Skip to content

कुंभेरी युद्ध आणि खंडेरावांचा मृत्यू

बादशहाने सफदरणेगाची वजीर पदावरून हकालपट्टी केल्याने त्या दोघांत संघर्ष सुरू झाला. त्यामुळे बादशहाने मराठ्यांना मदत मागितली. त्यानुसार पेशव्यांनी रघुनाथदादा, होळकर, शिंदेंना पाठविले परंतु मराठे दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच सफरदरजंगाचे पारिपत्य झाले होते.

थोड्याच दिवसांत सफरदरजंगाचा मृत्यू झाला. इ. स. १७५४ मध्ये याचवेळी आग्रा अजमेरच्या सुभ्यावरून मराठ्यांचे सुरजमल जाटाशी वितुष्ट येऊन युद्ध सुरू झाले.

रघुनाथराव, मल्हारराव होळकर यांनी कुंभेरीस पेठा दिल्यावर गाजीउद्दीन बादशहाचा तोफखाना घेऊन मराठ्यांच्या मदतीला आला. मराठे व गाजीउद्दीनाचे सख्य पाहून बादशहाने सुरजमलास गुप्त पत्र पाठवून त्यास टिकाव धरण्यास सांगितले व स्वत: बाह्यत मराठ्यांना पण आतून जाटास मदत करण्यास फौजेसह येऊ लागला.

Ahilyabai Holkar android App

पण हे कारस्थान गाजीउद्दीनास कळताच त्यांनी मल्हाररावांना सोबत घेऊन दिल्लीच्या सैन्यावर छापा घालून फडशा उडविला. बादशहा पळून दिल्लीला परत गेला तर होळकर व गाजीउद्दीन यांनी वेढा घातला. कुंभेरीचा किल्ला मजबूत असून वाळवंटामुळे सुरूंग लावणे शक्य नव्हते. जाट चाळीस लक्ष रुपये देण्यास तयार होता, तर रघुनाथरावांची मागणी एक कोटीची होती.

कुंभेरीस मोर्चे लावण्याची जबाबदारी खंडेरराव होळकर यांच्यावर होती. खंडेराव खंदक निरीक्षण करीत असताना खंडेररावास जांबोऱ्याची एक गोळी लागली आणि खंडेररावांचा मृत्यू (स.१७५४) झाला. पुत्राच्या मृत्यूची बातमी ऐकून मल्हारराव होळकर फार दुःखी झाले शेवटी जय्याप्पा शिंद्यांच्या मध्यस्थीने रघुनाथरावांनी ६० लाख रुपये खंडणी घेऊन वेढा उठविला.

वीर सरदार खंडेराव होळकर
सौजन्य : आण्णासाहेब डांगे

जय्याप्पा शिंदे रामसिंगच्या मारवडला गेला. या घटनेमुळे होळकर-शिंदे तेढ परत वाढली. सुरजमल जाटाचा शिरच्छेद करून त्याचे शिर यमुनेत टाकण्याची प्रतिज्ञा मल्हाररावांनी केली. ही बातमी सुरजमलाची पत्नी किशोरीदेवीला कळाली. त्यामुळे ती भयभयीत होऊन रूपराम काटारीमार्फत शिंदेंशी तहाची बोलणी लावली.

रघुनाथरावांचे मन कुंभेरीचा वेढा उठविण्यासाठी वळविले. प्राप्त परिस्थितीत सूजरमल जटांशी तह करावा असे शिंदेंचे मत होते, आणि मल्हारराव होळकर यांची इच्छा नसतानाही तह झाला आणि अशाप्रकारच्या अनेक प्रसंगांतून शिंदे-होळकर वाद वाढत गेला.

गांगरसोली, कुंभेरी(राजस्थान) येथील
सरदार खंडेराव होळकर यांची मुख्य समाधी

संपूर्ण इतिहास – राणी अहिल्यादेवी होळकरांचा समग्र इतिहास

अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी पुस्तके पहा : Ahilyabai Holkar Books

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]

राहुल वावरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *