सुभेदार मल्हारराव होळकर यांनी होळकर रियासतीची स्थापना केल्या नंतर अनेकांवर जबाबदाऱ्या निश्चित करुन एक मंत्री मंडळ अस्तित्वात आणुन त्यातही खाजगी व सरकारी दिवाण नियुक्त केले होते यात सुभेदार हे प्रमुख पद होते व नंतर फौजेचे प्रमुख असायचे.
सुभेदार मल्हारराव महाराजा नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कुशल प्रशासक म्हणून राज्यकारभार करीत असतांना खाजगी जहागीरीतुन त्यांनी मंदिर, घाट, वाडे, बारवा, विहीर, अन्नछत्र, निर्माण, देखभाल व दुरुस्त करण्यासाठी एक वेगळे खाते अस्तित्वात आणला होता या कामात देखरेख करणारे, हिशोब ठेवणारे, काम करुन घेणारे,पत्रव्यवहार करणारे, कामगार, कारागीर, पाथरवट,रंगारी,पानाडे आदी भरती करणारे लोक यावर संशोधन सुरू आहे.
महाराजा यशवंतराव होळकर यांनी किल्ले महेश्वर येथे राज्यभिषेक Coronation करुन घेतल्यानंतर भानपुरा हि नवी राजधानी अस्तित्वात आणली तर कारभारी मंडळ नेमुन सरदार बुळे यांना कारभारी मंडळाचे Board of Governors प्रमुख केले होते. पुढे यात हळूहळू बदल होत गेले आणि वेगवेगळे विभाग निर्माण करण्यात आले तर होळकर राज्याचे सर्वजन कल्याणकारी संविधान Holkar State Public Welfare Constitution अस्तित्वात आणुन कारभार व कायद्याची Administration and law enforcement अमलबजावणी सुरू केली.
सुभेदार मल्हारराव महाराज यांचे पासुन होळकर रियासतीमध्ये वाफगाव, चांदवड, महिदपुर, भानपुरा, इंदुर, महेश्वर या ठिकाणी टकसाळी सुरू करून नाणे निर्मिती सुरू केली होती तर तृतीय तुकोजीराव होळकर व द्वितीय यशवंतराव महाराज यांनी टपाल तिकीट ही सुरू केले होते तसेच होळकर स्टेटचे स्टँम्प तसेच शेअर खरेदी विक्रीचे बाँन्ड जारी केले होते.
दरम्यान राज्याचे स्वतंत्र असे गँझेट ही नियमितपणे प्रकाशित होत असे व ग्रामपंचायती अस्तित्वात आणुन पंच (सरपंच) नियुक्त करीत असे. पुढे हे प्रभो प्रार्थना नावाचे राष्ट्रगीत ही विष्णु सरवटे यांनी लिहून ते द्वितीय यशवंतराव होळकर महाराज यांनी होळकर स्टेटमध्ये लागु केले होते.
बांडे निशाण हे पांढ-या व तांबड्या रंगाचे निशाण अर्थात राज्यध्वज तसेच स्वतंत्र मुद्रा कार्यरत होती. प्रजावत्सल व राष्ट्रभिमानी होळकर राजघराण्यांने लोकांसाठी राज्यसंचलन करुन राज्यातील जनतेची पुत्रवत काळजी घेवून त्यांना न्याय, ममता, रक्षण, स्वातंत्र्य बहाल केले.
आजही होळकर राज्यकर्त्यांचे नाव जगभरात आदराने घेतले जाते. भारताच्या निर्मितीत त्यांचे अनमोल योगदान आहे. आँनरेबल मेजर जनरल हिज हाईनेस महाराजाधिराज राजराजेश्वर सवाई श्री यशवंतराव होळकर बहादुर (जी सी आई. एल एल डी ग्रँंड कंमाडर आँफ द इंडियन एम्पायर,डाँक्टर आँफ लाँज).
१६ जून १९४० पर्यंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे अष्टप्रधान मंडल
- प्राइम मिनिस्टर एवं प्रेसिडेंट – मुशीरुदौला श्री राजा ज्ञाननाथ सी. आय. ई
- डेप्युटी प्राइम मिनिस्टर इनचार्ज पुलिस एवं सिवील डिफेन्स – श्री आर ए हाँर्टन,सी.आय ई
- रिवेन्यू मिनिस्टर – एतमुद्दौला बँरिस्टर सी.जी मतकर
- कॉमर्स मिनिस्टर – कैप्टन एच.सी ढंढा
- एजुकेशन मिनिस्टर – कैप्टन एच.बी रिचर्ड्सन
- आर्मी मिनिस्टर – मेजर जनरल ए.एच विलियमस
- जनरल मिनिस्टर – कैप्टन एम क्यु खान
- फॉरेन मिनिस्टर – श्री डी.सी.साहनी
संदर्भ
होळकर स्टेट गँझेट
होळकरशाहीचा सांस्कृतिक इतिहास
होळकरशाहीचा इतिहास
स्मरण प्रयास
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
- होळकरांशी नमकहरामी करणाऱ्या भवानीशंकर बक्षीचा दुर्दैवी अंत…! - May 13, 2022
- वाफगावचे एक बुंदकी व दु बुंदकी नाणे - January 5, 2022
- होळकरांचे ऐतिहासिक वाफगाव - December 31, 2021