वाराणसी(उत्तर प्रदेश)
इतिहास:
राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७९१ ला वाराणसी(काशी) येथे गंगा नदीवर मणिकर्णिका घाट बांधून काढला व त्याच वेळी या घाटाच्या खालील बाजूला असलेले रत्नेश्वर महादेव मंदिर बांधले. हे मंदिर अहिल्यादेवींनी आपली दासी “रत्नाबाई” हिच्या ईच्छेवरून बांधले म्हणून या मंदिराचे नामकरण “रत्नेश्वर महादेव मंदिर” पडले असे सांगितले जाते.

अजून एक दंतकथा प्रसिद्ध आहे ती अशी कि, राणी अहिल्यादेवी यांनी रत्नाबाईला सांगितले कि या मंदिराचे नामकरण स्वताच्या नावाने न करता दुसरे नाव द्यावे. परंतु रत्नाबाईनी अहिल्यादेवींच्या म्हणण्याकडे कानाडोळा केला व अहिल्यादेवींनी रागाच्या भरात शाप दिला त्यामुळे हे मंदिर वर्षेच्या ९ महिने पाण्यात असते. या मंदिरात फक्त ३ महिनेच देवपूजा होते.


रत्नेश्वर मंदिर व मणिकर्णिका नदीघाटा व्यतिरिक्त राणी अहिल्यादेवी यांनी वाराणसीत(काशी) अनेक कल्याणकारी कार्य केली त्यामध्ये प्रामुख्याने काशीविश्वेश्वर ज्यीतीर्लिंग मंदिराचा पुनर्निर्माण, हजारा दीपमाळ, गंगा मंदिर, तारकेश्वर महादेव मंदिराचा निर्माण व शहरात अन्य ६ मंदिराचा निर्माण (होळकरांची खाजगी संपत्ती) केला. अहिल्याबाई नदीघाट, शीतल नदीघाट, दशवमेध नदीघाट बांधले. हे सर्व नदीघाट होळकरांची खाजगी संपत्ती आहे. रामेश्वर धर्मशाळा, कपिलधारा धर्मशाळा, उत्तर काशी धर्मशाळा, ब्रम्हपुरी धर्मशाळा, लोलार्क जलकुंड, दुर्ग जलकुंड, अहिल्याबाई नदीघाटावर भव्य होळकर वाडा व शहरात अन्य ८ वाडे (होळकरांची खाजगी संपत्ती) बांधले आणि नदीघाटावर तीन मंदिरे (होळकरांची खाजगी संपत्ती) त्यातीलच एक रत्नेश्वर मंदिर. संदर्भ : व.वा.ठाकूर लिखित – अहिल्यादेवींचे कार्य व जीवन पुस्तक.

महत्त्वाचा मुद्दा:
सध्याच्या काळात हे मंदिर त्याच्या एका खास वैशिष्ट्यामुळे प्रसिद्धीस आले आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा एका बाजूला असलेला तिरकसपणा किंवा झुकाव. मंदिराच्या या वौशिष्टाची बरोबरी लोक जागतिक वारसा स्थळ असलेले पिसाच्या झुलत्या मनोऱ्याशी करत आहे. लोकांचा हा प्रश्न पण चुकीचा नाही व या प्रश्नाचे उत्तर अनेक प्रसार माध्यमांनी पण शोधला व तेथे लोकांचे म्हणणेच खरे ठरले.

पिसाच्या मनोऱ्याची उंची १८३ मीटर असून रत्नेश्वर महादेव मंदिराची उंची ४० मीटर आहे व पिसाचा मनोरा फक्त ५’ डिग्रीच झुकलेला असून रत्नेश्वर महादेव मंदिर ९’ डिग्री झुकलेले आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न असून या सर्व गोष्टी खऱ्याही आहेत. पण रत्नेश्वर मंदिराचे दूदैव्ह इतकं कि जागतिक वारसा तर सोडाच पण अजून ऐतिहासिक वास्तू म्हणून साधी नोंद पण नाही. हे मंदिर होळकरांची खाजगी संपत्ती असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत व्हत्या मात्र हि नोंद लवकर होईल असे पुरातत्व खात्याने स्पष्ट केले आहे.

सध्या या मंदिराचा हा मुद्दा गाजत असल्यामुळे मंदिराच्या निर्माण काळाविषयी अनेक दंतकथा जन्म घेऊ लागल्या आहेत मात्र हे मंदिर राणी अहिल्यादेवींच्या खाजगी जहागिरीतून बांधले आहे याचे पुरावे उपलब्ध असून व.वा. ठाकूर यांनी अहिल्यादेवींचे कार्य व जीवन या पुस्तकात हे तत्कालीन संदर्भ दिले आहेत. तसेच हे मंदिर ज्या घाटावर आहे तो मणिकर्णिका नदीघाट होळकर घराण्याची खाजगी संपत्ती आहे.
मंदिर स्थापत्य:
हे मंदिर वर्षाच्या नऊ महिने गंगा नदीच्या पाण्यात असून वर्षातील तीनच महिने पाण्याबाहेर येते. त्यामुळे या मंदिरात तिनचं महिने पूजा होते. या मंदिराचे बांधकाम नागरशैली प्रमाणे असून मंदिर प्रामुख्याने “गर्भगृह” व “सभागृह” या दोन भागात विभागले आहे.

दोन्ही गर्भगृहावर शिखरे आहेत. गर्भगृहावरील शिखर मोठं असून सभागृहावरील शिखर लहान आहे. दोन्ही शिखर तेवढेच कोरीव व श्रीमंत आहेत.

दोन्ही शिखरांवर पुन्हा त्याच शिखरांच्या रचनेनुसार एकावर एक अशा छोट्या छोट्या शिखरांची प्रतिकृतींची रचना केले असल्यामुळे मंदिरांचे दोन्ही शिखर शिल्पकलेचा उत्तम नमूना आहे. गर्भगृहावरील शिखर हे मोठे आहे तर सभागृहावरील शिखर गोल आहे. गोल शिखरावरील नक्षीचे थोडेफार नुकसान झालेले दिसते.

मंदिराच्या गर्भगृहामध्ये मधोमध पाच शिवलिंगाचा एक समूह नजरेस पडतो व त्याच्या पाठीमागील देवळ्यातही एक शिवलिंग आहे. गर्भगृहात एकूण ३ देवळ्या असून थोडीफार नक्षी हि पाहावयास मिळते.

मंदिराला एकूण १० खांब असून सर्व खांब नक्षीदार व कोरीव आहेत. भिंतीवरील मुर्तीकाम, छतावरील शिल्पपट सुंदर आहे. गर्भगृहाच्या दारी सुंदर वेली व वेगवेगळी आकर्षक दगडी शील्प हि कोरलेली आहेत.




हे मंदिर असे तिरके का? असा प्रश्न अनुभवी स्थपत्यशस्त्रांना विचारला असता त्याचे म्हणणे आहे कि, हे मंदिर वास्तविक नदीच्या पात्रात बांधण्यात आले व अधिककाळ ते पाण्यात असल्यामुळे नदीच्या प्रवाहाचा त्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून असे तिरके बांधले असावे तसेच पुरापरिस्थितीच्या वेळेस नदीच्या पाण्याची उंची समजावी म्हणून अशी अनेक मंदिरे अहिल्यादेवींनी नदीत बांधलेली आढळतात.
संदर्भ:
आहिल्यादेवींचे जीवन व कार्य
आभार:
Kevin Standage
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
अधिक माहितीसाठी “अहिल्यादेवींचे जीवन व कार्य” हे पुस्तक आजच Online मागवा.
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021