Skip to content

अहिल्यादेवी होळकर अन्नछत्र(धर्मशाळा) : लोणार

लोणार, जि.बुलढाणा(महाराष्ट्र)

सम्राट अशोकानंतर संपूर्ण भारतभर लोककल्याणकारी कार्य फक्त अहिल्याबाईनीच केली. अहिल्याबाई चे राज्य कालौघात नष्ट झाले परंतु त्यांनी भारतात ऊभे केलेले धर्माचे राज्य आजही त्यांच्या कार्य रूपाने टिकून आहे.

महाराष्ट्र भूमीत जन्मलेल्या व भारताच्या इतिहासात अजरामर असलेल्या सतराव्या शतकातील कर्मयोगीनी अहिल्यादेवी होळकर अतुलनीय व्यक्तिमत्त्व आहे. एक प्रभावी स्त्री, बुध्दिमान, राज्यकर्ती, शुरविर, रणनीतीकुशल म्हणून जनसामान्यांतआदराचे स्थान आहे.

धर्म आणि कर्म यांची अद्वितीय सांगड घालून आपल्या लोककल्याणकारी कार्यामुळे त्यांनी भारताच्या राजकीय, सांस्कृतिक पटलावर कायमची नाममुद्रा कोरुन ठेवली आहे.

Ahilyabai Holkar android App

वास्तविक पाहता अहिल्यादेवीची सत्ता केवळ इंदुर सभोवतीच्या ‘माळवा’ प्रदेशावर तरीही त्यांनी आपल्या खाजगीतील खजिना (१६ कोटी) संबंध भारतात धर्मदायासाठी रिता केला.

हिंदू धर्मशास्त्रात तिर्थयात्रा करणे हे महत्त्वाचे काम मानले जाते. त्या काळात प्रवासाची साधने मर्यादित होती. राजे, संस्थानिक, धनिक, मध्यम वर्गीय व सामान्य आपआपल्या परीने तिर्थयात्रा करीत असत.

धर्मशाळा दान, एक काम्य दान, प्रवासी लोकाचा प्रवास सुखावह व्हावा यासाठी धर्मशाळा बांधुन व आवश्यक त्या सोयी ऊपलब्ध करून ती धर्मशाळा दान करणे याला ‘धर्मदान’ म्हणत होते.

भविष्य पुराणात सांगितले आहे की दोन अनाथ अशा लोकांची राहण्याची सोय करणाऱ्या माणसाला आणखी काही दानधर्म करायला नको, धर्मशाळाने त्याला मोक्षप्राप्ती होते.

तिर्थयात्रा, पिंडदानला जाणाऱ्या भाविकांची, यात्रेकरूंची त्याकाळी तिर्थक्षेत्री गैरसोय होते ही बाब लक्षात घेऊन अहिल्याबाईनी संपूर्ण भारतात धर्मशाळा बांधल्या, धर्मशाळेच्या व्यवस्थेसाठी कायम स्वरूपी खर्च लावून दिला. बऱ्याच धर्मशाळेत अन्नछत्र व सदावर्ते चालू केलीत.

लोणारचे अन्नछत्र हे त्यांच्या प्रजावत्सलता, दानशुरताचे मूर्तीमंत ऊदाहरण आहे. अन्नदान करणारे अन्नछत्र आजच्या परिस्थितीतही शासन म्हणजे साधना ,जबाबदारीयुक्त, कार्यकर्तुत्व यांची जाणिव देणारा मार्गदर्शक मैलाचा दगड ठरला आहे. लोणारचे अन्नछत्र एक मजली, १०८ दगडी खांब असलेले (१००×५० फुट ) ओवऱ्या, मोठा परीसर व बाजूला स्थानिक दानशूरने बांधलेली ‘धर्मशाळा’ आहे.

अन्नछत्र आता भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. पण लोणार गाव अहिल्याबाईच्या पायधुळीने पवित्र झाल्याचे अन्नछत्राचे लेणं अभिमानाने घेऊन ऊभे आहे.

अहिल्यादेवी होळकर धर्मशाळेचे आणखी छायाचित्र
Cover Photo : राबर्ट गिल(ब्रिटिश लाएबरी)
फोटो : प्रा. डॉ. वर्षा मिश्रा
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]

राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.
प्रा. डॉ. वर्षा मिश्रा
Latest posts by प्रा. डॉ. वर्षा मिश्रा (see all)

2 thoughts on “अहिल्यादेवी होळकर अन्नछत्र(धर्मशाळा) : लोणार”

  1. Girish Mandke, Deccan College, Pune

    लोणार येथील अन्नछत्र – ही प्रा.वर्षा मिश्रा यांची माहिती उत्तमच आहे. त्यांनी आणखी कोठे अन्नछत्रे बांधली त्याची माहिती मिळू शकेल का ? प्रा. वर्षा मिश्रा यांचा फोन नंबर मिळू शकेल का ?

    1. त्यांच्या Profile मध्ये facebook ची लिंक दिली आहे त्यांच्या account ची. facebook जाऊन त्यांना message करा ते देतील नंबर. शिंदखेडा राजा येथे पण आहे. please visit AhilyaStore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *