धनगर समाजातील अपरिचित सरदार घराणी
काझडचे नरुटे पाटील घराणे
इंदापूर परगण्यातील काझड गावच्या नरुटे(नरोटे/नरवटे) पाटलांविषयी शिवचरित्र साहित्य खण्ड 3 मध्ये 2 पत्रं उपलब्ध आहेत.त्यामध्ये या नरोटे पाटलांविषयी काही माहिती मिळते. या गावात शिवरायांनी मोरया गोसावी यांना इनाम दिल्याच्या नोंदीही मिळतात. 31 ऑक्टोबर 1761 शके 1683 कार्तिक शु 4 रोजी लखोजी बिन मालोजी पाटलाला लिहलेल्या पत्रात नरोटे पाटलांचा मूळ पुरुष म्हणून लखोजी पाटिल थोरले यांचा उल्लेख मिळतो.
या लखोजी ला संतान नसल्यामुळे त्यांनी पराजी पाटलांचा लेक सिदोजी पा. ला दत्तक घेतले त्याने मोकादमी केल्यानंतर त्याच्या पोटी लखाजी झाला त्याने मोकादमी केली. या लखाजी पाटलाच्या काळात गावावर दादोजी कोंडदेवची स्वारी झाली ,या लढाईमध्ये दादोजी चा पुतण्या मृत्यूमुखी पडला. तेव्हा लखाजी पाटलांना धरून आणण्यात आले आणि खुनाचा बदल्यात खून मागितला.
यावेळेला तुकोजि पाटिल भलेरायाचे विल्हेचा हा लखाजिंच्या मदतीस धावून आला आणि तो लखाजींला बोलला कि, “जे मी खून देतो मी मेलो तरी माझी मुले लेकरे पोसशील आणि पाटीलकीही राकशील आणि तुला मारले राहणार नाही, आज मुले माणसेही जगणार नाहीत”. असा विचार झाल्यानंतर तुकोजीला मारण्यात आले. शके 1674 माघ शु.3/ इस 1753 फेब्रु 6 ला लिहिलेल्या पत्रात या घराण्याची 5 ते 6 पिढ्यांची वंशावळ मिळते.
या 2 पत्रांखेरीज इंदापूर परगण्यातील बोरी, आणि अन्य गावांच्या पत्रांमध्ये नरुटे पाटलांचा नामोल्लेख आढळतो आणि त्याचा काळ हा दुसऱ्या पत्रात दिलेल्या वंशावळीशी जुळतो.न रुटे घराण्याची वंशावळ (अग्नोजी पाटलांना पाठवलेल्या पत्रातून) 1.पराजी, 2.जानोजी(1631 कालखंड), 3.आबाजी, 4.रायाजी-माऊजी-मकाजी, 5.आबाजी, 6.जिवाजी, 7.अग्नोजी(1753 चा कालखंड).
लखोजी बिन मालजी पाटलांना (1761 चे पत्र) पाठवलेल्या पत्रातुन उपलब्ध असलेली दुसरी वंशावळ 1.लखाजीबाबा थोरले, 2.सिदोजी पा.दत्तक(पराजी पाटलांचा लेक: लखाजीबाबा थोरले याचे पोटी संतान नसल्यामुळे), 3.लखाजी दुसरे (सिदोजी चा पुत्र) इस 1609 चा कालखंडयाच्या कारकिर्दीत दादोजी ची स्वारी आणि दादोजींच्या पुतण्याची हत्या, 4.माऊजी दत्तक (अंबाजीचा लेक) कालखंड 1683, 5.निंबाजी नरुटे पाटलांविषयी असलेली दन्तकथा मियान राजू व मलिक अंबर यांच्यात वाद सुरू होते.
त्यावेळी मलिक अंबरच्या इंदापुरच्या तळावर मियान राजू ने हल्ला केला त्या लढाईत छ.शिवरायांचे आजोबा मालोजी भोसले या लढाईत मारले गेले. नरुटे सरदारांचा या लढाईत सहभाग होता असं दन्तकथेवरून समजतं पण ते मियान राजू च्या बाजून लढले कि मलिक अंबर च्या? याबाबतची माहिती आणि इतिहास दुर्दैवाने उपलब्ध नाही. नरुटे पाटलांशी सम्बंधित 2 च पत्रे उपलब्ध असल्यामुळे या घराण्याचा इतिहास अजूनही अंधारातच आहे.
संदर्भ : सरंजामे मरहट्टे
अधिक माहितीसाठी “सरंजामे मरहट्टे” हे पुस्तक आजच मागवा.
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
- नरुटे पाटील घराणे - October 2, 2020
- अहिल्यादेवी होळकर आणि महेश्वरी साडी - January 21, 2020