Skip to content

अहिल्यादेवींचा राजकीय व प्रशासकीय नेतृत्वाचा विकास

सुभेदार मल्हाररावांचा आपल्या सुनेच्या योग्यतेवर पूर्ण विश्वास होता. अहिल्याबाई या बुद्धीमान, कुशाग्र असल्याने राजकारभाराची जबाबदारी अहिल्याबाईवर सोपवत. अहिल्याबाई ती सर्व कामे अतिशय चातुर्याने करीत असत.

खंडेरावाच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांच्या विनंतीवरून अहिल्यादेवी सती न जाता राजकारभारात सक्रिय झाल्या. सुभेदार मल्हारराव लढाईवर असताना अहिल्याबाईंना वेळोवेळी पत्र पाठवून राजव्यवहाराचे, रणनितीचे, युद्ध साहित्याचे, प्रजापालन, न्यायदान, प्रशासन याविषयी सूचना करत असत.

अहिल्याबाईस राजकीय व प्रशासकीय कारभाराचे शिक्षण मिळत गेले. मल्हारराव होळकर हे अहिल्याबाईचे राजकीय गुरू झाले.
मल्हाररावाने अहिल्याबाईस पाठविले पत्र पुढीलप्रमाणे –“चिरजीव अहिल्याबाई प्रति, मल्हारजी होळकर आशीर्वाद उपरी कुशल जाणोत राजकीय लिहित जाणे. विशेष आपणास पत्र श्रीमंतांचे की, रा. कुसाजी शिंदे मौजे पिंपरखेड येथील संबुगीर गोसावी याने कुसाजी मजकूर याचा शेतमळे व घर जप्त केले म्हणून कळले. त्यास वाफगावी जेथे मुले माणसे त्याची असतील तेथे तुम्हा गोसावी यासी ताकीद उत्तम प्रकार करून इसम मजकुराची जप्ती सेतमळे याची जे असतील त्याची ताकीद करून सोडून द्यावी.” हे पत्र लिहिले आहे(३.१२.१७६२)

वरील पत्राच्या विश्लेषनाचा विचार करता शंभूगीर गोसावीयाने पिंपरखेडच्या कुसाजी शिंदे पाटलाचे शेतमळे व घर जप्त केले होते व त्याच्या पुतण्यास वाफगावी कैदेत ठेवले होते. पेशव्याने दिलेल्या आज्ञेप्रमाणे जप्ती दूर करून शेतमळ्याची मोकळीक करावी व वाफगावाहून त्याच्या पुतण्यास सोडवावे याबाबत मल्हाररावाने अहिल्याबाईस सांगितले होते.

मल्हाररावाने आपल्या हयातीतच एखाद्या व्यक् तीस इनाम देणे, रोजगार देणे, अशी राज्यकारभारविषयक कामे अहिल्याबाईकडे सोपविली होती व तिला राज्यकारभारात तरबेज करून पुढील तजवीज करून ठेवली होती. अशा प्रकारे आपल्या सुनेला मुलगा मानून मल्हाररावाने अहिल्याबाईच्या नेतृत्वगुणांना वाव दिला.

अहिल्याबाईंच्या सासू गौतमाबाई यासुद्धा कर्तव्य कठोर होत्या. त्याचा प्रभावही अहिल्याबाईंच्यावर पडल्याचे दिसून येतो. मल्हारराव युद्ध मोहिमेवर असताना युद्धाची सविस्तर माहिती अहिल्याबाईस कळवीत असे. दुसऱ्या पत्रात पुढील प्रमाणे उल्लेख मिळतात. सोनपत पानपतचे लढाईवर जाते समयी हरी प्रसाद भट परसोई यांनी प्रश् न दिला होता याज करीता भटची यास २५ बिगे जमीन व चार आणे प्रमाणे रोजींदा करुन देण्याबद्दल अहिल्याबाईचे नावे पत्र होते.(०६.०९.१७६२)

अशा प्रकारे मल्हारराव पानिपतच्या लढाईवर निघते समयी हरिप्रसाद भट परसाई याने ज्योतिष विषय सल्ला दिला होता. त्यामुळे त्यास २५ बिघे जमीन व रोजचे ४ आणेदेण्याविषयी पत्रातून मल्हाररावानी अहिल्याबाईस सांगितले होते. अशा प्रकारे वरील विश्लेषणाचा विचार करता पुस्तकी शिक्षणापेक्षाही प्रत्यक्ष शिक्षण व्यवहाराला अत्यंत उपयोगी पडते व तेच अहिल्याबाईला जास्त मिळाले.

पुस्तकी शिक्षण कथा पुराणांच्या माध्यमातून झालेले होते. परंतु प्रत्यक्षरित्या घेतलेल्या व्यवहारी शिक्षणाचा त्यांना राज्यकारभारात उपयोग झाला. इंदोर स्टेट गॅझेटिअरमध्ये असे म्हटले आहे की, मल्हारजी हे जेव्हा जेव्हा बाहेर जात असे तेव्हा ते आपला सर्व कारभार सुनेवरच सोपवून जात असे.

त्यावेळची कागदपत्रे पाहिली म्हणजे तोफांच्या गाडीचे पाटे घेणे अथवा संस्थांच्या बगीच्यास लागणाऱ्या बैलगाड्या घेणे ह्या व्यवहारी गोष्टींचा व राजकीय नेतृत्वाचा विकास झाला.

संपूर्ण इतिहास – राणी अहिल्यादेवी होळकरांचा समग्र इतिहास

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.
राहुल वावरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *