मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्राचा अभ्यास केला की माणसाला जणू त्या इतिहासाची भुरळ पडते, कारण होळकरशाहीचा इतिहास आहेच तेवढा गौरवशाली. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी पाया रचला. मातोश्री अहिल्यादेवींनी त्याचा स्वाभिमान आणि बाणेदारपणा दाखवून दिला.
देशाभिमान आणि कर्तबगारी तर एकाहून एक सरस आणि अशा महान इतिहासाची पाने जेव्हा आपन उलगडत असतो तेव्हा भारतभूमीत ईंग्रजी सत्ता प्रस्थापित होण्याआधी एक महान इतिहास घडला तो म्हणजे यशवंतराव होळकर यांचा. महाराजांच्या नावाने इंग्रजी सत्ता थरथरत होती.
इंग्रजांनी हेन न ते प्रकारे महाराजांना हरवण्याचा प्रयत्न केला पण महाराज यशवंतराव होळकर इंग्रजांना प्रत्येक वेळी पुरुन उरले आणि म्हणून इंग्रजांनी फंदफितुरीचा मार्ग अवलंबला. जेव्हा शिंद्यांकडुन हल्ला झाला त्या हल्यात यशवंतराव होळकरांचे मोठे बंधू दुसरे मल्हारराव मारले गेले नंतर काही काळातच दुसऱ्या बाजीरावांनी यशवंतराव महाराज यांच्या दुसऱ्या मोठ्या भावाला विठोजी होळकरांना हत्तीच्या पाई दिले अशा वाईट काळात यशवंतराव होळकरांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला.
अशा परिस्थितीतही महाराजांनी मार्ग काढले. स्वताचे सैन्य उभे केले व एक एक प्रदेश जिंकून स्वताचे राज्य उभे केले. ह्या प्रवासात महाराजांना अनेक साथी सोबती भेटले त्यातील एक होते भवानी शंकर बक्षी. बराच काळ त्यांनी महाराजांसोबत इमानेइतबारे काम केल्याने महाराजांनी लाला भवानी शंकर याला काही महत्त्वाच्या पदांवर काम दिले मात्र इंग्रजांच्या फंदफितुरीमध्ये भवानीशंकर बक्षी सामील झाला.
त्याने बरीच महत्त्वाची माहिती इंग्रजांना दिली. त्याची बक्षिसी म्हणून भवानीशंकर बक्षी याला इंग्रजांनी दिल्ली मध्ये एक हवेली व काही इनाम दिले. जेव्हा यशवंतराव होळकर महाराजांना व सैन्याला फितुरीची बातमी कळाली तेव्हा भवानीशंकर बक्षीचा शोध घेतला मात्र तो मिळत नव्हता कारण तो अंदाज लाऊन आधिच इंग्रजांच्या गोठात सामील झाला होता.
नंतर भवानीशंकर त्याला दिलेल्या दिल्ली येथील हवेलीत राहु लागला. दिल्लीतील जनतेला स्वकीय राजसत्ते विषयी विषेश आदर सन्मान होता. त्यात इंग्रजांना लढायांत खडे चारनारा एकच महान राजा यशवंतराव होळकर यांचे वर जन आशिर्वाद होताच. दिल्लीतील जनतेला जेव्हा भवानीशंकर बक्षी याच्या फितुरी बद्दल कळाले तेव्हा त्याला लोक आधि मागेपुढे आणि नंतर समोरुन ही नमकहराम म्हणु लागले आणि विषेश म्हणजे त्याच्या घराला नमक हराम की हवेली व त्या गल्ली ला नमक हराम गली म्हणू लागले.
त्यामुळे भवानीशंकर बक्षी याच्या व्यवसायाचे बारा वाजले. नंतरच्या काळात भवानीशंकर बक्षी इंग्रजांच्या ही काही कामाचा न उरल्याने त्याच्याकडूनही त्याला हिन वागणूक दिली जात असे. अशा परिस्थितीत भवानीशंकर बक्षी हा आर्थिक व मानसिक दोन्ही आघाड्यांवर कमकुवत होत होता अशातच त्याची कोणीतरी राहत्या हवेलीतच हत्या केली एका नमकहरामाचा अंत अशा वाईट रितीने झाला.
खरतर खुप मोठ्या काळापर्यंत हा महान इतिहास सामान्य माणसापासून दुर कसा राहीला याचे आश्चर्य वाटते. वाचनाचा छंद जोपासत असताना लढवय्या यशवंतराव होळकर महाराजांच्या काळात झालेल्या नमकहरामी विषयी वाचनात आले आणि त्यानंतर कळाले ते एक हवेली विषयी आणि मग मनाला ओढ लागली ती नमकहराम हवेली. जी दिल्ली मध्ये आहे तिचा इतिहास जाणून घेण्याची खुपशा माध्यमातून मी माहिती घेतली.
मग त्या हवेलीला भेट देण्याचा निर्णय घेतला. कामानिमित्त दिल्लीत जाणे झाले आणि मी त्या नमक हराम हवेलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यामागे माझे दोन उद्देश होते पहिला म्हणजे सत्य इतिहास पडताळायचा होता आणि दुसरा म्हणजे माझ्या Jivan ek akhada नावाच्या युट्युब चॅनलला ह्या इतिहासावर व्हिडिओ टाकण्याची इच्छा होती. तो Video खाली दिला आहे.
बऱ्याच वाटा चुकत मी त्या हवेली पर्यंत पोहचलो मात्र नमक हराम खरतर कोनाला राग यावा असा शब्द त्यामुळे मी भवानीशंकर बक्षी याच्या नावावरून विचारपूस केली मात्र कोणालाही त्या विषयी माहिती नव्हती. मग वेळेचा अभाव बघुन नाईलाजाने नमक हराम हवेली विचारली तेव्हा एका जुन्या माणसाने मला 154 नंबर विचारत जा म्हणून हिंदी मध्ये सांगितले आणि मनाला शांती मिळाली कारन मला आता कोना समोर नमकहराम बोलाव लागणार नव्हत.
तेथे पोहोचलो मात्र समोर काही कोळसा दुकान आणि फूल दुकान दिसत होते खुप लोकांना माहीती विचारण्याचा प्रयत्न केला पन कोनी कॅमेरा समोर बोलायला तयार नव्हते. ह्या नादात एक दोनदा अपमानाचे घोट ही मिळाले पन हवेली बघुन सगळ विसरून गेलो एका शिख व्यक्तीने छान माहीती देऊन मार्गदर्शन केले.
नंतर 154 नंबर ला भेट दिली. बांधकाम बघुन पुरातन असल्याची जाणीव झाली. दरवाजाच्या एका बाजूला छान नक्षीकाम आजही आहे काही मोठे दरवाजे नावाला म्हणून आजही उभे आहे. हवेली ही पुर्णपणे विकली गेली असुन सध्या नमकहराम हवेली मध्ये सोईनुसार बांधकाम करुन 600 कुटुंब राहत आहे.
भवानीशंकर बक्षी याच्या मृत्यू नंतर हवेली विकण्याचा प्रयत्न केला गेला पन साधारण 8 ते 9 दशके हवेली पडत्या भावानेही कोनी घेतली नाही. नंतर भारताच्या स्वातंत्र्य युद्धात त्या हवेलीच्या नावाला शोभेल अशी घटना घडली स्वातंत्र्य सेनानी मारण्यासाठी पिछा करत असताना एका परिवाराने त्या इंग्रज अधिकार्याला हवेली मध्ये लपवून वाचवले(त्या परिवाराचे नाव मी जानुन सांगु इच्छित नाही).
त्याचे बक्षीस म्हणून ती हवेली त्यांच्या नावे दिली गेली आणि नंतर त्यांनी ती विकली. हवेलीचे नाव परत सार्थ झाले मधल्या काळात तेथे शाळा, मिल असे काही उद्योग चालू झाले मात्र ते दिर्घकाळ चालू शकले नाही. ह्या सर्व इतिहासत महाराजा यशवंतराव होळकर महाराजांवरील तत्कालीन प्रजेचे प्रेम बघुन मन भारावून गेले.
हा इतिहास कळाल्यावर यशवंतराव होळकर हे क्रुर शासक होते हा धाधांत खोटा आरोप आहे हे ह्या नमकहराम हवेली च्या नावामुळे आणि इतिहासा मुळे प्रत्येक व्यक्तीला समजून येईल हे मात्र नक्की महाराजांचे इंग्रजांना देशाबाहेर काढण्याचा लढा आणि देशभक्ती तसेच प्रजेच्या मनातील स्थान याचा प्रत्यय म्हणजे नमकहराम हवेली चा इतिहास आहे असे नक्की म्हणता येईल
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi
- नमकहराम हवेलीची आजची अवस्था - November 17, 2022