Skip to content

जेजुरी : अहिल्यादेवी होळकर तलाव

जेजुरी, ता.पुरंदर जि.पुणे (महा.)

जेजुरी पुण्यश्लोक अहिल्यादेवीं होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या कर्तुत्वाने पावन झालेली भूमी. जेजुरी(Jejuri) मधील राणी अहिल्यादेवींच्या काही कार्यामधील एक उत्कृष्ट नमुना म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव. या तलाव्याचा निर्माण पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७० केला.

राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील हा तलाव अभियांत्रिकेचा व पाणी व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमूना आहे.
अहिल्याबाई-होळकर-फोटो
अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला भव्य तलाव

हा तलाव लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सासरे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व सासू श्रीमंत गौतमीबाई होळकर यांच्या स्मरणार्थ निर्माण केला म्हणून या तलावास “मल्हार-गौतमेश्वर तलाव” या नावाने देखील ओळखले जाते. जेजुरी गडाच्या बाजूला हा भव्य तलाव स्थित असून एकूण १८ एकर जागेमध्ये पसरलेला आहे.

हा तलाव आकाराने चोकोनी असून चारीही बाजूने मजबूत घडीच्या दगडाने बांधलेला आहे. या तलाव्याच्या एका बाजूला चिंचणीची बाग असून जेव्हा आपल्या नजरेस हा तलाव पडतो तेव्हा आपल्या डोळ्याचे प्रारणे फिटून जीव थक्क झाल्याशिवाय राहत नाही. डोंगरावरील अनेक झऱ्याचे पाणी एकत्र करून शिस्तबद्ध पदधतिने तलाव्यामध्ये सोडण्यात आलेले आहे. डोंगरातील पाणी ज्या ठिकाणी तलाव्यात येते त्या ठिकाणी दगडांची खाली-वर या प्रकारे विशिष्ट्य पदधतीने मांडणी केलेली दिसते.

ahilyabai-holkar
अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला भव्य तलाव

तलाव्यामध्ये उतरण्यासाठी पूर्व व उत्तरेच्या बाजूला पायऱ्यांची सोय केलेली आहे. त्याचप्रकारे तलाव्यातील पाणी हे शेतीसाठी वापरण्यात यावे यासाठी पूर्व, उत्तर व दक्षिण या बाजूंना दगडी मोटेची सोय केलेली दिसते. तसेच तलाव्याच्या उत्तर व दक्षिण बाजूला तलाव्याला लागुनच दोन चौकोनी आकाराच्या विहिरी आहेत.

या विहिरीचे बांधकाम दगडामध्ये असून त्यामधील दक्षिण बाजूच्या विहिरीवर शेतीसाठी पाणी उपसण्यासाठी दगडी मोटेची सोय केलेली आहे. याच विहिरीतील पाण्याचा उपयोग चिचणीच्या बागेसाठी होत असावा. तलाव्याच्या उत्तर बाजूला थोड्या अंतरावर अधुरे काम झालेले मंदिर पहावयास मिळते. या मंदिरामध्ये काही कोरीव पादुका पहावयास मिळतात तर काही कोरीव दगडी शिळा मंदिरासमोर हि बघायला मिळतात. या मंदिरासमोर एक छोटी दीपमाळ हि आहे.

अहिल्यादेवी-फोटो
तलावाच्या उत्तर बाजूला असलेली विहीर
ahilyadevi-holkar
तलावाच्या दक्षिण बाजूला असलेली विहीर(चिंचेच्या बागेशेजारी)

तलाव्याची पूर्व कडील बाजू हि तलाव्याची प्रमुख बाजू असून याच बाजूने दटयांच्या सहाय्याने तलाव्यातील पाणी हे गायमुख या जलकुंडामध्ये व जेजुरीतील तीन हौदामध्ये भूमिगत नळांद्वारे पोहचवले जात होते. त्यामुळे धुणे, अंघोळी व जनावरांसाठीचे पाणी दूरवर उपलब्ध होत होते. त्याचा वापर करून ते पुढे शेतीसाठी वापरले जात. त्यामुळे पाणी प्रदूषण होऊ नये म्हणून, पाणी वापरल्यानंतर त्याचा पुढे शेतीसाठी पुनर्वापर व्हावा हा विचार होता.

दटयांच्या बाजूला तलाव्याच्या बंधरयावरच भूमिगत नळांद्वारे जाणाऱ्या पाण्यावरील हवेचा दाब कमी व्हावा व या भूमिगत नळांद्वारे पाण्याचा प्रवाह व्यवस्थित व्हावा यासाठी खास चौकोनी दगडात मांडणी केलेली दिसते,ती आज हि आहे. पूर्वकडील बाजूला असलेल्या दटयांची मांडणी हि आज ही पहावयास मिळते तसेच त्या दटयांमधील भूमिगत नळही नजरेस पडतात. फक्त पूर्वकडीलच बाजूने तलाव्याच्या तळापर्यंत पायऱ्यांची सोय केलेली आहे आणि याच पायऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या भिंतीवर महाराजा होळकर इंदौर स्टेटचा संगमरवरी बोर्ड पहावयास मिळतो.

ahilyabai-holkar-information-in-marathi
तलावाच्या याच दटयांच्या माध्यमातून पाणी भूमिगत नळांना मिळत असे
ahilyabai-holkar-in-marathi
तलावाच्या याच दटयांच्या माध्यमातून पाणी भूमिगत नळांना मिळत असे
ahilyabai-holkar-marathi
तलाव्यामध्ये असलेला महाराजा होळकर इंदौर स्टेटचा बोर्ड

दोन ठिकाणी तलाव्यामध्ये महाराजा होळकर इंदौर स्टेटचा बोर्ड आहे. पूर्वकडील एका बाजूने आपून तलाव्यात उतरल्यावर भव्य होळकर कालीन शिवपिंड पहावयास मिळते व या शिवपिंडेच्या बाजूला असलेल्या पूर्वेकडील तटबंदीवर विविध आकाराच्या दगडांची लक्षणीय मांडणी केलेली आहे.

हि शिवपिंड राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विद्यमानाने तयार झालेली असावी. या तलाव्याचा आजही फक्त जेजुरीच नाही तर आसपासच्या गावांना ही शेतीसाठी पाण्याचा उपयोग होतो. हा तलाव तयार करताना जो नवलात या प्रकारचा दगड सापडला त्याच दगडापासून जेजुरीगडाच्या पायऱ्या होळकर काळात बनवल्या गेल्या.

ahilyabai-holkar-mahiti
तलावामध्ये असलेली पिंड
ahilyabai-holkar-history-in-marathi
तलावामधील विशिष्ट दगडी रचना
information-about-ahilyabai-holkar-in-marathi
तलावामधील दुसरा होळकर स्टेटचा शिलालेख

सन १९३९ ला या तलाव्यातील पाण्याचा उपयोग जेजुरीत पिण्यासाठी होऊ लागला. ही प्रमाणात आजही होत आहे. या तलाव्यामध्ये भव्य दगडी चौथरा पहावयास मिळतो. पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या अनेक कार्यामधील एक उत्तम कार्य असलेला हा होळकर तलाव अभीयांत्रीकेचे भाग आहे.

अशाप्रकारे विविध गुणांनी नटलेला हा होळकर तलाव आज घाणीच्या साम्रज्यात अडकलेला दिसतो. जेजुरी देवस्थान यांच्या वतीने येणाऱ्या यात्रेकरूंच्या अपुऱ्या सोयीमुळे तलाव्याच्या पश्चिम बाजूला मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसते. मात्र जो पर्यंत सूर्य,चंद्र आणि वारा आहे तो पर्यंत हा होळकर तलाव आपल्याला इंदोरची राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाची आणि व्यक्तिमत्वाची जाणिव करून देत राहणार हे नक्कीच.आजच्या या कलयुगात हि होळकर कालीन वास्तू दिमाखात उभी आहे.

ahilyabai-holkar-information
तलावात चारही बाजूने अशा प्रकारेचे मजबूत दगडी बांधकाम बघायला मिळते.

महत्त्वाचे:

  • गायमुख या जलकुंडाचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७० ला केला होत मात्र त्या गायमुखाच्या भिंतीचा वापर करून आज त्यावर भक्त निवास उभारले आहे. गायमुखाच्या पूर्वीच्या काही भिंती बाहेरील व आतील बाजूस पहावयास मिळतात.
  • चिचणीच्या बागेचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी भक्तांच्या सोयी केला होता.
गायमुख एक इतिहासात विलीन झालेले जलकुंड.
अधिक फोटो पहा:
अहिल्यादेवी होळकर तलाव जेजुरी
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]

राणी अहिल्यादेवी होळकरांनी भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कार्यांची यादी पहा.
अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी कार्य
राहुल वावरे

2 thoughts on “जेजुरी : अहिल्यादेवी होळकर तलाव”

  1. भाऊसाहेब निंबाळकर

    नमस्कार.मी कालच धारढगाव खडक (नैताळे)येथे अहिल्याबाई होळकर यांची बारव पाहिली.सुस्थितीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *