दि.२०-२१ डिसेंबर १८१७
महिंदपुर,जि.उज्जेन(मध्यप्रदेश)
तृतीय मराठा-इंग्रज युद्ध हे महाराष्ट्रामध्ये नियोजीत होते. या युद्धामध्ये हिंदवी स्वराज्यातील प्रमुख तीन घराणी व त्यांचे प्रमुख-उपप्रमुख सरदार सामील होणार होते. प्रमुख तीन घराण्यामध्ये पुण्याचे पेशवे(बल्लाळ), इंदौरचे होळकर व नागपूरचे भोसले होते.
मात्र इंग्रजांनी या युद्धात रडीचा डाव आखला व होळकर आणि भोसले यांना पुण्याला न येऊ देता त्यांच्याशी स्वतंत्र युद्ध पुकारले. सीताबर्डी(नागपूर) येथे दि.२६-२७ नोव्हेंबर १८१७ ला भोसले-इंग्रज पहिली लढाई, महिंदपुर(मध्यप्रदेश) येथे २०-२१ डिसेंबर १८१७ ला होळकर-इंग्रज दुसरी लढाई व कोरेगाव(पुणे) येथे दि.१ जानेवारी १८१८ ला पेशवे-इंग्रज शेवटची लढाई झाली.
उत्तरेकडून होळकर सैन्य महाराष्ट्राकडे येत असताना, २० डिसेंबर १८१७ ला दिवस मावळणींला आला होता म्हणून सारे होळकर सैन्य या दिवशी किल्ले महिंदपुर येथे मुक्कमी होते. होळकरांचे काही सरदार इंग्रजांच्या गळाला लागले होते. त्यांना जहागिरी देण्याचे इंग्रजांनी कबुली दिली होती.
होळकरांच्या फितूर लोकांनी २० डिसेंबरला सायंकाळी ही संधी साधली व महालात अचानक श्रीमंत तुळसाराणीना गुप्त निरोप धाडून क्षिप्रा नदीच्या गऊ घाटावर महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी एकटे यावे असे सांगितले. क्षिप्रा नदीच्या काठी श्रीमंत तुळसाराणी एकट्या आल्या व त्यांचा विश्वास घाताने तुरंत शिरच्छेद करुन ठार मारले.
त्यांचे धड गऊ घाटावर पडले व शीर क्षिप्रा नदीत फेकून देण्यात आले. या घटनेची खुस-पूस त्या रात्री होळकरांच्या छावणीत कोणालाही नव्हती. त्यांचा खून झाला व कोणी केला? हे कुणालाच माहित नव्हते. मात्र २१ डिसेंबरला सकाळ पर्यत हि घटना समजतास खऱ्या अर्थाने तृतीय मराठा-इंग्रज युद्धातील दुसरी लढाई म्हणजेच महिंदपुरची होळकर-इंग्रज लढाई सुरु झाली.
क्षिप्रा नदीच्या एका तटावर होळकर सेन्य होते तर दुसऱ्या तटावर इंग्रज सेन्य होते. दोन्ही बाजूच्या सॆन्याने एकमेकांवर तोफाने मारा करण्यास सुरुवात केली. क्षिप्रा नदी दुथडी भरून वाहत होती.
या लढाईत १२ वर्षाचे श्रीमंत महाराज मल्हारराव होळकर(दुसरे), श्रीमंत भीमाबाई होळकर, सरदार हरिराव होळकर, सरदार तात्या जोग, सरदार गफूर खान, सरदार भाऊसाहेब होळकर, सरदार मीर खान यांच्या सहित शंभर तोफा, पंधरा हजार घोडदळ व दहा हजारांचे प्रशिक्षित पायदळ लढत होते.
पुस्तकाचे नाव : अहिल्याबाई होळकर यांचे नेतृत्व
- माध्यम : मराठी
- Category : शोधप्रबंध
- प्रकाशक :
(झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग) - किंमत : ६०० रु.
- पाने : ३१२
२१ डिसेंबरला सकाळी युद्ध सुरु झाले. श्रीमंत भीमाबाई, श्रीमंत हरिराव अभूतपूर्व सैन्य संचलन, शस्ञ संचलन व युद्ध संचलन करून सेनेत जोश भरत होते. ब्रिटीश सेनेचे नेतृत्व प्रचंड अनुभवी व भारतात दरारा असलेल्या कर्नल माल्कम, कमांडर टॉम्स हिस्लाप आणि मेजर हंट यांच्याकडे होते. हे युद्ध गंगावाडी भागात सुरु झाले होते.
भिषण युद्ध सुरु होते. होळकर सेना ब्रिटीश सेनेवर तुटून पडली होती. क्षिप्रा नदीच्या पाण्याचा रंग लाल झाला होता. श्रीमंत हरिराव होळकर हत्तीवर बसून लढाई करत सैनिकांचे मनोधैर्य व आत्मविश्वास वाढवत होते. त्यांच्या बरोबर १२ वर्षाचे महाराजा मल्हारराव हि हत्तीवर बसले होते. श्रीमंत हरिराव होळकर यांचा हत्ती ब्रिटिशांनी जखमी केला त्यांनतर त्यांनी त्यांच्या लाडक्या घोड्यावर बसून लढाईला सुरुवात केली.
पुस्तकाचे नाव : होळकरशाहीचा इतिहास भाग – १
- माध्यम : मराठी
- Category : दुर्मिळ पुस्तक
- प्रकाशक : होळकर गव्हर्नमेंट प्रेस, इंदूर.
(झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध, कव्हर, बायडिंग) - लेखक : व. वा. ठाकूर
- किंमत : २०००
- पाने : ४१४
ज्या वेळेस श्रीमंत हरिराव होळकर ब्रिटिशांना करार प्रहार करत होते तेव्हा त्यांच्या दिशेने गोळी डागली गेली व त्यावेळेस घोड्याने पुढचे दोन्ही पाय वर घेऊन गोळी स्वतावर झेलली व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या घोड्याचे नाव “जीवा” होते, असे सांगितले जाते.
लढाईंनंतर काही काळानंतर त्या घोड्याची समाधी उभारण्यात अली. तालाकुंजी बारवे शेजारी समाधी आहे. समाधीची उंची ६ फूट असून सध्याच्या काळात घोड्याचे शीर वेगळे झाले आहे. त्याची लवकरात लवकर दुरुस्ती होणे आवश्यक आहे. घोड्यावरील नक्षी काम सुरेख असून युद्धातील पेहराव दिसून येतो व पाठीमागील बाजूस पुरुषाचे शिल्प आहे.
श्रीमंत हरिराव होळकर हे महाराजा यशवंतराव होळकर यांचे पुतणे व सरदार विठोजी होळकर यांचे पुत्र होय. सरदार विठोजींची हत्या पेशव्यांनी हत्तीच्या पायदळी देऊन केली होती. या लढाईत श्रीमंत हरिराव हे सरदार होते पुढे १८ वर्षेनंतर सन १८३४ ला ते होळकरशाहीचे ९ वे शासक बनले.
श्रीमंत भीमाबाईने घोड्याची लगाम दातात धरली. दोन हातात दोन तलवार घेऊन अक्षरशः ब्रिटीश सैन्यांना कापून काढत होती. श्रीमंत महाराजा मल्हारराव(दुसरे) वयाने लहान असून हि युद्धात नजर ठेऊन होते.
दुपारी तीन वाजेपर्यंत होळकरी सेना इंग्रजांना कापुन काढत विजयाच्या क्षणापर्यंत पोहोचली होती. पण ऐन मोक्याच्या वेळी काही सरदार आपल्या सैन्यासह रणांगणातुन निघुन गेले. हाती आलेला होळकरांचा विजय त्यांच्यामुळे निसटला.
अशा प्रकारे २१ डिसेंबरच्या महिंदपुर येथील लढाईत होळकर सेना पराभूत होऊन श्रीमंत भीमाबाई, श्रीमंत मल्हारराव, सरदार तात्या जोग आदी. नि किल्ले अलोटच्या दिशेने पलायन केले. या लढाईत होळकरांचे ३००० सेन्य मृत्यूमुखी पडले व श्रीमंत तुळसाराणी साहिबा होळकर शहिद झाले. त्यांच्या समरणार्थ महिंदपुर पासून काही अंतरावर “तुळसापुरा” नावाचे गाव वसविण्यात आले आहे.
लढाई नंतर ३ ते ४ दिवस, गऊ घाटावर श्रीमंत तुळसाराणी यांच शीर धडापासून अलग केलेले शरीर पडून होते. शरीरावर असलेल्या साडीवरून त्यांच धड ओळखण्यात आले व त्याच जागी त्यांची समाधी बांधण्यात आली. पूर्वी समाधीला शिखर, चोथरा, नक्षीखांब असे रूप होते मात्र त्यावर अलीकडच्या काळात ५० वर्षपूर्वी वीज कोसळून नुकसान झाले. आता फक्त चोथरा दिसतो.
समाधीवर व समाधीच्या बाजूनं होळकर कालीन तांब्याच्या घातूच्या कारंजा बसवण्यात आल्या होत्या. त्यासाठी समोरील बाजूच्या खांबावरून पाण्याची विशेष व्यवस्था केली होती. तो खांब आजही अस्तित्वात आहे. समाधीमध्ये त्यांची संगमरवरी मूर्ती व शिवपिंड होती. नंतरच्या काळात होळकर घराण्याकडून या समाधीचा जिर्णोधार करण्यात आला नाही. सोने व हिऱ्यांच्या हवेसे पोटी, आजच्या घडीला या समाधीला अज्ञात लोकांनी नुकसान केलेलं दिसून येते.
तर या लढाईत इंग्रजांचे १७४ सेन्य मृत, ६०४ सेन्य गंभीर जखमी व प्रमुख ९ इंग्रज अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. ब्रिटिश हिंदू सेनिकांना सामूहिक जाळण्यात आले व ९ इंग्रज अधिकाऱ्यांची क्षिप्रा नदीच्या पलीकडील दुबली गावात(ता.महिंदपुर जि.उज्जेन, म.प्र) सामायिक कब्र तयार करण्यात आली. सोने व हिऱ्यांच्या हवेसे पोटी, आजच्या घडीला या कबरींना अज्ञात लोकांनी नुकसान केलेलं दिसून येते.
वास्तविक खिश्चन लोक एका व्यक्तीसाठी एक कब्र बनवत असतात मात्र हि लढाई खूप भयानक होती म्हणून भयभीत होऊन इंग्रजांनी एकच कब्र ९ इंग्रज अधिकाऱ्यांसाठी बनवली. कबरीवर शिलालेख आहे, त्यावरून त्यांची नावे, गाव व हुद्दा वाचायला मिळतो. ते ९ जण पुढील प्रमाणे होते, १.डोनाल्ड मेकालियान(सेना प्रमुख), २.लेफ्टिनेंट चार्ल्स कोलोेमन(मद्रास यूरोपियन रेजीमेंट्स), ३.लेफ्टिनेंट हेनकोम(मद्रास यूरोपियन रेजीमेंट्स), ४.लेफ्टिनेंट ग्लेन(थर्ड पी.एल.आई), ५.कैप्टन मार्टन(रायफल क्राॅस), ६.लेफ्टिनेंट शहनाहन(रायफल क्रॉस), ७.लेफ्टिनेंट कोर्न(रायफल क्राॅस), ८.लेफ्टिनेंट गिबिंस(सेकंड बटालियन रेजीमेंट्स), ९.लेफ्टिनेंट जाॅन गिबिंस(आॅफिसर थर्ड डिविजन). हि कब्र आर. गिबिंस या ब्रिटीश अधिकाऱ्याने बनवली होती. या ९ नावात त्यांचे दोन सख्ये भाऊ होते.
या लढाईचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे होळकर-इंग्रज दोन्ही सेन्याकडून रॉकेटचा उपयोग केला होता. रुद्रखेडा ता.महिंदपुर जि.उज्जेन(म.प्र) या गावात आजही ते स्टीलचा ढाचा पाहावयास मिळतो. तसेच या लढाईतून महाराजा यशवंतराव होळकर यांचे १२ वर्षेचे पुत्र महाराजा मल्हारराव होळकर यांच्याकडून शाही कार्यक्रमातील रत्नजडीत तलवार ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चोरी केली.
हि रत्नजडीत तलवार महाराजा यशवंतराव होळकर यांच्या काळातील असून राज्यभिषेक कार्यक्रमानिमित्त तयार केली असावी. लढाई चालू असताना ब्रिटिश अधिकारी मेजर हार्सने ती तलवार महाराजा मल्हारराव होळकर(दुसरे) यांच्याकडून हिसकावून घेतली व प्रमुख ब्रिटिश अधिकारी जाॅन माल्कम याला आणून दिली. आज ती तलवार व्हिकटोरीय अँड अल्बर्ट म्युझियम, लंडन येथे आहे.
या म्युझियमच्या Website वरून मिळालेल्या माहितीवरून, हि तलवार सन १८८८ मध्ये कॅथिरीना माल्कम यांनी म्युझियमला विकली होती. कॅथिरीना माल्कम हि जाॅन माल्कमची मोठी मुलगी आहे. अधिक माहिती व फोटोसाठी पाहण्यासाठी म्युझियमच्या Website ला भेट द्या. www.victoria&albertmuseum.com
महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक बद्दल अधिक वाचा. Read Now
महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची युद्धातील तलवार कुठे आहे? Read Now
पुढे ६ जानेवारी १८१८ ला श्रीमंत कृष्णाबाई(केसराबाई) होळकर यांनी श्रीमंत मल्हारराव होळकर(दुसरे) यांच्या वतीने इंग्रजांबरोबर तह केला. या तहावर होळकरांचे दिवाण तात्या जोग व ब्रिटीश अधिकारी जॉन माल्कम यांनी सही केली. हा तह शिंदेशाहीच्या किल्ले मंदसोर येथे झाला होता म्हणून हा तह “मंदसोरचा तह” या नावाने प्रसिद्ध आहे. या तहात एकूण १४ अटी आहेत त्या होळकरशाहीच्या इतिहासाची साधणे भाग – २ मध्ये वाचायला मिळतात.
आरोप :
यामध्ये जे होळकरांचे सरदार फितूर झाले होते त्यामध्ये सरदार गफूर खानचं नाव घेतलं जात व त्याला या लढाईनंतर जावरा परगण्याची जहागिरी दिली असे सांगितलं जात. पण हे सर्व आरोप सरदार गफूर खानाच्या वंशजांनी फेटाळून लावले आहेत. खरं तर या प्रकरणावर वेगळी चर्चाच होऊ शकते पण थोडक्यात या लढाईनंतरच्या काही गोष्टी आपुन समजून घेतल्या पाहिजेत.
- ब्रिटिशांनी होळकर राज्य खालसा केल्यानंतर, बराच मोठा भूभाग आपल्या अख्त्यारीत्या ठेवल्यानंतर काही भागाची वाटणी तीन व्यक्तींमध्ये केली होती. त्यामध्ये सरदार गफूर खानचे नाव आहे. हे नाव होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग – २ मध्ये वाचायला मिळते.
- या लढाई नंतर सरदार गफूर खान १८२३ पर्यंत होळकरांबरोबर इंदोरलाच होता व तेथेच मृत्यू पावला. त्याच्या वंशजांचा असा प्रश्न आहे! जर तो फितूर असता तर त्याला तेथे होळकरांनी राहून दिले असते का? होळकरशाहीतील जावरा परगण्याला “जावरा स्टेट” हे ब्रिटिशांनी बळजबरीने घोषित केले होते असे त्यांचे म्हणणे आहे.
- तसेच होळकरशाहीतील संदर्भानुसार, सन १८१७ नंतर काही अनेक वर्ष सरदार गफूर खान व त्यांचे वंशज इंदोर दरबारी सभेला हजरी लावत होते व अन्य दोघांचा सन १८१७ नंतर लगेच होळकरांशी संबंध संपुष्टात आला होता.
- सरदार गफूर खान हा सरदार अमीर खानचा साडू आहे. सरदार अमीर खान हा महाराजा यशवंतराव होळकरांचा सरदार होता व पुढे त्याने सन १८०६ ला बंड करून होळकरशाहीतील टोंक परगण्याला स्वतःचे “टोंक राज्य” म्हणून घोषित केले होते व त्याच्या सांगण्यावरून सरदार गफूर खानने फितुरी केली असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे तर गफूर खान यांना काही इतिहासकारांनी धर्माचा चष्मा घालून फितुरांच्या यादीत गोवले आहे, असे खानच्या वंशजाचे म्हणणे आहे.
- यावरून एक लक्षात येते, याबद्दल अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. पुढे सन १८६० नंतर जावरा स्टेट स्वतंत्र उदयास आले. त्यांचा होळकरांशी काहीही संबंध उरला नाही व बाकीचे दोन महत्त्वाची नावे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग – २ मध्ये वाचा.
महाराणी तुळसाबाई, कृष्णाबाई व भीमाबाई बद्दल थोडक्यात :
- महाराणी तुळसाबाई व कृष्णाबाई(केसराबाई) होळकर या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पत्नी आहेत. त्यांना एकूण चार पत्नी आहेत.
- भीमाबाई होळकर या महाराजा यशवंतराव होळकर यांची मुलगी आहे. तिच्या आईचे नाव होते लाडाबाई.
- महाराज मल्हारराव होळकर(दुसरे) हे महाराजा यशवंतराव होळकर यांचा मुलगा आहे. त्यांच्या आईचे नाव कृष्णाबाई(केसराबाई) होते.
- महाराणी तुळसाबाई व कृष्णाबाई होळकर यांचा उगम स्थान इतिहासात मिळत नाही.
- महाराजा यशवंतराव होळकर यांच्या मृत्यूनंतर तुळसाराणी यांनी सन १८१७ पर्यत तब्बल ७ वर्ष होळकरशाहीचा कारभार पाहिला. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय ३० वर्ष असावे.
- सन १८०२ ला महाराजा यशवंतराव होळकर व दुसरा बाजीराव यांच्यात लढाई झाली असली तरी पुढे १० ते १२ वर्षांनी, महाराजा यशवंतराव यांच्या मृत्यूनंतर बाजीराव पेशवे(दुसरे) यांनी ब्रिटिशांशी लढण्यासाठी महाराणी तुळसाबाई होळकर यांना मदत मागितली व त्यांनी बिशर्त पाठींबा दर्शविला होता. होळकर हे सुरुवातीपासूनच ब्रिटिशांच्या विरोधात होते.
- सन १८१८ नंतर महाराणी कृष्णाबाई होळकर यांनी होळकरशाहीचा कारभार रिजंट स्वरूपात तब्ब्ल ४० वर्ष संभाळला. त्यांना दुसरी अहिल्या म्हटलं जात. आज जी होळकरशाही दिसत आहे त्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे.
महिंदपुर बद्दल थोडक्यात :
- मुघलांचा पराभव केल्यानंतर महिंदपुर परगणा सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांना सन १७३४ च्या दरम्यान भेटला होता.
- त्यानंतर येथील किल्ल्याचा व आधी वास्तूंचा पुनर्निर्माण सुरु झाला व तो पूर्ण झाला राणी अहिल्यादेवीच्या काळात.
- सन १७३७ ला सुभेदार मल्हाररावांनी सरदार संताजी वाघ यांना येथे सरदार म्हणून नेमले. होळकरशाहीतील सरंजाम सरदारापैकी संताजी वाघ एक होय.
- सन १७६१ ला पानिपतच्या युद्धात सरदार संताजी वाघ धारातीर्थ पडल्यावर त्यांच्या वंशजांना महिंदपुर परगणा व अन्य जहागिरी कायम स्वरूपी बहाल केली व त्यांची कन्या प्रिताबाई हिचा विवाह अहिल्यादेवींचा पुत्र मालेरावांशी लावून देण्यात आले. वाघ घराण्याला येथील अनेक धार्मिक मान देण्यात आले, नाणी पाडण्याचा अधिकार हि देण्यात आला.
- सरदार संताजी वाघ यांची समाधी येथेच आहे. स्थानिक लोक त्यांना “वाघ राजा” संबोधतात. पानिपतच्या युद्धावरून मराठीत एक म्हण प्रचलित आहे, “दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि असंख्य बांगड्या फुटल्या” त्यातील सत्तावीस मोहऱ्यांपैकी “संताजी वाघ” एक मोहरा आहेत.
- सन १८१७ ची हि लढाई झाल्यानंतर पण होळकरशाहीतील १८५७ चा उठाव याच ठिकाणी झाला होता.
- आजही येथे या लढाईतील व १८५७ च्या उठावात जे बाँम्ब गोळे वापरले होते ते सापडतात. तसेच होळकर कालीन नाणी हि सापडतात.
- होळकरांना येथे अनेक धार्मिक व सांस्कृतिक मान होते. विस्तृत इतिहास लवकरचं.
श्री.घनश्याम होळकर यांनी लिहलेले पुस्तक Amazon वरून Online मागविण्यासाठी Buy Now वर Click करा व अधिक माहिती वाचण्यासाठी Read More वर Click करा.
संदर्भ
होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग -१
होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग -२
आभार
श्री.आर.सी. ठाकूर(इतिहास संशोधक, महिंदपुर),
श्री.घनश्याम होळकर(इतिहास संशोधक, भरतपूर),
श्री.समीर पांचाळ(नाणी अभ्यासक,अहमदाबाद),
श्री.गौरव सोनगरा(महिंदपुर), आणि
theroaddiaries.in
काही शंका, तक्रार किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021