Skip to content

जाम(महू) – Jam Gate(Mhow) : होळकरकालीन प्रवेशद्वार

ahilyabai-holkar

राणी अहिल्यादेवी होळकर(Ahilyadevi Holkar) यांच्या इतिहासाची साक्ष देणारा बुलंद असा महादरवाजा

jam-gate
जामद्वार

जाम(खुर्द), ता.महू जि. इंदोर(म.प्र) : हा मार्गद्वार जामखुर्द या गावापासून ३ कि.मी अंतरावर स्थित असून इंदोर-महू-महेश्वर मार्गावर आहे(जामखुर्द मार्गे). या मार्गद्वाराच्या समोरील व मागील बाजूने दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्‍या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे या राज्याच्या आत ’श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ’श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ’विद्या व लक्ष्मी’ होय. या महादरवाज्याला चार भव्य बुरूज असून त्यांची उंची ८० फूट आहे व त्याची लांबी ७५ फूट व रुंदी ७० फूट आहे. या द्वारच्या तटबंदीमध्ये जी उतरती मोठी छिद्रे दिसतात त्यास ’जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही मोठी छिद्रे असतात. या दरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या दिसतात, तसेच संरक्षकांसाठी दुसऱ्या माळ्यावरती राहण्यासाठी केलेल्या खोल्या दिसतात.

सन १७९१ ला राणी अहिल्यादेवी यांनी या मार्गद्वाराची निर्मिती केली हे तेथील शिलालेखावरून समजते. असे सांगितले जाते कि, डाकू गणपतराव याने किल्ले महेश्वर दरबारी राणी अहिल्यादेवींच्या समोर आत्मसमर्पन केल्यानंतर त्याच्यापासून मिळालेल्या संपत्तीतून राणी अहिल्यादेवी यांनी या मार्गद्वाराची निर्मिती केली.  

jam-gate-indore
Image Source by Unknown
jam-gate-mhow
दुसऱ्या माळ्यावरती राहण्यासाठी केलेल्या खोल्या

या द्वारच्या उत्तरेकडील टेकडीवर पार्वती मंदिर स्थित आहे. या महाद्वाराच्या निर्मिती वेळेस या मंदिराचा निर्मांण राणी अहिल्यादेवी यांनी केला. या महादरवाज्यापासून उत्तरेकडील टेकडीवरील पार्वती मंदिरा पर्यंत तटबंदी बांधलेली आहे तर डावीकडे खोल दरी आहे. हे महाद्वार प्रवाश्यांच्या संरक्षनासाठी उभारलेले आहे तसेच येथे कर वसूल केला जात असे.

हा मार्गद्वार जामखुर्द या गावापासून ३ कि.मी अंतरावर स्थित असून जामखुर्द या गावामध्ये राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सेनिकांच्या राहण्यासाठी भुईकोट किल्ल्याचा, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या सोयीसाठी ३ बारवांचा तसेच काही मंदिरांचा निर्माण केला, त्यातील जामबारव प्रसिद्ध असून पुरात्तव खात्याच्या नियंत्रणाखाली आहे.  हा द्वार “जाम घाट” / Jam Gate या नावाने प्रसिद्ध आहे. जामद्वार वर असलेला शिलालेखाचा उल्लेख खालीलप्रमाणे, याचे वाचन श्री.राज्‍यपाल शर्मा (झालावाड़, राजस्थान) यांनी केले आहे. 

श्री।
श्रीगण्‍ेाशाय नम:।। 
स्‍वस्ति श्रीविक्रमार्कस्‍य संमत् 
1847 सप्‍ताब्धिनागभू:। 
शाके 1712 युग्‍मकुसप्‍तैक मिते 
दुर्मति वत्‍सरे। माघे शुक्‍ल त्रयोदश्‍यां पुष्‍यर्क्षे 
बुधवारे सुबा (स्‍नुषा)* मल्‍लारि रावस्‍य खंडेरावस्‍य वल्‍लभा।। 2।। 
शिव पुजापरां नित्‍यं ब्रह्मप्‍याधर्म तत्‍परा। 
अहल्‍यारग्राबबंधेदं मार्ग द्वार शुशोभनम़।। 3।।

  • येण्याचे मार्ग व अंतर :
  • इंदोर ते जाम गेट(इंदोर-खरगोण मार्ग) : ५२ कि.मी
  • Indore to Jam Gate Distance : 52 Km (via. Indore-Khargone Hwy)
  • महेश्वर ते जाम गेट(महू-मंडालेश्वर मार्ग) : ३३ कि.मी
  • Maheshwar to Jam Gate Distance : 33 Km ( via Mhow-Mandaleshwar Rd)

इंग्रजी मध्ये वाचण्यासाठी Click करा, Jam Gate Information in English

jam-gate-distance
या फोटोवरून आपल्याला द्वाराची भव्यता कळते

माहितीसाठी आभार :

  • मराठे कालीन होळकर संस्थान हे पुस्तक(लेखिका-शारदा बंडे)
  • ऑल इंडिया धनगर समाज महासंघ विशेषांक सन २०११
  • होलकरों का इतिहास हे हिंदी पुस्तक
  • आशिष सोनी
  • Google Image

जाम गेट(Jam Gate) चा Video नक्की पहा.

    

राहुल वावरे

1 thought on “जाम(महू) – Jam Gate(Mhow) : होळकरकालीन प्रवेशद्वार”

  1. Pingback: Jam Gate : Mhow, Indore. | Ahilyabai Holkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *