Skip to content

पुस्तकाचे नाव : ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर

Ahilyabai Holkar Book

माध्यम : मराठी
लेखक : विनया खडपेकर
Category : कथा
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पाने : २९०
किमंत : ३३० रु.

Share This Link:
https://amzn.to/2BqHdH9

सारांश :

अहिल्याबाई होळकर! जन्म ३१ मे १७२५. मृत्यू १३ ऑगस्ट १७९५. ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रुप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळया मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठयांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली. पुस्तकाला मिळालेले पुरस्कार:  महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार २००७-०८.


अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी अधिक पुस्तके पहा : Ahilyabai Holkar Books

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *