Posted on Leave a comment

घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे!

आनेक लोकांना प्रश्न असतो कि घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे काय असतात? घोंगडीचे आरोग्यविषयक फायद्यांबरोबर धार्मिक व इतर फायदे हि असतात मात्र या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे. 

घोंगडीचे हे फायदे फक्त हातमागावर जी घोंगडी बनली जाते त्यापासूनच मिळतात. आता काही जणांना प्रश्न पडला असेल कि हे हातमाग काय असते. घोंगडीच्या विणकामावरून दोन प्रकार पडतात. एक हातमाग घोंगडी  व दुसरा मशीनमेड घोंगडी. मशीनमेड घोंगडी म्हणजे डुप्लिकेट घोंगडी, ज्यामध्ये कॉटन मिक्स असते व  हातमागावर जी घोंगडी बनवली जाते ती ओरिजिनल घोंगडी असते. ज्यामध्ये पूर्णपणे लोकरीचा वापर केलेला असतो. 

Join Our YouTube Channel Today!

घोंगडीचा पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. आजकालच्या वाढलेल्या धकथकीत जीवनामुळे बहुतांशी लोकांमध्ये पाठदुखी कंबरदुखी हा त्रास दिसून येतो. शक्यतो शहरातील लोकांना हा त्रास असतो तसेच वाढत्या वयामुळे पण हा त्रास सुरु होतो. अशा लोकांनी घोंगडी अंथरून त्यावर नित्यनेमाने झोपावे. त्यांच्यासाठी घोंगडी रामबाण उपाय आहे.  

यांनतर घोंगडी, रक्ताशी संबंधित असणाऱ्या तीन आजारांवर उपयुक्त आहे. ज्यामध्ये घोंगडीमुळे ज्या व्यक्तीला ते आजार असतील त्याला दिलासा मिळतो व त्या व्यक्तीचे ते आजार नियंत्रित राहण्यास मदत होते. पण घोंगडीत असं काय आहे कि ज्यामुळे ती मनुष्याच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे? असा काहींना प्रश्न पण पडत असेल?

घोंगडी शरीराला टोचते व हे टोचणेच शरीरासाठी आवश्यक असते. घोंगडी जेव्हा शरीराला टोचली जाते तेव्हा ती acupuncture चे कार्य करते व त्यामुळे शरीरातील ब्लड सर्कलशन व्यवस्तीत होते म्हणजे संत पद्धतीने रक्त प्रवाह होतो त्यामुळे रक्तमुळे जे आजार होतात ते होता नाही किंवा जे आजार झालेत ते नितंत्रणात राहतात फक्त घोंगडी रोजच्या वापरात हवी. डॉक्टर हि अशा लोकांना घोंगडी वापरण्याचे सुचवतात.    

रक्ताशी संबंधित पहिला आजार आहे मधुमेह. घोंगडीमुळे ज्या व्यक्तींना मधुमेह झाला आहे अशा लोकांचा मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे उच्च रक्तदाब व अन्य आजार होण्याचा धोका टळू शकतो.  मधुमेह म्हणजेच डायबिटीज. दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच.

मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचे व ग्लुकोजची मात्रा वाढल्याने आपलं काम नीट पार पडू शकत नाहीत. पांढऱ्या पेशी ज्या आपल्या शरीराला रोगप्रतिकार शक्ती प्रदान करतात त्यांचा प्रभाव सुद्धा अतिग्लुकोजमुळे कमी होतो. यामुळे मधुमेहासोबत इतरही आजार आणि व्याधी शरीराभोवती विळखा घालू लागतात.

सामान्यत: जेव्हा शरीरात ग्लुकोज व साखरेची मात्रा वाढू लागते तेव्हा हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु होतो. हे यामुळे होतं कारण रक्तात ग्लुकोज वाढल्याने रक्त गढूळ होतं आणि ह्या दुषित रक्ताचा प्रवाह संथ होऊन हे रक्त वेळेत हृदयापर्यंत पोहोचत नाही. ते रक्त पोहोचावे म्हणून शरीर जोर लावते. यालाच उच्च रक्तदाब म्हणतात. त्यामुळे संत रक्त प्रवाहित होण्यासाठी व मधुमेहामुळे उच्च रक्तदाब सारखा त्रास उदभवू नये म्हणून अशा लोकांनी नेहमी घोंगडी अंथरून झोपावे. 

आजकाल कामाची जीवनशैली अशी झालेली आहे कि १० व्यक्ती नंतर १ ला उच्च रक्तदाब म्हणजेच BP चा त्रास आहे. अशा लोकांनी घोंगडी अंथरून त्यावर नित्यनेमाने झोपावे. घोंगडी शरीराला टोचली जाते व अदोगर सांगितल्याप्रमन ब्लड सर्कलशन व्यवस्तीत होते म्हणजे संत पद्धतीने रक्त प्रवाह होतो त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.   

रक्ताशी संबंधित तिसरा आजार आहे अर्धांगवायूचा म्हणजेच पॅरालिसीस. अर्धांगवायूचा(पॅरालिसीस) धोका टळतो. अर्धागवायू, पक्षाघात, लकवा, पॅरालिसीस आणि स्ट्रोक ही एकाच आजाराची वेगवेगळी नावे आहेत.  उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना हा आजार उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळेअशा लोकांनी हि घोंगडी वापरायला सुरुवात केली पाहिजे. नेहमी झोपताना अंथरून म्हणून तिचा वापर केला पाहिजे. असे केल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.

आपल्या देशात दर मिनिटाला सहा लोकांना अर्धागवायूचा कोणाला ना कोणाला झटका बसतो. प्रत्येक वर्षी पंधरा लाख लोक या आजाराने ग्रासतात, तर दर तीन मिनिटाला एक जण या आजाराने दगावतो. पॅरालिसीसचा ज्याला अटॅक येतो त्याला BP चा त्रास असतो व जेव्हा मेंदूला रक्तप्रवाह होत नाही तेव्हा हा अटॅक येतो पण जेव्हा तुमचा BP च नियंत्रणात असेल तर हा पुढचा संभाव्य धोका टळू शकतो म्हणून अशा लोकांनी हि घोंगडी अंथरून त्यावर नित्यनेमाने झोपावे.

यानंतर घोंगडीचा चोथा फायदा आहे तो ज्यांना पित्ताशयाचा त्रास आहे अशा लोकांसाठी. हा रोग इतका धोकादायक नाही, पण त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार जितक्या लवकर आपल्याला माहित पडतील तितक्या लवकर आपण त्याच्या त्रासदायक समस्यांपासून आराम किंवा मुक्ती मिळवू शकतो. घोंगडीमुळे हा त्रास ज्या लोकांना आहे अशा लोकांना निश्चितच अराम मिळू शकतो.  

यानंतर शेवटचा फायदा म्हणजे घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होण्यास मदत होते तसेच कांजण्या व गोवर तापातही घोंगडीचा वापर करतात.

Read More वर Click करा.
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected] 
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *