Skip to content

परदेशात असलेल्या होळकरांच्या मौल्यवान वस्तू

भारत विकासशिल आणि प्रगतदेशांपैकी एक देश होता. त्याला पूर्वी “सोने की चिडिया” म्हणून ओळखल्या जायचं, या भारतवर्षात अनेक साम्राज्य होऊन गेली त्यातील सर्वात प्रभावशाली “मराठा” साम्राज्य याच मराठासाम्राज्यातील उत्तरेतील बुरुज मानल्या जाणाऱ श्रीमंत होळकर घराणं, ह्या पराक्रमी घरान्याने कटक ते अटकेपर्यंत स्वराज्य नेण्यास अग्रस्थान पत्करले होते.

भारतात अनेक विदेशी सत्ता होऊन गेल्या त्यांच्याचपैकी एक “ब्रिटिश राजवट” ब्रिटिशांनी DIVIDE AND RULES हे सूत्र वापरून १८५८ ते १९४७ पर्यंत राज्य केलं. भारत हे लोकशाही राज्य म्हणून ओळखल्या जावे, म्हणून भारतात राजेशाही अंमल असतांनाही अनेक संस्थानिकांनी आपली राजेशाही त्यागली त्यात सर्वात आधी जर कुणाचे नाव असेल तर इंदूर संस्थानचे श्रीमंत होळकर ब्रिटिश भारत सोडून गेले.

पण भारतातील खूप काही मौल्यवान वस्तू त्यांनी नेल्या तो बेशोकिमती “कोहिनूर” असो की महाराजा यशवंतराव होळकर यांची “रत्नजडित तलवार” किंवा मग शिखांचे राजे महाराजा रणजितसिंह यांचे “सोन्याचे सिंहासन” ह्या वस्तू इंग्रजांनी टप्पाटप्पाने भारतातून नेल्या.

काही वस्तू विकत घेतल्या तर काही इथल्या संस्थानिकांनी त्यांना भेटस्वरूपात दिल्या तर काही त्यांनी मुसद्देगिरीने पळवून नेल्या त्यांच्याचपैकी एक मौल्यवान कोहिनूर हिरा. “कोहिनूर” हा आंध्रप्रदेशातील गोलकुंडाच्या खाणीत सापडला असे सांगितल्या जाते. अल्लाऊंद्दिन खिलजी, शाहजहान नंतर अहमद शाह अब्दाली कोहिनूर अफगाणिस्थानत घेऊन गेला.

पुढे त्याचाच वंशज शाह सुजा दुर्रानी त्याला भारतात घेऊन आला त्यांने तो शिखांचे राजे महाराजा रणजित सिंह यांना दिला. कालांतराने महाराज रणजितसिंहाच्या मृत्युनंतर त्यांचे ११ वर्षीय पुत्र महाराजा दुलीपसिंह यांच्याकडे कोहिनूर आला. त्याचाच फायदा घेत इंग्रजांनी अग्लो_शीख युद्ध घडवून आणलं आणि लाहोर च्या करारानुसार कोहिनूर इंग्रजांकडे गेला. प्रदेशात कोणत्या होळकरशाहीच्या वस्तू आहेत याची आपण माहिती घेऊयात.

सन १८१७ महिंदपुर येथील होळकर-इंग्रज लढाईमध्ये हि होळकरशाहीची तलवार होती. इंग्रज सेनापती सर जॉन माल्कम याने महाराजा मल्हारराव होळकर(दुसरे) यांच्याकडुन हि तलवार बळकावली.

संदर्भ
Victoria and Albert Museum

सन १८५० मधील महाराज तुकोजीराव होळकर(दुसरे) यांचा काळातील कोट.

संदर्भ
Victoria and Albert Museum

सन १८५२ मधील महाराज तुकोजीराव होळकर(दुसरे) यांच्या काळातील जॅकेट.

संदर्भ
Victoria and Albert Museum

सन १८५२ मधील महाराज तुकोजीराव होळकर(दुसरे) यांच्या काळातील हुडी.

संदर्भ
Victoria and Albert Museum

सन १८७२ मधील महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) यांच्या काळातील पगडी कापड.

संदर्भ
Victoria and Albert Museum

१९ व्या शतकातील महाराजा होळकर यांची तलवार.

संदर्भ
Victoria and Albert Museum

१९ व्या शतकातील महाराजा होळकर यांची तलवार.

संदर्भ
Victoria and Albert Museum

९ मार्च १८७६ रोजी प्रिन्स ऑफ वेल्स, किंग एडवर्ड सातवा” यांनी इंदूर शहराला भेट दिली. किंग एडवर्ड सातवे हे भारत दौऱ्यावर होते त्यांचा हा भारतीय उपखंडवरचा शेवटचा मुक्काम ह्या शहरात होता. त्यांनी भारतातील राज्यकर्त्यांसाठी एक रिसेप्शन आयोजित केले होते आणि इंदूरचे महाराज तुकोजीराव(दुसरे) होळकरांनी प्रिन्सच्या भेटीच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या मेजवानी आणि बॉलमध्ये त्यांनी भाग घेतला होता. महाराज तुकोजीराव होळकर द्वितीय यांनी किंग एडवर्ड यांना अनेक वस्तू सादर केल्या होत्या. त्यांच्याचपैकी काही वस्तू,

संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust
संदर्भ
Royal Collection Trust

भारत आणि परदेशातील संग्रहालयात श्रीमंत होळकरांच्या अनेक मौल्यवान वस्तू आणि शस्त्रे आहेत पण हे लोकांच्यासमोर येणं तेवढच महत्त्वाचं आहे. राजराजेश्वर चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर(पहिले) यांचा अंगरखा सरकारी संग्रहालय, अलवर, राजस्थान येथे आहे. त्याचे खालील फोटो व व्हिडीओ पहा.

महाराज यशवंतराव होळकर(पहिले)
यांचा अंगरखा
महाराज यशवंतराव होळकर(पहिले)
यांचा अंगरखा
Watch on Youtube

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *