मांडवगण, ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर(महाराष्ट्र)

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांच्या मृत्यूनंतर होळकर साम्राज्याची(२१ जिल्हे) जबाबदारी हि विरांगना राणी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आली. एवढया विशाल साम्राज्याचा कारभार हि एक स्त्री करत आहे, हे पाहून अनेक आक्रमणे होळकर साम्राज्यावर झाली व ती राणी अहिल्यादेवी होळकर यांनी हत्तीवर स्वार होऊन परतावून लावली.

यांच्या “भैरव” हत्तीची उपेक्षित समाधी
मांडवगण, ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर येथील किल्ले सदृश्य होळकर वाड्यात राणी अहिल्यादेवी होळकर मुक्कामी असताना त्यांचा हत्ती मरण पावला. हि हत्तीची समाधी होळकर वाड्याच्या पाठीमागील बाजूस स्थित असून उपेक्षित अवस्थेत आहे. हि समाधी येथील काही लोकांचा थिलर पार्टीचा अड्डा आहे. एका भव्य चौथऱ्यावर मधोमध हत्तीची अखंड शिळेमध्ये मूर्ती बसवलेली आहे. येथील काही सुज्ञान नागरिकांनाच माहित आहे कि, हि राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या हत्तीची समाधी आहे.
चौथऱ्याच्या एका बाजूला शिलालेख होता व त्यावर हत्तीची निधन तारीख व अन्य माहिती मोडी लिपीमध्ये होती मात्र हि समाधी दुर्लीक्षित असल्यामुळे हा शिलालेख नष्ट झाला आहे. पुरात्तव खाते व समाजातील जबाबदार व्यक्तींनी या समाधीच्या सुरक्षेतेसाठी विशेष पुढाकार घेऊन या ठिकाणी एकदातरी अवश्य भेट दिली पाहिजे, नाही तर येणाऱ्या काळात हि होळकर कालीन वास्तू नष्ट झाल्या शिवाय राहणार नाही.


तसेच या वाड्याचे थोडक्यात विशेष सांगायचे म्हटले तर या वाड्याच्या प्रमुख प्रवेशद्वारालाच दोन्ही बाजूला दोन हत्ती साखळीने बांधले जायचे व त्या साखळ्या आजही प्रवेशद्वारामध्ये दोन्ही बाजूला आहेत.


दोन्ही बाजूला दोन हत्ती साखळीने बांधले जायचे
श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) उत्तरेत असताना सन १७८८ ला निजाम सेण्याचा मांडवगण वर आक्रमण झाले होते आणि राणी अहिल्यादेवी होळकर मांडवगणला येईपर्यंत तेथील होळकरांचे सरदार देशमुख यांनी निजाम सेण्याला लढवत ठेवले होते, आणि राणी अहिल्यादेवी महेश्वरहून मांडवगणला आल्या आणि निजामाचा हल्ला परतावून लावला. होळकर सेनेचा विजय झाला. अशी माहिती सांगण्यात आली.
राणी अहिल्यादेवी होळकर मांडवगणला येईपर्यंत मुघल सेन्याने वाड्याच्या प्रमुख प्रवेश्द्वारच्या दोन्ही बुरुजाचे व उजवीकडील तटबंदीचे नुकसान केले होते ते आज हि पहावयास मिळते. मांडवगण ला श्री. सिद्धेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान असून येथेच मांडवऋषींची समाधी आहे. हा वाडा सध्या ९९ वर्षच्या करारावर शाळेस दान दिला आहे.

या स्थळाची माहिती येथील स्थानिक श्री. विशाल वाघ यांनी दिली असून राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मांडवगणमधील इतिहासाची माहिती हि मांडवगणमधील होळकरांचे सरदार देशमुख यांच्या घरातील वंशज पोपटराव देशमुख यांनी दिली आहे. इतिहासात त्यांच्या घराण्याची सोयरीक फलटणच्या नाईक-निबांळकर घराण्याशी हि झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.


इतिहास अभ्यासक श्री.रामभाऊ लांडे यांनी या हत्तीचे नाव “भैरव” असल्याचे सांगितले असून स्थनिक लोक या समाधीस “हत्तोबा” असे म्हणतात. लहान मुलं जर रडत असेल किंवा त्याला त्वचेचा काही आजार झाले तर या समाधीची श्रद्धेपोटी पूजा केली जाते. सन २०१८-१९ या कालावधीत श्री. सिद्धेश्वर देवस्थानच्या परिसरात झालेल्या विकास कामांमुळे या समाधीस काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते.
मांडवगन येथील होळकर वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वराचे खूप नुकसान झाले आहे मात्र इतिहासात या वाड्याचे प्रवेशद्वार कसे असावे? असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा शिंदे सरकारांच्या जामगाव(ता.पारनेर) वाड्याचे प्रवेशद्वार डोळ्यासमोर उभे राहते. दोन्ही ठिकाणांना नक्की भेट द्या.

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
राणी अहिल्यादेवी होळकरांनी भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कार्यांची यादी पहा.
अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी कार्य
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021
Nice imformation, can you tell me some more detail about it