Skip to content

महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची युद्धातील तलवार कुठंय….!

महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची युद्धातील तलवार कुठं असेल असा प्रश्न आपल्याला कधी पडला आहे का?

महाराजाधिराज यशवंतराव होळकर (Yashwantrao Holkar) यांच्या काळात होळकरशाहीची तिसरी राजधानी भानपुरा, जि.मंदसौर (मध्यप्रदेश) पासून १० कि. मी अंतरावर दुधखेडी नावाचे गाव आहे व त्या गावात दुधखेडीमातेचे (केसरमाता) मंदिर आहे. त्या मंदिरात हि युद्धातील तलवार काही काळापूर्वी होती.

या मंदिरात हि तलवार का होती? तर त्याला एक स्थानिक लोकमत आहे, ते म्हणजे महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची अशी श्रद्धा होती कि या मंदिरात हि तलवार ठेवत असल्यामुळे त्यांना युद्धात यश मिळत आहे त्यामुळे महाराजाधिराज आपली युद्धातील तलवार या देवी शेजारी ठेवत असतं, अशा प्रकारे स्थनिक लोक सांगतात. त्यामुळे हि तलवार या मंदिरामध्ये होती. सध्या २०१६ पासून या मंदिराचे नव्याने बांधकाम सुरु करण्यात आले आहे त्यामुळे या मंदिराच्या इतिहासाबद्दल माहिती वृत्तपत्रातून छापून अली होती  व त्यामुळे आपल्याला तलवारीची माहिती समजली.

त्यांनतर आपल्या facebook Page (होळकर राजघराण) चे भानपुरा येथील सदस्य श्री.नितीन विश्वकर्मा यांनी दुधखेडी येथील मंदिर ट्रस्टशी संपर्क करून तलवार बद्दल आधीक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ट्रस्टच्या संबंधितांनी असे सांगितले कि, “ती तलवार सध्या दुसऱ्या ठिकाणी आहे”, ते अधिक माहिती देऊ शकले नाहीत. यावरून अनेक प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे ती तलवार सध्या कोणत्या ठिकाणी असेल? जर असेल तर त्या तलवारीचे नाव काय असेल? ती कधी बनवली असेल? वजन काय असेल? लांबी काय असेल? रचना कशी असेल? यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरे अजून हि गुलदस्त्यातच आहेत आणि जर नसेल तर ती तलवार कोठे गेली? तिची विक्री तरी झाली नसेल ना? हे हि प्रश्न उभे राहतात कारण अलीकडील काळात भानपुरा येथील किल्ल्यातील अनेक होळकर कालीन तोफांची विक्री झाली आहे. या तालवारीबद्दलची अधिक माहिती काही महिन्यात आपल्यासमोर या Page च्या माध्यमातून नक्की मांडू…..   

zunj-marathi-book-by-n-s-inamadar
विकत घेण्यासाठी Order Now वर Click करा

महाराजाधिराज यशवंतराव यांची हि एकमेव युद्धातील तलवार होती का? त्यांच्या अजून युद्धातील तलवार असतील का? तर मित्रांनो, नक्कीच त्यांच्या युद्धातील अजून तलवारी असतील मात्र सध्या तरी त्यांची युद्धातील हि एकमेव तलवारीची माहिती मिळाली आहे. तसेच सन १७९९-१८०० च्या दरम्यान बनवलेली “महाराजा होळकर” म्हणजेच महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची अजून एक तलवार व्हिकटोरीय अँड अल्बर्ट म्युझियम, लंडन येथे आहे.

त्या तलवारी बद्दलची संपूर्ण माहिती व्हिकटोरीय अँड अल्बर्ट म्युझियमच्या अधिकृत वेब-साईट वर उपलब्ध आहे मात्र ती तलवार हिरेमोती अशी रत्नजडीत सन्मान वाढवणारी तलवार आहे. ती युद्धातील तलवार नाही. ति शाही कार्यक्रमानिमित्त म्हणजेच राज्यभिषेखा निमित्त बनवण्यात आलेली रत्नजडीत तलवार आहे. पूर्वी इतिहासात हिरेमोती जडीत तलवार युद्धात वापरत नसत.


पूर्वीच्या काळी इतिहासात पूजेसाठी वापरली जाणारी तलवार वेगळी असत, शाही कार्यक्रमा निमित्त वापरली जाणारी रत्नजडीत तलवार वेगळी असत, युद्धासाठी वापरली जाणारी तलवार वेगळी असत, त्याचप्रमाणे दुधखेडी ता.भानपुरा जि.मंदसौर (मध्यप्रदेश) येथील तलवार हि युद्धातील आहे व त्या तलवारीच्या साहाय्याने महाराजाधिराज यशवंतराव यांनी कदाचित सन १८०२ ला पेशवे-शिंदे यांचा पराभव केला असेल किंवा ३०० इंग्रजांची नाके ज्या तलवारीने कापण्यात आली होती ती हिच तलवार असू हि शकते. अधिकृत इतिहास लवकरच समोर येईल.

होळकरांच्या लष्करात श्रीमंत महाराजा मल्हारराव होळकर सरकार, श्रीमंत अहिल्यादेवी (Ahilyadevi Holkar) व महाराजाधिराज थोरले यशवंतराव यांच्या काळात सेनिकांसाठी ज्या तलवारी, ढाली, भाले, बिचवे, आदी हत्यारे वापरली जायची त्यातील बरीच हत्यारी हि महेश्वर (मध्यप्रदेश) व इंदौर (मध्यप्रदेश) येथील वस्तू संग्रहलयात पाहवयास मिळतात मात्र एकाही होळकरांच्या प्रसिद्ध महाराजा किंवा महाराणीची वयक्तीक युद्धातील शस्त्रे तेथे नाहीत.

  • आभार:
  • श्री.नितीन विश्वकर्मा(भानपुरा, मध्यप्रदेश)       
  • दुधखेडी माता ट्रस्ट, दुधखेडी.
  • व्हिकटोरीय अँड अल्बर्ट म्युझियम, लंडन. Visit

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]

राहुल वावरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *