पानिपताने हताश न होता मराठ्यांनी पुन्हा कंबर बांधली. या कामात भोसले, माधवराव व सुभेदार मल्हाराव होळकर हे अग्रगण्य होते. माधवरावांनी दक्षिणेकडील मोंहीम हाती घेतली व शिंदे, होळकरांनी उत्तरेकडील मोहीम हाती धरली.
- अहिल्यादेवींच्या काळातील बारवांची माहिती
- अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरांची माहिती
- अहिल्यादेवींच्या काळातील ऐतिहासिक वास्तू
इ. स. १७६१ पासून इ. स. १७६६ पर्यंत म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या घडीपर्यंत मल्हाररावांनी उत्तरेच्या राज्याला समर्थपणे धरून मराठ्यांची घडी पुन्हा पूर्ववत बसवून दिली. वरील विश्लेषणावरून मल्हाररावांच्या अंगी असलेल्या विविध नेतृत्व गुणांचा परिचय होतो. ते तत्कालीन कालखंडातील अत्यंत शूर, मुत्सदी, धाडसी नेतृत्व मराठ्यांना लाभले होते.
इ. स. १७६६ मध्ये दुसऱ्यांदा मराठ्यांनी उत्तर मोहीम आखली. या मोहिमेचे नेतृत्व रघुनाथरावराव दादाकडे होते. होळकर, शिंदेही सोबत होते परंतु त्याचवेळी मल्हाररावांना कानाची व्यथा झाली. “अलंपूर प्रांत झासी या मुकामास आल्यावर श्रीमंत सुभेदार बहुतच काहली झाले दैवी मानवी उपाय करून अनुष्ठान दानधर्म बहुत काही केले आयुमर्याद करून गुणास न येता शेवटी भूमीवर उतरले, उपरातीक दुसरे रोजी वैशाख श. ११ मंगळवारी पावणे दोन प्रहर दिवस येता देवाज्ञा झाली.”
अशा रितीने मल्हाररावांचा मृत्यू १६ एप्रिल १७६६ ला आलमपूर, ता.लहार जि.भिंड(म.प्र) येथे झाला. मृत्यूनंतर खंडेरावांचा मुलगा मालेराव यांच्या हाती इंदोरचा राज्यकारभार आला. त्यांना होळकरांची सुभेदारीची वस्त्रे मिळाली.
सुभेदार मालेराव होळकर ह्यांचे नाव सनद की तुम्हावर सर्व प्रकारे कृपा असे तर कैलासवासी मल्हारजी होळकर याप्रमाणे सरंजाम महाल गाव, खेडी, सुदामतप्रमाणे सरहुकूम सरदारीचा बंदोबस्त करून फौज सरंजामनिशी सेवा एकनिष्ठपणे करीत जाणे. सन १७६६ मध्ये मालेरावास सुभेदारीची वस्त्रे मिळाली. त्यावेळी पेशव्यांनी अहिल्याबाई होळकरांना पत्र पाठविले होते. ते पुढीलप्रमाणे, “सविस्तर गंगाधर यशवंत सांगतील. त्याप्रमाणे तजवीज करून आपला सर्व बंदोबस्त महाल, गाव, खेडी याचा अर्थ पूर्ण करणे.”
पेशव्यांच्या पत्रानुसार मालेरावास फौज देऊन जवाहरमाल जाटाच्या मोहिमेवर पाठविले. जवाहरमल जाटाने गतवर्षाची खंडणी मान्य केल्याने मालेराव या मोहिमेहून इंदोरला परत आले. परत आल्यावर मात्र, त्याची प्रकती बिघडली. १७६७ रोजी मालेरावाचे निधन झाले.
यानंतर तुकोजींनी मुलखगीरी करावी आणि कारभार अहिल्याबाईंनी करावा असे ठरले. याबाबतचे महादजी शिंदेंचे पत्र अतिशय बोलके आहे ते लिहितात, “होळकरांच्या घरची चाल सर्वत्र माहितीच आहे. कै. सुभेदार असता गौतमाबाई कारभार करीत होती. ती वारल्यावर पुढे अहिल्याबाई कारभार करू लागली. ही चाल त्यांचे घरी पहिल्यापासोन आहे नवी नाही.” म्हणजे पर्यायाने तुकोजींना होळकरशाहीची वस्त्रे मिळाली तर सर्व कारभाराचे अधिकार मात्र अहिल्याबाईंच्याच हातात होते. केवळ मोहिमेची जबाबदारीच ती काय तुकोजीरावांकडे होती.
संपूर्ण इतिहास – राणी अहिल्यादेवी होळकरांचा समग्र इतिहास
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021
Mast bhau. Nice history for dhangar samrajya..