Skip to content

अहिल्यादेवी होळकरांच्या जहागीरीचे स्वरूप

होळकरांच्या सरदारीचे राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत जहागिरीचे प्रामुख्याने दोन भाग होते.
१)खासगी जहागीर,
२)जाहगिरी ऊर्फ दौलत,

खासगी जहागीर :

इ. स. १७३३ मध्ये बाजीराव पेशवे यांचेकडून सुभेदार मल्हारराव होळकरांना आपली पत्नी गौतमाबाईच्या नावाने खासगी जहागीर मिळाली. त्या जहागीरीचे उत्पन्न पुढीलप्रमाणे होते, २६३००० प्रो. महेश्वर चोळी प्रो. इंदूर पो (पैकी) हरसोल प्रो. महतपूर पो. जगोटी व करंज माकडोन, वगौरे ३६०१० दक्षिण प्रांती चांदवड पो गाव कोरेगाव मोगलाईकडील वगैरे ३६०१० दक्षिण प्रांती चांदवड पो. गाव कोरेगाव मोगलाईकडील बरहुकूमयाद २९९०१० यावरून असे दिसून येते की, गौतमाबाईंच्या काळात खासगी जहागीरीचे उत्पन्न ३ लाख रुपये होते.

नंतर खासगी जहागिरीचा प्रदेश वाढत जाऊन अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत १५ लाख रुपये खासगी जहागिरीचे उत्पन्न झाले होते. गौतमाबाईंच्या काळात खासगी जहागिरीचा विनियोग फारसा झालेला आढळत नाही. अशा प्रकारची खासगी उत्पन्नाच्या जहागिरीचे स्वरूप फक्त होळकरांच्या स्त्रियांसाठीच होते. शिंदे, पवार, भोसले, गायकवाड या सरदारांच्या स्त्रियांना ही व्यवस्था नव्हती.

Ahilyabai Holkar android App

सुभेदार मल्हारराव होळकरांना पेशव्यांकडून ती खास स्वरूपात मिळाली होती. त्यामुळे होळकरांच्या स्त्रिया खासगी उत्पन्नाचे प्रशासकीय काम पहात असत. याचप्रमाणे गौतमाबाईंच्या मृत्यूनंतर खासगी व सरकारी प्रशासन अहिल्यादेवीच पहात होत्या. यातूनच त्यांच्या राजकीय व प्रशासकीय नेतृत्व गुणांना वाव मिळाल्याचे संशोधनातून दिसून येते.

गौतमाबाईंच्या तीन सवती आणि अहिल्याबाईंच्या ८ सवती यांना मिळालेले धनही या खासगी मिळकतीत सामावलेले असावे कारण त्या सती गेल्यामुळे त्यांचे किडूकमिडूक असेल ते अहिल्यादेवींच्या गंगाजळीत आपोआप आले असावे. याशिवाय राजपुरुषांना संक्रांत, दसरा या निमित्ताने आणि इतर मंगल कार्याच्या निमित्ताने भेटी मिळत.

अहिल्यादेवी स्वतःला या निमित्ताने दर वर्षी चोळीसाठी म्हणून एक लाख तेरा हजार आठशे रुपये मिळत अशारितीने सुभेदार मल्हाररावांच्या मृत्यूसमयी १६ कोटी रुपये खासगी जहागिरीचे उत्पन्न शिल्लक असल्याचे उल्लेख मिळतात. या १६ कोटी रुपये शिल्लक असलेल्या रकमेवर आणि १५ लाख रुपये उत्पन्नाच्या खासगी जहागिरीच्या प्रदेशावर अहिल्यादेवीची संपूर्ण मालकी होती.

१६ कोटींचे द्रव्य आणि १५ लाखांची मिळकत तसेच प्रत्येक महालातून येणारी शेरी नजराणा असे उत्पन्न खासगी जहागिरीचे होते. प्रत्येक परगण्यातून अहिल्यादेवीस दरमणी दोन शेर या हिशोबाने शेरी नजराण्याचे उत्पन्न मिळत असे. इ. स. १७८० साली पुढीलप्रमाणे शेरी नजराण्याचे उत्पन्न मिळाले होते.

२४, १४५-९-० प्रांत स्वदेश पैकी
०७८६६-११-० प्रांत नेमाडपैकी
५७, २९७ – ०-० प्रांत माळवापैकी
८९,०३०९, ४-० गावगन्ना
शेरी नजराण्याऐवजी गावे
११६६-१०-० प्रांत दक्षिण भाळनेर येथील मौजे भामरे उखलवाडी
१६१५०-०-० प्रांत हिंदुस्थान
२७, ३१६-११-००
११६६-१०-० प्रांत दक्षिण भाळनेर येथील मौजे भामरे उखलवाडी
१६१५०-०-०
२७, ३११६-११-०० चोळीऐवजी फुटगाव
२६, ३०० प्रांत दक्षिण
८७,५०० प्रांत हिंदुस्थान
१३,५०० परगणे सावेर
७००० तालुके केली विजेता परगणे निंबहेडा
१००० तालुके सोमानी प्रांती नखर
१००० मौजे दुर्जनपुरा परगणे हसलपूर
१०००० परगणे कस रिया
१५००० परगणे भोरू पिंपळी प्रांत जैपूर
२०० मौजे सेत
८५,५००
१,१३,८००-०-० तेरीज एकदर जमेबद्दल
८९,३०९-४-० शेरी नजराणा
१,४३,८००-०-० गावगन्ना चोळी व फूटगाव व जहागीर
२५, ३१६-०-० प्रांतवार गावगन्ना
२,३०,४२५-१५-० शिवाय भेटी व नजराणे भेटीची पातळे व बागांपैकी उत्पन्न.

अशा रीतीने प्रांत स्वदेश, प्रांत माळवा, प्रांत नेमाड, प्रांत हिंदुस्थान, प्रांत दक्षिण येथून येणारी शेरी नजराण्याचे उत्पन्न आणि खासगी जहागिरीतील महत्त्वाचे उत्पन्न खासगीकडे जमा होत असे. खासगी जहागिरीच्या कामकाजासाठी निराळी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती. यातूनच अहिल्यादेवींचे प्रशासकीय नेतृत्व घडत होते.

खासगी जहागिरीचा हिशोब सरकारी हिशाबापेक्षा वेगळा ठेवला जात असे. त्यासाठी स्वतंत्र नोकरवर्गाची नेमणूक करण्यात आलेली होती. अहिल्यादेवींच्या काळात गोविंदपंत गानू हे खासगी जहागिरीचे कारभारी म्हणून कामकाज पहात होते. अहिल्यादेवींनी जी लोककल्याणकारी कामे केली जे दानधर्म केला, संपूर्ण भारतभर जी मंदिरे बांधली तो सर्व खर्च खासगीच्या उत्पन्नातून केला, असे संशोधनातून स्पष्ट होते.

सुभेदार मल्हाररावांच्या कारकिर्दीत त्यांच्या जहागिरीत वाढ म्हणजे खासगीच्या जहागिरीतही वाढ होत असे हीच पद्धत अहिल्यादेवींच्या काळातही अस्तित्वात होती. त्यामुळे दौलतीच्या उत्पन्नाबरोबर खासगी जहागिरीचेही उत्पन्न वाढे. उदा. इ. स. १७७० माधवराव रघुनाथ कमाविसदार परगणे मजकूर येथील गाव साल. मजुकरापासून खासगीकडे ठेवित असे, एकूण अठरा गावांची लावणी आबादी उत्तम होणेचा बंदोबस्त करणे.

तेथील कामकाज तहसील वगैरे निराळी दाखवित जाणे. अशा रीतीने खासगीच्या महालात भर पडत असे. गौतमाबाईंच्या कारकिर्दीत गौतमाबाई आणि सुभेदार मल्हारराव होळकरांच्या इतर पत्नी यांचे द्रव्य खासगीच्या जहागिरीत जमा होत होते. याशिवाय सुभेदार मल्हारराव होळकरांची जी खासगी गावे होती यांचे उत्पन्न सरकारात जमा होत असे, तसेच अहिल्यादेवींना अनेक राजपूत राजे, खुद्द मोगल बादशहा यांच्याकडून खासगी इनाम मिळाले होते.

वरील विश्लेषणाचा विचार करता अहिल्यादेवींचे व्यक्तीक राहणी अत्यंत साधी होती. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धन-संपत्ती असूनही त्या कधी विलासी जीवनात राहिल्या नाहीत. हा त्यांच्या व्यक्तिमत्वातील गुण दिसून येतो.

सरंजामी प्रांत आणि जहागीर ऊर्फ दौलत :

सुभेदार मल्हाररावांच्या मृत्यूसमयी ७४११ लाख रुपये उत्पन्न होते. तो अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत १ कोटी ५११ लाखांच्या आसपास झाला. संपूर्ण माळव्याचे उत्पन्न १ कोटी असून त्यापैकी निम्यापेक्षा जास्त माळवा होळकरांच्या ताब्यात होता.

महेश्वर, इंदोरे, नेमावर, पंचमहाल, देपालपूर हा संमपूल बेरमा, सुदरणी, नारायणगड, रामपुरा, भानपुरा, सावेर, तराना, कामथा, महिदपूर, जीरापूर, माचलपूर, पिंपलोर इत्यादी उत्तरेकडील परगाणे तर दक्षिणेकडील वाफगाव, चांदवड, संगमनेर, अंबड, वेरूळ, आडगाव(नाशिक), खानदेशात खुलतानपर, नंदूरबार, नेमाडमध्ये खरगोन, सनावद, बढवाल, सेंधवा, भीकनगाव, जामली, इस्लामाबाद, हवेली, राजस्थानात टोक, तोडा, रामपुरा, अन्य प्रदेशात झाबुका, जाबदा, सिरोंज हे प्रदेश होळकरांच्या जहागिरीचे होते.

खासगी जहागिरी प्रमाणेच दौलतीच्या उत्पन्नावरही अहिल्यादेवींचे नियंत्रण होते. तथापि राज्यकारभाराच्या सोयीसाठी दौलतीचे तीन भाग करण्यात आले होते. सातपुड्याच्या दक्षिणेचा भाग, स्वदेश व खानदेश, सातपुड्याचा भाग महेश्वर व जवळपासचा प्रदेश, महेश्वरच्या पलीकडचा उत्तर विभाग प्रांत, इंदोर, तराणा व राजपुतन्यातील काही प्रदेश या ठिकाणी अहिल्याबाईंनी प्रशासनात केलेल्या काटेकोर नियोजन लक्षात येते.

सुभेदार तुकोजी होळकर जेव्हा दक्षिण भागाची व्यवस्था पाही तेव्हा उत्तर विभागाची व्यवस्था अहिल्यादेवीं पहात. तुकोजी उत्तरेत असेल तर ते उत्तरेची व्यवस्था पहात असे. त्यावेळी अहिल्याबाई मध्यविभाग आणि दक्षिण विभागाची व्यवस्था पहात असे. मध्य विभागावर अहिल्याबाईचे कायम नियंत्रण असले तरी माळव्यातील तीन महाल, नेमाडमधील महाल असे चार महालाखेरीज संपूर्ण माळव्यातील होळकरांचा प्रदेश तुकोजीबाबा आपल्या नियंत्रणाखाली पहात असे.

याशिवाय देशीचे व खानदेशाचे २५ लाख उत्पन्नाचे महाल तुकोजीबाबांकडे होते. हिंदुस्थानातील प्रदेशाचा कारभारही श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकरांकडेच होता. तुकोजीबाबा उत्तरेत स्वारीत असतानाही अहिल्यादेवींनी देशीच्या महालाची व्यवस्था पाहिली. परंतु कारभारात हस्तक्षेप मात्र केला नाही.

परंतु निकड भासली म्हणजे देशीच्या कामविसदारांना बोलावून हिशोब केलेत आणि ते तुकोजीबाबांकडे रवाना केले आणि खासगी बरोबरच सरकारी दौलतीचे व्यवहार चोख ठेवले. वरील विश्लेषणावरून अहिल्याबाईंचे प्रशासकीय नेतृत्वाचे विविध पैलूया ठिकाणी लक्षात येतात.

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.
राहुल वावरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *