होळकरांच्या राज्याला प्राकृतीक सीमा नव्हती. काही परगणे माळवा, राजपुतांना व नेमाड क्षेत्रात तर उरलेले दक्षिणच्या पठरात होते. एकूण एकशे सव्वीस (१२६) परगणे असून सुभेदार मल्हाररावाच्या काळात राज्याचे उत्पन्न साडे चौऱ्याहत्तर लक्ष रुपये होते. अहिल्याबाईंच्या काळात शांतता व सुव्यवस्था असल्याने राज्याचे उत्पन्न सव्वा कोटी झाले होते.
१. राज्याच्या उत्तरेस कोटा व उदयपूरची सीमा लागून होती.
२. दक्षिणेस ग्वाल्हेर, धार, बडवानी, निजाम पेशव्यांचे राज्य होते.
३. पूर्वेस ग्वाल्हेर, देवास, धार व भोपाळ
४. पश्चिमेस बडवानी व डुंगरपूर
५. उत्तर पूर्वीस झालवाडा अशी संस्थान होती.
राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून होळकरांच्या सरदारीचे अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत प्रामुख्याने दोन भाग होते.
१)खासगी जहागीर,
२)जाहगिरी ऊर्फ दौलत,
या दोन पद्धतीविषयी आपण माहिती प्रकरण ७ मध्ये पाहिली आहे.
प्रकरण : ७ – अहिल्यादेवी होळकरांच्या जहागीरीचे स्वरूप
राज्यामध्ये प्रशासकीय व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून भारताच्या इतिहासात प्राचीन काळापासून प्रशासकीय व्यवस्थेचे वेगवेगळ्या राज्यात तत्कालीन राज्याने आपल्या सोयीनुसार प्रशासकीय व्यवस्था तयार केली होती. सुभेदार मल्हारराव होळकरांच्या प्रशासकीय व्यवस्थेत काही सुधारणा अहिल्यादेवींनी केल्या होत्या. त्या खासगी व सरकारी खर्चाचा हिशोब अत्यंत चोख ठेवत असत. मल्हाररावाच्या मृत्यूनंतर काही दिवसच अहिल्यादेवींचा पुत्र मालेराव सुभेदार होता नंतर मात्र तुकोजीराव होळकरांकडे सुभेदारी आली होती. म्हणून अहिल्यादेवींनी प्रशासकीय राज्यकारभार करावा आणि तुकोजीरावांनी सुभेदारी घेऊन सैन्याशी राज्यकारभार करावा अशी अधिकाराची दुहेरी व्यवस्था होती.
मल्हाररावांच्या काळात मल्हारराव होळकर लढाईवर असले म्हणजे ते तलवार गाजवून सर्व खर्च बाहेर पाडे. आवश्यकता असल्यास सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करीत असत. परंतु तुकोजीराव होळकर यांचे दिवाण पैशाचा हिशोब व्यवस्थीत ठेवत नसत. त्यांना अहिल्याबाईंना सातत्याने पैसे पाठवावे लागत असत. म्हणून एके ठिकाणी अहिल्यादेवी म्हणतात की पैशाच्या हिशोबात एक कवडी माझ्याकडे निघाली तर मी त्यास पाचकवडी देईन अशा प्रकारचा विश्वास अहिल्यादेवींना स्वतःच्या प्रशासकीय व्यवस्थेवर होता. तत्कालीन अहिल्यादेवींच्या कालखंडातील प्रशासकीय व्यवस्था पुढीलप्रमाणे.
शाज्याचा मोठ्या विभागांना सरकार असे म्हणत. प्रत्येक सरकारात १० ते ४० जिल्हे असत त्यास परगणा अथवा महल म्हणत. प्रत्येक परगण्यात ५० ते ३०० पर्यंत खेडी होती. परगण्याचे तालुक्यात विभाजन केलेले असे प्रत्येक तालुका ६ ते ३० खेडी मिळून बनलेला असे.
खालीलप्रमाणे होळकरशाहीत काही प्रशासकीय पदे होती.
दिवाण :
होळकर शाहीत दिवाण हा सर्वोच्च अधिकारी होता. त्याची नेमणूक पुणे दरबाराकडून होई त्याला ‘पगारापोटी जहागिरी दिली जात असे त्याशिवाय पालखी, हत्ती, नोकर यांचा खर्चही सरकार तर्फे दिला जात असे, परगण्यातून येणाऱ्या महसूलाचा ठराविक हिस्सा दिवाणाला मिळे. प्रत्येक गावातून हंगामाच्या वेळी २ रुपये मागण्याचा हक्क दिवाणास मिळे. अहिल्याबाईस दौलतीच्या जहागिरीसाठी गंगाधर चंद्रचूड तर अल्पकाळ नारो गणेश शौचे आणि पराशर पंत हे दिवाण लाभले परंतु या दिवाणांनी होळकरशाहीचे हीत न पाहता केवळ स्वार्थासाठी निरनिराळ्या लोकांना हाताशी धरून अहिल्याबाईस घरी बसविण्याचे प्रयत्न केले.
कमाविसदार :
परगण्याचा मुख्य अधिकाऱ्याला कमाविसदार म्हणत. हा सरकारी अधिकारी असे, परगण्यातील सर्व जमा खर्चाचे अंदाजपत्रक कमाविसदाराला वर्षाच्या सुरुवातीस फडणविसाकडून दिले जात असे. मंजूर केलेला खर्च वजा जाता बाकी पैसा त्याला सरकारी खजीन्यात भरावा लागे. राज्याच्या गरजेच्या वेळी (उदा.युद्धप्रसंगी) त्यावेळी पुढील एक किंवा दोन वर्षांचा महसूल आगावू देण्यासंबंधीची मागणी महेश्वर दरबाराकडून होत असे. वाटाघाटी करण्यासाठी कमाविसदारांना महेश्वरी बोलविले जाई. कमाविसदारांनी आगाऊ दिलेल्या रकमेवर शेकडो १ टक्का दराने व्याज आकारण्यास मान्यता दिली जाई.
कमाविसदाराला पगारापोटी ३० हजार रुपये व पालखी दिली जात असे. कमाविसदाराने आपल्या प्रजेशी आचरण योग्य ठेवावा याबद्दल अहिल्याबाईकडून वारंवार ताकीद येत असे. जर रयतेला खुद्द अहिल्यादेवींकडे दाद मागता येत असे. चांदवडच्या कमाविसदाराने एक बोहऱ्यास मार दिला असता अहिल्यादेवींनी कमाविसदारास ताकीद केली. “तिर्थरूप कैलासवासी सुभेदारांनी कोणकोणत्या प्रकारे आणून रयतेचे संगोपन केले. अतःपर गैरवाजवी उफसर्ग लागूनये रयतेची दिलभरी करून गैर न करीत जाणे” परगण्यात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी कमाविसदाराची होती त्याला त्याच्या कामात मंडलोई मदत करीत असे.
मंडलोई व कानूगो :
दूरच्या प्रांतातील कमाविसदारास न्यायदान करावे लागे. परगण्यातील जमिनीची मोजणी महसूल याबाबत माहिती कानूगो दफ्तर असे आणि दफ्तर मंडलोईकडून असून सांभाळण्याची जबाबदारी मात्र कानूगोची असे त्याची नेमणूक वंशपरंपरेने केली जाई.
मिर्धा :
जमीन मोजणाऱ्या अधिकाऱ्यास मिर्धा म्हणत. हे पद बहुदा मुसलमानाकडे रहात असे.
पाटील :
पाटील प्रत्येक गावाचा प्रमुख असून हे पद वंश परंपरेने त्याच्याकडे रहात असे. त्याला १०० ते २०० बिघे जमीन इनाम महसूल मुक्त असे. कर व दंड वसूल करण्याचा याला अधिकार होता.
पटवारी :
गावातील महसूल विषयक दफ्तर सांभाळण्याचे काम पटवारी करीत असे. त्याची नेमणूक सरकारातून केली जाई. चौकीदार, ब्राह्मण, सुतार, न्हावी, धोबी इत्यादी नोकर वर्ग व बलुतेदार यांना जमिनीच्या उत्पन्नातून हिस्सा मिळत असे.
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021