Skip to content

महाराजा यशवंतराव होळकर यांची मुद्रा

महाराजा यशवंतराव होळकर यांची अस्सल राजमुद्रा नुकतीच एका कागदपत्रावर मिळाली आहे. होळकर रियासत संबधी संशोधन सुरू असतांना संशोधनातून अनेक अज्ञात बाबी समोर आणुन त्याचा उलगडा करीत आहोत. मुद्रेवरील मजकूर खालील प्रमाणे,

श्री म्हाळसाकांत चरणी तत्पर
तुकोजीसुत यशवंतराव होळकर

महाराजा यशवंतराव होळकर यांनी आपला राज्यभिषेक झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या मोहर वापरल्या त्यापैकी ही एक आहे.

उत्तरेतील एका मंदिराच्या व्यवस्थापन तसेच पुजाऱ्याच्या अधिकाराबाबत बहाल केलेल्या सनदेवर ही मोहर आहे. कोणत्याही अभ्यासकाने ही सनद वाचलेली नाही लवकरच या मोडी सनदेचा लेखाजोखा मराठीत सादर करु.

रामभाऊ लांडे

1 thought on “महाराजा यशवंतराव होळकर यांची मुद्रा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *