Buy Online Ghongadi Woollen Blanket


आमच्या घोंगडी बद्दल थोडक्यात माहिती नक्की जाणून घ्या.

AhilyaStore ची घोंगडी का वापरावी?

  • १००% लोकरीचा वापर
  • सर्व घोंगडी हातमागावर बनवलेल्या 
  • उच्च दर्जाच्या लोकरीचा वापर 
  • २४*७ तास Customer Support  
  • Cash On Delivery सेवा उपलब्ध
  • Online Order उपलब्ध
  • Free Home Delivery
  • Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो 
  • Refund and Return Policy

आमची काम करण्याची पद्धत

घोंगडीच्या गुणवत्तेविषयी

आमच्या येथे उपलब्ध असलेली घोंगडी हि सातारा जिल्हयातील फलटण, मान, खटाव या तालुक्यातील कारागिरांनी विणलेली आहे तसेच काही घोंगड्या या कर्नाटकातील चलकरे येथे विणलेल्या आहेत. तरडगाव ता.फलटण जि.सातारा हे आमचे मुख्य मध्यवर्ती ठिकाण असून येथून संपूर्ण महाराष्ट्रासहित भारतभरात आम्ही Online पार्सल पाठवतो.

कारागिरांकडून घोंगडी जेव्हा आमच्या येथे जमा केली जाते तेव्हा प्रथम घोंगडीचे निरीक्षण केले जाते. त्यांनतर दुसऱ्या दिवशी सर्व घोंगडी पुन्हा उन्हात वाळत घालून दुसऱ्यांदा बारकाईने निरीक्षण केले जाते आणि जेव्हा घोंगडी पार्सल मध्ये पॅक केली जाते तेव्हा एकदा निरीक्षण केले जाते. अशा प्रकारे एका घोंगडीचे तीन वेळा निरीक्षण केले जाते. 

घोंगडीचे निरीक्षण करताना AhilyaStore चे राहुल वावरे

ग्राहकांना घोंगडी भेटल्यावर ती जर काही करणावास्तव Depictive निघाली तर आपण त्यांना घोंगडी Replacement देतो. आमच्या Return and Replacement Policy बद्दल अधिक वाचा. आमची घोंगडी पूर्णपणे लोकरीची असून हातमागावर विणलेली आहे. काळी, पांढरी, करडी अशा रंगाची व ९*४,१०*४ या आकाराची आणि जावळाची व मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीची(पारंपारिक) घोंगडी तुम्ही घेऊ शकता.   

घोंगडी कशी खरेदी करू शकता?

तुम्ही तीन प्रकारे घोंगडी खरेदी करू शकता. 

  • COD – Cash On Delivery करू शकता,
  • 8999143074 या नंबर वर Google Pay करू शकता, किंवा
  • Website वरून तुम्ही खरेदी करू शकता. 

तुमच्याकडून एकदा Order Confirm झाल्यांनतर दुसऱ्या दिवशी Order Dispatch होते. आमच्या सर्व Order या Indian Post द्वारे पाठवल्या जातात. Indian Post मार्फत Order पाठवल्यानंतर त्याच दिवशी Parcel चा Tracking Code व बिल तुमच्या WhatsApp किंवा Email वर पाठवले जाते.

Order Confirm झाल्यांनतरची Process

Download App:

घोंगडीचे फायदे

घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे

  • पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. 
  • उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
  • कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
  • घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.
  • अर्धांगवायूचा धोका टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
  • घोंगडीला थोडासा स्वतःचा सुगंध असतो त्यामुळे दमा व पित्ताशयाचा त्रास दूर होतो.
  • सविस्तर वाचा – आरोग्यविषयक घोंगडीचे फायदे
घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे पहा

घोंगडीचे धार्मिक फायदे

  • सर्व धर्म ग्रंथात घोंगडीला अन्य साधारण महत्व आहे.
  • घोंगडीवर केलेली पूजा व ध्यान साधना आत्मसात होतात.
  • सर्व प्रकारचे पारायण वाचन करण्यासाठी घोंगडी वापरतात.
  • महालक्ष्मी पूजनासाठी घोंगडी वापरतात.
  • देवाची तळी उचलण्यासाठी व जागरण गोंधळासाठी घोंगडी आवश्यक असते.   
  • पितृदोष असणाऱ्यांनी घोंगडी दान करावे. घोंगडी दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे.
  • योगसाधना व अध्यात्मिक पारायण करण्यासाठी.
  • डोहाळे कार्यक्रमातील देव पूजेसाठी.
घोंगडीचे धार्मिक फायदे व महत्व पहा

घोंगडीचे इतर फायदे

  • उन्हाळ्यात थंडावा देते.
  • घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत
  • झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.

Customer Reviews

279434548_500955125044506_6247880466696581651_n
279898881_504426191364066_6235754392115887977_n
295227574_556726756134009_3864457259330903690_n
297413153_564573762015975_7538124821782192803_n
299285431_573297047810313_7096711410820839608_n
300785986_576202377519780_2877199600711449268_n
302246759_584783329995018_7524037320312012561_n
304807291_595992958874055_2517219860516028964_n
308106383_602344184905599_5558536783450272162_n (1)
Review with foto 1 (2) (1)
Review with foto 1 (1) (1)
ravi nimbalkar
amol kankanalwar
vivek vairale
previous arrow
next arrow

घोंगडी वापरण्याविषयी काय केले पाहिजे व काय टाळले पाहिजे त्याविषयी थोडक्यात,

हे करू नका

  • घोंगडी साबण लावून धुऊ नका. 
  • घोंगडी निरम्याच्या पाण्यात भिजत घालू नका.
  • घोंगडी आपटून धुऊ नका. 
  • घोंगडी पिळून धुऊ नका.
  • घोंगडी ब्रशने धुऊ नका. 
  • घोंगडी वॉशमशीन मध्ये धुऊ नका.
  • घोंगडी क्षारयुक्त पाण्यात भिजत ठेऊ नका.    
  • घोंगडी जास्तकाळ कोंदट वातावरणात ठेऊ नका.

हे करा

  • घोंगडी गोड्या पाण्यात भिजऊन उन्हात वाळत घाला. किंवा 
  • पाण्यात न भिजवता उन्हात वाळत घालणे केव्हाही योग्यच.
  • ज्या ठिकाणी हवा खेळती असते अशा ठिकाणी घोंगडी रोज ठेवा.

टिप : दर २० ते २५ दिवसांनी घोंगडी उन्हात वाळत घालणे योग्य ठरते.

घोंगडी तयार कशी होते?

आज आधुनिकीकरणामूळे बहुतेकजणांना धनगरी घोंगडी काय असते हेच कदाचित माहित नसावे व ती कशी तयार होते हे हि माहित नसावे. शिवकाळापासून आजपर्यत आवडीनं वापरलं जाणार पारंपरिक उत्पादन म्हणजे घोंगडी. घोंगडी तयार करते वेळी दोन गोष्टी महत्वाच्या असतात,

१. लोकरीचे सूत किंवा धागा तयार करणे,
२. तयार लोकरीच्या सुतापासून घोंगडी तयार करणे.

१. लोकरीचे सूत किंवा धागा तयार करणे

मेंढ्या धुणे –
घोंगडी तयार करण्याआधी सर्वात पहिली पायरी म्हणजे मेंढ्या धुणे. मेंढपाळ एक-एक मेंढी न धुता, गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतो. मेंढ्या धुतल्यामुळे त्यांच्या लोकरीमधून काटे-कुटे व चिखल साफ होतो त्यामुळे लोकर कात्रण सहज व सोपी होते. लोकर म्हणजे मेंढ्यांची केस.

तलाव्यात मेंढ्या धुताना मेंढपाळ

लोकर कात्रणे –
मेंढ्यांना स्वच्छ धुतल्यानंतर स्वच्छ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. लोकर कात्रणे म्हणजे मेंढ्याची केस कापणे होय. पूर्वी इरसाल पद्धतीने हि मेंढ्याची लोकर कात्रण होत असे. काळ्या, पांढऱ्या आणि करड्या रंगावरून व लहान आणि मोठ्या मेंढ्यांच्या लोकरीवरून वर्गीकरण केले जाते.

लोकर पिंजने –
लोकर कात्रण झाले की त्यांनतरचा टप्पा म्हणजे लोकर पिंजने. लोकर पिंजने म्हणजे लोकर व्यवस्थित स्वच्छ करणे. लोकरमधील उर्वरित काटे व घाण बाजूला करणे, तसेच स्वच्छ केलेल्या लोकरीचा विणकरी सहज धागा बनऊ शकतो अशा प्रकारे लोकर स्वच्छ केली जाते. लोकर पिंजल्यानंतर त्याचे उत्तम दर्जाचे लोकरीचे गोळे तयार होतात व ते पुढे कातण्यासाठी पाठवतात.

पारंपारिक कमान व भिंगरी साहित्य
Thanks, asiainch

लोकर हातानं पिंजताना ज्या अवजराचा वापर करतात त्याला “कमान” म्हणतात. ते दिसायला धनुष्यबाणासारखे असते. सध्या काही ठिकाणी लोकर पिंजण्यासाठी मशीनचा वापर करतात. पूर्वीच्या काळी लोकर फक्त कमानच्या साहाय्याने पिंजली जात असे.

कमानच्या साहाय्याने लोकर पिंजतना

लोकरीचे सूत कातणे –
लोकरीचे सूत कातणे म्हणजे स्वच्छ केलेल्या लोकरीचा धागा बनवणे. पूर्वी लोकर पिंजून झाले कि हाताने भिंगरीच्या साह्याय्ययने लोकरीपासून सूत कातलं जात होते. घरी असलेल्या महिला भिंगरीने सूत कातत असत किंवा मेंढ्या जेव्हा शांत चरत असत तेव्हा मेंढपाळ हि भिंगरीच्या साहाय्याने सूत कातत असत.

हाताने सूत काताना(भिंगरीच्या साहाय्याने)
हाताने सूत काताना(भिंगरीच्या साहाय्याने)
मेंढ्या चारताना भिंगरीच्या साहाय्याने सूत काताना
भिंगरीच्या साहाय्याने सूत काताना
Thanks, thecolorcaravan

कालांतराने भारताच्या स्वतंत्र्य लढाईतील स्वदेशी मोहिमेच्या दरम्यान भिंगरीची जागा हि चरख्यांन घेतली. मोठ्या प्रमाणात लोकरीचे सूत हे चरख्यावर कातले जाऊ लागले व त्यामुळे सूत कातण्याच्या पद्धतीला गती प्राप्त झाली. चरख्याला “राहाट” हि म्हटलं जात. पूर्वी चरक्यावर किंवा भिंगरीच्या साहाय्याने सूत कातण्याचे काम करताना स्त्रिया ओव्या म्हणत असत.

चरख्याच्या साहाय्याने सूत काताना
चरख्याच्या साहाय्याने सूत काताना

सूत कातत असताना त्याच्या गुंड्या बनवल्या जातात. त्या गुंड्याना “कुकडं” म्हटले जाते. लोकरीचा धागा हा बारीक, मध्यम व मोठा तयार केला जातो मात्र बहुतेक करून धागा हा मध्यम किंवा मोठा तयार केला जातो. यानंतर या लोकरीच्या धाग्याचा ‘ताणा काढला’ जातो.

लोकरीच्या धाग्याच्या अशा गुंड्या(कुकडं) बनविल्या जातात.
लोकरीच्या धाग्याच्या अशा गुंड्या(कुकडं) बनविल्या जातात.

खालील Video मध्ये बघा, लोकर पिंजून आल्यांनतर त्यापासून चरक्यावर सूत कसे कातले जाते.

लोकरीचे सूत कातणे

२. लोकरीच्या सुतापासून घोंगडी तयार करणे

लोकरीचा ताणा काढणे –
लोकरीचा ताणा काढणे म्हणजे लोकरीच्या सुताचे माप घेणे. लोकरीचे सूत कातून झाल्यांनतर घोंगडी बनवण्यासाठी जेवढे लोकरीचे सूत लागणार असते तेवढे सूत मोजणी यंत्रावर घेतले जाते, यालाच सुताचे माप घेणे किंवा लोकरीचा ताणा काढणे म्हणतात. हे माप घेण्याचे यंत्र पण लाकडाचे असते. त्याला “घोडा” म्हणतात.   त्यावेळेसच ८ फूट, ९ फूट, १० फूट, १२ फूट लांबीचे सूत बनले जाते.

लाकडी घोड्यावर लोकरीचा ताणा काढताना
लाकडी घोड्यावर लोकरीचा ताणा काढताना
लाकडी घोड्यावर लोकरीचा ताणा काढताना
लाकडी घोड्यावर लोकरीचा ताणा काढताना
लाकडी घोड्यावर लोकरीचा ताणा काढताना
लाकडी घोड्यावर लोकरीचा ताणा काढताना
लाकडी घोड्यावर लोकरीचा ताणा काढताना

पूर्वीच्या काळी लोकरीचा ताणा छोट्या यंत्रावर काढला जात असे त्याला “तानारी” म्हणतात. तानारी वर ताण काढण्याचे काम शक्यतो स्त्रिया ओवी म्हणत करत असत. नंतरने लाकडी “घोडा” चा वापर करून ताणा काढले जाऊ लागले. त्यामुळे कामाची गती वाढली. आजही काही ठिकाणी स्त्रिया तानारी वर लोकरीचा ताणा काढताना दिसतात.

तानारी वर लोकरीचा ताणा काढताना
तानारी वर लोकरीचा ताणा काढताना

चिंचोक्याची खळ बनवणे –
लोकरीचा ताण काढून झाला कि चिंचोक्यापासून खळ बनवली जाते. चिंचोक्यात वेगवेगळी रसायने असल्यामुळे व त्याचा लोकरीच्या सुतावर विपरीत परिणाम होत नसल्या कारणामुळे चिंचोक्यांची खळ वापरतात.

चिंचोक्याची खळ बनवणे म्हणजे चिंचोके रात्रभर पाण्यात भिजत ठेवले जाते. त्यांनतर दुसऱ्याशी ते बारीक कुटून त्यांचा लगदा तयार केला जातो. चिंचोके कुटून त्यांचा लगदा तयार करण्यासाठी उकल किंवा दगडी पाठचा वापर केला जातो. त्यांनतर काही ठिकाणी खळीमध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो.

लोकरीच्या सुताला खळ लावणे –
चिंचोक्याची खळ बनवून झाल्यांनतर ज्या सुताचे माप घेतलेले असते ते सूत लाकडी सांगड्यावर अंथरले जाते व त्याला खळ लावली जाते. या लाकडी सांगाड्यांना “पांजणी” म्हटलं जात व खळ लावण्यासाठी कात्याचे ब्रश बनवलेले असतात, त्याला “कुंची” म्हटलं जात. या प्रक्रियेला “पांजण” लावणे म्हणतात व हि प्रक्रिया उन्हात केली जाते व त्यांनतर खळ लावलेले लोकरी सूत वाळायला ठेवले जाते.

कुंची‘ च्या साहाय्याने खळ लावताना कारागीर
पांजणी वर खळ(पांजण) लावताना

घोंगडीला बुरशी लागू नये, वर्षानुवर्षे ती टिकून राहावी, सुताला चांगला पीळ व मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी काही ठिकाणी लोकरीच सूत रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमध्ये भिजत ठेवलं जातं तर काही ठिकाणी हि प्रक्रिया केली जात नाही.

पांजणी वर खळ(पांजण) लावताना
पांजणी वर खळ(पांजण) लावताना

लोकर मागावर लावणे –
खळ लावलेले लोकरी सूत वाळून तयार झाल्यांनतर लोकर मागावर घेतली जाते. लोकर मागावर घेणे म्हणजे वाळलेले कडक सूत हातमागावर अंथरले जाते. हातमागाच्या एका बाजूला खड्डा केला जातो. त्या खड्ड्यामध्ये उभे राहून विणेकरी लोकर मागावर घेतं असतो. ठरलेले घोंगडीचे माप लांबी आणि रुंदीच्या प्रमाणे सर्व सूत प्रथमता हातमागावर समप्रमाणात जुळवून घेतो.

घोंगडी विणणे –
हातमागावर सर्व लोकर अंथरून झाल्यावर किंवा लावून झाल्यावर विणकारी घोंगडी विनायला सुरुवात करतो. जर घोंगडी जावळाची असेल तर घोंगडी विणताना विणेकरी घोंगडीच्या एका बाजूला पिवळा किंवा पांढरा धागा लावून घोंगडी विनायला सुरुवात करतो आणि जर घोंगडी ठाचणीची किंवा मळणीची असेल तर घोंगडी विणताना विणेकरी घोंगडीच्या दोन्ही बाजूला पिवळा किंवा पांढरा धागा लावून घोंगडी विनायला सुरुवात करतो.

घोंगडीचा सर्व ताण या धाग्यावर काढला जातो व या धाग्यांना समरूप मानून विणेकरी लय साधत घोंगडी विणतो. घोंगडी योग्यरीत्या विणायला २४ तास ते ४८ तास लागतात. यानंतर घोंगडी काही तास उन्हात वाळवून विक्रीस तयार होते.

पहिल्या प्रक्रियेपासून ते शेवटच्या प्रक्रियेपर्यंत घोंगडी तयार होण्यासाठी ८ ते १० दिवस लागतात, कधी कधी ही दिवसांची संख्या वाढू पण शकते. एक घोंगडी तयार करण्यासाठी साधारणता ३ ते ४ किलो लोकर आणि २ ते ३ किलो चिंचोके लागतात. आजच्या घडीला लोकांच्या मागणीनुसार हवी अशी घोंगडी बनवून दिली जाते.

लोकरीचा ताण काढणे ते घोंगडी कशी बनते, ते या Video मधून पहा.

मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्‍याचदा आपल्या पडत असतील तर तर त्याचे उत्तर म्हणजे…  मानवी जीवनात घोंगडी हि एक औषधी आहे. त्यामुळे नक्की घोंगडी वापरा व आपल्या धनगरी घोंगडीचे दुर्मीळ फायदे वर दिलेलेच आहेत.

घोंगडीचे प्रकार

लोकांना हवी हवीशी वाटणारी काळीभोर घोंगडी हि धनगरी घोंगडी नावाने पण ओळखली जाते तर काही लोक घोंगडीला कांबळा, कांबळी असे हि म्हणतात मात्र वास्तविक घोंगडी व कांबळा मध्ये वापरण्यावरून फरक आहे. दोन्ही वस्त्रे मेंढ्यांच्या लोकरी पासूनच बनलेली असतात, फक्त महंत किवा देवाचे पुजारी जी घोंगडी वापरतात त्यालाच कांबळ किंवा कांबळी म्हणतात. त्यावर पांढऱ्या रेघा असतात. अडीच रेघी किंवा दिड रेघी ज्या घोंगडी असतात त्याच कांबळी घोंगडी होय. कांबळी घोंगडी हि जावळाच्या लोकरीची आणि शक्यतो करून काळया रंगाची व त्यावर पांढऱ्या रेघा असतात.

अडीच रेघी कांबळी घोंगडी खांद्यावर घेऊन श्री.नानादेव फरांडेबाबा. ते विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टणकोडोली(कोल्हापूर) चे प्रमुख मानकरी आहेत.

अडीच रेघांमध्ये दोन सम आकाराच्या मोठ्या रेघा असतात तर तिसरी त्यापेक्षा लहान असते म्हणून ती अडीच रेघी कांबळा घोंगडी. वरील फोटोत महाराजांनी अडीच रेघी घोंगडी वापरली आहे. तर दिड रेघा मध्ये एक रेघ मोठी असते व दुसरी लहान म्हणून ती दिड रेघी कांबला घोंगडी. साधक आपापल्या हुद्दयाप्रमाणे या घोंगडी परिधान करतात.

अशा प्रकारे काळ्या घोंगडीवर पांढऱ्या रेघा असतात. यावरून प्रकार ठरतात.

कांबळीचा ध्वज हि वापरला जातो. काठी कांबळीच्या नावानं चांगभलं असे हि म्हटलं जात आणि सर्वसामान्य लोक जे वापरता त्याला घोंगडी म्हणतात. अडीच रेघी किंवा दिड रेघी कांबळाची घोंगडी सर्वसामान्य लोकांना वापरायला परवानगी नसते.

पंढरीच्या विठुरायाच्या खांद्यावरील घोंगडी

पंढरीच्या पांडुरंगाच्या खांद्यावर, भगवान श्रीकृष्णाच्या खांद्यावर, दत्तप्रभूंच्या खांद्यावर, नवनाथांच्या अंगाखांद्यावर, खंडोबा, खेलोबा, बिरोबा, सिद्धनाथ, महालिंगराया, विठ्ठल बिरदेवाच्या खांद्यावर देखील घोंगडी असून दोन रेघी, अडीच रेघी, तीन रेघी, साडेतीन रेघी घोंगड्या वापरण्याची पद्धत व परंपरा समाजात गुरु शिष्याच्या नात्यामध्ये दिसून येते.

जेजुरीच्या खंडेरायाच्या खांद्यावरील घोंगडी.

घोंगडी निर्मितीचा इतिहास प्राचीन असून रामायण, महाभारता पासून ज्ञानोबा, तुकोबाराय ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत हि घोंगडीचे उल्लेख मिळतात. घोंगडीबद्दल ज्यांना माहिती आहे ते नेहमीच घोंगडीचा वापर करतात मात्र काही लोक वेगवेगळ्या कारणांसाठी घोंगडी वापरण्याचा विचार करून घोंगडी खरेदी करतात. घोंगडीमध्ये वेगवेगळे आकार असून पांढरा, काळा व करडी असे रंग असतात.

घरातील घोंगडीवरील लक्ष्मीपूजन

काही लोक घोंगडीचा घरगुती दैनंदिन वापरासाठी किंवा पूजापाठ करण्यासाठी वापर करतात. दऱ्याखोऱ्यात रानोमाळ मेंढर राखणारे मेंढपाळ ऊन वारा पावसापासून बचावाकरिता नेहमीच घोंगडीचा वापर करीत असतात.

देवाच्या मूर्तीच्या खांद्यावर देण्यासाठी घोंगडी हवी असेल तर 8999143074 ला संपर्क करा.

मुसळधार पावसात मळणीच्या घोंगडीचे उभे घोंगटे करून मेंढपाळ बांधव अथवा जंगलात राहणारे बांधव आपला बचाव करतात. नौसर्गिक उब मिळत असल्याने प्रत्येकाच्या घरात घोंगडी बघायला मिळतेच.

मळणीच्या घोंगडीचे उभे घोंगटे केलेले खिरविरे येथील बांधव.
खिरविरे(राहुरी) येथील Ravindra Dagale यांनी घेतलेला फोटो.

साधारणता हातमागावरील घोंगडीचे मुख्य प्रकार हे तिच्या लोकरीवरून, रंगावरून, विणकामावरून, धाग्याचा आकार व गावावरुन पडतात.

लोकरीवरून घोंगडीचे प्रकार खालीलप्रमाणे

जावळाची घोंगडी

मेंढरांच्या कोकराच्या पहिल्या कातरणीपासून मिळणाऱ्या लोकरीस जावळ किंवा बाळ लोकर म्हणतात. या जावळाच्या लोकरीपासून तयार होणाऱ्या घोंगडीस “जावळाची घोंगडी” म्हटले जाते. काही ठिकाणी या घोंगडीस “बाळ-लोकरीची” घोंगडी म्हणून हि ओळखले जाते. कोवळी लोकर असल्यामुळे हि घोंगडी मऊ असते, कमी टोचली जाते व हलकी असते.

या घोंगडीचा वापर अंथरन्यासाठी व पांघरण्यासाठी होतो व तसेच धार्मिक विधीसाठी आणि देवाच्या मूर्तीच्या खांद्यावर देण्यासाठी हीच घोंगडी वापरली जाते. हि घोंगडी तयार करण्यासाठी सात ते आठ दिवस लागतात व मेहनत हि जास्त लागते तसेच जवळाची लोकर मर्यादित असल्यामुळे घोंगडी हि मर्यादित तयार होते त्यामुळे या घोंगडीची किंमत सर्वात जास्त असते.

हि फक्त हातमागावर तयार केली जाते व या प्रकारच्या घोंगड्या प्रामुख्याने बाजारात विक्रीस उपलब्ध असतात. जावळाच्या घोंगडीत काळा, पांढरा व करडा हे तीन रंग बघायला मिळतात. करड्या रंगाची जवळाची घोंगडी धार्मिक विधीमध्ये वापरत नाहीत, तसेच यामध्ये वेगवेगळ्या नक्षी तयार केल्या जातात. कोकरू म्हणजे मेंढ्याची लहान पिल्ल व लोकर म्हणजे मेंढ्यांची केस.

पारंपारिक(मोठ्या लोकरीची), खळीची व मळणीची घोंगडी

पारंपारिक किंवा मोठ्या लोकरीची घोंगडी म्हणजे मोठ्या मेंढयाच्या लोकरीपासून बनवलेली घोंगडी. तिला आपण पारंपारिक घोंगडी म्हणूनही ओळखतो. मोठ्या मेंढ्याची लोकर हि कडक असते, थोडी जास्त अंगाला टोचली जाते व कधी-कधी काही ठिकाणी रुतल्या सारखी वाटते, आणि वजनाने जास्त असते. काही ठिकाणी या घोंगडीला चिंचोक्याची खळ लावली जाते.

पारंपारिक करडी घोंगडी(खळ नाही)

खळीची घोंगडी तयार करताना चिंचोक्याच्या खळीचा कमी अधिक प्रमाणात वापर केला जातो. चिंचोक्याच्या खळीपासून तयार केलेल्या घोंगडीला खळीची घोंगडी म्हणतात. चिंचोक्याची खळ म्हणजे चिंचोके लाटून तयार केलेला चिकट लगदा किंवा चिकट द्रावण. या घोंगडीसाठी मोठ्या मेंढ्याच्या लोकरीचा वापर केला जातो.

हि घोंगडी कडक असते अगदी स्टार्चच्या कपड्यासारखी. काळ्या, पांढऱ्या, करड्या तसेच काळ्या पांढऱ्या एकत्रित लोकरीपासून खळीची घोंगडी तयार केली जाते. या घोंगडीचा वापर अंथरण्यासाठी तसेच घराबाहेरील कामे जसे मेंढ्यामागे, गुरे राखताना संरक्षण व्हावे म्हणून केला जातो. पारंपारिक घोंगडीचे वजन जावळाच्या घोंगडी पेक्षा जास्त असते.

पारंपारिक खळीची पांढरी घोंगडी

पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्याचे मावळे ते दरी-खोऱ्यात मेंढ्या राखणारे मेंढपाळ हे पारंपरिक खळीच्या घोंगडीचा वापर करत असत. घराबाहेर घोंगडी वापरताना ती उसवून फाटू नये म्हणून तिला रेवड किंवा रेवडी घालत असत.

रेवड म्हणजे घोंगडीच्या दशा वरून व खालून रेशमीच्या धाग्यामध्ये विणून घट करणे होय. कोणत्याही रंगाची पारंपारिक घोंगडी धार्मिक कार्यासाठी वापरत नाहीत. पारंपारिक घोंगडीला महाराष्ट्राचा काही भागात “धाबळी, धाबळ किंवा ढाबळी” असे म्हणतात. पूर्वी ठराविक लोकच रेवड घालण्याचे काम करायचे. मात्र आजच्या काळात अशा लोकांची संख्या खूपच कमी झाली आहे.

हातमागाच्या काळ्या घोंगडीला घातलेली रेवड

मळणीची घोंगडी म्हणजे खळीची घोंगडी नदीच्या कातळात खडडे बघून त्या खड्यात खळीची घोंगडी टाकून पायाने मळली जात म्हणून तिला मळणीची घोंगडी म्हणतात. पायाने खळीची घोंगडी मळली की तिची विन अजून घट्ट होऊन खळ मजबूत होत असतं. त्यामुळे फार कमी पाऊसाचे पाणी आत येण्याची शक्यता असते.

कोकणात शेती करताना मळणीची घोंगडी वापरली जात असे.

पूर्वी मळणीच्या घोंगडीचा वापर तळ कोकणात केला जात असे. भात लागवड व अन्य शेतीची कामे करताना या घोंगडीचा वापर सरास केला जात होता. काही ठिकाणी मळणीच्या घोंगडीला “फटकूर” हि म्हणतात. बहुतेक करून कोल्हापूर भागात. घोंगडीचे उभे घोंगटे करून पावसात हिच घोंगडी वापरली जात असे. आजच्या घडीला हि घोंगडी नामशेष झाली आहे.

पूर्वी पारंपारिक व मळणीच्या घोंगडीला रेवड घातली जात असत तसेच जर जावळाची घोंगडी धार्मिक विधींसाठी वापरली जात नसेल तर तिला हि रेवड घातली जात असत.

वरील सर्व घोंगड्या पारंपरिक पद्धतीनं हातमागावर विणकाम करून तयार केल्या जातात. मात्र वेळेनुसार हा पारंपरिक हातमागावर घोंगड्या बनवणाऱ्या कारागिरांची संख्या कमी होत गेली व मशीनवर तयार केलेल्या घोंगड्या बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या व येत आहेत. मशीनवर तयार केलेली घोंगडी म्हणजे Duplicate घोंगडी, ज्यामध्ये कॉटन मिक्स असते म्हणजे कापसाचे सूत मिसळलेले असते. AhilyaStore.com वर फक्त हातमागावरील घोंगड्या उपलब्ध असतात. याची आम्ही १००% खात्री देत आहोत.           

रंगावरून घोंगडीचे प्रकार खालीलप्रमाणे

काळी, पांढरी, करडी घोंगडी

रंगावरून घोंगडीचे काळी, पांढरी आणि करडी असे प्रकार पडतात. करडी घोंगडीमध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाचा उपयोग करून वेगवेगळ्या रंगाच्या छटा असलेल्या घोंगड्या बनवतात, त्यांना काही ठिकाणी कोंडाळ घोंगडी असे म्हटले जाते. हे सर्व रंग जावळाच्या घोंगडीत व मोठ्या लोकरीच्या घोंगडीत बघायला मिळतात.

विणकाम व धाग्यावरून घोंगडीचे प्रकार खालीलप्रमाणे

सिंगल व डबल वीण घोंगडी

घोंगडीच्या विणकामारून घोंगडीचे सिंगल वीण व डबल वीण घोंगडी असे प्रकार पडतात. सिंगल वीण मध्ये घोंगडी आडवी व उभी एकदाच विणलेली असते व डबल विनमध्ये घोंगडी आडवी व उभी दोन वेळा विणलेली असते, त्यामुळे तिचे विणकाम दाट दिसते. हे दोन्ही विण जावळाच्या व मोठ्या लोकरीच्या घोंगडीत बघायला मिळते.

जावळाच्या लोकरीचा व मोठ्या लोकरीच्या धाग्याचे लहान, माध्यम व मोठा धागा असे प्रकार पडतात. पूर्वी हातमागावरील सर्व घोंगड्या मोठ्या धाग्याच्या असायच्या. आता बहुतेककरून हातमागावरील सर्व घोंगडी माध्यम धाग्याच्या असून लहान धाग्याचा वापर शक्यतो करून देवाच्या मूर्तीच्या खांद्यावर देण्यासाठी जी घोंगडी तयार केली जाते, त्यामध्ये केला जातो.

सन १९८६ साली जर्मन संशोधक गुंथर सोन्थायमर यांनी मेंढपाळांच्या जीवनावरील चित्रित केलेला लघूपट नक्की पहा.

गावावरून घोंगडीचे प्रकार खालीलप्रमाणे

कोल्हापुरी, माणदेशी घोंगडी

गावरून घोंगडीचे चलकरेची घोंगडी, कोल्हापूरची घोंगडी, पट्टणकोडोलीची घोंगडी, अदमापूरची घोंगडी, माणदेशची घोंगडी असे अनेक प्रकार पडतात. भारतामध्ये सर्वात प्रसिद्ध म्हणून कर्नाटकातील चलकरेची घोंगडी ओळखली जाते. आम्ही माणदेशात येतो मात्र सर्व ठिकाणच्या प्रसिद्ध घोंगड्या आपल्या AhilyaStore वर उपलब्ध आहेत.

पट्टणकोडोली

घोंगडीचे इतर प्रकार खालीलप्रमाणे

दिड व अडीज रेघी घोंगडी

घोंगडीवर असलेल्या रेघेवरून घोंगडीचे दीड रेघी, अडीज रेघी घोंगडी असे प्रकार पडतात. हि घोंगडी म्हणजे कांबळा घोंगडी किंवा कांबळी घोंगडी असते व याचा वापर धर्मगुरु, महंत, साधू संन्यासी लोक वापरताना दिसतात. या प्रकारची घोंगडी तयार करताना जावळाच्या लोकरीचा वापर करतात.

अशा प्रकारे काळ्या घोंगडीवर पांढऱ्या रेघा असतात. यावरून प्रकार ठरतात.

हातमाग व मशीनमेड घोंगडी

हातमाग घोंगडी म्हणजे Original घोंगडी. जी कारागीरांमार्फत हातमागावर पारंपारिक पद्धतीने बनवली जाते. हि घोंगडी तयार होण्यासाठी सात ते आठ दिवस लागतात व या मध्ये १००% लोकरीचे वापर केलेला असतो. वर दिलेले सर्व  प्रकार हातमाग घोंगडीचे आहेत. AhilyaStore.com वर सर्व हातमाग घोंगडी उपलब्ध आहेत. खालील Video मध्ये हातमागांची घोंगडी कशी तयार केली जाते हे पाहू शकता.

हातमाग घोंगडी(Original) तयार करताना कारागीर

मशीनमेड घोंगडी म्हणजे Duplicate घोंगडी, जी मशीन वर तयार केली जाते. या घोंगडीमध्ये ७०% ते ८०% कापसाचे सूत मिक्स असते. कारागिरांच्या घटत्या संख्येमुळे हा प्रकार गेली पाच-सहा वर्षांपासून बाजारात आला आहे. हि घोंगडी दिसायला खूप आकर्षित असते. या घोंगडीचे सर्व प्रकार खालील भागात फोटोसहित दिलेले आहेत तसेच खालील Video मध्ये मशीनमेड घोंगडी कशी तयार केली जाते हे पाहू शकता.

मशीनमेड घोंगडी(Duplicate) तयार करताना

Original व Duplicate घोंगडी ओळखायची कशी?

आजच्या काळात बाजारात ९९% घोंगड्या या मशीनमेड म्हणजेच Duplicate घोंगड्या उपलब्ध आहेत. पंढरपूर, अदमापूर, जेजुरी पासून ते मुंबई, पुणे शहरातील बाजारात किंवा कृषी प्रदर्शनात मशीनमेड घोंगडीच विकली जाते. १% प्रमाणातच हातमागावरील म्हणजे Original घोंगडी तयार केली जाते. मशीनमेड घोंगडीमध्ये कापसाचे सूत किंवा नायलॉनचा धागा ८०% मिसळलेला आसते व हातमागावरील घोंगडी पूर्णपणे लोकरी पासून तयार केलेली असते. या दोन्ही घोंगडी ओळखायचे तीन पद्धती आहेत. ते खालीलप्रमाणे,

घोंगडीची ब्रॉडर पहाणे, हि पद्धत शक्यतो काळ्या रंगाच्या घोंगडीस लागू होते. मशीनमेड घोंगडीला खूप प्रमाणात बॉर्डर असतात. लाल, पिवळा, हिरवा, जांभळ्या रंगाच्या बार्डेर पहावयास मिळतात. त्यामानाने हातमाग घोंगडीला बार्डेर खूपच कमी असतात. मात्र हा मार्ग कायमस्वरूपी लागू होऊ शकत नाही कारण भविष्यात मशीनमेड काळ्या घोंगडीच्या बॉर्डर कमी होऊ शकतात.

घोंगडीची ब्रॉडर पहाणे

घोंगडीच्या दशा पहाणे, हि पद्धत काळ्या, पांढऱ्या व करड्या रंगाच्या सर्व घोंगडीस लागू होते. मशीनमेड घोंगडीच्या दशा लहान व मोकळ्या सुटलेल्या असतात तर हातमागा घोंगडीच्या दशा मोठ्या असतात व त्या कडी किंवा साखळी पध्द्तीने विणलेल्या असतात. सध्या तरी मशीनमेड घोंगडीच्या दशा या दोन पध्द्तीने विणल्या जात नाहीत. 

मशीनमेड व हातमाग पांढरी घोंगडी(साखळी पध्द्तीने विणलेल्या दशा)
मशीनमेड व हातमाग काळी घोंगडी(साखळी पध्द्तीने विणलेल्या दशा)
मशीनमेड व हातमाग पांढरी घोंगडी(कडी पध्द्तीने विणलेल्या दशा)
मशीनमेड व हातमाग काळी घोंगडी(कडी पध्द्तीने विणलेल्या दशा)
अधिक माहितीसाठी Video पहा.

घोंगडीच्या दशा पेटवने, हि पद्धत काळ्या, पांढऱ्या व करड्या रंगाच्या सर्व घोंगडीस लागू होते. हातमाग घोंगडीच्या दशा आपण जेव्हा पेटवतो तेव्हा केस जळल्यासारखा चर-चर आवाज येतो आणि केस जळल्यासारखा वास हि येतो व मशीनमेड घोंगडीच्या दशा आपण जेव्हा पेटवतो तेव्हा केस जळल्यासारखा चर-चर आवाज येत नाहो व प्लास्टिक जळाल्या सारखे वास येतो.

घोंगडीच्या दशा पेटवने

हि एकमेव अशी पद्धत आहे जी कायमस्वरूपी Original व Duplicate घोंगडी ओळखताना उपयोगात येऊ शकते. अधिक माहितीसाठी खालील Video नक्की पहा.   

अधिक माहितीसाठी हा Video पहा.

मशीनवर बनवलेल्या घोंगडीचे प्रकार खालीलप्रमाणे

मशीनमेड मोठी घोंगडी

लोकरीच्या सुताचा धागा तयार करून त्यात अजून दुसरे सूत मिसळून हि घोंगडी तयार केली जाते. हि घोंगडी वजनदार असते. लोकांना पारंपारिक घोंगडी वापरताना लोकरीचा त्रास वाटतो म्हणून ते बाजारात मिळणाऱ्या स्वस्त मशीनमेड घोंगडीचा वापर करतात.

मशीनमेड काळी घोंगडी

या घोंगडीमध्ये ७०% सूत व ३०% लोकर असते. या घोंगडीमध्ये काळा, पांढरा व करडा रंग बघायला मिळतो व १० ते १४ फुटांपर्यत लांबी मिळते. या घोंगडीचे वजन सरासरी ३ ते ४ किलो पेक्षा जास्त असते. कालांतराने हि घोंगडी आपले मूळ रूप दाखवते.

मशीनमेड करडी घोंगडी
मशीनमेड(Duplicate) पांढरी जाड वजनाची घोंगडी

पानिपत घोंगडी (मशीनमेड)

अनेक चित्रपट तथा टीव्ही वरील धार्मिक चॅनेलवर भागवत, रामायण कथा सांगणाऱ्या महाराजांच्या खांद्यावर घोंगडी असते ती मऊ घोंगडी म्हणजेच पानिपत शॉल होय. हरियाणा राज्यातील पानिपत मध्ये मोठ्या प्रमाणात घोंगडी सारखी हुबेहुबे दिसणारी शॉल तयार केली जात असून हजारो लोक घोंगडी समजून हि शॉल खरेदी करत असतात. हि शॉल मशीनवर तयार केलेली असून यामध्ये सूत (Cotton) मिसळलेले असते.

पानिपत घोंगडी(शॉल)

लोकरीची घोंगडी हि खरीखरी व मऊ तसेच उबदार असते. घोंगडीला घुता येते, कोणत्याही ऋतूत घोंगडी वापरल्यास शरीराला फायदा मिळतो तर पानिपत शॉल धुतली तर तिचा रंग निघून जातो. पानिपत शॉल काळ्या, पिवळ्या, लाल व गुलाबी रंगात मिळतात. या शॉलचे वजन साधारण २ ते ३ किलो भरते. हि शॉल(घोंगडी) दिसायला आकर्षक व सुबक असून घोंगडीसारखी तयार गेली असते.

काळी व पिवळी पानिपत घोंगडी(शॉल)
लाल व गुलाबी पानिपत घोंगडी(शॉल)

अशाप्रकारे लोकरीच्या धाग्यापासून तयार होणाऱ्या घोंगडीला कुणीही राजाश्रय मिळवून देण्याचा प्रयत्न केला नाही. हंटर कमिशनला सामोरे जाताना महात्मा फुलेंच्या खांद्यावर घोंगडी होती. याच घोंगडीने इंग्रजांचे लक्ष वेधून घेतले होते दरम्यान बेळगावात तयार होणारी हातमागावरील घोंगडी इंग्रजांनी ब्रिटनला पाठवली होती.

मराठयांच्या इतिहासात देखील मोठंमोठ्या मोहिमांवर जाताना प्रत्येकाजवळ एक घोंगडी असायची. अशी हि घोंगडी यांत्रिकीकरणाच्या काळात लुप्त होताना दिसून येत आहे. घोंगडी आणि घोंगडी विणकराच्या कष्टाला योग्य प्रतिष्ठा मिळत नसल्यामुळे भारतीय संस्कृतीचे वैभव सांगणारी घोंगडी अडगळीत पडत असून या घोंगडीला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देण्याची आवश्यकता आहे व AhilyaStore या मोहिमेत सक्रिय सामील झाले आहे.

घोंगडी व्यवसायातील फसवेगिरी

जेव्हा आपण घोंगडी खरेदी करत असतो तेव्हा मोठ्या प्रमाणात Original(हातमागाची) घोंगडी म्हणून Duplicate(मशीनमेड) घोंगडी दिली जाते. मशीनमेड हा प्रकार गेली काही वर्षांपासून बाजारात आला आहे. मशीनमेड घोंगडीमध्ये कॉटन व अन्य सुतांचे मिक्सिंग असते.

 अगदी पंढरपूर, अदमापूर, आरेवाडी, पठ्ठनकोडोली, मायाक्का चिंचणी, माळेगाव यात्रा किंवा मुंबई, पुण्यातील ग्राहक बाजारात हि मशीनमेड घोंगडीच विकली जाते व लोकांना याबद्दल माहित नसल्या कारणाने त्यांची नकळत फसवणूक होते किंवा केली जाते. काळी व पांढरी घोंगडी घेताना हि फसवेगिरी केली जाते. याबद्दल आपण थोडक्यात पाहू,

काळी घोंगडी घेताना होणारी फसवणूक

काळ्या घोंगडी मध्ये जावळ लोकरीची घोंगडी(बाळलोकर) व मोठ्या लोकरीची घोंगडी(खळीची किंवा पारंपरिक) असे दोन प्रकार असतात. आपण जेव्हा हातमागावरील काळी जावळाची घोंगडी घेयला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड पानिपतची घोंगडी दिली जाते. ज्यात ८० टक्के कॉटन मिक्स असते. तिला पानिपत येथे शॉल म्हणतात. ती दिसायला खूप आकर्षित असते व या शॉलची किंमत ४०० ते ७०० रुपया पर्यत असते मात्र ती येथे जावळाची घोंगडी म्हणून ३००० पासून ते ५००० हजारापर्यत विकली जाते.

मशीनमेड(Dupliacte) पानिपत घोंगडी/शॉल
हातमागाची(Original) काळी(जावळ) घोंगडी

तसेच जेव्हा आपण हातमागावरील मोठ्या लोकरीची किंवा खळीची घोंगडी घेयला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड जाड वजनाची घोंगडी दिली जाते. या घोंगडीमध्ये हि  ८० टक्के कॉटन मिक्स असते. या घोंगडीची किंमत ७०० ते ८०० पर्यत असते मात्र हि मोठ्या लोकरीची घोंगडी म्हणून १५०० ते २००० पर्यत विकली जाते. 

मशीनमेड(Duplicate) जाड वजनाची घोंगडी
हातमाग(Original) मोठ्या लोकरीची घोंगडी

त्यामुळे मित्रानो जर तुम्ही जत्रांत व यात्रांमध्ये किंवा कोठे हि काळी घोंगडी घेताय तर सावधान. खालील Video मध्ये नक्की पहा कि, खरी व खोटी काळी घोंगडी जावळ लोकरीची व मोठ्या लोकरीची कशी ओळखावी.

Original व Duplicat काळी घोंगडी ओळखायची कशी? हे जाणून घेण्यासाठी हा Video नक्की पहा.

पांढरी घोंगडी घेताना होणारी फसवणूक

पांढऱ्या घोंगडी मध्ये हि जावळ लोकरीची घोंगडी(बाळलोकर) व मोठ्या लोकरीची घोंगडी(खळीची किंवा पारंपरिक) असे दोन प्रकार असतात. आपण जेव्हा हातमागावरील पांढरी जावळाची घोंगडी घेयला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड न्यूझीलंडची घोंगडी दिली जाते. ज्यात ८० टक्के कॉटन मिक्स असते. हि घोंगडी न्यूझीलंडला तयार होते. यावर चे फिनिशिंग खूप आकर्षित असते व या घोंगडीची किंमत ५०० ते ८०० रुपया पर्यत असते मात्र ती येथे जावळाची घोंगडी म्हणून ४००० पासून ते ५००० हजारापर्यत विकली जाते.

मशीनमेड(Dupliacte) घोंगडी/न्यूझीलंड घोंगडी
हातमागाची(Original) जावळ लोकरीची घोंगडी

तसेच जेव्हा आपण हातमागावरील मोठ्या लोकरीची किंवा खळीची घोंगडी घेयला जातो तेव्हा आपल्याला मशीनमेड जाड वजनाची घोंगडी दिली जाते. या घोंगडीमध्ये हि  ८० टक्के कॉटन मिक्स असते. या घोंगडीची किंमत ७०० ते ८०० पर्यत असते मात्र हि मोठ्या लोकरीची घोंगडी म्हणून १५०० ते २००० पर्यत विकली जाते.

मशीनमेड(Duplicate) जाड वजनाची घोंगडी
हातमागाची(Original) मोठ्या लोकरीची घोंगडी

खालील Video मध्ये नक्की पहा कि, खरी व खोटी पांढरी घोंगडी जावळ लोकरीची व मोठ्या लोकरीची कशी ओळखावी.

Original व Duplicat पांढरी घोंगडी ओळखायची कशी? हे जाणून घेण्यासाठी हा Video नक्की पहा.

धार्मिक वस्त्र म्हणून जावळ लोकरीच्या ढाबळ किंवा शॉल ऐवजी
मशीनमेड शॉल दिली जाते

वास्तविक जावळाच्या लोकरीची शॉल असा काही प्रकारच नाही. आजच्या घडीला लोकरीपासून सर्वात साँफ्ट म्हणजेच मऊ अशी कोणती गोष्ट बनत असेल तर ती आहे फक्त जावळाची घोंगडी. जावळ लोकरीचे ढाबळ बनवणारी पिढी आज बहुतेक नाहीशी झाली.आहे    

आजकल दक्षिणेकडे बेळगावच्या बाजूला अशा प्रकारची शॉल तयार केली जाते. ज्यामध्ये साधरणतः २×६ फूट व ३×७ फूट असा आकार असतो व अर्धा किलोच्या आसपास वजन असते. काळी,पांढरी व पिवळ्या रंगाची शॉल तयार केली जाते. यामध्ये ७०% ते ८०% कापसाचे सूत मिक्स असते व उर्वरित प्रमाणात लोकर असते. 

मशीनमेड पांढरी शॉल

देवळांमध्ये जे व्यक्ती देवाची दररोज सेवा करतात असे व्यक्ती याप्रकारची शॉल परिधान करतात. त्यांच्यामते हि शॉल फक्त जावळाच्या लोकरीची असते म्हणून वापरतात पण हे खोटे आहे. जावळाच्या लोकरीची शॉल म्हणून मशीनमेड शॉल देऊन सरास फसवणूक केली जात आहे.  

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

89 99 143 074 – राहुल वावरे

Rahul WawareFacebook | Instagram

Ghongadi Price – घोंगडीच्या किंमती

अनेकांना एक प्रश्न सारखं खुणवत असतो व तो म्हणजे घोंगडीच्या किंमती कशा ठरतात? घोंगडीच्या किमती या त्यावर्षी उपलब्ध असलेली लोकर, विणकाम, रंग व कधी कधी ज्या ठिकाणी ति बनते त्या ठिकाणाचा विचार करून घोंगडीच्या किंमती निश्चित केल्या जातात. खालील चार्ट नक्की पहा. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या घोंगडीच्या किंमती दिल्या आहेत.

घोंगडीचा प्रकारSizeलोकरकिंमत
काळी घोंगडी९*४ फुटजावळ२५०० रु.
पांढरी घोंगडी९*४ फुटजावळ२७०० रु.
करडी घोंगडी९*४ फुटजावळ२००० रु.
काळी घोंगडी१०*४ फुटमोठ्या मेंढयांची२६२५ रु.
पांढरी घोंगडी१०*४ फुटमोठ्या मेंढयांची३१५० रु.

लोकरी पासून इतर बनवले जाणारे वस्तू

लोकरी पासून प्रामुख्याने घोंगडी तयार होते हे सर्वज्ञात आहे पण घोंगडी व्यतिरिक्त लोकरीपासून जेन किंवा जिन, आसन, योगपटी(योगा मॅट), कानटोपी, बंडी यासारख्या गारमेंटच्या वस्तू तयार केल्या जातात.

जेन –
जेन ला जान, जिन, जाजम किंवा जा-नमाज सुद्धा म्हणतात. जेन बनवताना सर्व प्रकारची लोकर एकत्र केली जाते. त्याची जाडी १ ते १.५ इंच असते व वजन ६ ते ८ किलो एवढे असते. जेनमध्ये काळे व पांढरे या दोन रंगाचे प्रकार असतात व सामन्यतः ६×४ फूट आकारचे बनवले जाते. काही ठिकाणी ७×५ किंवा ६×६ फूट आकाराचे जेन सुद्धा मिळते. आकर्षित दिसण्यासाठी त्यावर रंगाने नक्षीकाम केलेले असते.

६×६ फूट – हातमागावरील पांढरे जेन

जेन मध्ये हि हातमाग व मशीनमेड असे दोन प्रकार असतात. हातमाग जेन पूर्णपणे लोकरीपासून बनवलेले असते तर मशीनमेड जेन मध्ये कापसाचे, कात्याचे, प्लस्टिकचे सूत मोठ्या प्रमाणात वापरले जाते. काही ठिकाणी तर अतिकिळसवाणा प्रकार केला जातो तो म्हणजे यासर्व मिश्रणात माणसाचे पण केस मिसळी जातात. त्यामुळे जेन घेताना खात्रीपूर्वक ठिकाणाहून घेत जा.

६×४ फूट – हातमागावरील काळे जेन

हात मागावरील जेन जास्त काळ ठिकले जाते तर मशीनमेड जेन चे काही काळानंतर तुकडे पडायला सुरुवात होते. हातमागावरील जेन पासून हि घोंगडीप्रमाणे सर्व आरोग्यविषयक फायदे मिळतात. मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी जा-नमाज म्हणून जेन चा वापर करतात.

६×४ फूट – हातमागावरील पांढरे जेन

आसन –
आसन हे जावळाच्या लोकरीपासून तयार केले जाते. यामध्ये काळे व पांढरे हे दोन रंग असतात. २×२ फूट हि लहान साईज असून ४×४ हि मोठी साईज मानली जाते. आसनाचा उपयोग धार्मिक कार्यसाठी मोठ्या प्रमाणात होतो म्हणून ते जावळाच्या लोकरीपासून बनवलेले असते. आसनमध्ये हि मोठ्या प्रमाणात मशीनमेड म्हणजेच डुप्लिकेट आसन तयार केली जातात व बाजारात विकली जातात.

हातमागावरील पांढरे आसन

आसन का महत्वाचे असते. त्याचे विशेष काय? हे थोडक्यात जाणून घेऊ. आसन हे स्वतःच स्वतंत्र असावं आणि इतरांना कधीच वापरुन देवू नये. ते अतिशय पवित्र वस्तु त्याची अवहेलना कधीच करुं नये, ते कधीच पायानं पुढे मागे सरकवू नये, त्याचा योग्य तो मान त्याला दिलाच पाहिजे व त्याचा आदर ही करावा कारण आसन म्हणजे वाहन, वाघावर बसणारी देवी ही जेव्हा वाघावर बसते तेव्हा ती क्रौर्याची परीसीमा होवुन दैत्याचा नाश करण्यास सज्ज असते व भक्ताचे रक्षण करते, असे समजले जाते.

हातमागावरील काळे व पांढरे आसन

आपण इष्टदेवतेची सेवा करत असतांना ती जर आसनावर बसुन केली की त्या सेवेमुळे मिळणारी उर्जा द्विगुणित होते कारण ती उर्जा आपल्यात सामावून घेण्यासाठी आसनावर बसणं अनिवार्य आहे नाहीतर जी ऊर्जा प्रक्षेपित होईल ती सर्व तुमच्या देहातून जमीनीत शोषून घेतली जाईल. त्यासाठी कुठल्याही साधनेला बसताना आसन हे अत्यावश्यक आहे, तेच आसन आपण आणि पृथ्वी यामध्ये अंतर निर्माण करते त्यामुळे आपल्यात निर्माण होणारी उर्जा ही पृथ्वी तत्वात विलिन होत नाही. म्हणून आसन हे उपयुक्तच नाही तर अत्यावश्यक असते.

मशीनमेड काळे आसन

प्रत्येक सेवेला आसन घ्यावेच, त्यात प्रत्येकाने आपआपले आसन वापरावे कोणाचेही दुसऱ्या व्यक्तीच्या आसनाचा वापर करु नये कारण त्याची सर्व नकारात्मक उर्जा आपल्यात सामावते. याचा अभ्यास म्हणजे आभा त्याला इंग्रजी मध्ये ऑरा म्हणतात, तसंच जपाची प्रत्येकाची माळ ही सुद्धा स्वता:ची असावी लागते. तसेच आसनावर बसताना पाय देवुन बसू नये त्याला एक आपल्याला आवडेल असे नाव द्यावे ते फक्त आपल्यालाच माहित असावे सेवा करण्यापुर्वी त्या आसनाला नावाने व आदराने म्हणजे संबोधावे.

मशीनमेड करडे आसन

समजा आसनाचे नाव जर वनराज असेल तर आदराने हाक मारुन त्यावर प्रथम नमस्कार करावा गुडघे टेकवुन त्यावर बसावे व सेवेसाठी साधनेसाठी सज्ज व्हावे. असे केल्याने काय होते, ही आसन देवता आपल्यास संरक्षण देवुन सर्व आदिदैविक, आधिभौतिक, आदिअध्यात्मिक सर्व प्रकारे संरक्षण करते.

जर समजा कोणाचे आसन खाली म्हणजे जमीनीवरुन उचलायचे राहिले असेल तर ते पायाखाली न तुडवता व्यवस्थित ठेवावे, कारण आपण केलेल्या सेवेने त्यावर त्याची वैयक्तिक आभा तयार होते आणि ती आभा आपले संरक्षण करते. आसन हे नेहमी कशाने ही दूषित होणार नाही असे असावे कारण जर ते दूषित झाले तर ते पुन्हा वापरताना धुवावे लागते आणि अशाने तुमची जी अध्यात्मिक त्या आसनात साठलेली असते तीचे विघटित पावते म्हणून आसन लोकरीचे किंवा दर्भाचे असावे.

आजच्या काळात भरपूर लोक आसन मी म्हणून घोंगडीचा वापर करतात. पूर्ण शरीर व्यवस्थित घोंगडीवर सामावले जाते म्हणून घोंगडी वापरली जाते. कधी कधी असं लहान हि पडते. मोठ्या प्रमाणात २×२ फूटचे आसन बनवले जाते.

योगपटी –
हातमागावरील योगपटी हि जावळाच्या लोकरीपासून तयार केली जाते. त्यावर अंशतः चिंचोक्याची खळ लावलेली असते. यामध्ये साधरणतः २×६ फूट व २×५ फूट आकाराच्या योगपटी मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात. यामध्ये काळी व पांढरी योगपटी तयार केली जाते. योग साधना करण्यासाठी किंवा नर्मदा परिक्रमा करताना विसाव्याचे वस्त्र म्हणून वापर योगपटीचा उपयोग केला जातो.

२×५ फूट – हातमागावरील पांढरी योगपटी

कानटोपी व बंडी(काचोळी ) –
हातमागावरील कानटोपी व बंडी सर्व प्रकारची लोकर एकत्र करून तयार केल्या जातात. सर्व लोकर एकत्र असल्यामुळे एक विशिष्ट्य रंगाच्या कानटोपी किंवा बंडी तयार होत नाही. बंडी म्हणजे लोकरीचे बनियन.

लोकरीच्या कानटोपी
बंडी

Our Handicraft Collections

घोंगडी Packaging

काळी घोंगडी(जावळाची) Packing – 8×4 Ft.

आकार – ८*४ फूट

पांढरी घोंगडी(जावळीची) Packing – 9×4 Ft.

आकार – ९*४ फूट

काळी घोंगडी(जावळाची) Packing – 10×4 Ft.

आकार – १०*४ फूट

Video Reviews

श्री.भाऊसाहेब राजोळे, नाशिक(व्यावसायिक)

श्री.भाऊसाहेब राजोळे, नाशिक

People Also Ask

Health benefits of Ghongadi

  • It relieves back pain, waist pain, vata, joint pain.
  • Helps control high blood pressure.
  • Ghongadi are also used in smallpox, measles, fever.
  • Sleeping on a Ghongadi relieves asthma in children.
  • Prevents the risk of paralysis and helps reduce diabetes.
  • The Ghongadi has a slight fragrance of its own, so it relieves asthma and gallbladder problems.

Religious benefits of Ghongadi

  • Ghongadi have another general significance in all religious scriptures.
  • Pooja and meditation on the Ghongadi are assimilated.
  • Ghongadi are used for reciting all kinds of Parayanas.
  • Ghongadi are used for worshiping Mahalakshmi.
  • Ghongadi is needed in Khandoba tali bhandar program.
  • For yoga practice and spiritual recitation.
  • For Dev Pooja in Dohale program.

Other benefits of Ghongadi

  • Cool in summer.
  • Sleeping on a bed does not allow snakes, scorpions, ants, gophers, bees, wasps to approach.
  • It is an excellent medicine for insomniacs. Sleeping on a blanket leads to restful sleep.
तुम्ही आमच्या Website वरून घोंगडी Online खरेदी करू शकता किंवा COD - Cash On Delivery साठी 8999143074 या नंबरला संपर्क करू शकता.