Who We Are?

सन २०२० च्या जुलै महिन्यात जी ऐतिहासिक पुस्तके सध्या प्रकाशित होत नाहीत व जे शोधप्रबंध अत्यंत दुर्मिळ व उत्तम आहेत ते अधिकाधिक लोकांपर्यंत ना नफा, ना तोटा या निस्वार्थी उद्देशाने पोहचवण्यासाठी Ahilya Store ची सुरुवात केली.

सुरुवात केल्यानंतर काही महिन्यातच लोकांचा खूप प्रतिसाद मिळाला. लोकांच्या नवनवीन सूचना, मागणी व कल्पना आम्हाला मिळत गेल्या. असंख्य सूचनामधील एक सूचना अशी होती कि तुम्ही Hand Crafted वस्तू विकायला ठेवा व असंख्य मागणी पैकी एक मागणी होती घोंगडीची. त्यामुळे Ahilya Store ला एका वेगळ्या उंचीवर नेहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु झाले.

सन २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही घोंगडी Online Shopping साठी उपलब्ध केली व त्यानंतर एक वर्षा नंतर म्हणजेच सन २०२२ च्या नोव्हेंबर महिन्यात धनगरी जेनगोधडी Online Shopping साठी उपलब्ध केली. हे सर्व जेव्हा घडत होत तेव्हा AhilyaStore च्या माध्यमातून आम्ही Agriculture क्षेत्रात Online च्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसाठी(Organic Farms) कंपोस्ट खत शेतकऱ्यांना पर्यत काही काळ पोहचवत होतो.

त्यामुळे सेंद्रिय शेतीमधून तयार होणाऱ्या Organic Foods व Organic दुग्धजन्य पदार्थांची मागणी होऊ लागली, म्हणून आम्ही AhilyaAgro च्या माध्यमातून Organic Foods दि.०१ मे २०२३ ला, महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून Online Shopping उपलब्ध केले. तसेच डिसेंबर २०२३ च्या दरम्यान आम्ही Amazon सारख्या Platform वर आमची सर्व प्रोडक्ट उपलब्ध केली.

ज्या उद्देशाने Ahilya Store ची सुरुवात झाली होती तो, ऐतिहासिक दुर्मिळ पुस्तके व शोधप्रबंध Online Shopping साठी उपलब्ध करणे हा उद्देश कायम असणार आहे. आपल्या काही शंका असल्यास [email protected] या email वर संपर्क करा किंवा आम्हाला थेट Contact करा.

AhilyaStore is a part of the AHILYA GROUP.

Our Founders

Rahul Waware
Founder | Technical Head
Akshay Barve
Co-Founder | Marketing Head
Omkar Waware
Co-Founder | Operation Head

Buy Ghongadi Online

AhilyaStore App

Recent Blog’s