-
Black Woolen Jen – 6*4₹2,400.00
-
White Woolen Jen – 6*4₹2,400.00
-
Black Jen Ghongadi Aasan₹1,400.00
-
White Jen Ghongadi Aasan₹1,400.00
-
Black Woolen Jen – 6*6₹3,800.00
धनगरी जेन म्हणजे काय? असा काहींना प्रश्न पडतो. तर जेन म्हणजे मेंढ्यांची लोकर वापरून १ इंच जाडीची तयार केलेली चटई होय. जेन हे वजनाने जड असते. उदा. ६*४ जाडीच्या जेनचे वजन ४ ते ५ किलो येते व जाडी १ इंच. तसेच जेन कडक असल्यामुळे त्याची घडी घालू शकत नाही ते गुंडळावे लागते. जेन बद्दल अधिक माहिती व फोटो खाली दिलेले आहेत.
AhilyaStore चे जेन का वापरावे?
- १००% लोकरीचा वापर
- सर्व जेन हातमागावर बनवलेले
- उच्च दर्जाच्या लोकरीचा वापर
- २४*७ तास Customer Support
- Cash On Delivery सेवा उपलब्ध
- Online Order उपलब्ध
- Free Home Delivery
- Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो
- Refund and Return Policy
आमची काम करण्याची पद्धत
जेनच्या गुणवत्तेविषयी
आमच्या येथे उपलब्ध असलेले जेन हे सातारा जिल्हयातील फलटण, मान, खटाव या तालुक्यातील कारागिरांनी तयार केलेले आहेत. तरडगाव ता.फलटण जि.सातारा हे आमचे मुख्य मध्यवर्ती ठिकाण असून येथून संपूर्ण महाराष्ट्रासहित भारतभरात आम्ही Online पार्सल पाठवतो.
आमचे जेन पूर्णपणे लोकरीची असून भेसळमुक्त आहे याची आम्ही १००% खात्री देतो. काळे व पांढरे अशा रंगाचे व ६*४,६*६ व ७*५ या आकाराचे जेन उपलब्ध असते. ६*४ या आकाराचे जेन कायमस्वरूपी विक्रीला असते व ६*६ आणि ७*५ या आकारचे जेन खरेदी करण्यासाठी तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते.
जेन कसे खरेदी करू शकतो?
तुम्ही तीन प्रकारे जेन खरेदी करू शकता.
- COD – Cash On Delivery करू शकता,
- 8999143074 या नंबर वर Google Pay करू शकता, किंवा
- Website वरून तुम्ही खरेदी करू शकता.
तुमच्याकडून एकदा Order Confirm झाल्यांनतर दुसऱ्या दिवशी Order Dispatch होते. आमच्या सर्व Order या Delhivery किंवा इतर Private कुरियर कंपनी द्वारे पाठवल्या जातात. तुमची Order पाठवल्यानंतर त्याच दिवशी Parcel चा Tracking Code व बिल तुमच्या WhatsApp किंवा Email वर पाठवले जाते.
जेनचे फायदे
लोकरी जेनचे आरोग्यविषयक फायदे :
- पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो.
- उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
- कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
- घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.
- अर्धांगवायूचा धोका टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
- घोंगडीला थोडासा स्वतःचा सुगंध असतो त्यामुळे दमा व पित्ताशयाचा त्रास दूर होतो.
लोकरी जेनचे धार्मिक फायदे :
( Note – हातमागावरील पारंपारिक घोंगडी(धाबळ किंवा धाबळी किंवा खळीची), मळणीची घोंगडी (फटकूर), करडी घोंगडी(जावळ) व लोकरीचे जेन(जान) किंवा जेजम यांचा धार्मिक विधीसाठी वापर करू शकत नाही. हातमागावरील जावळाची काळी किंवा पांढरी घोंगडीचा वापर धार्मिक विधीसाठी केला जातो.)
टिप : जेनच्या आयुष्यासाठी २० ते २५ दिवसानंतर ते उन्हात सुकत ठेवले पाहिजे तसेच जर ते ओले झाले तर लवकरात लवकर उन्हात सुकत ठेवणे.
जेन वापरण्याविषयी काय केले पाहिजे व काय टाळले पाहिजे त्याविषयी थोडक्यात,
हे करू नका
- जेन जास्तकाळ कोंदट ठिकाणी ठेऊ नका.
- जेन साबण लावून धुऊ नका.
- जेन निरम्याच्या पाण्यात भिजत घालू नका.
- जेन आपटून धुऊ नका.
- जेन पिळून धुऊ नका.
- जेन ब्रशने धुऊ नका.
- जेन वॉशमशीन मध्ये धुऊ नका.
- जेन क्षारयुक्त पाण्यात भिजत ठेऊ नका.
- जेन गुंडाळून त्यावर बसू नका.
हे करा
- जेन सतत वापरात असणे कधी हि योग्य असते.
- जेन वापरात असेल तर दोन महिन्यातून उन्हात वाळत घाला. किंवा जर
- जेन वापरात नसेल तर २० ते २५ दिवसांनी उन्हात वाळत घाला.
- ज्या ठिकाणी हवा खेळती असते अशा ठिकाणी जेन रोज ठेवा.
जेन कसे तयार होते?
लोकर कात्रणे
जेन तयार करताना सर्वात सुरवातीची प्रक्रिया म्हणजे मेंढ्यांची लोकर कात्रणे. लोकर कात्रणीच्या आधी मेंढ्याना ओढयात किंवा नदीत स्वच्छ धुतले जाते व त्यांनतर मेंढ्यांची लोकर कात्रण केली जाते. लोकर म्हणजे मेंढ्यांची केस.
लोकरीचे वर्गीकरण करणे
लोकर कातरून झाले कि लोकरीचे वर्गीकरण केले जाते. यामध्ये जावळ लोकर व मोठी लोकर वेगळी केली जाते तर काही ठिकाणी हे केले जात नाही. तसेच पांढरी, काळी व करड्या रंगाची लोकर वेगवेगळी केली जाते. जावळ लोकर म्हणजे मेंढ्याच्या पिल्लांची पहिली लोकर तर मोठी लोकर म्हणजे प्रौढ मेंढ्याची लोकर.
लोकर पिंजणे
लोकर पिंजणे म्हणजे लोकर स्वच्छ करणे. लोकरीमधून काही घाण काढायची राहिलेली असेल तर ती या प्रक्रियेमध्ये काढली जाते. घाण म्हणजे छोटा-मोठे काटे किंवा लोकरीचा गुंता झाला असेल तर तो मोकळा केला जातो. आज काही ठिकाणी लोकर हाताने पिंजली जाते तर काही ठिकाणी मशीनच्या साहाय्याने पिंजली जाते.
लोकरीचा थर लावणे व करंजाची पेंड मिसळणे
लोकर पिंजून झाले कि लोकरीचा थर लावला जातो व त्यावर वरून पाणी शिंपडले जाते व करंजाची पेंड त्यावरून लावली जाते. पुन्हा त्यावर नवीन लोकरीचा थर लावला जातो व पाणी शिंपडून करंजाची पेंड लावली जाते. या प्रकियेमध्ये ठरले जाते कि किती लोकरीची थर लावायचे.
यावरूनच जेनची क्वालिटी ठरली जाते. जेवढे थर जास्त व जेवढ्या चांगल्या प्रतीची करंजाची पेड वापरली जाते तेवढे जेन चांगले बनले जाते. करंजाची पेंड कडक असते त्यामुळे ती अधल्या रात्री पाण्यात भिजत ठेवतात.
ओल्या जेनची लोळी धरणे
लोळी धरणे म्हणजे ओले जेन गुंडाळणे. वरील प्रक्रिया जेव्हा सुरु असते तेव्हा तिच्या खाली ताडपत्री सारखे जाड वस्त्र अंथरले जाते व थर लावले जातात. सर्व थर लावून झाले कि त्यावरून पुन्हा एक ताडपत्री अंथरली जाते व त्या ओल्या जेनचे Rolling स्वरूपात गुंडाळले जाते. यालाच ओल्या जेंनची लोळी धरणे म्हणतात.
ओले जेन मशीनमध्ये लावून देणे
ओल्या जेंनची लोळी धरली कि म्हणजेच गुंडाळले कि ते पॅक बांधले जाते व ते ओले जेन Roll मशीनमध्ये लावून अँटी-क्लॉक वाईज फिरवले जातो. त्यामुळे वरून दाब पडल्यामुळे सगळे थर घट होतात व त्याचबरोबर ओली करंजाची पेंड सर्व लोकरीच्या थरांमध्ये व्यवस्थित पसरली जाते किंवा मुरली जाते. काही वेळानंतर जेन बाहेर काढले जाते.
हाताने लेव्हलिंग करणे
मशिनमधून जेन जेव्हा बाहेर काढले जाते तेव्हा थोड्या प्रमाणात ओलसर असते तेव्हा हाताने जेनची लेव्हलिंग करतात. लेव्हलिंग करतात म्हणजे कारागीर प्रयत्न करतात कि जेनचा वरील व खालील पृष्ठभाग सपाट व्हावा.
जेन वर नक्षी करणे
जेनची लेव्हलिंग करून झाले कि जेनवर नक्षीकाम केले जाते. कारागीर वेगवेगळ्या नक्षी काढतात. या नक्षी पांढऱ्या लोकरीच्या माध्यमातून काढल्या जातात. पांढऱ्या लोकरीच्या धाग्याला वेगवेगळे रंग दिलेले असतात. ज्या पांढऱ्या लोकरीच्या साहाय्याने नक्षी काढली जाते ती लोकर वळून तिचा लांब धागा तयार करतात. त्यानंतर त्या पांढऱ्या लोकरीच्या धाग्याला लाल, हिरवा, गुलाबी, पिवळा हे रंग दिले जातात. त्यासाठी तो पांढरा धागा रात्रभर त्या रंगात बुडवून ठेवावा लागतो.
धनगरी जेनचे प्रकार?
धनगरी जेन म्हणजेच लोकरीचे जेन. जेनमध्ये वापरलेल्या लोकरीवरून, रंगावरून व आकारावरून वेगवेगळे प्रकार पडतात.
लोकरीवरून, जेनचे जावळ लोकरीचे जेन व मोठ्या लोकरीचे जेन हे दोन प्रकार पडतात. जावळ लोकर म्हणजे मेंढ्याच्या पिल्लांची पहिली लोकर. तिला काही ठिकाणी बाळ-लोकर हि म्हणतात तर मोठी लोकर म्हणजे प्रौढ मेंढ्यांची लोकर. लोकर म्हणजे मेंढ्यांची केस. शक्यतो बहुतेक जेन मोठ्या लोकरीची असतात.
रंग व आकारावरून, जेनचे काळे व पांढरे असे दोन प्रकार पडतात तर आकारावरून ६×४,६×६, ७×५ किंवा आसनाच्या आकाराचे २×३ किंवा २.५×२.५ अशे हि प्रकार पडतात. जेन ची कमीत कमी रुंदी २ फूट व जास्तीस जास्त लांबी ७ फुटा पर्यत करता येते त्यामुळे या दोन अंकामधील कोणत्याही आकाराचे जेन तयार करू शकतो. उदा.६×५ किंवा ४×५.५ असे.
खरे व खोटे जेन कसे ओळखावे?
ज्याप्रमाणे आपण खरी व खोटी घोंगडी ओळखू शकतो त्याप्रमाणे जे ओळखू शकत नाही. आज जेन मध्ये हि बनवट पद्धतीचे जेन तयार केली जातात मात्र आपण ते ओळखू शकत नाही. दक्षिणेकडील राज्यातून हि जेन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात व भारतभरात पोहचवली जातात. खालीलप्रमाणे बनावट जेन तयार केली जातात,
- सर्वात मोठा किळसवाणा प्रकार म्हणजे बनावट जेन मध्ये मेंढ्यांच्या केसा ऐवजी माणसांची केस मिसळली जातात, व हा प्रकार ओळखू येऊ नाही म्हणून मेंढ्यांची व माणसांची केस एकत्र करून त्यांना कला रंग दिला जातो. हि बनावट जेन खूप काळीभोर असतात.
- करंजीच्या पेंड ऐवजी हलक्या प्रतीचे चिकट रासायनिक द्रावण वापरणे. हे द्रावण स्वस्त येते म्हणून वापरले जाते.
- लोकरीचे कमी थर भरले जातात.
अशाप्रकारे बनावट जेन तयार केले जाते मात्र ती ओळखायची कोणतीच पद्धत नाही. हि जेन यात्रा-जत्रांमध्ये तसेच रस्त्यांवर फेरीवाल्यांकडून विकली जातात. काही ठिकाणी ६०० ते ८०० रुपयात विकतात तर कधी कधी २००० किंवा त्यापेक्षा अधिक किमतींना विकली जातात. त्यामुळे तुम्ही जर जेन घेणार असाल तर व्यवस्थित खात्री करून घेतले पाहिजे.