स्मृती दिनानिमित्त भुईकोटातील समाधीवर दिप लावुन अभिवादन
भानपुरा /मध्यप्रदेशातील मंदसोर जिल्ह्यात असलेल्या भानपुरा या तालुक्याच्या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर यांचे भुईकोटात भव्य दिव्य स्मारक असुन त्यांच्या २०८ व्या स्मृती दिनानिमित्त होळकर रियासतीचे अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी भानपुरा येथील समाधीवर दिप लावुन अभिवादन केले. २०१७ मध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांच्या बलिदान दिनानिमित्त भव्य सोहळा भानपुरा येथे रामभाऊ लांडे, नागेश वाघमोडे, घनश्याम होळकर, अक्षय बर्वे यांनी घेवुन देशभरातील साहित्यिकांचा सन्मान करीत भानपुरा प्रशासनाकडे स्मारकासंबधी निवेदन केले होते पाठपुरावा केल्यानंतर भानपुरा नगर परीषदेने रस्ता नामांतराचा प्रस्ताव मंजुर करून भानपुरा येथे “महाराजा यशवंतराव होळकर राजमार्ग “अशी कोनशिला बसवली होती तसेच भुईकोट परिसरात बाथरूम ची मागणी करण्यात आली. न.प.प्रशासनाने बाथरूम ची व्यवस्था केली आहे. तर यापूर्वी २०११ मध्ये महाराजा यशवंतराव होळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त महादेव जाणकर यांनी भानपुरा येथे रँली आणली होती.
महाराजा यशवंतराव होळकर यांनी भानपुरा येथुन आपल्या राज्याचा कारभार केला होता महेश्वर येथे राज्यभिषेक झाल्यानंतर त्यांनी महेश्वर येथून होळकरांची राजधानी भानपुरा येथे हलवली होती भानपुरा आणि रामपुरा हे मल्हारराव होळकरांनी मिळवलेले मोठे परगणे होते निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भानपुरा येथे यशवंतरावांनी इंद्रगडातुन उगम पावणा-या “रेवा “नदीच्या तिरावर भव्य दिव्य असा भुईकोट निर्माण करुन नावली नामक गावात तोफखाना सुरू करीत दिडलाख खडी फौजेची छावणी उभी करुन सतत छावणीत त्यांचा मुक्काम असत तर होळकर राजपरिवार भानपुरा येथील गढीत राहत असे भुईकोटात खाली मोठ्ठे तळघर असुन एक हजार लोक सामावतील अशी व्यवस्था तळघरात केलेली आहे तर किल्ल्याच्या तटभिंतीत चाळीसफुट खोल बारव निर्माण केलेली आहे.
इंग्रजांच्या विरोधात लढतांना भानपुरा वासियांच्या सुरक्षेसाठी भुईकोटात तळघर आणि गुप्त रस्ते करण्यात आले होते. यशवंतरावांची पत्नी राणीसाहेबा तुळसाबाई यांच्या हत्येनंतर होळकरांची राजधानी भानपुरा येथून केसरबाई यांनी पुन्हा इंदौरला हलवली होती.
भानपुरा येथील भुईकोटास स्थानिक लोक छत्री म्हणतात तर दिपावली नंतर येणाऱ्या एकादशीला महाराजा यशवंतरावांचा मृत्यु झाल्यामुळे दरवर्षी तिथीप्रमाणे पुण्यतिथीनिमित्त स्थानिक रहिवाशी अभिवादन करतात सदर भुईकोटात अनेक प्राचीन शिल्प असुन तेथे पुरातत्व विभागाचे संग्राहालय असुन भुईकोटाचा दरवाजा सकाळी सात वाजता उघडून रात्री सहा वाजता बंद करण्यात येतो पुर्वी येथे असंख्य तोफा होत्या मात्र त्या आजरोजी गायब झाल्या आहेत गत दोनमहिण्यापुर्वीच भुईकोटातील असंख्य दस्तऐवज इंदौरला हलवण्यात आल्याची माहिती मिळाली तर महाराजांच्या तलवारी बंदुका ही हलविण्यात आल्या आहेत इंदुर येथील होळकर ट्रस्टच्या देखरेखीखाली पुर्वी महाराजा यशवंतराव होळकर स्मृती समाधीवर नियमित पुजापाठ नैवैद्य वार्षिक उत्सव करण्यात येत असे मात्र ते हळुहळु बंद करण्यात येत आहे.
महाराजा यशवंतराव होळकरांनी परमार कालीन हिंगलाज गड दुर्ग ताब्यात घेवुन तेथे मोठी लष्करी छावणी निर्माण केली होती तर हिगंलाज गडावर तटभिंती आणि बुरुज निर्मिती केली होती परिसरातील अनेक मंदिराचे निर्माण करुन जमिनी इनामी दिल्या होत्या तर पानमळ्याच्या शेतीला प्राधान्य देवुन भानपुरा येथील पानं दुरदुर व्यवसायानिमित्त विक्री साठी जात असत. असा भला मोठा इतिहास भानपुरा आणि परिसरात दडलेला असुन इतिहासप्रेमी आणि लेखकांनी या परिसरातील होळकर इंग्रज संघर्षावर अधिक संशोधन करून लुप्त झालेला पराक्रमी इतिहास लिहिण्याची आवश्यकता आहे.
दिप लावण्यासाठी दिव्यांग असलेले भानपुरा येथील नितीन विश्वकर्मा, अमित टेलर, तसेच पोलीस दलाचे पोवार आणि समाधीवर पुजा पाठ करणारे महेश पुजारी उपस्थित होते. रामभाऊ लांडे आणि नागेश वाघमोडे यांनी भानपुरा येथे महाराष्ट्रातून येऊन या उत्सवाची सुरुवात केली आहे. कार्यक्रमासाठी अवधूत लाळगे, बाळासाहेब राशीनकर, भाऊसाहेब राशीनकर, सुनील मतकर, रामदास गुरव, नागेश वाघमोडे यांचे योगदान लाभले.
- होळकरांशी नमकहरामी करणाऱ्या भवानीशंकर बक्षीचा दुर्दैवी अंत…! - May 13, 2022
- वाफगावचे एक बुंदकी व दु बुंदकी नाणे - January 5, 2022
- होळकरांचे ऐतिहासिक वाफगाव - December 31, 2021
Nice Analysis. helpful for history lover.
आपले होळकर शाहीवरील प्रेम हे एक दिवस आपल्या उचित ठिकाणी घेऊन जाईल