Skip to content

पुस्तकाचे नाव : धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास

Dhangar Samaj History in Marathi

माध्यम : मराठी
लेखक : संजय सोनवणी
Category : कथा
प्रकाशक : Amazon AP Pvt.
पाने : २००
किमंत : १५० रु.

Share This Link:
https://amzn.to/2WbUBcY

सारांश :

धनगर एक पशुपालक समाज! आतिशय प्राचीन आदिम समाज.पशुपालन हा जगातील सर्वात जुना व्यवसाय. शेतीपेक्षा ही आधीचा.हा व्यवसाय करणारा धनगर समाज इतका जुना आहे.प्राचीन आहे. खंडोबा, जोतिबा, विठोबा, बिरोबा, मायक्का ही धनगर समाजाची दैवत. तशी ती महाराष्ट्राची दैवत!ती एका अर्थाने या समाजातून आली आहेत. राजकीय वारसाही या समजला लाभला आहे. अलीकडील म्हणजे मध्ययुगात मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची नावे जगप्रसिद्ध आहेत. या पुस्तकात लेखकाने प्राचीन काळातील सातवाहन व मौर्य घराणे हे ही धनगर समाजातून पुढे आलेले आहे अशी मांडणी केली आहे. धनगर समाजाची ही राजकीय घराणी इतिहासकारांनी धनगर म्हणून नोंदवली नाहीत असी खंत लेखकाने प्रस्तावनेत व्यक्त केली आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले ते यशवंतराव होळकर व आद्य महिला स्वातंत्र्य सैनिक भीमाबाई होळकर ह्या देखील धनगर समजातून आल्या आहेत. या पुस्तकामध्ये धनगर समजाची दैवत, वंश परंपरा, रजकर्ते घराणे, इतिहास आणि चाली रिती इत्यादी सविस्तर माहिती वाचायला मिळते. धनगर समाज महराष्ट्रातील प्रमुख समाज.कष्ट करणारा. भटकंतीतून जीवनाचा आनंद शोधणारा. जागरण गोंधळ घालणारा. वाघ्या मुरोळी सोबत जमणारा, बेल भंडारा उधळणारा समाज… यळकोट यळकोट जय मल्हार म्हणणारा समाज मात्र बुजरा आहे. त्या विषयी वाचायला मिळते. धनगर समाजाच्या ज्ञात माहिती स्त्रोताच्या आधारे लिहिलेला साद्यंत इतिहास आहे असा दावा प्रकाशक करतात.

आपल्या समाजाचा गौरवशाली इतिहास वाचाच. हा माझा आग्रह आहे.

कचरू चांभारे
मुख्याध्यापक : जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी, ता.जि.बीड
९४२१३८४४३४


अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी अधिक पुस्तके पहा : Ahilyabai Holkar Books

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *