हा शिलालेख सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील (होळ ,खामगाव) जवळ असलेल्या मौजे मुरूम गावातील गावाच्या नीरा नदीकिनारी असलेल्या महादेव मंदिर शेजारी असलेल्या चौरसाकृती दगडावर कि जी मंदिराचा प्रवेशद्वारा वरची पट्टी असून त्यावर कोरलेला आहे. शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ३ ओळीचा असून शुद्ध मराठी भाषेत आहे काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत.
गावाचे नाव : मुरूम
ता.फलटण , जि. सातारा
शिलालेखाचे वाचन :
१ श्री सके १७१२ साधारण नाम
२ सवतस रे माघ .शुद्ध १५ श्री मल्हारेश्वर महादेव
३ श्रीमंत महाराणी अहिल्याबाई होळकर सरकार.
- शिलालेखाचे स्थान : महादेव मंदिराच्या बाजूस मोकळी सुट्टी शिळा आहे .
- अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
- भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
- प्रयोजन : श्री मल्हारेश्वर महादेव मंदिर बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
- मिती / वर्ष : अठरावे शतक – सके १७१२ साधारण नाम सवतस रे माघ .शुद्ध १५ (महाशिवरात्री )
- काळ वर्ष : अठरावे शतक – शुक्रवार १८ फेब्रुवारी १७९१
- कारकीर्द : छ .धाकटे शाहू महाराज सातारा ,पेशवेपद – सवाई माधवराव पेशवे
- व्यक्तिनाम : श्रीमंत महाराणी अहिल्याबाई होळकर सरकार
- ग्रामनाम :-
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे
अर्थ : शालिवाहन शकाच्या – सके १७१२व्या वर्षी साधारण नाम सवतसरे माघ .शुद्ध १५ म्हणजेच महाशिवरात्री शुक्रवार १८ फेब्रुवारी १७९१ या दिवशी श्रीमंत महाराणी अहिल्याबाई होळकर सरकार यांनी मौजे मुरूम येथे आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मरणार्थ श्री मल्हारेश्वर महादेव मंदिर बांधले किवा त्याचा जीर्णोद्धार केला .
शिलालेखाचे महत्व :- होळकर घराण्याचे संस्थापक सुभेदार श्री मल्हारराव होळकर यांचा जन्म सातारा जिल्यातील मुरूम या गावी झाला आहे. उत्तेरेकडे स्वरीमध्ये मराठा सरदार यांनी खूप पराक्रम गाजवला आहे, यात मल्हारराव होळकर यांचा मृत्यू२० मे१७६६ मध्ये मध्यप्रदेश येथील भिंड येथील आलमपुरा या गावी येथे झाला. तेथे त्यांची छत्री आहे.
परंतु त्याच्या मूळ जन्म गावी त्यांची (स्णूष्या)सुनबाई श्रीमंत महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या नावाने त्यांच्या जन्म गावी श्री मल्हारेश्वर महादेव मंदिर बांधले .
याच वर्षी मल्हार राव होळकर यांचा पुत्र तुकोजी होळकर यांनी शके 1712 साधारण नाम सवत्सरात जेजुरी येथे वडिलांच्या नावे मल्हार गौतमेश्वराचे महादेव मंदिर बांधले आहे.
आपल्या पूर्वजाच्या जन्माची व पराक्रमची आठवण म्हणून त्यांच्या नावाने नवीन मंदिर बांधनारे पुत्र तुकोजी होळकर आणि सूनबाई पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर हे एकमेव कुटुंब आहे .यातून सुभेदार मल्हारराव होळकर यांचे जन्म गाव हे सातारा जिल्ह्यातील मुरूम हेच गाव आहे हे सिद्ध होते .हेच या शिलालेखाचे महत्व आहे.
संक्षेप :- संवत्सरे –सवतछरे ,मा.-माघ ,शु .-शुद्ध
संदर्भ -(IE VI -3८४ )
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021