Skip to content

बाजीरावांकडून मल्हारराव होळकरांना माळव्याची सनद

माळवा विजयाने होळकर, शिंदेंच्या कर्तृत्वाला सुरुवात झाली. या विजयाचे श्रेय प्रामुख्याने होळकर, शिंदे आणि उदाजी पवारांचे आहे. माळवा विजयात उदाजी पवारांची कामगिरी मोलाची ठरली.

“वाटणी संबंधी वाद निर्माण झाला. पवारांना माळव्यात अर्धा मोकासा हवा होता. त्यांना अर्धा प्रांत दिला तर होळकर व शिंद्यांचे काय करायचे असा प्रश् न होता. या प्रकरणामुळे पवार दुरावले. होळकर व शिंदे बळावले. माळव्यांचा स्वतंत्र कारभार होळकर, शिद्यांना देण्यात आला.

२२ नोव्हेंबर १७३१ रोजी मल्हारराव व राणोजीच्या नावे संयुक्त सरंजाम दिला. पेशव्यांच्या उत्तरेकडील राजवटीचे पहिले मोठे सरंजामदार होळकर, शिंदेच होते.

malharrao holkar
मल्हारराव होळकर
राणोजी शिंदे

इ. स. १७३३ साली होळकर, शिंदे यांच्या ताब्यात माळव्यातील जो मुलुख होता तो पाच परगणे व साडेतेरा सरदारे पेशव्यांच्या ताब्यात यावेळी आला असून त्यांनी शिंदे व होळकर सरदारांत वाटून दिली.

यादी – सन सालासीन (इ.स. १७३२-३३) जमा झाले. मजकूर महात्मा निहाय सुभा प्रांत माळवा, ——– , ९० सफर,सरंजामी राजश्री मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे, श्रीमती राजश्री चिमणाजी बल्हाळ महाल बितपशील.

५. कित्ता परगणे मजकूर
१.परगणे डोंगरपूर यांचे वाटणीपैकी एकूण महाल
१. परगणे दाहाद
१, परगणे सालोत
१. परगणे सुप
१. परगणे आळी
१३. कित्ता सरकारने
१. सारंगपूर व उज्जेन
१. सरकार मंदसोर
१. सरकार पिंडावा कोळी गांगुर्णा
१. सरकार भेलसे
१, सरकार मांडवगड
१. सरकार चंदेरी बुद्रक व खुर्द
१. सरकार अढयाबाद
१. सरकार आलमगीरपूर
१. सरकार गदे
१. सरकार रहाबाद
१. सरकार हांडेपैकी महाल ७ एकूण निमे
१, सरकार कोटे
१. सरकार बुंदी
———————–
१३. सरकार

मल्हारराव होळकरांनी बाजीरावांच्या कारकिर्दीत प्रत्येक युद्धात, मोहिमेत भाग घेऊन मदत केली. माळवा बुंदेल खंड आणि दिल्लीपर्यंत मराठ्यांचे राज्य व प्रभा प्रस्थापित झाली.

माळव्याचे सुभेदार मल्हारराव होळकर | Malharrao Holkar Song

संपूर्ण इतिहास – राणी अहिल्यादेवी होळकरांचा समग्र इतिहास

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]

राहुल वावरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *