Skip to content

अहिल्यादेवी होळकर – प्रस्तावना व परिचय

प्रस्तावना :

लोकमाता, राजमाता, विरांगणा, पुण्यश्लोक, देवी, गंगाजल निर्मळ, मातोश्री या सगळ्या पदव्या अहिल्याबाई होळकरांना लोकांनी अर्पण केल्या होत्या. मनापासून, हृदयापासून! कुठलाही पदवीदान समारंभ न होताही, या पदव्या आज दोनशे वर्ष टिकून आहेत. टिकणार आहेत.

अत्यंत प्रेमाने त्यांनी सामान्य माणसाचे हित बघितले. प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखाने जगात यावं, इकडे लक्ष दिले. त्या धार्मिक होत्या हे तर, सर्वाना माहित आहे, परंतु एक राज्यशासक म्हणून त्यांचे कर्तृत्व फार महत्त्वाचे आहे.

अपार शहाणपण आणि तडफ असणारी ती अलौकिक स्त्री होती. खंबीर मन आणि चातुर्य यामुळे, अनेक संकटे त्यांनी पार केली. न्यायदान तर इतके अचूक की, भांडणाऱ्या दोन्ही बाजू त्यांना दुवा देत.

अहिल्याबाई होळकर पोवाडा | Ahilyabai Holkar Powada
शाहीर बाळासाहेब काळजे

रणनीतीची त्यांना जाण होती. एका नजरेत हिशोब करण्यात त्या तरबेज होत्या. प्रजावत्सलता आणि परदुःखाने व्याकूळ होणार मन, त्यांना लाभलं होतं.

त्या स्वतः रणांगणात युद्दाला उतरत, तोफा ओतणे, जंबुऱ्याच्या गोळ्या तयार करणे, तिरबाजी, याचे शास्त्र त्यांना माहीत होते. घोड्यावर स्वार होण्याचे कौशल्य तर होतेच, पण त्यांनी स्त्रियांचे सैनिकदलही तयार केले होते. मातीवर, देशावर निष्ठा, बाणेदार वृत्ती, साधी राहाणी, उच्च चारित्र्य हे त्यांचे विशेष!

Order करण्यासाठी येथे Click करा

त्यांचे कौटुंबिक जीवन अत्यंत दुःखी, काळेकुट्ट असे होते. पण प्रशासन धवलशुभ्र, निष्कलंक असे! त्या धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या. ठिकठिकाणी नदीघाट, देवळे, दर्गा, धर्मशाळा, विहिरी, रस्ते असे त्यांचे कार्य आहे. अन्नछत्रे आणि पाणपोया आजही चालू राहिल्या आहेत. अनेक जण आपली भूक-तहान तिथे शांत करीत आहे. हे सारे कार्य जातीधर्मात अडकलेले नाही.

सर्व धर्मीयांसाठी त्यांनी मदत केली. म्हणूनच केवळ ‘धार्मिक’ इतकीच त्यांची ओळख नाही. त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी केलेले कार्य आजही जिवंत आहे कारण मंदिरे, दर्गे, अन्नछत्रे वगेरे ठिकाणी त्या त्या कार्याच्या खर्चासाठी त्यांनी सालीना उत्पन्न करून ठेवले होते तसेच अनेक बारावा लोकांची, पशुपक्षांची आणि शेतीची पाण्याची गरज भागवत आहे.

त्यांची ही दूरदृष्टी चकित करणारी आहे. त्यांच्यात अनेक सदगुण बहरास आलेले होते. अठरा सतींच्या किंकाळ्या आणि सर्व जीवलगांचे मृत्यू त्यांना बघावे लागले.

शेवटी त्या एकट्या राहिल्या. संसाराचा हा उन्हाळा सोसून, ही बाणेदार स्त्री, कुणालाही शरण न जाता कर्त्यव्यकठोर असा कर्मयोग आचरत राहिली. प्रजेचं सुख बघत राहिली. दुःखाला खंबीरपणे सामोरे जातांनाही आपले कर्त्यव्य ठामपणे त्यांनी केले.

हे सर्व वाचकालाही सामर्थ्य,शक्ती देणारे आहे.

परिचय :

  • जन्म : ३१ में १७२५
  • जन्म ठिकाण : चोंडी ता.जामखेड जि.अहमदनगर(महाराष्ट्र)
  • रिजंट कार्यकाळ : ११ डिसेंबर १७६७ – १३ ऑगस्ट १७९५
  • मृत्यू : १३ ऑगस्ट १७९५
  • मृत्यू ठिकण : किल्ले महेश्वर,जि.खरगोण(मध्यप्रदेश)
  • संस्थान राजधानी : किल्ले महेश्वर
  • सासरे : सुभेदर मल्हारराव होळकर(१)
  • सासू : गौतमाबाई, बाणाबाई, द्वारकाबाई, हरकुराबाई
  • पती : शूरवीर खंडेराव होळकर
  • मुलगा : सुभेदर मालेराव होळकर
  • सुना : प्रिताबाई, मैनाबाई
  • मुलगी : मुक्ताबाई फणसे – होळकर
  • जावई : सरदार यशवंतराव फणसे
  • उपाधी : पुण्यश्लोक, मातोश्री, लोकमाता
  • वडील : माणकोजी शिंदे(पाटील)
  • कार्यकाळ : २८ वर्ष

प्रकरण : २ – सुभेदार मल्हारराव होळकरांचा आदीचा काळ
संपूर्ण इतिहास – राणी अहिल्यादेवी होळकरांचा समग्र इतिहास

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]

राहुल वावरे

1 thought on “अहिल्यादेवी होळकर – प्रस्तावना व परिचय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *