सन १७६७ साली अहिल्यादेवींनी आपली राजधानी इंदूर वरून माहेश्वरी ला हलवली आणि वेगानं माहेश्वरीचा कायापालट व्हायला सुरुवात झाली. घाट, मंदिरे, रस्ते आणि दस्तुरखुद्द होळकरांची राजधानी म्हणताना माहेश्वरीच्या सौन्दर्यात भर पडू लागली.
- अहिल्यादेवींच्या काळातील बारवांची माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.
- अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरांची माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.
- अहिल्यादेवींच्या काळातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.
खरं तर माळव्यात 5 व्या शतकापासून वस्त्रोउद्योगला सुरुवात झालेली पण माळव्याला आणि विशेषतः महेश्वरीतील वस्त्रोद्योगला खरी भरभराट आली ती अहिल्यादेवींच्या शासनकाळात.
अहिल्यादेवींनी माहेश्वरी राजधानी हलवताच सुरत, माळवा आणि हैद्राबाद तसेच मांडव्याहून विशेष विण कामगाराना बोलावून वेगळ्या धाटणीची साडी बनवायला सांगितलं. हि साडी साधारणतः ९ यार्ड म्हणजे २७ फुट लांब असे आणि याच्या किनारीवर काही कलाकृती किंवा चित्रं विणली जात.
बऱ्याचदा हि चित्र महेश्वरच्या किल्ल्यात असलेल्या भिंतीतील पाहून काढली जात. आजही अनेक माहेश्वरी साड्यांवर किल्ल्यातील भिंतीवरील चित्र आपल्याला पाहायला मिळतात.
अशा प्रकारची साडी बनवुन घेण्यामागे अहिल्यादेविंचा उद्देश होता की राजघराण्यातील स्त्रियांना साडी चोळी म्हणून भेट द्यायला आणि होळकर संस्थानाला भेट देणाऱ्या पाहुण्यांना भेट देण्यासाठी विशेष भेट म्हणुन आणि एक वेगळी ओळख म्हणून मातोश्रीनी या साड्या स्वतः लक्ष घालून बनवून घेतल्या. पुढं हीच साडी राजघराण्यात आणि खानदानी घराण्यांची वेगळी ओळख बनली.
आजही माहेश्वरी साडी हि महेश्वर ची वेगळी ओळख असून करोडोंची उलाढाल ह्या उद्योगाच्या माध्यमातून होत आहे. गेली 250 वर्षांपासून अनेक विणकामगारांच्या पिढ्या इथं गुंण्यागोविंदान राहून अर्थार्जन करीत आहेत.
मातोश्रींबद्दल बोलताना आचार्य विनोबा भावे म्हणतात की “आम्ही जिथं जिथं गेलो तिथं तिथं आम्ही परप्रांतीयांच्या मुखातून अहिल्यादेवींची स्तुतीच ऐकली.शस्त्रबळाने दुनियेला जिंकणार अनेक आहेत, परंतु प्रेमाने,धर्मशक्तीने,भारतातील सर्व प्रांतांना जिंकणारी अहिल्यादेवि ह्या एकमेव होत”.
माहिती साभार
The Real Story Behind Maheshwari Saree
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
- नरुटे पाटील घराणे - October 2, 2020
- अहिल्यादेवी होळकर आणि महेश्वरी साडी - January 21, 2020