सरदार यशवंतराव फणसे यांच्या घराण्याचा उगम कधी व कोठे झाला याचे संदर्भ साध्यतरी भेटत नाहीत मात्र सध्यातरी यशवंतराव फणसे यांच्याच नावाचा उल्लेख फणसे घराण्याचा प्रथम उल्लेख मानला जातो. त्यांचा उल्लेख राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कन्येशी झाला होता त्यावेळी प्रथम त्यांचा उल्लेख येतो.
- जन्म : उपलब्ध नाही
- जन्म ठिकाणं : उपलब्ध नाही
- सरंजामी सरदार : सन १७६७ पासून
- पत्नी : मुक्ताबाई व नयन
- मुलगा : नथोबा होळकर
- सासू : राणी अहिल्यादेवी होळकर
- मृत्यू : सन १७९१
- मृत्यू ठिकाण : महेश्वर(मध्यप्रदेश)
यशवंतराव फणसे यांच्या लग्नविषयी व जाते बद्दल भरपूर चुकीचा इतिहास पसरविला जात आहे. मात्र फणसे घराणं पूर्वीपासून स्वराज्य सेवेत असणार व पुढे त्यांनी होळकर संस्थामार्फत स्वराज्याची सेवा केली असणार.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची कन्या श्रीमंत मुक्ताबाई यांचा विवाह होळकरांचे सरदार यशवंतराव फणसे यांचेशी लावुन देण्यात आला होता. यावेळेस यशवंतराव फणसे हे सुभेदार तुकोजीराव होळकर(१) यांच्या सेन्यातील एका तुकडीचे सरदार असावेत.
सरदार फणसे घराणे हे धनगर असुन होळकरांशी पुर्व नातेसंबंध असलेले पराक्रमी सरदार घराणे होय. सुभेदार मल्हारराव होळकर प्रथम माळव्यात दाखल झाल्यानंतर त्यांचेसोबतच्या जहागीरदार नारायणराव बारगळ, सरदार फणसे, सरदार बुळे, सरदार लांभाते, सरदार वाघ, सरदार वाघमारे, सरदार बहाड, तुकोजीराव होळकर यांना विविध जबाबदारी देत माळव्यातच स्थिर केले होते.
विंध्य पर्वत रांगातील होळकरशाहीचा जाम परगणा माळव्याचे प्रवेश द्वार म्हटले गेले होते. जाम या गावाच्या ठिकाणीच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून टोल घेतला जात असे व त्यांची पूर्ण तपासणी करून पुढे प्रवेश दिला जात असत.
राज्याच्या संरक्षणादृष्टीने जाम हे ठिकाण महत्त्वाचे होते त्यामुळे येथे प्रदेशद्वार निर्मिती करण्याचे राणी अहिल्यादेवी होळकर यांनी ठरवले. त्यामुळे जाम दरवाजा निर्मिती नंतर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी सरदार यशवंतराव फणसे व सरदार माधवराव राजोळे या दोन घरावर सोपवली होती.
या दोन्ही घराण्याला राणी अहिल्यादेवींच्या काळात नव्याने सरंजामी बहाल केली होती. जाम परगण्याचा सरंजाम हा राजोळे घराण्याला देण्यात आला होता. सरदार यशवंतराव फणसे हे होळकर सैन्यात सरदारकीचे काम करीत असे त्यांच्या कडे भिल्ल सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व होते. राणी अहिल्यादेवींच्या इतिहासात “भिल्ल कवडीचा कर” इतिहास प्रसिद्ध आहे.
Recent Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या राजधानी महेश्वर येथे आपल्या राज्याचा राज्यकारभार पाहत असतांना माळव्यातील जंगलातुन जाणाऱ्या वाटसरुची काही भिल्ल पेढांरी लुट करीत असल्याने वाटसरु आणि व्यापा-यात घबराट निर्माण झाली होती.
यामुळे वाटसरु लुटणा-या लुटारुंचा कायम बंदोबस्त करण्यासाठी होळकर सैन्यातील सरदारांना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या दरबारात बोलावुन आवाहन केले की, भिल्ल पेंढारी वाटसरुची लुटमार करुन त्यांना जायबंदी करीत असल्याने वाटसरुची संख्या कमी होत असुन याचा माळव्याच्या व्यापारावर मोठा वाईट परिणाम होत असल्यामुळे भिल्ल पेंढारी लुटारुंना शस्त्र टाकुन शरण यायला सांगा त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे काम देण्यात येतील.
जर ते ऐकत नसतील तर त्यांना अटक करुन हजर करावे, जो ही कामगिरी पुर्ण करील त्याचेंशी माझी कन्या मुक्ता हीच विवाह लावुन देण्यात येईल असे आवाहन मातोश्री अहिल्यादेवी यांनी करताच सरदार यशवंतराव फणसे पुढे झाले आणि त्यांनी पैजेचा विडा उचलुन लुटारु भिल्ल आणि पेढां-यांना अटक करून अहिल्यादेवी समोर हजर केले होते पुढे त्यांचा ठरल्याप्रमाणे मुक्ताबाई यांच्याशी विवाह लावुन देण्यात आला अशी कथा सांगितली जाते मात्र याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाही.
परंतु उपलब्ध पुराव्यानुसार हे समजते, सरदार यशवंतराव फणसे यांचेशी आपली कन्या मुक्ताबाईचा विवाह लावुन देत त्यांना महाराष्ट्रातील होळकरांच्या चांदवड या खाजगी परगण्यातील आंदण म्हणून निफाड, लासलगाव, सोनेवाडी, शिवरे-बोराहळे व मडकेजाम हि पाच गावे आणि तेथील वाडे व पाटीलकी दिली होती तर मध्यप्रदेशातील तराना परगण्याची सरंजाम बहाल केला होता. त्यासंबंधीची पत्रे उपलब्ध आहेत.
फणसे आणि होळकर दोन्हीही धनगर जमाती मधील घराणे असुन हा विवाह एका घटनेतुन नातेसंबंधात झालेला असतांना काही लोक यशवंतराव फणसे यांना भिल्ल सांगुन चुकीचा इतिहास पसरवण्याचे काम करीत आहेत.
निफाड, हनुमंतगाव, इंदुर, मल्हारगड येथे आजही फणसे घराण्यातील लोक वास्तव्यास असुन हे सर्व होळकरांचे रक्तसंबधातील नातेवाईक आहेत. याच फणसे घराण्यातील केशवराव फणसे यांनी अमेडच्या लढाईत चंद्रावताचा सेनापती ठार केला होता.
फणसे हे होळकर रियासतीमधील निष्ठावान सरदार घराणे आहे. फणसे हे आदीवासी भिल्ल आहे असा चुकीचा इतिहास पसरुन होळकरांच्या इतिहासात खाडाखोड करण्याचा प्रकार सुरु आहे. एकीकडे अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच भुमिकेला विपर्यास्त दाखवुन त्यांचा अपमान करायचे काम काही लोक करीत असुन होळकर राजघराण्यांचा कागदोपत्री असलेल्या नोंदीवरुन अभ्यास न करता कुठल्यातरी बाजारुंच्या सांगण्यावरुन चुकीचा इतिहास सांगायचे काम करु नये. उपलब्ध पत्रावरून सरदार यशवंतराव फणसे हे जातीने खुटेकर धनगर आहेत.
सरदार यशवंतराव फणसे यांचे मुक्ताबाई यांच्याशी नेमके कधी लग्न झाले होते याचे पत्र उपलब्ध नाही मात्र सन १७६७ ते १७६८ च्या दरम्यान झाले असावे. तसेच त्यांचा दुसरा विवाह हा नयन यांच्याशी झाला होता. सुभेदार तुकोजीबाबा होळकर यांच्या बरोबर अनेक लढायांमध्ये सरदार यशवंतराव यांचा सहभाग असायचा.
आषाढी वारीनिमित्त महेश्वर हुन पंढरपूरला येणाऱ्या होळकरांच्या दिंडीला संरक्षण देण्याचे काम सरदार यशवंतराव फणसे यांच्यावर होते. यशवंतराव व मुक्ताबाई यांना एका पुत्र होता त्याचे नाव “नथोबा” होते. सन १७९१ ला सरदार यशवंतराव फणसे यांना देहवास झाला. त्यांच्याबरोबर मुक्ताबाई व नयन या दोघीही सती गेल्या.
यासर्वांचीही सामायिक समाधी हि किल्ले महेश्वरच्या बाजूला असलेल्या फणसे वाड्यात आहे. आज तो वाडा मातंगेश्वर परिसर नावाने ओळखला जातो. या समाधीच्या गर्भगृहात सरदार यशवंतराव, मुक्ताबाई व नयन या तिघांच्या संगमरवरी मुर्त्या आहेत. राणी अहिल्यादेवींनी जावाईच्या समरणार्थ महेश्वर मध्ये यशवंतपूर हि पेठ वसवली व फणसे घराण्याने नर्मदा नदीवर मातंगेशवर परिसरासमोर फणसे घाटाचा निर्माण केला.