Ghongadi Shop in Mumbai

मूंबई मध्ये उपलब्ध घोंगडी

काळी घोंगडी(जावळ)

  • आकार : ९*४ फूट
  • वजन : १ ते १.५ कि.लो च्या दरम्यान 
  • विणकाम : हातमाग
  • लोकर : जावळ
  • खळ : नाही
  • विनय सोमण : 96194 24506
    (माहिम, मूंबई – सोमवारी बंद)
  • राहुल वावरे : 95524 42057

पांढरी घोंगडी(जावळ)

  • आकार : ९*४ फूट
  • वजन : १ ते १.५ कि.लो च्या दरम्यान 
  • विणकाम : हातमाग
  • लोकर : जावळ
  • खळ : नाही
  • विनय सोमण : 96194 24506
    (माहिम, मूंबई – सोमवारी बंद)
  • राहुल वावरे : 95524 42057

घोंगडी व्यवसायातील फसवेगिरी

मशीनमेड घोंगडी, मोठ्या लोकरीची घोंगडी म्हणून विकली जाते

मशीनमेड घोंगडी मशीनवर तयार केली जाते ज्यामध्ये ७०% कॉटन व ३०% लोकरीचे सूत असते व खळीची घोंगडी हातमागावर तयार केली जाते ज्यामध्ये १००% लोकरीचे सूत असते.

मशीनमेड घोंगडीची किंमत ५०० रु. ते ७०० रु असते मात्र मशीनमेड घोंगडीला खळीची घोंगडी सांगून १००० रु ते १८०० रु. पर्यंत विक्री केली जाते. हातमागावर विणकाम करणाऱ्या कारगिरांची संख्या कमी होत असल्यामुळे जास्त प्रमाणात मशीनमेड घोंगडी बाजारात येत आहेत.

पानिपत घोंगडी, जावळाची घोंगडी म्हणून विकली जाते

पानिपत घोंगडी हरियाणा राज्यातील पानिपत या ठिकाणी तयार होत असून हि घोंगडी पण मशीनवर तयार केली जाते. यामध्ये ७०% कॉटन व ३०% लोकरीचे सूत असून दिसायला आकर्षक व मऊ असते. हि घोंगडी त्याठिकाणी शॉल म्ह्णून वापरतात मात्र महाराष्ट्रात हि घोंगडी जावळाची म्हणून विकली जाते.

पानिपत घोंगडीची किंमत ७०० रु. ते ९०० रु. असते मात्र पानिपत घोंगडीला जावळाची घोंगडी सांगून २००० रु. ते ४००० रु. पर्यंत विकले जाते. त्यामुळे घोंगडी खरेदी करताना व्यवस्थित चौकशी करून घ्यावी किंवा आम्हाला संपर्क करू शकता.

Original व Duplicat काळी व पांढरी घोंगडी ओळखायची कशी? हे जाणून घेण्यासाठी खालील Video नक्की पहा.
Original व Duplicat काळी घोंगडी ओळखायची कशी? हे जाणून घेण्यासाठी हा Video नक्की पहा.
Original व Duplicat पांढरी घोंगडी ओळखायची कशी? हे जाणून घेण्यासाठी हा Video नक्की पहा.

AhilyaStore Mumbai Contact’s

विनय सोमण
माहीम, मूंबई, 400016,
संपर्क – 96194 24506.

ग्रीषा नवेले
नेरुळ, नवी मुंबई, 400706,

संपर्क – 84259 10251.

घोंगडी बद्दल काही शंका असल्यास खालील नंबर ला संपर्क करा.
राहुल वावरे – 95524 42057


आमची काम करण्याची पद्धत

मुंबई येथे उपलब्ध असलेली घोंगडी हि सातारा जिल्हयातील फलटण, मान, खटाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील कारागिरांनी विणलेली आहेत तसेच काही घोंगड्या या कर्नाटकातील चलकरे येथे विणलेल्या आहेत. तरडगाव ता.फलटण जि.सातारा हे आमचे मुख्य मध्यवर्ती ठिकाण असून येथून संपूर्ण महाराष्ट्रासहित भारतभरात आम्ही Online पार्सल पाठवतो, तसेच मूंबईच्या आमच्या प्रतिनिधींनाही.

घोंगडीचे निरीक्षण करताना AhilyaStore चे राहुल वावरे

कारागिरांकडून घोंगडी जेव्हा तरडगांव येथे जमा केली जाते तेव्हा प्रथम घोंगडीचे निरीक्षण केले जाते. त्यांनतर दुसऱ्या दिवशी सर्व घोंगडी पुन्हा उन्हात वाळत घालून दुसऱ्यांदा बारकाईने निरीक्षण केले जाते आणि जेव्हा घोंगडी पार्सल मध्ये पॅक केली जाते तेव्हा एकदा निरीक्षण केले जाते. अशा प्रकारे एका घोंगडीचे तीन वेळा निरीक्षण केले जाते.

आमची काम करण्याची पद्धत

Online Order केल्यांनतर ग्राहकांना घोंगडी भेटल्यावर ती जर काही करणावास्तव Depictive निघाली तर आपण त्यांना घोंगडी Replacement देतो मात्र जेव्हा ग्राहक प्रत्यक्षात येऊन घेतात आणि जर घोंगडी Depictive निघाली तर तेव्हा काही गोष्टींची पूर्तता केल्यानंतर आपण Replacement देतो. आमची घोंगडी १००% लोकरीची असून हातमागावर विणलेली आहे.

काळी, पांढरी, करडी अशा रंगाची व ८×४,९×४, १०×४ या आकाराची आणि जावळाची व मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीची(पारंपारिक) घोंगडी तुम्ही Online घेऊ शकता किंवा प्रत्यक्षात सध्या मूंबई येथे ९×४ आकाराची जावळाची काळी व पांढरी घोंगडी घेऊ शकता. 

AhilyaStore ची घोंगडी का वापरावी?

  • १००% लोकरीचा वापर
  • सर्व घोंगडी हातमागावर बनवलेल्या 
  • उच्च दर्जाच्या लोकरीचा वापर 
  • २४*७ तास Customer Support  
  • Cash On Delivery सेवा उपलब्ध
  • Online Order उपलब्ध
  • Free Home Delivery
  • Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो 
  • Refund and Return Policy

घोंगडीचे फायदे

घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे

  • पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. 
  • उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
  • कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
  • घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.
  • अर्धांगवायूचा धोका टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
  • घोंगडीला थोडासा स्वतःचा सुगंध असतो त्यामुळे दमा व पित्ताशयाचा त्रास दूर होतो.
  • सविस्तर वाचा – आरोग्यविषयक घोंगडीचे फायदे

घोंगडीचे धार्मिक फायदे

  • सर्व धर्म ग्रंथात घोंगडीला अन्य साधारण महत्व आहे.
  • घोंगडीवर केलेली पूजा व ध्यान साधना आत्मसात होतात.
  • सर्व प्रकारचे पारायण वाचन करण्यासाठी घोंगडी वापरतात.
  • महालक्ष्मी पूजनासाठी घोंगडी वापरतात.
  • देवाची तळी उचलण्यासाठी व जागरण गोंधळासाठी घोंगडी आवश्यक असते.   
  • पितृदोष असणाऱ्यांनी घोंगडी दान करावे. घोंगडी दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे.
  • योगसाधना व अध्यात्मिक पारायण करण्यासाठी.
  • डोहाळे कार्यक्रमातील देव पूजेसाठी.

घोंगडीचे इतर फायदे

  • उन्हाळ्यात थंडावा देते.
  • घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत
  • झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.

About AhilyaStore’s Ghongadi

आमच्या येथील घोंगडी बद्दल थोडक्यात सांगायचे म्हटले तर AhilyaStore जेवढ्याही घोंगडी आहेत त्या सर्व हातमागावरील घोंगडी उपलब्ध आहेत. काही जणांना हा प्रश्न पडला असेल कि हे हातमाग काय असते? तर  घोंगडीच्या विणकामावरून तिचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, एक म्हणजे हातमागावर तयार केलेली घोंगडी व दुसरी मशीनवर तयार केलेली घोंगडी. बहुतेक लोकांना हि गोष्ट माहित नसते.  

हातमागाची घोंगडी म्हणजे Original घोंगडी. पूर्वीच्या काळी सर्व घोंगडी या कारागिरांच्या मार्फत हातमागावर तयार केल्या जात. त्या तयार होण्यासाठी ५ ते ७ दिवस लागत असे. कालांतराने कारागिरांची संख्या कमी झाली त्यामुळे बाजारात हातमागावरील घोंगडीची जागा मशीनवरील घोंगडीने घेतली. आज बाजारात ९९% जी घोंगडी विकली जाते ती मशीनमेड घोंगडी असते.

मशीनमेड घोंगडी म्हणजे Duplicate घोंगडी. जी काही तासातच तयार होते व मशीनवर तयार केली जाते. ती दिसायला खूप आकर्षक असते व याच घोंगडीची किंमत ५०० ते ७०० पर्यत असते. या घोंगडीची किंमत एवढी कमी असण्याचे कारण म्हणजे हि घोंगडी डुप्लिकेट असते. यामध्ये ७० ते ८० टक्के कापसाचे किंवा नायलॉनचे   सूत मिक्स असते. हि घोंगडी तयार होण्यासाठी फक्त १०० ते १५० रु. खर्च येतो व हि घोंगडी कापसाचे किंवा नायलॉनचे सूत मिक्स केल्याशिवाय तयारच होत नाही त्यामुळे हि घोंगडी स्वस्तात विकली जाते.

मशीनमेड घोंगडी हि हातमागावरील घोंगडी पेक्षा आकर्षक दिसायला असते, त्यामुळे ती Duplicate असून सुद्धा लोकांना ओरिजनल वाटते. म्हणून ग्राहकांची आजच्या काळात मोठया प्रमाणत फसवुनूक होत आहे. पंढरपूर, जेजुरी, अदमापूर, आरेवाडी, पठ्ठनकोडोली, मायाक्का चिंचणी, माळेगाव किंवा मुंबई, पुण्यातील ग्राहक बाजारात हि मशीनमेड घोंगडीच विकली जाते व लोकांना याबद्दल माहित नसल्या कारणाने त्यांची नकळत फसवणूक होते किंवा केली जाते.

दुसऱ्या बाजूला हातमागावरील घोंगडी तयार होण्यासाठी ५ ते ७ दिवस लागतात. त्यासाठी कारागीर खूप कष्ट घेतो आणि यामध्ये पूर्णपणे लोकरीचा वापर केला जातो. त्यामुळे या घोंगडीत वापरलेले मटेरियल म्हणजेच लोकर, ती तयार होण्यासाठी लागलेला वेळ, कष्ट हे सर्व विचारत घेऊन त्यांची किमत ठरते. मोठ्या लोकरीची घोंगडी २००० पासून २५०० पर्यत मिळते तर जावळाची घोंगडी २५०० पासून ३००० रु. पर्यत मिळते.

हातमागावरील घोंगडी हि मशीनमेड घोंगडीच्या प्रमाणात दिसायला जरी आकर्षक नसेल पण आरोग्यविषयक, धार्मिक व अन्य फायदे हे फक्त हातमागावरील घोंगडीमुळेच मिळतात. तर कधी हि, कुठून हि घोंगडी खरेदी कराल तर घोंगडी हातमागावरील आहे का? मशीनमेड? असा प्रश्न करायला विसरू नका. जे प्रामाणिक आहेत ते खरं सांगतील व काही जण लबाडी करतील. AhilyaStore येथे सर्व हातमागावरील घोंगडी उपलब्ध आहेत.

Our Handicraft Collections

Buy Ghongadi Online

Recent Blog’s


Get AhilyaStore App

AhilyaStore Mumbai Address

AhilyaStore, Mahim
Bombay Bedding Works
Shop Number 1, Sahayog CHS Near City Light Cinema,
Lady Jamshedji Rd, Mahim(W), 400016.


AhilyaStore, Byculla
Kach Building, D.P. Wadi, Ghodapdev,
Byculla, Mumbai – 400033.