसार चित्र रंगविण्याच्या तंत्र-कौशल्यात बदल होत गेला आणि प्रत्येक कलाकाराच्या काम करण्याच्या पद्धतीत हि वेगळी शैली असते. म्हणून एकाच व्यक्तीचे दोन वेगळ्या कलाकारांनी काढलेल्या चित्रात फरक असणे स्वाभाविक आहे.
१८ व्या शतकात होळकर घराण्यातील सुभेदार मल्हारराव होळकर यांनी मोठा पराक्रम गाजवून स्वतःचे माळव्यात छत्रपतींच्या सनदेनुसार पेशव्यांनमार्फत आपले राज्य स्थापन...
जेजुरी गड, ता.पुरंदर जि.पुणे(महाराष्ट्र)Jejuri Gad, Tal-Purandar Dis-Pune(MH) इतिहास : श्री मल्हारी मार्तंड देवस्थान म्हणजेच श्री खंडोबा यांचे मंदिर. जेजुरीचे मंदिर...
दि.२०-२१ डिसेंबर १८१७ महिंदपुर,जि.उज्जेन(मध्यप्रदेश) तृतीय मराठा-इंग्रज युद्ध हे महाराष्ट्रामध्ये नियोजीत होते. या युद्धामध्ये हिंदवी स्वराज्यातील प्रमुख तीन घराणी व त्यांचे...
किल्ले वाफगाव - Wafgaon Fort,ता.खेड जि.पुणे(महाराष्ट्र) इतिहास : होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचे उदाहरण म्हणजे वाफगावचा भुईकोट किल्ला (Wafgaon Fort) होय. हा...
"श्री मल्हारराव चरणी तत्पर खंडोजी सुत मालेराव होळकर" महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी असलेले वाफगाव ऐतिहासिकरित्या महत्त्वाचे असुन होळकर रियासतीचा...
महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचे जन्मगाव वाफगाव ता.राजगुरू जिल्हा पुणे असुन वाफगावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. होळकर राजघराण्यांच्या वंशावळीत सहावी वस्ती होळकरांची...
All material appearing on the Ahilyabai Holkar website ("content") is protected by copyright under U.S. Copyright laws and is the property of Ahilyabai Holkar. You may not copy, reproduce, distribute, publish, display, perform, modify, create derivative works, transmit, or in any way exploit any such content, nor may you distribute any part of this content over any network, including a local area network, sell or offer it for sale, or use such content to construct any kind of database.