राणी अहिल्यादेवींचे सामाजिक कार्य संपूर्ण भारतात चालू असे. सुभेदार तुकोजीराव होळकर दूरच्या मोहिमेवर जात असतं. होळकरांच्या दौलतीचे व खासगी जहागिरीचे अधिकारी निरनिराळ्या प्रांतात कार्यरत रहात असतं.
त्यांना वेळेवर आपले आदेश पोहोचविणे, आपल्या प्रजेची सुख, दुःख कळणे इतर राज्यकर्त्यांशी संपर्क साधने, या व इतर अनेक कारणांनी अहिल्यादेवींनी पूर्वीच्या डाक व्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून तिची नव्याने रचना केली होती.
महेश्वर(मध्यप्रदेश) ते पुणे(महाराष्ट्र) ही नित्य स्वरूपाची डाक व्यवस्था असून इतर डाक व्यवस्था नैमितीक स्वरूपाची होती. तिला स्थापनेच्या दृष्टीने स्थळाची मर्यादा नव्हती. राणी अहिल्याबाईंना ती आवश्यक वाटे.
त्यावेळी हरकारा, सवार किंवा कासीद यांना पाठवून आपल्या आज्ञा किंवा पत्रे त्या पाठवित असत, तशीच व्यवस्था होळकरांच्या राज्यातील सावकारसुद्धा करीत असत. अहिल्यादेवींच्या वेळी या व्यवस्थेला डाक बसविणे असे संबोधले जाई.
राज्यांच्या अंतर्गत ठराविक ठिकाणी डाकी चौकी निर्माण केलेली असे. पत्र घेवून जाणाऱ्या कासीदांचे वर्ग किंवा श्रेण्या निर्माण करण्यात आले होते. हरकारा, राऊत, पियादा, रसानगिदार, जथेदार, जथेदारांना हेर म्हणून ओळखले जात असे आणि तेच डाक व्यवस्थेचे ठेकदार असून टपाल पोहचविण्याचा मक्ता घेत.
कासी सामान्यत: पायी चालत कासीदची दोन व्यक्तीची एक जोडी रहात असे तसेच काही कासीद जोड्या, उंट, घोडे यांचा वापर डाक पोहचविण्यासाठी करीत.
महेश्वर ते पुणे या अंतरातील डाक व्यवस्थेमध्ये प्रमुख चार टप्पे व २० गावे होती, ती खालील प्रमाणे.
- पहिला टप्पा : महेश्वर पासून थाळनेर पर्यंत – ४० कोस,
- दुसरा टप्पा : थाळनेर पासून चांदवड पर्यंत – ४० कोस,
- तिसरा टप्पा : चांदवड पासून संगमनेर पर्यंत – ३० कोस,
- चोथा टप्पा : संगमनेर पासून पुण्यापर्यंत – ४२ कोस.
२० गावे खालील प्रमाणे,
- नावडा तावडीस, ता.कसरावद जि.खरगोण(मध्यप्रदेश),
- बलकवाड, ता.कसरावद जि.खरगोण(मध्यप्रदेश),
- नागलवाडी, ता.सेंधवा जि.बडवाणी(मध्यप्रदेश),
- थवरगड, ता.सेंधवा जि.बडवाणी(मध्यप्रदेश),
- सांगवी, ता.शिरपूर जि.धुळे(महाराष्ट्र),
- थाळनेर, ता.थाळनेर जि.धुळे(महाराष्ट्र),
- कापडणे, ता.जि.धुळे(महाराष्ट्र),
- लळींग, ता.जि.धुळे(महाराष्ट्र),,
- टोके(शोध चालू आहे),
- मालेगाव, ता.मालेगाव जि.नाशिक(महाराष्ट्र),
- दहीगाव(जि.नाशिक महाराष्ट्र),
- पाटोदे, ता.येवला जि.नाशिक(महाराष्ट्र),
- शेरास(शोध चालू आहे),
- संगमनेर, संगमनेर जि.अहमदनगर(महाराष्ट्र),
- आंबे धारगाव, ता.संगमनेर जि.अहमदनगर(महाराष्ट्र),
- आळे, ता.जुन्नर जि.पुणे(महाराष्ट्र),
- लोणी, ता.आंबेगाव जि.पुणे महाराष्ट्र),
- भीमेचे काठी(जि.पुणे महाराष्ट्र),
- पुणे(जि.पुणे महाराष्ट्र),
- सरबरा(जि.पुणे महाराष्ट्र),
यासी कासीद जोड्या पाच कोसा कोसांवर जोडी एक प्रमाणे जोड्या ३४ यास, दरमहा रुपये २४० डाक चौकीच्या जोड्या ३० असाव्या. ६० दर ४ रुपये ४८ सरबाईच्या जोड्या ४ असाव्या, ८ दर ६ प्रमाणे २८८.
इ.स. १७९२ मध्ये अहिल्याबाईंनी महेश्वर ते पुणे या अंतरासाठी ३४ कासीद जोड्या नियुक्त करून त्यांना २८८ रुपये पगार दिला होता. या स्वारींनी दर महिन्यास येऊन डाक पोहोचती करावी पाच सात दिवसांच्या अंतराने पुण्याची डाक घेऊन यावी आणि या वेळेत जर कमी जास्त दिवस झाले तर किंवा कागदाची गफलत झाल्यास कासीदाला कामावरून कमी करण्यात येत असे. बऱ्याच वेळा समाचार पत्रे हे विशिष्ट व्यक्ती मार्फत, सांकेतिक भाषेत पाठविली जात असे.
काही महत्त्वाची पत्रे यात्रा करणाऱ्या ब्राह्मणा बरोबर पाठविली जात. बल्लाळ पेशवे यांना अहिल्याबाई यांनी वेदमुर्ती खुशालीराम यांच्या बरोबर पत्र पाठविण्याचे उल्लेख मिळतात.
अहिल्याबाईंनी निर्माण केलेल्या या योजनेमुळे परराज्यात त्यांनी नियुक्त केलेल्या वकिलांमार्फत येणारी पत्रे. संपूर्ण भारतात चालू असलेली बांधकामे, अंतर्गत राज्यातील खबरी ताबडतोब मिळून त्यानुसार निर्णय घेता येत असे व आपल्या प्रजेवर आलेले संकट निवारण करता येई. या व्यवस्थेमुळे त्यांचा पुणे दरबाराशी सतत संपर्क राहत असे.
२० गावांचे Google Map Location व तेथील होळकरकालीन वास्तू –
१. नावडा तावडीस, ता.कसरावद जि.खरगोण(मध्यप्रदेश),
होळकरकालीन पत्रात “नावडा तावडीस” असा गावाचा उल्लेख आहे. मात्र त्या गावाचे सध्याचे नाव “नावडा टोडी” असे असून, ते कसरावद या शहराचा एक भाग आहे.
२. बलकवाड, ता.कसरावद जि.खरगोण(मध्यप्रदेश),
३. नागलवाडी, ता.सेंधवा जि.बडवाणी(मध्यप्रदेश),
४. थवरगड, ता.सेंधवा जि.बडवाणी(मध्यप्रदेश),
होळकरकालीन पत्रात “थवरगड” असा या ठिकाणाचा उल्लेख आहे. मात्र त्या ठिकाणाचे सध्याचे नाव “भवरगड” असे आहे. होळकरकालीन या किल्ल्याचा निर्माण १७ व्या शतकातील असून तो “बिजासन गड” म्हणून हि ओळखला जातो. सेनिकी छावणी म्हणून या किल्ल्याचा वापर होळकरांनी मोठ्या प्रमाणात केला.
५. सांगवी, ता.शिरपूर जि.धुळे(महाराष्ट्र),
१२. पाटोदे, ता.येवला जि.नाशिक(महाराष्ट्र),
१५. आंबे धारगाव, ता.संगमनेर जि.अहमदनगर(महाराष्ट्र),
होळकरकालीन पत्रात “आंबे धारगाव” असा गावाचा उल्लेख आहे. मात्र त्या गावाचे सध्याचे नाव “घारगाव” असे आहे.
१६. आळे, ता.जुन्नर जि.पुणे(महाराष्ट्र),
आळे गावात होल्करकालीन मंदिर व पायविहीर असून ते मंदिर होळकर बाबाचे मंदिर व ती पायविहीर “होळकरी विहीर” म्हणून प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात मंदिराचे व विहिरीचे नव्याने काम झाल्यामुळे जुन्या खुणा शिल्लक नसून, मंदिरामध्ये होळकर कालीन मूर्ती नजरेस पडते.
१७. लोणी, ता.आंबेगाव जि.पुणे महाराष्ट्र),
होळकरकालीन पत्रात “लोणी” असा गावाचा उल्लेख आहे. मात्र त्या गावाचे सध्याचे नाव “लोणी-धामणी” असे आहे.
संदर्भ
होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग – 1
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021