परिचय :
- जन्म : १६ मार्च १६९३
- जन्म ठिकाण : मुरूम होळ, ता.फलटण जि.सातारा(महाराष्ट्र)
- कार्यकाळ : सन १७२५ – २० मे १७६६
- मृत्यू : २० मे १७६६
- मृत्यू ठिकण : आलमपूर, ता.लहार जि.भिंड(मध्यप्रदेश)
- संस्थान राजधानी : इंदोर
- सासरे : भोजराज बारगळ
- पत्नी : गौतमाबाई, द्वारकाबाई, बनाबाई, हरकूबाई(खांडाराणी)
- मुलगा : खंडेराव होळकर
- सून : राजमाता अहिल्यादेवी होळकर
- उपाधी : सुभेदार
- वडील : खंडोजी होळकर
- धर्म व जात : हिंदू – धनगर
होळकर घराण्याचे मुळ वस्तीस्थानः
होळकरांचे वंशवृक्ष अनेक ठिकाणातून आलेले आहेत. वंशापैकी अनेक शाखा दूरवर पसलेल्या दिसतात. यांच्या वसाहती मथुरा, राजपूताना, खानदेष, नाषिक व अहमदनगर येथे स्थायिक होत होत आज राजघराणे इंदूरास नांदत आहे. होळकर घराणे हे मुळचे मथुरचे नंतरे त्यातील काही शाखा दक्षिण भारतात पसरल्या. त्यातील काही होळकरांचे पूर्वज पूर्वी उत्तर प्रदेशातील मथुरा येथील मुळ रहिवाषी होते नंतर राजकीय अस्थिरतेमळे ते मथुरतून चितोड नंतर दक्षिणेला औरगाबांद नंतर महाराष्ट्रातील वाफगाव येथे स्थायिक झाले. ही मंडळी पंचभैया होळकर या नावानें ओळखली जाते. सुभेदार मल्हारराव होळकर ते यशवंतराव होळकर यांचा समावेष होता.
होळकर घराण्याचा उदयः
सुभेदार मल्हारराव होळकरांचे पूर्वज हे दक्षिण भारतातील वाफगावचे मुळचे राहणारे होते. तर मल्हाररावांचे पुर्वज काही काळ ‘वीर’ या गावी राहत होते. म्हणून हे घराणे काही काळ आपल्या घराण्याच्या दूर दूर पसरलेल्या शाखांतून व्यक्तिषः निवड करुन पांच बंधूंस त्यांनी इंदूरांत होळकर घराण्याच्या वंशावळीत अनेक व्यक्तींचा सामावेष होता. त्यात सुभेदार ‘वीरकर’ या कुल नावानेही ओळखले जात असे. त्यानंतर मल्हाररावांचे वंशज पुण्याजवळ असलेल्या फलटन संस्थानातील “होळ” परगण्यातील नीरा नदी काठच्या ‘मुरूम – होळ’ या गावी स्थायिक झाले. त्यामुळे त्यांना ‘होळ’ या गावावरून त्यांना वीरकर ऐवजी ‘होळकर’ या नावाने ते ओळखले जाऊ लागले. अशी दंतकथा आहे. मल्हारजीच्या वडिलांचे नांव खंडूजी. खंडोबा हे श्रीमल्हारीमार्तंडांचे दुसरे नांव होय. खंडोजी वीरकर सामान्य कुटूंबातील होते. त्यांचा साधारण शेतीवर उदरनिर्वाह चालत होता. तसेच ते ‘होळ’ गावचे प्रतिष्ठित चैगुले म्हणजेच ग्रामधिकारी होते. ‘खंडोजी वीरकर हे जातीने खुटेकर धनगर होते.’
त्यास खानदेशातील तळोदे तालुक्यातील सुलतानपूर येथील भोजराजजी बारगळ यांची बहीण जिवाई दिली होती. म्हणजेच खंडोजी वीरकर यांचा विवाह खानदेशातील मौजे तळोदे परगणे सुलतानपूर येथील साबाजीबाबा बारगळ या चैगुले यांची कन्येशी तर भोजराज बारगळ यांच्या बहीणीषी झाला. खंडोजी होळकर यांचा इ. स. 1696 ला मृत्यू झाल्याने मल्हारी व त्याची आई जिवाई अनेक संकटाना सामना करावा लागला.
जन्म व बालपण:
मराठेशाहीचा उज्जवल इतिहास घडविणाऱ्या युगपुरुष असणाऱ्या मल्हाररावांचा जन्म खंडोजी वीरकर व जिवाई यांच्या पोटी इ.स.१६९३ रोजी १६ मार्च रोजी झाला. त्यांचे जन्म नाव ‘कुरबा वीर मल्हारी’ असे होते. ते सामान्य घरातील जातील कुटूंबातील होते. अशा महान रत्नाचे वडील खंडोजी वीरकर हे होळ गावचे प्रतिष्ठित चैगुले या पदावर होते. मल्हारराव होळकर तीन वर्षाचे असतानाच, बाल वयात त्यांच्या वडीलांचा मृत्यू झालेला होता. तेव्हा जिवाईस सासरमध्ये विधवेचे जीवन जगताना भावकीने व इतर नातेवाईकांनी संपत्तीच्या वारसा व मालकी हक्कामुळे बराच मोठा त्रास होऊ लागला.
खंडोजीची सर्व संपत्ती, घरदार भावकीने व इतरांनी बळकावल्याने त्यात जिवाईचे काहीही चालत नसल्याने आपल्या चिमुकल्या मुलांचे व आपले भविष्यात काही बरे वाईट होऊ शकते. या कायमच्या भितीपोटी जिवाईने पतीच्या निधनानंतर सासर सोडून ती आपल्या बाल मल्हारीस घेऊन आपल्या माहेरी कायमची राहायला आली.
मल्हारराव होळकर जसे जसे मोठे होवू लागले तसे तसे ते आपल्या मामाच्या कामात मदत करू लागले. मामाकडे असताना मल्हारराव मेढपाळी व्यवसायावर लक्ष ठेवत असे. एके दिवशी मल्हारी मेढरें राखताना बसल्या ठिकाणी दोन प्रहरीं एका वृक्षाखाली झोपी गेले होते. त्यांची मातुश्रीं भाजीभाकर घेऊन येत होती, तो लांबून तिला असे दिसलें कीं एका नागाने आपली फडा मल्हारजीचे डोक्यावर उभारलेली आहे तिची गाळण उडाली व ती तशीच गावात गेली. थोडया वेळाने ती परतून येते आणि पाहते तों नाग तेथे दिसेना. मुलास कांही एक इजा झाली नाही, हे पाहून तिचे जिवात जीव आला. गावातील ब्राम्हणास घडलेला प्रसंग सांगितला तेव्हा तो म्हणाला की, ‘बाई, हा मूल पृथ्वीपति होईल. त्यास दहा वर्षाचा होई पर्यंत फार सांभाळावे. पुढे हा पृथ्वीस संभाळून तुला पृथ्वीपतीची आई म्हणवील!’ अशी दंतकथा प्रसिद्ध आहे.
मामा भोजराज बारगळः
गौतमाबाईंच्या आईचे नाव मोहनाबाई तर वडीलांचे नाव साबाजी असे होत. भाऊ भोजराज बारगळ हे नंदुरबार जिल्ह्यामधील तळोदे गावचे एक सधन शेतकरी व चैगुले होते. तसेच भोजराज बारगळ हे सरदार कंठाची कदमबांडे याच्याकडे सेवेत होते. तर कंठाची कदम बांडे हे सेनापती दाभाडे याच्याकडे सरदार होते. भोजराज बारगळ हे कदमबांड्यांच्या फौजत एका पथकानिशी मोहिमेवर जात असत. म्हणजेच भोजराज बारगळ हे कदमबांडेच्या पंचवीस स्वारांचा प्रमुख होते.
मल्हारराव तेरा वर्ष्याचे असताना आई जिवाईचा मृत्यू झाल्याने वडीलाविना असलेल्या मल्हारी हा आता आईच्या प्रेमालाही मुकला यामुळे मल्हारीस फारच दुःख झाले. मामांने आई वडील विना पोरके झालेल्या मल्हारीस आई वडीलाची उणीव कधीच भासू दिली नाही. मामा भोजराज बारगळ यांनी भाचा मल्हारकडील मेढ्याा राखण्याचे कामं काढून आपल्याकडील पागेतील घोड्यााची व्यवस्था पाहण्याची जवाबदारी सोपवली. त्यास आपल्या घरच्या घोड्यााची देखरेख करण्याकरीता ठेवल्याने मल्हारीस लहानपणापासूनच तलवार चालविणे. दांडपटृा चालविणे, घोड्याांवर बसणे, भाला फेकणे, घोड्यााची निगा राखणे, घोड्याावर बसुन फेरफटका मारणे, घोडा भरदाव फेकणे, भाला फेकणे व निशाणा मारणे अशा अनेक प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण चांगल्या प्रकारे देऊन चांगलेच
पारांगत केले. म्हणजे मामानी त्यांचा गुरू व सासऱ्याची ही भूमिका त्यांनी पार पाडली. मल्हाररावांनी मामाच्या सैन्यात प्रवेश करून सैनिकी जीवनास सुरूवात केली. मामा हे कदमबांड्याांचे एक सरदार असल्याने अप्रत्यक्षपणे मल्हारराव हे कदमबांड्याांचे एक सैनिक व अनुयायी ठरले.
कदम बांडच्या लष्करात नोकरीः
छत्रपती शाहू महाराजांनी व पेशवे यांनी खंडराव दाभाडे यांना गुजरातकडे पाठवूने बराच मुलूख आपल्या वर्चस्वाखाली आणला. त्या मोगली मुलूखातील मोगलांची ठाणे उठवून तेथे आपला बंदोबस्त ठेवला. त्यात कदमराव बांडे वडगांवकर दक्षिणेस 200 स्वारासह दाभाडेकडे चाकरीस होते. कदमराव बांडे यांसी मोकासा परगणे, नंदूरबार महाल निम्मे, व परगणे सुलतानपूर महाल दरोबस्त नेमून दिला.
मामा भोजराज बाळगळ हे कदम बोडे या सरदाराकडे बारगीर म्हणून कामास होते. त्यामुळे मामाकडे बरेच मोठे सैनिक नोकरीस होते. त्यावेळी तापीकांठ, विंध्याद्रीपर्वत, सातपुडा डोगर पूर्व-पश्चिम आहेत तेथे राउळाच व भिल्लाचा उपद्रव खूप झाला. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी निजाम-उल-मुल्क यांनी कदमरावांस आज्ञा केली, मवास, राऊळ, कोळी, भिल्ल आहे त्यांचे पारिपल्य करावे. म्हणजे तुम्हास सरकारातून गांव इनायत होईल.
तेव्हा कदमराव बांडे यांनी तीन हजार फौजनिशी भिल्लांवर हल्ला चढवून त्यांचे बंदोबस्त करून त्याठिकाणी आपला अंमल बसविला. त्यावेळी त्या सैन्यात भोजराज बारगळ हे देखील सहभागी होते. नंतर भोजराज बारगळांनी आपल्या सैन्यात वाढ करून ती वीस हजारावर पोहचली होती. त्यांनी भिल्ल, कोळी यांचा सामना करीत नर्मदा ओलांडून रेवा, गुजरात पर्यंत मजल मारली. पावागड येथील लढाई जिंकून त्यांना पानेरचा किल्ला जिंकला.
मराठा सरदार त्रिंबकराव दाभाडे हे कधी गुजरातवर तर कधी माळवा स्वाऱ्या करीत असत. यांच्या कधी दाभाडेबरोबर गुजरात स्वाऱ्या तर कधी संताजी जाधवबरोबर माळव्यावरं कदमबांडे स्वाऱ्या करत होत. गुजरात व माळवा मुलूख तसा संपन्न असल्यामुळे यावर पुरे सरदारांची दृ‛टी या प्रांतांकडे नेहमी असल्याने दाभाडे व कदमबांडे हे कधी एकत्र तर कधी स्वतंत्रपणे या प्रांतावर हल्ले करत असत.
सन 1707 पर्यंत त्रिंबकराव कदमबांडे ह्यात होते. मल्हारी मोठा झाल्यावर मामा भोजराज बारगळ यांनी त्यास एक घोडा देऊन कंठाजी कदम बांडे यांच्या हवाली करून भाचा मल्हारीला त्यांच्याकडे नोकर म्हणून सेवत रूजू केले. म्हणजेच मल्हारराव हे पंधरा वर्ष्याचे असताना बारगीर म्हणून कदम बांड्याांच्या लष्करात चाकरीस लागले. मल्हारजीच्या आयुष्य क्रमातील पहिली शाळा बांडे यांचे हाताखाली सुरु झाली.
मल्हारराव नंतर स्वपराक्रमाच्या जोरावर सैनिक पदापासून कदमबांडे यांच्या फौजतील पंचवीस स्वारांचे प्रमख बनले. त्यानंतर मल्हाररावांनी आता दिडशे स्वारांचे पथक तयार केलले होते. मल्हाररावांनी एका सैनिकापासून आपल्या राजकीय कारकिर्दीस करून कदम बांडे यांच्या सैन्यात शीलेदार म्हणून काम केले. माळव्यात त्यांचा सुसंघटित प्रवेश इ.स.1721 मध्ये झाला. मल्हाररावांच्या इ.स.1718 पुर्वीपासूनच माळव्यावर स्वतंत्र स्वाऱ्या करीत असत. बाळाजी विशवनाथ भट यांनी इ. स. 1719 उत्तर मोहीम हाती घेतली. मल्हाररावांचे शौर्य व कर्तृत्व पेशव्यांनी पाहिलेले होते. त्यामुळे त्यांनी मल्हाररावास या मोहिमेत सहभागी करून घेतलेले होते. मोगली प्रदेशात घुसून गोदावरी नदीपर्यत मजल मारून त्यांनतर उत्तरेची
दुसरी स्वारी हाती घेऊन पवार, धनगर, मराठा मंडळी जमा करून गोदावरी नदी पार करून स्वारी केली. मराठे परमुलखात स्वारीस जात त्यावेळी तरूण तडफदार तरूणास मोहीमेस सामावून सहज घेतले जाई. त्यांनी स्वतःचे शस्त्र व घोडा घेऊन काढलेल्या मोहिमेत पराक्रम घडवून घेण्यास मदत होई अशा लोकांना शिलेदार असे म्हणत. त्यांना स्वारीत सरदारांच्या हुकूमाप्रमाणे शत्रुवर तुटून पडावे लागे. तसेच स्वारीत व मोहीमेत शिलेदारांना जी लूट सापडली त्याचा ठराविक हिस्सा सरकारात जमा करून बाकीची लूट त्यानांचा ठेवून घेण्याचा अधिकार असल्याने शिलेदार म्हणून सेवा करण्यांस तत्पर असत. पण तेव्हांचे सरदार पगारी सैनिक फारसे कोणी पदरी ठेवत नसे; तर स्वारीच्या वेळस सोबत घेत जी काही लूट मिळेले ती द्याची मुभा देत असत.
पेशवे आपल्या सर्व फौजेसह दिल्लीच्या आसपास पोंचल्यानंतर तेथील एका महाला विषयी त्यांचा खंडणीचा ठराव झाला. त्या ठरलेल्या करारांत असें एक कलम होतें की, पेशव्यांच्या फौजनं त्या महालांतील उभ्या पिकास इजा पोहचू नये. परंतु मल्हाररावे होळकरांच्या घोड्याांस वैरण वा चारा नसल्यामुळे त्यांनीं आपल्या स्वारांकडून शेजारील शेतातील पीक कापून आपल्या घोड्याापुढे आणून टाकले. ही घटना पेशव्यांच्या कानी गेली. तेव्हा बाजीराव स्वतः हे कृत्य कोणी केले ते पाहण्यासाठी पुढे सरसावले त्यावेळी ते घोडे व ती वैरण दिसली. तेव्हा बाजीरावांनी मल्हाररावांच्या एका बारगीरास काठी मारली. तेव्हा मल्हारराव आपल्या राहुटीच्या तोडाषी चÚहाट वळीत बसलेले होते. त्यांनी हे पहाताच त्यांना राग अनावर न झाल्याने कशाचीही पर्वा न करता तेथूनच शिव्या देत; रानातील मातीचा ढेकुळ बाजीरावांच्या दिशेने भिरकावित म्हणाले की, ‘आम्हास काय रोजमुरे देऊन भागलास म्हणून काठया मरतोस.’
बाजीराव काहीही न बोलता ते सरळ आपल्या राहुटीकडे निघून गेले. बाजीरावांनी आपल्या वडीलांस हा सारा प्रकार सांगत म्हणाले की, ‘परदेषांत आपली फौज जर अशी बेबंद व बेहूकमी वागूं लागली तर पुढें कसा परिणाम व्हावा?’ त्यावर दोघांत विचार विनिमय होऊन उद्या सकाळी मल्हारराव होळकरास लुटण्याचे ठरविले. हे वृत्त मल्हारराव यांनासमजताच त्यांनी आपल्या सर्व बारगीरांस बोलावून आपल्याविरोधी होत असलेल्या कार्यवाही बद्दल सांगून म्हणाले की, ‘ज्याला मजबरोबर राहून मरावयाचें असेल त्यानें येथें रहावें, व ज्यास हें पसंद नसेल त्यानें आतांच निघून जाऊन आपला बचाव करावा.’ त्यावेळी काही बारगीर मल्हाररावांस सोडुन निघून गेले. तर बाकीचे वीस-बावीस स्वार मल्हाररावासोबत राहून लढा देण्यास तयार झाले. त्यानंतर पुढचा कट केला. त्यानुसार त्यांनी आपल्याकडील घोडी होती ती लष्करात सोडून दिली. खोगिरे, राहूटया वगैरे जाळून, अंगास राख लावून, ढाल, तलवारीनिशी, मागे टेकडी होती त्या टेकडीवर जाऊन बसले.
त्यावेळी एक सरदार मल्हाररावास आधार देण्यासाठी गुप्त संदेष पाठविला की, ‘हिंमत सोडूं नको, तूं खुटेकर आणि मी हटकर दोघेही धनगरांचे बीज आहों, आज तुझी वाट तीच उद्यां माझी वाट, सबब मी तुला सामील आहें,’ काही मराठा सरदार पेशव्यांकडे जावून सल्ला मसलत चालु होती त्यातील एका सरदाराने पेशव्यास म्हणाले की, ‘आपण सरदारी करुं पहातां आणि पदरच्या शिपायांची बरदास्त तर या प्रकारची! त्यांच्या घोड़यांस ना दाणा ना वैरण! बरें त्यांनीं स्वतः मिळविली, तर त्यांस शिक्षा करितां, आणि लुटून घेण्याचा विचार करितां! वाः! अशानें वेल कसे मांडवास जातील? जो तुम्हांस ढेकूळ मारावयास चुकला नाहीं, तो तुमच्या शत्रूचां प्राण घ्यावयास चुकेल काय? ह़या त्याच्या अंगच्या साहसाची योग्यता जाणून त्याची बूज करावयाचें सोडून उलटा त्यास लुटून घेण्याचा विचार केलात? अहो, आपल्या फोऊजी तील पाच पंचवीस स्वार लुटून घेण्यात लैकिक आहे, किंवा त्यांची चांगली बरदास्त राखून त्यांच्याकडून शत्रूस लुटवून घेण्यांत लौकिक आहे, हा तरी कांहीं विचार करा!
एरव्हीं तो (मल्हारराव होळकर) तर मरावयास सिद्धच झाला आहे! कदाचित् त्याचे इतर जातवाले धनगर जर त्यास सामील झाले तर मग कसा परिणाम होईल?’
पेशवे बाळाजी विष्वनाथ यांना त्या सरदारचे म्हणणे पटले. तेव्हा त्यांनी मल्हाररावास लुटण्याचा निर्णय रद्द करून तो धनगर सरदार म्हणजेच पांढरे सरदार यांच्या मध्यस्थिने पेशव्यांनी जे जे अंगास राख लावून बसले होते त्या रागावलेल्या सोबत्यांची समजुत काढून तितक्यास वस्त्रे देऊन घेाडी ज्या ज्या गोटांत गेली होती. तेथून जमा करुन मल्हारजीच्या स्वाधीन केली. अशी कथा प्रसिद्ध आहे.
या शिवाय मल्हाररावांना संरजामा करीता वीस हजार रूपये दिले. या रूपयातून त्यांने पंचविस घोडे स्वारावरून सव्वाषे घोडे स्वारांचे पथक तयार केले. म्हणजेच आपल्या टोळीत दिल्लीस जाताना फक्त 25 घोडयांचा मालक आता त्यात भर पडून 500 घोडयांचा स्वामी बनला होता.
मल्हारराव होळकर यांनी युध्दात मिळालेल्या सरंजामानिशी घरी पत आल्यावर मामा भोजराजकडे ती सादर केली ऐवढा मोठा परक्रम पाहुन भोजराज खुष झाले. कंठाजी कदम बांडे यांच्याकडे पंचविस घोडे स्वाराचे मनसबदार बनले. वयाच्या सतराव्या वर्षी खानदेशातील अणकाईचा किल्ला जिंकताना पराक्रम दाखविला.
विवाहः
मामा भोजराज बारगळ यांनी पुढे काही काळात स्वतःची मुलगी गौतमबाईचा विवाह मल्हाररावांसोबत करण्याचे ठरविले. पण पत्नी मोहिनाबाईने त्यास नकार दिला तरीही भोजराजनी पुढील भविष्याचा विचार करून स्वतःच्या पत्नीच्या विरोध बाजूला ठेवून स्वतःची एककुलती एक लाडकी मुलगी गौतमाबाईचा विवाह भाचा मल्हारीशी लावून दिला. त्यांचे लग्न, जे‛ठ शुद्ध 13 झाले होते. वधूचें नाव गौतमाबाई. वधुवराचे वयांत सव्वा वर्ष्यांचे अंतर.
तसेच मल्हाररावांना त्यांच्या जिवनात गौतमाबाई शिवाय इतर तीन बायका होत्या. म्हणजेच गौतमाबाई, व्दारकाबाई, बनाबाई व हरकुबाई(खांडारानी) अशा चार बायका होत्या. गौतमाबाई या धैर्यवान, साहसी, चतूर, स्पष्ट वागणारी, हूषार, दयाळु व राज्यकारभाराची जाणीव असलेली बुध्दीमान स्त्री होती.
बढवणीच्या संस्थानिकांकडे नोकरीः
भाच्यांशी आपल्या मुलीचा विवाह सोहळा पार पाडला. तरीही या विवाहास भोजराज यांच्या पत्नीचा मोठा विरोध होता. शिवाय विवाह नंतर या रोजच्या कटकटीस कंटाळुन व मल्हारराव होळकरांचा स्वभाव हा तापट व स्वाभिमानी असल्याने कदमबांडेशी पटेनासे झाले. मामा भोजराज बारगळ व कदमबांडे यांच्या संमतीने मल्हाररावाने बडवनीचा शासक मोहनसिंग यांची नोकरी पत्करली. नर्मदा नदी काठी असलेले रांगड संस्थानिक बढवणीकर याच्या पदरी मल्हारराव होळकर यांनीनोकरी स्विकारली. इ. स. 1720 ते 1721 च्या दरम्यान मल्हारराव होळकर आपल्या फौजच्या उदरनिर्वाहासाठी मोहनसिंग राणे या बढवणीच्या संस्थानिकांकडे गेलेे होत. तिथे गेल्यावर त्यां संस्थांनिकांनी आपल्या बडवणी संस्थानाच्या संरक्षणाची जबाबदारीे त्यांच्यावर सोपविलेली होती. त्यावेळी मोहनसिंग व बाजीराव यांत संघर्षाची वातावरण निर्माण झाले. तेव्हा मराठयांनी मोहिम हाती घेऊन ते बडवणीच्या दिशेने निघाले.
त्यावेळी पेशव्यांनेे बढवणीला वेढा दिला असता सुमारे दीड हजार फौजनिशी मल्हाररावांनी पेशव्याच्या फौजेचा धुव्वा उडवला. मल्हारजीमुळे लढाईचा शेवट लौकर होईना. तेंव्हा शेवटी बाजीरावाने मल्हाररावास पत्र पाठवून उभयपक्षी तहाची मुखत्यारी मल्हाररावांस दिली. ‘उभयपक्षीं मुखत्यारी तुमचीच आहे! खंडणीचा ठरावा करुन फौजची रवानगी करुन द्यावी. असे पत्र आल्याने मल्हाररावानी पुढाकार घेऊन मल्हारजींनी पेशव्यांचे वर्चस्व राखून दोन्ही पक्षास मान्य होईल असा तह घडवून आणला. त्यानुसार दोघांतील मतभेद मिटविले. मल्हाररावांनी या तहातून यापुर्वीच्या पेशव्यांच्या सेवतील ऋणाची फेड म्हणून त्यांनी मालक बडवणीकर व पेशवेे यांच्यात मध्यस्थी करण्याचे मान्य करून चालाखीने पेशव्यांचे वर्चस्व मान्य करून त्यांस युध्दचा खर्च व खंडणी देण्याचा उभयतामध्ये यशस्वी तोडगा काढल्याने मल्हारावावर पेशवे खुष झाले.
मल्हररावांनी तसा तह करुन घेतला व पेशव्याच्या फौजची रवानगी केली. हीे मल्हाररावांची कर्तबगारी पेशव्यांचे नजरेंत भरली आणि पेशव्यांनी बहुमानाने त्यास आपलेकडेस वळविले.
ती मल्हाररावांची चतुराई पाहुन बाजीराव पेशवे यांनी मल्हाररावांस स्वराज्याचे सरदार व्हावे असे सुचविले. म्हणजेच बाजीराव व मल्हारराव यांच्यातील हा उभयपक्षी करार होता. याचा अर्थ मल्हारराव होळकर हे इ. स. 1725 पर्यंत माळव्यात स्वतंत्रपणे आपल्या सैन्यासह वावरत होते. मल्हारराव होळकर हे पेशव्यांच्या नोकरीत सामील झाले.
पेशव्यांच्या लष्करात प्रवेश:
मल्हारराव होळकरांनी बडवणी येथे केलला करार व दाखविलेली हुशारी व पराक्रम पाहुन स्वतः बाजीरावास मल्हाररावांसारखा हुशार व कर्तबगारीचा मोहरा आपल्या दौलतींत असला पाहिजे असे वाटू लागले. तेव्हा त्यांनी मल्हाररावास प़त्र पाठवून कौतक करूनु मल्हाररावास निरोप पाठवून आपला मनोदय कळविला. ‘तुम्हांस पदरीं ठेवण्याचा आमचा उद्देष आहे! व त्या संबधानें बोलावयाकरितां तुम्हांकडील एकादा मुखत्यार कारकून पाठवून द्यावा, असा संदेश खास हेरामार्फत पाठविला. तेव्हा मल्हाररावांनी पेशव्याना कळविले की, ‘आम्ही आमचे मामा बारगळ यांचे अंकित आहो, आपण त्यांजपासून आम्हांस मागून घेतल्यास आम्हीं आपली सेवा करण्यास हजरच आहें.
तेव्हा बाजीरावांनी बाळोजी बाबा प्रभु सारख्या मोठ्याा शहाण्या व इभ्रतदार कारकुनास मामा भोजराजकडे पाठवून मागून घेतले.मल्हारराव होळकर व पेशवे बाजीराव हे दोघेही अतिशय बाणेदार स्वभावाचे होते. त्यात मल्हारराव कडक शिस्तीचे व अत्यंत उदार मनाचे सर्वांषी मिळते जुळते घेणारे एक मायाळू सुभेदार होते. अशा शुर सरदाराने जे राज्य मिळवले. ते स्वतःच्या तलवारीच्या जोरावर! मल्हाररावांच पेशव्यांच्या दरबरात मानाचं स्थान होतं. दरबारात त्यांची वचक होती.
पेशव्यांना ते घरातील वडिल माणसांसारखे वाटायचे. काही उघाडणी केल्याचे इतिहासात अनेक पूरावे मिळतात.
पाचशे घोडेस्वारांचा प्रमुखः
उत्तरेत स्वराज्याचा विस्तार करायचा असेल तर मल्हाररावासारख्या दूरदृ‛टीच्या मुत्सद्दी सरदारचा मोठा उपयोग होईल अन्यथा स्वतः मल्हाररावच उत्तरेत स्वतंत्र बस्तान बसवेल असे बाजीरावाला वाटत होते. कारण बाळाजी विष्वनाथांच्या उत्तर स्वारीत मल्हारराव स्वतंत्र पथक म्हणून सामील झाले होते. मल्हाररावांच्या लग्नानंतर बाजीरावाने त्यांना स्वतःच्या सैन्यात सामील करून घेतले. मराठा पेशवा यांनी मल्हाररावांस पाचशे घोडेस्वारांचा प्रमख बनले.
बाळाजी विष्वनाथाच्या कारकीर्दीच्या अखेरीस मल्हाररावाने उदाजी पवार यांच्या मदतीने माळव्याचे राजकारण सुरू केले होते. पेशवेपदी बाजीरावांस नियुक्त करू नये. यासाठी दरबारातील वयस्क व मातब्बर मंडळीने विरोध केला. तेव्हा भट घराण्याच्या सेवचा विचार करुन बाजीराव बल्लाळ यांसे पेशवे पदाची वस़्त्रे 17 एप्रिल, 1720 रोजी छत्रपती शाहु महाराजांकडून दिली गेली.
पेशवेे बाजीरावांनी सर्व जुन्या सरदारांचे कायमचे उच्याटन करण्यासाठी जाणीवपुर्वक नव्या समविचारी, पराक्रमी व एकनिष्ठ असणाऱ्या नव्या तरून सरदारांस व सुभेदारांस आपल्या भोवती जमा केले. त्यात मल्हारराव होळकर, राणोजी शिदे, उदाजी पवार होते. मल्हाररावासारखा धाडसी, पराक्रमी स्वाभिमानी स्पष्ट वक्ता असलेला पेशव्यास एक चांगला हिरा मिळाला. जो की पेशव्यांचा उजवा हात मल्हारराव होळकर व डावा हात राणोजी शिदे हे लाभलेले होते. एवढेच नव्हे तर चिमाजी अप्पाच्या प्रत्येक स्वारीत मल्हारराव होळकर नेहमी राहत असत.
मल्हाररावांची बढतीः
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या सेवत आल्यानंतर पहिली मोहिम निघाली खानदेशावर हल्ला करून अजीमउल्लाखानचा सरदार दाऊदखानचा दारून पराभव केला.. या युध्दात मल्हाररावांनी पराक्रम गाजवुन ही मोहिम फत्ते करून परत आले. इ. स. 1717 च्या स्वारींत दिलेल वचनही पूर्ण केलं पाहिजे असें बाजीरावांस वाटून त्यांनी मल्हाररावांस छत्रपती शाहू महाराजांच्या परवानगीनें इ.स. 1725 त चैथाई व सरदेशमुखी हे हक्क वंशपरंपरा वसूल करण्याविषयी व मोकास बाबीपैकीं अर्धा महसूल सेनाखर्चाकरितां घेण्याविषयींची सनद करुन दिली.
त्यानुसार मल्हारराव माळव्यात इ. स. 1728 पर्यत हा हक्क वसूल करीत तेथेच ‘स्वराज्याचे कार्य करीत असताना अलमपूर येथे कानाच्या व्याधी होवून 20 मे 1766 राहीले. असे यावरून स्पष्ट होते. मंगळवारी सुभेदारांस देवाज्ञा झाली. पेशवे माधवराव यांनी 2 जून 1766 रोजी सुभेदारांच्या पश्चात त्यांच्या छत्रीसाठी दिलेली सनद- मालजी होळकर यांजकडे छत्रीचे खर्चाकरितां इनाम गांव दिल्याबददल सनद बार आहे.
छत्री मौजे मल्हारनगर उर्फ अलंमपूर
परगणे बेरछा येथे आहे तेथें सदावर्ताचे वगैरे खर्चाबदल इनाम गांव.
17501 परगणे बेरछा पैकी गांवे 11
7,000 परगणे दतियापैकी गांव 3
3,000 परगणे भांडरपैकी एक गांव 1
………….. ,
27501
नूतन इनाम दरोबस्त कुलबाब कुलकानू म्हणोन सनद.
सुभेदार मल्हारराव होळकरांचा बांधा भारदस्त पाणीदार डोळ, सरळ नाक, रुंद छातीे असलेले शरीर यष्टीचे होते. त्यामुळे भव्य चेहरा व दिसण्यास गंभीर वाटत होते. मल्हारी लहान वयात असतानाच अतिशय चपळ व तल्लक होते. आजोळी राहून मामांचे मेंढरे रानात चारायला घेऊन जात असताना तो मामाच्या पागेत घोडयाची देखरेख करुन आपले जीवन सुरु केल, बघता बघता सैन्यात नोकरी करीत करीत जाऊन सुभेदार पदापर्यंत पराक्रमाने पदेे हस्तगत केले.
निधन :
सुभेदार मल्हारराव होळकरांनी मनगटाच्या जोरावर उत्तरेतं दिल्ली बादशहावर वर्चस्व निर्माण करुन अटकेपार झेडे लावण्या ऐवढे अफाट शौर्य दाखविले. मल्हाररावानी चार पेशव्याची प्रदीर्घ जवळपास पन्नास वर्ष म्हणजे अर्धे शतकभर तळपत्या तलवारीची साथ देऊन पाहिलेली होती.
त्यांचे निधन २० मे १७६६ रोजी, आलमपूर ता.लहार जि.भिंड(म.प्र) येथे झाले. त्यांचे निधन नेमके कोणत्या कारणामुळे झाले? याबद्दल अनेक तर्क-वितर्क आहेत.