राजराजेश्वर मंदिर : वाफगाव, ता.खेड जि.पुणे(महाराष्ट्र)

वाफगाव येथील होळकरकालीन किल्ल्याच्या बाहेर राजराजेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे असून या मंदिराचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. या मंदिरासमोर दगडी मेघडबरीमध्ये नंदीचे भव्य वास्तू स्थित असून नंदीच्या गळ्यातील घंटा व रेखीव काम सुरेख आहे.


हे मंदिर बंदिस्त स्वरुपात आहे. हे मंदिर पाहिल्यावर आपणास होळकर कालीन रेखीव व सुरेख दगडी कामाचा बोध होतो. या मंदिरच्या नक्षीदार बांधकामात महेश्वर किल्ल्याची समरूपता पाहवयास मिळते.

मंदिराच्या बाजूच्या चौथऱ्यावर पूर्वी धर्मशाळा होती. मंदिराच्या गाभाऱ्यात आजही होळकर कालीन पूजेच्या पुरातन वास्तू पाहावयास मिळतात. एका कलशावर “तुकोजी होळ” अशी अक्षरे दिसतात. एक नक्षीदार घंटी आणि शिसवी पेटी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या लॅच पद्धतीची कुलूप कशी असतात तशी कुलुपी पद्धत आहे. दरवाजा लोटून घेताच आतून कडी लागते आणि एका लांब चपट्या किल्लीनेच ते उघडता येते.


अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेली मंदिरे पाहण्यासाठी Click करा.
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021
Pingback: किल्ले वाफगाव - महाराज यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ | Ahilyabai Holkar