अंबड, जि.जालना(महाराष्ट्र)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७६८ दरम्यान निर्माण केलेली पुष्कर्णी बारव गेल्या अनेक वर्षापासून अंबडकरांची तहान भागविण्याचे काम करीत होती. आजही या बारवेशेजारी असलेले जारच्या प्लँटंला बारवेच्या पाण्याचा पाझर आहे.
पुष्कर्णी बारवे ऐवढी मोठी बारव मराठवाड्यात कुठेच पहायला मिळत नाही. या बारवेला पुर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशेला दरवाजे आहेत. दगडी पाय-या नंतर सुंदर असे अंतर्गत घाट असुन त्यावर पुर्वी धार्मिक विधी अर्थात पिंडदान व गंगापुजन केल्या जात असे.
पुष्कर्णी बारवे ऐवढी मोठी बारव मराठवाड्यात कुठेच पहायला मिळत नाही. या बारवेला पुर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशेला दरवाजे आहेत. दगडी पाय-या नंतर सुंदर असे अंतर्गत घाट असुन त्यावर पुर्वी धार्मिक विधी अर्थात पिंडदान व गंगापुजन केल्या जात असे.
तर बारवेत सुंदर असे महादेवाचे मंदिर असुन समोर सभामंडप व त्यावर कोरलेली अनेक हत्तींची गजमाळ आणि विविविध फुले, वेलीची केलेली नक्षीकाम बारवेच्या सौंदर्यात भर घालणारे असुन सभामंडपात नंदी असुन गर्भगृहात शिवलिंग स्थापन केलेले आहे.
याच मंदिराच्या भिंतीवर तीस देवकोष्टक व कपडे बदलण्यासाठी तयार केलेली स्वतंत्र खोली पहायला मिळते. देवकोष्टकात पुर्वी मुर्त्या असाव्यात मात्र कधीकाळी त्या शिवलिंगासह चोरीला गेलेल्या आहेत याबाबत कुणाकडे ही माहिती नाही. इतके चांगले मंदिर असतांनाही शहरातील अनेक लोक इकडे येत नाहीत त्यामुळे गर्दुल्यांनी मंदिराचा ताबा घेतलेला दिसतो.
उन्हाळ्यात हे मंदिर थंडगार असते दरम्यान पावळ्यातील पाण्यामुळे मंदिर पाण्याखाली असते त्यामुळे बारवेत टाकलेला सर्व कचरा त्यात घाण कपडे,सो ड्याचे रिकामे पुडे अर्थात पाँलिथीन पिशव्या, रिकाम्या दारुच्या दारुच्या बाटल्या, बिसलरीच्या बाटल्या, घरातील निर्माल्य तसेच शेजारच्या बाजारपेठेतील दुकानातील कचराही नियमित टाकल्या जातो.
बारवेत जिकडे तिकडे कचरा, उगलेली झाडे पहायला मिळतात तर पालिकेने केलेले उद्यानही दुरावस्थेत सापडलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बारव निर्माण केल्याने त्यांच्या नावे उद्यान असले तरी ते अर्धे अतिक्रमण झालेले आहे. गावातील काही पुढा-यांनी बारवा, तलाव, रिकामे भुखंड, तसेच स्मशानभूमीत ही अतिक्रमण केलेली आढळतात यावर कुणीही काहीही बोलत नाही.
दरवर्षाला एकच रस्ता नवीन केल्या जातो मात्र बारव स्वच्छतेसाठी एकही नगरसेवक पुढे येत नाही याचीही खंत वाटते. बारवेशेजारी आजुबाजुला अनेकांनी अतिक्रमण करुन बारवेच्या तटावरही घराच्या भिंती बांधलेल्या असुन त्या भिंती कोसळल्यास मोठ्या दुर्घटना घडून विपरीत घडु शकते तर पुष्कर्णीच्या पाण्यात अनेक लाँन्ड्रीवाले कपडे धुतात.
त्यांना कितीही समाजावुन सांगितले तरीही ते तेच करतात आत्तापर्यंत ठिक होते मात्र आतातरी बारवात कपडे धुने बंद करायला हवे मात्र यावरही कुणी बोलत नाही. अनेकांना पाणी पाहिजे मात्र बारवा स्वच्छ करायला नको वाटते शहरातील काही तरुण श्रमदान करु इच्छितात मात्र त्यांना बळ देण्यासाठी ही कुणी पुढाकार घेत नाही.
1988 ला तालुक्याचे तत्कालीन आमदार विलासराव खरात यांनी बारवेची कोसळलेली भिंत बांधण्यासाठी निधी दिला होता तर मंत्री राजेश टोपे यांनी पुष्कर्णी ला संरक्षण भितं बांधली होती काही सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी बारव स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला होता मात्र बारव स्वच्छ केल्यानंतर हळुहळु पुन्हा घाण केल्या जाते.
जालना बखर नावाच्या पुस्तकात एक मजकूर आहे त्यात लिहले आहे की ही बारव सुवासिनींची मनोकामना पुर्णकामना करणारी बारव असुन यात सात आसरा आहेत. त्याची पूजाअर्चा तसेच जावळ देण्याची परंपरा आहे.
इथेच पिंडदान व गंगापुजन केल्यास पितृशांती लाभते तसेच जे लोक बारवेत घाण टाकतील ते नेहमीच संकटात, दुःखात,अपयशी राहतील बारव हे लक्ष्मीचे प्रतिक आहे.
त्यामुळे बारव नेहमी स्वच्छ ठेवून तीचे पुजन व्हायला हवे साक्षात ती गोदावरी असुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पैठण येथील सिध्देश्वर महादेव मंदिराखालुन भुमिगत वाटेने अंबडला आणलेली आहे, असे सांगितले जाते.
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi
- होळकरांशी नमकहरामी करणाऱ्या भवानीशंकर बक्षीचा दुर्दैवी अंत…! - May 13, 2022
- वाफगावचे एक बुंदकी व दु बुंदकी नाणे - January 5, 2022
- होळकरांचे ऐतिहासिक वाफगाव - December 31, 2021