मराठ्यांचे वर्चस्व उत्तर भारतामध्ये वाढत होते, बाहरी आक्रमणाचे मुख्य केंद्रबिंदू असणारा माळवा प्रांत हा जणू भुरुजच मानल्या जायचा. त्या काळी दिल्लीची आणि माळव्याची सत्ता ज्यांच्याकडे असायची तेच भारतावर अधीराज्य करत होते.
असा हा माळवा प्रांत चाणक्य, अनुभवी आणि शक्तिशाली असणाऱ्या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(१) यांच्याकडे आला. भारतातील धनाने आणि शक्तीनेही श्रीमंत असणार होळकर घराणं होय. इंदुरात होळकरांची गादी होती.
श्रीमंत मल्हारराव होळकर यांची दहशद उत्तर भारतामध्ये एवढी होती की शत्रूंच्या सेना “मल्हार आया मल्हार आया” ह्या गर्जनेनेच कोसभर दूर पळून जायच्या. भारतातील अनेक राजे-राजवाड्यांचा मल्हारराव होळकर यांचं नाव ऐकताच थरकाप उडत असे, संपूर्ण भारतामध्ये होळकरांच्या विरुध्द उभं राहण्याची ताकद कुठल्याच राज्याकडे नव्हती.
- नाव : होळकर सरदारांचे प्रशासन
- Category : शोधप्रबंध
- पाने : ४६२
- किमंत : ७४५
(झेरॉक्स मध्ये उपलब्ध, कव्हर, बायडिंग)
श्रीमंत मल्हारराव होळकर आपल्यावर चालून येत आहे असं जयपूर रियासतीच्या सवाई ईश्वरीसिंहाना कळताच त्यांनी आत्महत्या केली.
श्रीमंत मल्हारराव होळकर हे श्रीमंत पेशव्यांसाठी वंदनीय होते. त्यांना सर्वजण प्रेमाने “मल्हारबा” असे म्हणत म्हणूनच मल्हारबांचा निर्णय अंतिम असायचा, श्रीमंत पेशवे त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते आणि छत्रपतीसुद्धा मल्हारबांचा आदर करत.
सन १७४२ मध्ये मोहिमेवर असतांना मल्हारबा काशीला आले विश्वनाथाचे मंदिर अनेकदा पाडण्यात आलं. त्याचं पुनःनिर्माण पण अनेकदा झालं. मल्हारबांना असे समजले की…” सण ९ एप्रिल १६६९ मध्ये औरंगजेबाने फर्मान काढून काशी विश्वनाथाचे मंदिर तोडण्याचा आदेश दिला आणि सदर काम साडेचार महिन्यात मुघलसेनेने पूर्ण केले.
- नाव : इतिहासातील अहिल्याबाईंचे योगदान
- Category : शोधप्रबंध
- पाने : ३२४
- किमंत : ५५५
(झेरॉक्स मध्ये उपलब्ध, कव्हर, बायडिंग)
तेव्हा मल्हारबांनी तिथे पुन्हा मंदिर उभारण्याचा पवित्रा घेतला पण अवधच्या नवाबाच्या हस्तक्षेमुळे हे काम पूर्ण झाले नाही मग मल्हारबांनी जणू रुद्ररूपच धारण केले. १७५२ च्या तहानुसार आग्रा व अजमेर येथील कर वसुलीचे हक्क मराठ्यांना मिळाले, सन १७५४ मध्ये कुंभेरीच्या युद्धात लढत असतांना मल्हारबांचे पुत्र खंडेराव होळकर यांना वीरमरण आले.
माळव्याच्या भविष्याचा घात करून वर्तमानाने त्याला भूतकाळाच रूप दिलं होतं. मातोश्री सती गेल्या नाही दुःखातून सावरून माळव्याचा कारभार बघत होत्या. सण १५५७ मध्ये मल्हारबांची दिल्लीवर दुसरी चढाई होती मराठ्यांनी काहीच दिवसात दिल्ली गाठली.
सोबत रघुनाथराव पेशवे, मानाजी पायगुडे, सखाराम बापू, दत्ताजी शिंदे आणि अंताजी माणकेश्वर होते. पुढे पंजाबकडे मराठ्यांच्या मोर्चा वळाला लाहोर घेत सन ८ मे १७५८ मध्ये तंजावर ते अटक(पाकिस्तानमधील मुख्य शहर) ,पेशावर पर्यंत स्वराज्याचा भगवा रोवला गेला आणि अटक पासून कटक पर्यंत मराठयांचं राज्य स्थापन झाले.
सन १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतचे युध्द घडले. अब्दालीचा अलिखित विजय झाला आणि मराठी साम्राज्य हलवून गेला. सन २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारबांचा मृत्यू झाला. त्यांचं काशी विश्वनाथ मंदिर बांधण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं.
त्यांच्या नंतर त्यांचे पोत्र(नातू) मालेराव होळकर गादीवर आले. त्यांचाही अल्पशा आजारामुळे काही महिन्यातच मृत्यु झाला. मातोश्री दुःखातून सावरल्या आणि पानिपताच्या युध्दानंतर भारताचं स्वरूप बदलण्याचं काम त्यांनी केलं. ग्वाल्हेरच्या शिंद्यांना त्यांनी खूप मदत केली.
त्या माळव्याच्याच नाही तर अखंड भारताच्या “मातोश्री” होत्या, राण्या असंख्य झाल्या ह्या जगात पण ज्या मातेला जिवंतपणी जनतेने “देवी” संबोधले अश्या गंगाजळनिर्मळ अहिल्यादेवी होळकर. त्यांनी एका हाती शस्त्र तर दुसऱ्या हाती शास्त्र घेऊन राज्य केलं.
अखंड भारतात प्रजाहितदक्ष कार्य केलेत त्यांनी अन्नछत्रे, बारव, विहिरी, तलाव, रस्ते, धर्मशाळा, विश्रामगृह, पाणीपोई, नदीघाट आणि माळव्यात कृषी, क्रीडा, उद्योग आणि महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं.
भारतात स्त्रियांची सेना त्यांनी बनवली तसेच अनेक मंदिरे त्यांनी बांधली. हिंदूंची राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत व्हावि हा पण एक त्यांचा मंदिरे बांधण्यामागील उद्देश असावा.
सल्तनतशाही, मोगलाईच्या काळात अनेक मंदिरांची नासधूस झाली होती. तिथल्या मूर्त्या खंडित करून मंदिरे तोडून तेथील खजिने लुटण्याचा आले होते. त्यांच्याचपैकी काशी विश्वनाथाचे मंदिर बाराजोतिर्लिंगापैकी एकमेव आदिलींग आणि हिंदूंच्या आस्थेच केंद्रबिंदू होतं.
सन १७८० मध्ये धर्मनिरपेक्ष राज्याची महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी अन्य धर्मियांच्या भावना न दुखावता मशीदीशेजारी ते मंदिर बांधून तिथे शिवलिंगाची स्थापना केली. ११० वर्षांनी देवाधी देव महादेव यांच्या मंदिराचा उद्धार झाला आणि मल्हारबांचे स्वप्न मातोश्रींनी पूर्ण केले.
तसेच नदीकिनारी मणिकर्णीका घाट, रत्नेश्वर महादेव मंदिर व अन्य मंदिरे, होळकर वाडा बांधला. नागपूरकर भोसल्यांनी मंदिराला चांदी दान केली. पुढे सन १८५३ मध्ये शिखांचे राजे रणजीतसिंहांनी त्या मंदिराला २२ टन शुध्द सोन्याचे छत्र मंदिराच्या शिखरावर बसवले.
काशी विश्वनाथ कॉरिडोर प्रकल्प….
अहील्यादेवी होळकर द्वारा निर्मित मूळ काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आणि मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराला भव्यता आणि दिव्यता प्रदान करणे होय तसेच मंदिर परिसर गंगानदी घाटापर्यंत जोडणे हा मुख्य उद्देश आहे. नदिघाटापासून डाव्याबाजूला,
- कार्यक्रमासाठी मंच,
- संस्कृती केंद्र,
- वारसा संग्रहालय,
- वैदिक केंद्र,
- दुकाने आणि कार्यालय आहेत.
तर उजव्याव्याबाजूला,
- विधी लाकूड भांडार,
- बहुउद्देशीय केंद्र,
- वाराणसी गॅलरी,
- यात्री सुविधा केंद्र.
तसेच समोर आपल्याला मंदिर चौकाचा मुख्य दरवाजा दिसतो. ज्यावरून आपण गंगानदीघाटापासून मुख्य मंदिर परिसर बघू शकतो.
चौकातून मंदिर परिसरात आपण जातो तिथे अहिल्यादेवी होळकर निर्मित मुख्य बाबा विश्वनाथ मंदिर व अन्य मंदिरे आहेत.मंदिर परिसराच्या आजूबाजूला अनुसरण करण्यासाठी कक्ष, पुजारी&सेवादल कक्ष, अतिथीकक्ष,चौकशीकार्यालय आणि प्रशासक कार्यालय आहेत.
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
राणी अहिल्यादेवी होळकरांनी भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कार्यांची यादी पहा.
अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी कार्य
- परदेशात असलेल्या होळकरांच्या मौल्यवान वस्तू - January 5, 2023
- काशीविश्वनाथ कॉरिडोर मध्ये ऊभारणार अहिल्यादेवीची प्रतिमा - December 3, 2021