Skip to content

किल्ले महेश्वर : अहिल्यादेवीचे दहनस्थळ व समाधीस्थळ

दहनस्थळ व समाधीस्थळ म्हणजे काय? असा अनेक लोकांना प्रश्न पडतो. तर नेमक काय हे जाणून घ्या..!

राणी अहिल्यादेवी होळकर यांचे दहनस्थळ

ahilyabai-holkar
अहिल्यादेवींचे दहनस्थळ

किल्ले महेश्वर जि.खरगोण(मध्यप्रदेश): होळकरशाहीची दुसरी राजधानी किल्ले महेश्वर(Maheshwar Fort) येथे १३ ऑगस्ट १७९५ ला राणी अहिल्यादेवी होळकर(Ahilyabai Holkar) यांचे निधन झाले.

किल्ल्याच्या(Fort) पायथ्याशी ज्या ठिकाणी त्यांचे दहन(अग्नी देणे) करण्यात आले त्या ठिकाणी या दहन वास्तूचा निर्माण करण्यात आला व त्यानंतर किल्ल्यावर ज्या ठिकाणी अंत्यविधीकार्य पार पडले त्या ठिकाणी त्यांच्या समाधीचा निर्माण करण्यात आला.

दहनस्थळाचे आणखी काही छायाचित्रे

अहिल्याबाई-होळकर-यांची-माहिती
१३ ऑगस्ट १७९५ ला अहिल्यादेवींचे निधन झाले.
किल्ल्याच्या पायथ्यशी असलेले दहनस्थळ
ahilyabai-holkar
अहिल्यादेवींचे दहनस्थळ
अहिल्यादेवींच्या दहनस्थळाचा Video

राणी अहिल्यादेवी होळकर यांचे समाधीस्थळ

ahilyabai-holkar

त्यांची समाधी अहिल्येश्वर छत्री मंदिर यानावाने सुप्रसिद्ध आहे. राणी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यविधीकार्य श्रीमंत संताजी होळकर यांनी पार पाडले, ते श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर यांचे धाकटे बंधू होय.

किल्ल्यावरील राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधी वास्तूचा निर्माण श्रीमंत तुळसाराणी साहिब होळकर यांनी केला. त्या महाराजाधिराज थोरले यशवंतराव होळकर यांच्या धर्मपत्नी होय.

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.

राहुल वावरे

1 thought on “किल्ले महेश्वर : अहिल्यादेवीचे दहनस्थळ व समाधीस्थळ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *