-
अहिल्याबाई होळकर यांचे नेतृत्व(Ahilyabai Holkar Book)₹600.00
-
Holkarshahicha Itihas Part – 1₹2,000.00
-
Ahilyadevi Holkar Works : अहिल्यादेवींचे कार्य₹550.00
-
Itihasatil Ahilyabaiche Yogdan₹600.00
-
Holkarshahicha Itihas Part – 2₹2,000.00
-
होळकर सरदारांचे प्रशासन – Ahilyabai Holkar Book₹750.00
-
होळकर दरबारातील हिंगण्यांची वकिली₹600.00
-
Holkaranchi Kaiphiyat Part – 2₹1,000.00
-
तुकोजीराव होळकर-२₹2,000.00
-
Holkarshahichya Itihasachi Sadhane Part – 1₹2,000.00
-
भवानीशंकर बक्षीची रोजनिशी₹10.00
-
Maheshwar Darbarchi Batmipatre Part-2₹1,000.00
-
Maheshwar Darbarchi Batmipatre Part-1₹1,000.00
-
Shindeshahichya Itihasachi Sadhane Part – 4₹1,000.00
-
हिंगणे दप्तर खंड-१₹500.00
-
Holkarshahichya Itihasachi Sadhane Part – 2₹2,000.00
-
Holkarshahitil Striyancha Patrvyavhar Khand-12₹500.00
-
Holkarshahitil Patrvyavhar Khand 1₹500.00
Ahilyabai Holkar Information in Marathi
भारतीय इतिहासात ज्या शुरवीर स्त्रियांची गाथा वर्णन केले जाते. त्यात अहिल्यादेवींचा उल्लेख आवर्जून करावा लागतो. अशा या थोर अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ ला म्हणजेच वैषाख ७ शके ला श्री माणकोजी शिंदे व सुषिलाबाई यांच्या पोटी झाला.
महाराष्ट्रातील पुर्वीच्या बीड व सध्याच्या अहमदनगर जिल्हयातील जामखेड तालुक्यातील सीना नदीकाठच्या छोट्याशा “चोंडी” या गावी धनगर कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील श्री माणकोजी शिंदे हे चौंडी गावचे पाटील होते. आई सुषिलाबाई नावा प्रमाणेच सुषील, धर्माचरणी, ज्ञानी, विनयषील, कर्तव्य परायणात तूस भरही कमी पडणार नाही. अशी एक आदर्ष व्यक्तिमत्व होते.
देवधर्म करणे, पूजा-आर्चा करणे, साधु-संतांचा आदर करणे, किर्तन, भागवत सप्ताहास जाणे, दानधर्म करणे अशा धार्मिकवृत्तीच्या आदर्ष गृहिणी होत्या. श्री माणकोजी शिंदे व माता सुषिलाबाई यांना सहा अपत्य होती. त्यांची नावे पुढीलप्रमाणे, १.महादजी, २.येसाजी, ३.बाणाजी, ४.विठोजी, ५.सुभनजी अशी पाच मुले व एक मुलगी म्हणजेच अहिल्यादेवी होळकर अशी सहा अपत्य होती. असे पाटीलकी असलेल्या अतिषय संपन्न व सधन घराण्यात अहिल्याबाईंचा जन्म झाल्यामुळे त्यांचे बालपण अतिषय लाडात व आनंदात गेले.
अहिल्याबाईंचे आईवडील धर्मपरायण वृत्तीचे असल्याने त्यांनीही आपल्या मुलीवर उत्तम संस्कार केले. गोरगरीब दुःखी कष्टी लोकांना मदत करीत असताना आपल्या मुलीस चांगलेच संस्कार व वळण लावण्यात त्यांच्या आईचा फार मोठा वाटा आहे. अशा धार्मिकवृत्तीच्या आई वडीलांच्या हाताखाली व मार्गदर्षनाखाली धार्मिक शिक्षणाचे बाळकडू त्यांना बालवयातच मिळाल्याने त्या आयुष्यभर ईष्वराचे चिंतन व उध्दार कार्य करण्यात मग्न होत्या.
अहिल्यादेवींचे शिक्षण:
वडीलांनी आपल्या सहा ही अपत्याना तत्कालीन परिस्थिीप्रमाणे दिले. अहिल्याबाईचे शिक्षण हे त्यांच्या पाच भावाप्रमाणेच शिक्षण दुसरीपर्यत झालेले होते. त्यांना मोडी लिपी लिहिता व वाचता येत होते. मोडी भाषेचे ज्ञान उत्तम होते. या सोबतच तलवार चालविणे, घोडयावर बसणे, दांडपटटा चालविणे, नेम धरणे, तीर मारणे व बचावात्मक पवित्रा घेणे इ. प्रशिक्षण मिळालेले होते.
अहिल्याबाईच्या व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भता नजरेत भरलेल्या मल्हाररावांनी तिला प्रयत्नपुर्वक राज्यकाराभारात सहभागी करून घेतले. देवनागरी लिपीसोबतच मोडी लिपीत त्यांना लिहिता व वाचता येत होते. तसेच मराठी सोबतच संस्कृत व हिंदी भाषेचेही त्यांना ज्ञान होते. तसेच रामायण, महाभारतासारख्या महाकाव्यासोबतच गीतासारख्या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथाची ही ओळख त्यांना होती. राज्याकाराभारात चालविण्यासाठी आवष्यक असा सैनिकी शिक्षणाची व्यवस्था मल्हाररावांनी अहिल्यांबाईसाठी केलेली होती.
राज्यकारभाराचे धडेः
एक पराक्रमी सुभेदार मल्हारराव होळकर यांची कर्तबगार सून म्हणून अहिल्याबाई होळकर यांचे कार्य महान स्वरूपाचे आहे. सूभेदार मल्हाररावांना जाणाीव होत होती की आपल्या पुत्रापेक्षा सूनबाई सर्वच बाबतीत गंभीर, आज्ञाधरक, अधिक हूषार, व सरस आहेत.
सासरे मल्हारराव व सासु गौतमाबाईनी अहिल्याबाईचे गुण ओळखुण आपल्या मार्गदर्शन खाली व राजनितीचे व युध्दाचे तसेच राज्यकारभार चालविण्याचे, शेजारील राज्याबद्दलच्या धोरणाविषयीचे, राजनितीचे व्यावहारिक शिक्षण, युध्दाचे डावपेच, यूद्धनिती, व्यावहारीक ज्ञान, यूद्धातील कामगिरी, समस्या, युध्दनिती व प्रशासनातील महत्वपुर्ण बाबी, युध्दातील अनेक पेचप्रसंग, युध्दक्षेत्रावर करावयाची कामगिरी, खाजगी व दौलतीच्या कामकाजाची जबाबदारी सांभाळणे, दारूगोळा व युध्दसामुग्री गोळा करणे, ती सूरक्षित स्थळी हलविणे व त्याविषयीची माहिती अतिषय गुप्त ठेवणे, सल्ला मसलतीचे कार्य करणे, यशस्वीपणे फौजेच्या हालचाली करणे, त्याच्यातील हिकमती व डावपेचाने आपल्या बाजुने परिस्थिती निर्माण करून अर्धे युद्ध लढाई अगोदरच जिंकणे, शत्रूचे मानसिक परिवर्तन करून त्याचे मानसिक खच्चीकरण करणे, शत्रूशी करावयाचे तह व करार, पत्रांची ने-आण करणाऱ्या काशीदांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था नोकरांकरवी करून घेणे, हूंडया वटविणे इत्यादी अनेक कामाविशयी इत्यंभूत बाबींचे शिक्षण व प्रशिक्षण दिले.
ते अहिल्याबाईने काळजीपुर्वक वेळोवेळी लक्ष देऊन आत्मसात करून अतिशय कुशलपणे त्यांनी नंतर राज्यकारभार केला. त्यामुळेच तसेच या सर्व बाबीचे प्रशिक्षण त्यांना सहजपणे सासऱ्याकडून मिळाले. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या सूनेला व मुलाला राज्यकारभाराचे योग्य ते धडे दिल्याने हळुहळु राज्याची थोडी थोडी जबाबदारी देऊन त्यांना आपल्या कार्यात चांगलेच सहभागी करून घेतले.
त्यामुळे सुभेदार मल्हारराव होळकर यांना राज्य विस्तार करण्यास व मराठा राज्य उत्तर भारतात पसरविण्यास पूर्ण वाव व सहकार्य मिळाले. म्हणुनच मराठयाना या अशा पराक्रमी सरदारमुळेच दिल्लीवर आपला वचक व विजय संपादित करता आला. पानिपतच्या युद्धनंतर पुन्हा मराठ्यांची जबर बसवण्यासाठी उत्तर मोहिम हाती घेतली. तेव्हा मल्हररावांनाही आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी ते या मोहिमेत आघाडीवर असताना वाटेतच त्यांची प्रकष्ती बिघडल्याने अचानक कर्तबगार सासऽयाचा आलमपूर ता.लहार जि.भिंड (मध्यप्रदेश) येथे मृत्यू झाला.
त्यामुळे होळकर राज्याचे फार मोठे नुकसान झाले. पण यापुर्वीच मल्हररावांनी तुकोजी होळकराकडे बरीच सेनापतीचे कार्य सोपविलेली होती. सासऱ्याच्या अचानक जाण्याने अहिल्याबाईची अवस्था फार वाईट झाली. साऱ्या होळकर राज्याचा भार त्यांच्या अंगावर येवून पडला. शिवाय भोवतालची परिस्थिती फार बिकट होती. तरीही त्यांनी साऱ्या संकटांना न डगमगता तोंड दिले.
अहिल्याबाईंचे व्यक्तिमत्व:
अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वसार त्यांच्या आई सुशीलाबाई, वडील माणकेाजी शिंदे, सासरे मल्हारराव होळकर, सासू गौतमाबाई यांचा खूप मोठा प्रभाव पडलेला होता. आईच्या धर्मनिष्ठेचा मोठाच ठसा अहिल्याबाईंवर उमटलेला होता. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व धार्मिक कार्यात सूर्यप्रकाशाएवढे उजळून निघाले असले तरी सामाजिकता हा देखील त्यांचा स्थायिभाव होता. बद्रिनाथपासून ते रामेश्वरपर्यंत आणि द्वारकेपासून ते जगन्नाथापर्यंत संपूर्ण भारतात त्यांच्या लौकिक-अलौकिक कार्याचा ठसा उमटलेला आहे.
दिनचर्याः
होळकर संस्थानातील तत्कालीन ब्रिटीश अधिकारी जाॅन माल्कनने लिहिलेले आहे. त्यानुसार अहिल्याबाईची दिनचर्या पुढील प्रमाणे होती. अहिल्याबाई हया सूर्याेदयापूर्वी घटका अडीच-घटका उठून स्नान करीत व नंतर पूजाआर्च करीत. यानंतर त्या नियमितकालपर्यंत पुराण श्रवणास बसत नंतर दानें देऊन त्या आपणासमक्ष ब्राम्हणांस भोजनें घालीत. तोच त्यांचे ताट वाढून येई. त्यांचे स्वतःचे भोजनास सारे शाकभाज्यांचे पदार्थ असत त्या आपलें भोजन आटपल्यावर पुनःकांही वेळ परमेश्वर स्तवन करुन थोडा वेळ वामकुक्षी करीत. नंतर पोषाख करुन त्या सरकारी कामकाज करावयास दरबारात जात असत. जेंव्हा दरबारांत जात तेंव्हा बहुधा दोन प्रहर होत. तेथें सूर्यांस्तापर्यंत कामकाज चाले. याउपर एक प्रहर पूजाअर्चा फराळ वगैरे कृत्यांत जाई मग रात्री सरकारी काम मध्यरात्रीपर्यंत चाले. अशी त्यांची नियमित दिनचर्या होती. अहिल्याबाईच्या नित्याच्या पंगतीत अनेकांना जेवणाचा मान होता. त्यात शरिफभाई, भारमलदादा होते.
अहिल्याबाईचा स्वभावः
अहिल्याबाईचा स्वभाव अतिशय प्रेमळ, करारीपणा व कर्णाचे औदार्य असले तरी अहंकार व सुडबुध्दी अजिबात कधीही त्यांच्या अंगी नव्हता. धार्मिकवृत्तीच्या ईश्वरावर दृढविश्वास व श्रध्दा होती. लहानपणापासून हूशार, चाणाक्ष, मन विवेकी व सात्विक स्वभाव होता. मनाचा दयाळुपणा, परधर्मसहि‛णुता, औदर्यावादीवृती व माणसांची अचूक पारख असलेल्या मोठया मनाच्या सुसंस्कृत राज्यकन्या होत्या. तसेच मुर्तीमंत प्रतिके प्रचंड बुध्दीमत्ता, मुत्सद्देगिरी, चोख व्यवहार, अजोड कर्तृत्व, शुद्ध चारित्र, सदाचरणी व सामाजिक समतेचा पुरस्कार करणारी आदर्श राज्यकर्ती होत्या.
सदैव कार्यमग्न असणारी अलौकीक साध्वी, त्यागी व वैराग्यवृत्तीच्या होत्या. भारताच्या इतिहासातील अहिल्याबाई शूर व मुत्सुद्दी स्वभावाची स्त्री राज्यकर्ती होती. आपले वैयक्तिक जीवन अतिशय साध्या पध्दतीने जगत असताना मात्र जनतेसाठी अहोरात्र अनेक निर्माण कार्य केले. म्हणून त्यांना पुण्यष्लोक या उपाधीने गौरविले आहे. अहिल्यादेवी आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम केले. एक आदर्शमाता, कन्या, पत्नी, सून व प्रशासक म्हणून संपूर्ण भारतभर त्यांच्या हयातीतच त्यांचा देवी, लोकमाता, पुण्यश्लोक, गंगाजलनिर्मळ या विषेश नावांनी लोक उल्लेख करू लागले. दुर्भाग्य नियतीने अहिल्याबाईच्या डोळया समोर सासू, पती, सासरे, मुलगा, सुना, जावाई, मुलगी, व नातु व नात सूना गेल्याचे आभाळा एवढे दुःख त्यांनी सहन करून जनहिताला प्राधान्य देऊन अख्ये आयुष्य खर्ची लावले.
अहिल्याबाईचे राहणीमानः
अहिल्याबाई सकाळी ब्रहयमुहूर्तवर उठून कर्मे आटोपून धर्मग्रंथ श्रवण करीता तसेच दानधर्म या कामातून त्यांची सकाळ सत्कार्याने उजळून निघत होती. त्यानंतर त्याचा शुभदिवस सुरू व्हायचा. त्या शाकाहारी जेवण करित त्यांना मांसाहर वज्र्य होता. त्या अतिषय सोज्वळ जीवन व्यतित करित होत्या. अहिल्याबाईचे राहणीमान हे अत्यंत साधे व अंगावर पांढरी साडी डोक्यावर पदर, कपाळावर पांढरा गोल गंध, पती निधनानंतर पांढरी साडी नेसत. दागिन्यांचा तर त्यांनी त्यागच केलेला होता. त्यांच्या अंगी हिंदु स्त्रीयांचा मुर्तिमंत आदर्ष दिसून येतो. सासऱ्यांनी अतिषय काटकसरीने कमावलेला सोळा कोटी रूपयाचे त्यांना या अफाट पैशाचा अजिबात मोह नव्हता.
एवढ्याा अमाप संपत्तीची मालकीण असतानाही या संपत्तीचा कधीही एका आण्याचा सुध्दा दुरूपयोग केला नाही. त्यांनी या अति संपन्न परिस्थितीतही अतिषय साधे व निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग निवडलेला होता. अहिल्याबाईचा आहार बेताचा असून तो ही शुद्ध शाकाहारी स्वरूपाचा होता. साध्या वेष्यामध्यें, साध्या आसनावर घोंगडी टाकून त्या बसत असत. मातोश्री अहिल्याबाई यांच्या अगाध संपत्तीची मालकीण असूनही त्या तपस्विनीचे जीवन जगल्या. आयु‛यभर त्यांनी सिंहासनावर पांढरी घोंगडी ठेवून राज्यकारभार केला. प्रजेला त्या सांगत असत दौलतीत जो नमस्कार केला जातो तो दौलतीस असतो. खासगीत आम्हाला नमस्कार करण्याची गरज नाही. यावरून त्यांच्या निःस्वार्थीपणाचा व स्थितप्रज्ञतेचा अनुभव येतो.
विवाहः
पेशवे व मल्हारराव होळकर उत्तरेकडून पुण्याकडे जात असतांना त्यांचा चैंडी या गावी मुक्काम होता. गावच्या बाजूलाच असलेल्या सीना नदीच्या किनाऱ्यावर आठ-नऊ वर्षेच्या दहा-बारा मुली वाळूचे शिवलिंग बनवण्याचा खेळ खेळत होत्या. कोणाचे शिवलिंग सुंदर होईल याच चढा ओढीत त्या रंगूण गेलेल्या.असताना मराठा तळावरील एक घोडा अचानक उधळून पळत सूटला. टापाच्या आवाजाने घोडा जवळ येत असल्याचं पाहून साऱ्या मुली पळून गेल्या पण घोडा शिवलिंग जवळ येताच चिमूकल्या अहिल्याने आपले शरीर त्या पिंडावर झोकून दिले. तेवढयात उधळलेला घोडा तिच्या जवळून पळत गेला.
तेव्हा श्रीमंत बाजीराव पेशवे व सुभेदार मल्हारराव होळकर त्यामुलीकडे धावले. पेशवे जवळ येऊन अहिल्येस म्हणतात की, पेारी तूला वेड-बिड लागलं की काय? घोडयाने तूडवले असतेना? अशी वाळूच्या ढिगाऱयांवर का पडून आहेस? सात-आठ वर्षची अहिल्या विचारलेल्या प्रश्नावर आश्चर्य व्यक्त करीत म्हणाली. वाळूचा ढिग!… हे तर आहे शिवलिंग. मी घडविलेलेआपण जे घडवाव ते प्राणपणाने रक्षवं अस थोर पुरूष म्हणतात. आणि याला रक्षून मी तेच केले…!
अहिल्येच्या नजरेतील तेज व धैर्यपूर्ण भाव आत्मविष्वास पाहून पेशव्यांना खूप आनंद झाला. तिची स्तुती करतांना श्रीमंत म्हणतात. सरदार मल्हारराव मुलीच्या वागण्यावर व तिच्या गुणावर मी संतुष्ट आहे. मला एखांदा अविवाहीत मुलगा असता तर तिला मी माझी सूनच केली असती. पण तुम्ही तिला तुमची सून करून घ्या. तूमच्या घराण्याचे नाव ती नक्कीच उज्ज्वंल केल्या वाचून राहणर नाही. वयाच्या ८ व्या वर्षी अहिल्यादेवींचा विवाह शाही वातवरणात खंडेरावासोबत शनिवार वाडा, पुणे येथे झाला. विवाहास सातारचे चोथे छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते.
त्यांच्या वैवाहीक जीवनात सुखापेक्षा दुखाःला अधिक सामोरे जावे लागले, परंतु त्या कधी डगमगल्या नाहीत. तितक्याच ताकदीने त्या कार्य करीत राहिल्या. अहिल्याबाई व खंडेराव यांना दोन अपत्य होती. अहिल्याबाईच्या जिवनात आनंदाचे दिवस आले. ते लहानपणातच नंतर मात्र त्यांना फारसा कौटूंबिक आनंद मिळणार नाही. खंडेरावांना अहिल्याबाई शिवाय अन्य पत्नी होत्या. परंतु खंडेराव शुरवीर होते. अहिल्यादेवी खंडेरावाचा योग्य तो मान ठेवीत त्यांच्या सुखाला जपत, पण जर ते त्यांच्या कामात आड आले तर, त्या जूमानीत नसतं. काही वेळ तर त्या पतीलाही उपदेष करीत. त्यांच्या अशा स्वभावामुळे सर्वावरच वचक होता. एवढे नव्हे तर खंडेरावानाही त्यांचा अपमान करणे शक्य नव्हते. खंडेराव अहिल्याबाईची योग्यता जाणून होते. त्यांच्याशी ते आदराने वागत असत त्याच्या प्रमाणे पार्वताबाई व सरताबाईशी त्यांचा व्यवहार सभ्यपणाचाच होता.
अपत्यः
मल्हारराव व गौतमाबाई आपल्या सूनेवर अधिकच प्रेम करत होते. त्यातच १ डिसेंबर १७४५ मध्ये सुन अहिल्याबाईस मुलगा झाला त्याचे अतिषय आवडीने मालेराव असे नाव ठेवण्यात आले. नंतर तीन वर्षांनी २० मे १७३३ त्यांना मुलगी झाली. तिचे नावे मूक्ताबाई या दोन मुलांच्या जन्मामुळे त्यांचे संसारात सुख समाधान सुरू झाला. पुण्यश्लोक अहिल्याबाईंची दिवंगत किर्ती भारतभर पसलेली आहे. प्राचीन भारतातील धर्मराजानंतर पुण्यश्लोक ही पदवी दोनषे वर्षापूर्वी समाजात जन्मास आलेल्या महिलेला मिळाली. ज्या अलौकीक स्त्रीने आपले आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवले. प्रजेच्या सुखसोयीसाठी अहोरात्र परिश्रम घेऊन संपूर्ण भारतभर अनेक जनकल्याणाच्या सुविधा आपल्या प्रशासनातून उपलब्ध करून दिल्या. पण त्यांनी निर्माण केलेल्या अप्रतिम वास्तू, तलाव, घाट, विहिरी व जलकुंड अनेक ठिकाणी आज ही पहावयास मिळतात, नव्हे त्याचा वापर अजूनही चालूच आहे परंतू अहिल्याबाईंच्या मृत्यूनंतर अनेक राजसत्ता या देशात येवून गेल्या. बरेच सत्तांतरे घडून आली परंतू त्यातील एकही राजाने अथवा सत्याधीशाने असे महान निर्माण कार्य केलेले नाही. किंवा त्याने अहिल्याबाईचे कर्तृत्व आचरणात आणण्याचा प्रयत्नही केला नाही.
संकटाची मालिकाः
मातोश्री अहिल्याबाईं यांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालू असताना पती खंडेराव कुंभेरीच्या युद्धात मारले गेले. तेंव्हा त्यांच्यापुढे आभाळा एवढे दुःखाचा डोंगर उभा राहिला. एवढेच नाही ‘संकटे एकटी येत नसतात सोबत संकटाची मालीका असते’ असाच प्रकार अहिल्याबाईंच्या कौटूबिंक जीवनात घडून आले. पती निधनानंतर आई सुषिलाबाई, वडील माणकोजी षिंदे, सासू गौतमाबाई, सासरे मल्हारराव, मुलगा मालेराव, बंधू यांच्या स्वर्गवासी झाल्याने अहिल्याबाईंच्या जीवनात मोठा अंधकार पसरलेला होता. तरी स्वतःच्या जीवनातील आभाळाएवढे दुःख बाजूला ठेवून सामान्य रयतेच्या कल्याणासाठी कार्य करीत राहिल्या. नव्हे तर स्वतःचे खाजगीचे सोळा कोटीची मालकीण असताना देखील अतिशय सामान्य जीवन जगून संपूर्ण भारतभर निमार्ण कार्य करून आपल्या जीवनातील दुःख बाजूला ठेवले. तसेच त्यांनी सती प्रथेस विरोध करीत सुनेंस सती जाण्यापासून परावृत करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता.
होळकर राज्यात चोर, डाकुंनी डोके वर काढून मोठ्याा प्रमाणात धुमाकुळ घातल्याने जनतेला याचा फार त्रास होत होता. त्यामुळे जनता खूपच घाबरलेली होती. तेव्हा अहिल्यार्बाइंनी धुमाकुळ घालणाऱ्या दरोडेखोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी एक विलक्षण दवंडी पिटवली, ‘जो दरोडेखोरांचा पुरता बंदोबस्त करील त्याला मी माझी मुलगी देईन. अशी भर दरबारात घोषणा केली. यामुळे स्वतःची मुलगी प्रजेच्या हितासाठी पणाला लागली. ठग पेंढाऱ्यांचा यशस्वीपणे जो कोणी बंदोबस्त करेल त्यास आपली मुलगी देईन अशी घोषणा भर दरबारात केली. तेव्हा यशवंतराव फणसे या वीरांनी हा पण यशस्वी करून दाखविला. तेव्हा त्याचा जात, पात, घराणे, पंथ, वंष, कुळ व धर्म याची कोणतीही तमा न बाळगता तुकोजी होळकर यांच्या सैन्यात काम करणारे सरदार श्री यशवंत फणसे या बहाद्दर तरूणाने हा ‘पण’ जिंकला.
अहिल्यार्बाइंनी आपल्या मुक्ता या एकुलत्या एका मुलीचा विवाह सन १७६६ मध्ये त्याच्याशी लावून देवून त्याच्या पराक्रमाचा उचित गौरव केला. एवढेच नव्हे तर त्यास काही गावांची जहागिरी दिली. होळकर राज्याच्या शासक असलेल्या मातोश्री अहिल्याबाईंने मध्ययुगात इतिहास नोंद ठेवेल असा एक विवाह घडवून आणला. या विवाहातून समाजात समानतेचा संदेश गेला. सन १७६७ मध्ये सरदार यशवंत फणसे यांना एक मुलगा म्हणजेच अहिल्याबाईना नातु झाला. त्याचे नाव ‘नथोबा’ असे ठेवले. नंतर अहिल्याबाईनी नथोबाचे सन १७८० मध्ये लग्न केले. पण तो लवकरच सन १७९० ला मृत्यू पावला. नंतर एका वर्षाने ३ नोव्हेंबर १७९१ रोजी जावाई यशवंत फणसेचा मृत्यू झाल्याने मुक्ताबाईही प्रथेप्रमाणे सती गेली. जेव्हा जावाई यशवंत फणसे निधन पावले. तेव्हा मुलगी मुक्ताबाई सती जाण्यासाठी तयार चालु होती. तेव्हा ती मुक्ताबाईस सती न जाण्याविषयी विनवणी केली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ती शेवटी सती गेली. असे घडल्याने अहिल्याबाईच्या डोळया समोर अंधार पसरलेला होता.
मृत्यू:
वयाच्या ७१ व्या वर्षी श्रावण वद्य १४ रोजी म्हणजेच त्यांचा मृत्यू १३ ऑगस्ट १७९५ रोजी किल्ले महेश्वर(मध्यप्रदेश) येथे झाला.
थोडक्यात प्रश्नउत्तरे :
अहिल्यादेवी होळकर यांचे भारतभरातील लोककल्याणकारी कार्य
Ahilyabai Holkar Work Throught in India
(संकलन स.२०१७ पर्यंतचे असून यामध्ये मौखिक व लिखित निर्माण आणि जीर्णोद्धार कार्यांचा समावेश आहे)
महाराष्ट्र राज्य – Maharashtra:
A. अहमदनगर जिल्हा:
१. अकोले तालुका:
- वाशेरे – बारव.
- वीरगाव – बारव.
- औरंगपूर – बारव.
- तांभोळ – बारव.
- ब्राह्मणवाडा – लिंबोणी बारव(मळ्याच्या वाहळाजवळ).
- लिंगदेव – लिंगेश्वर महादेव मंदिर व बारव.
- कुंभेफळ – शेषनारायण मंदिर, बारव.
२. श्रीगोंदा तालुका:
- श्रीगोंदा – खंडोबा मंदिर व बारव, शहरात ३ बारवा(बाजारपेठे शेजारी, शहराच्या उपवेसी शेजारी, कॉलेज आवारात,सध्या बुजवली), सिद्धेश्वर नदीघाट.
- मांडवगण – होळकर वाडा व पाठीमागील बाजूला भव्य बारवयुक्त मंदिर, सिद्धेशवर मंदिर, नदी घाट, राणी अहिल्यादेवींच्या हत्तीची समाधी व त्याच्या साखळ्या, गावामध्ये अन्य ४ बारव, संपूर्ण गावाला सात वेशी सहित तटबंदी.
- कोथूळ – खंडोबा मंदिर.
- पुही पाटी – भव्य बारव, पाणपोई.
- महेंद्र वस्ती(श्रीगोंदा) – भव्य बारव(श्रीगोंदा-मांडवगण रोडवर).
- पेठगाव – होळकर गढी(होळकरांच्या सरदारांना दिली), बारव.
३. कोपरगाव तालुका:
- पुणतांबे – होळकर वाडा, कार्तिक स्वामी मंदिर, गोदावरी नदीच्या काठावर अहिल्यादेवी नदीघाट .
- सावली विहीर – बारव.
- भोजडे – बारव.
- चांदेकसारे – बारव.
४. पाथर्डी तालुका:
- पाथर्डी – खोलेश्वर महादेव.
- मढी(कानिफनाथ महाराजांची समाधी) – तीन बारावा(गौतमी बारव-सासूबाईंच्या स्मरणार्थ बांधली) .
- धामणगाव – बारव.
५. संगमनेर तालुका:
- संगमनेर – राम मंदिर.
- पेमगिरी – बारव.
- देवकौठे(चोरकौठे) – जगदंबा देवीचे मंदिर आणि बारव.
- गुंजाळवाडी – बारव.
६. राहता तालुका:
- कोऱ्हाळे(बु.) – संपूर्ण गावाला तटबंदी, बारव.
- वाकडी – बारव.
७. राहुरी तालुका:
- राहुरी – बारव(राहुरी कॉलेजच्या उत्तरेला).
- वांबोरी – बारव.
८. शेवगाव तालुका:
- अमरापूर – बारव.
- भावी-नीमगांव – रेणुकादेवी मंदिर, बारव, धर्मशाळा.
९. नेवासा तालुका:
- सोनई – बारव.
१०. पारनेर तालुका:
- पारनेर – सिध्देश्वर मंदिर.
११. जामखेड तालुका:
- जामखेड – खंडोबा मंदिर.
- चोंडी – अहिलेश्वर महादेव मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, मारुती मंदिर, रमजानी मशीद, सीन नदीच्या काठावर नदीघाट.
B. पुणे जिल्हा:
१. जुन्नर तालुका:
- ओझर :- २ विहिरी व कुंड.
२. खेड तालुका:
- वाफगाव :- भुईकोट किल्ला, गुळवणी बारव, राजराजेश्वर मंदिर.
- बुरसेवाडी :- महादेव मंदिर.
३. पुरंदर तालुका:
- जेजुरी :- होळकर वाडा, विठ्ठल मंदिर, १८ एकरात भव्य तलाव, मल्हारगौतमेश्वर छत्री मंदिर, द्वारकाबाई होळकर व बनाबाई होळकर छत्री मंदिर, ३ बारावा, गायमुख जलकुंड, खंडोबा मंदिरास भव्य तटबंदीचा निर्माण, जेजुरी गडावरील पायऱ्यांची निर्माती, जेजुरी गडावरील सर्व दगडी कमानी, जनाई माता मंदिर व त्या शेजारील तीर्थ कुंडाचा निर्माण.
- पिसुर्डी :- बारव(संकेत मंगल कार्यालयामध्ये पुणे – सातारा रोडवर).
- वडकी नाला :- दिव्य घाटाच्या पायथ्याशी भव्य अहिल्याबाई होळकर तलाव(मस्तानी तलाव).
- माळशिरस :- भुलेश्वर मंदिर.
४. आंबेगाव तालुका:
- मंचर :- होळकर वाडा, राम मंदिर.
- खडकी-पिंपळगाव :- होळकर वाडा, लक्ष्मीनारायण मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर, काळभौरवनाथ मंदिर, अमृतशेवर मंदिर, बिरोबा मंदिर, घोडगंगा नदीघाट, उदाबाई होळकर-वाघमारे समाधी, बारव.
- काठापूर :- होळकर वाडा(संताजी वाघ यांना देण्यात आला), दत्त मंदिर.
- आंबेगाव घाट :- दिवाबत्तीची सोय केली, ती जागा आज हि आहे.
५. पुणे:
- पुणे :- होळकर वाडा, गणपती मंदिर, संगम नदीघाट(मुळा-मुठा नदी संगम).
- खडकी :- महादेव मंदिर, मुळा नदीघाट, श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) समाधी.
- नवी सांगवी :- मुळा नदीघाट, दत्त नदीघाट(मुळा नदीवर).
६. बारामती तालुका:
- सोमेश्वर :- बारव.
- काटेवाडी :- बारव.
- मुरूम :- मल्लिकार्जुन महादेव मंदिर.
- मांगोबाची वाडी(सुपे) :- गुजराची बारव किंवा कुंरूजाचा विहीर.
७. इंदापूर तालुका:
- पिटकेश्वर :- बारव.
- पळसदेव :- पळसनाथाचे मंदिर.
८. शिरूर तालुका:
- बुरुंजवाडी :- बारव.
९. दौंड तालुका:
- कुरकुंभ :- बारव.
१०. हवेली तालुका:
- देहू :- नगारखाना व इंद्रायनी नदीच्या तटावर नदीघाट.
११. भोर तालुका:
- रांझे :- होळकर वाडा(पूर्वी ५ माजली होता), रांझेश्वर महादेव मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर.
C. औरंगाबाद जिल्हा:
१. खुलताबाद तालुका:
- वेरूळ :- अहिल्याबाई होळकर तलाव/अमृततीर्थ जलकुंड, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, लक्षविनायक गणपती मंदिर, वेरूळच्या लेण्यांचा जीर्णोद्धार.
२. औरंगाबाद तालुका:
- औरंगाबाद :- खंडोबा मंदिर(सातारा परिसरात)
- एकलहरा गाव(पिंप्रीराजा) :- एकलहरामाता मंदिर, २ बारवा.
३. वैजापूर तालुका:
- धोंदलगाव :- बारव.
- शिऊर :- रावणेश्वर महादेव मंदिर.
४. पैठण तालुका:
- पैठण :- तुकाराम महाराज मंदिराभोवती तटबंदी, सिद्धेश्वर मंदिर.
- चौंडाळा :- कमानी बारव व शेजारी देवीचे प्राचीन मंदिर, गावामध्ये बारव, दगडी वेस.
- बिडकीन :- बारव.
- विहामांडवा :- बारव.
५. गंगापूर तालुका:
- गंगापूर :- बारव.
- कायगाव :- बारव.
- शिरेगाव :- शिरेश्वर मंदिर व बारव.
६. सिल्लोड तालुका:
- हट्टी :- रणेश्वर महादेव मंदिर.
D. नाशिक जिल्हा:
१. चांदवड तालुका:
- चांदवड :- किल्ले चांदवड, होळकर वाडा(रंगमहाल), जुना होळकर वाडा(रेणुका गर्ल्स हॉस्टेल),सात दगडी कमानी(देवी वेस), २५ पेक्षा अधिक बारवा(नरुटी बारव,विठोबा बारव,शहरातून रेणुका देवीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत), खंडोबा मंदिर, चंद्रेश्वर महादेव मंदिर, रेणुकामाता मंदिर, कुंड, विष्णू मंदिर, मुर्डेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर, कार्तिकेश्वर महादेव मंदिर, बुखारी बाबांचा दर्गा, नानावली बाबांचा दर्गा, खोकड तलाव, होळकर तलाव.
- विंचूर :- बारव(तिथे शत्रूंपासून बचावासाठी सुरक्षित जागा केलेली होती).
- वडनेर भैरव :- भैरवनाथ मंदिर, तीन मजली चावडी, भैरवनाथ मंदिराजवळ बारव बांधली, अन्य चार बारावा.
- राहुड :- बारव.
२. त्र्यंबकेश्वर तालुका:
- त्र्यंबकेश्वर :- कुशावर्त जलकुंड, प्रयागतीर्थ तलाव,गौतमी तलाव, पूजेची सोय केली.
- ब्रह्मगिरी :- किल्ले त्र्यंबकगडावर धर्मशाळा व बारव.
३. नाशिक तालुका:
- नाशिक :- कालिकामात मंदिर व शेजारी बारव, विश्वेश्वर महादेव मंदिर, कालिकामाता मंदिर व शेजारी बारव, राम कुंड, अहिल्याबाई कुंड, अन्य १५ बारवा(१-वाकडी/कारंजा बारव, २-टाकळी रोडलगत, ३-साधू ग्राम, ४-त्र्यंबकेश्वर रोडलगत), अहिल्याघाट, गोदावरी नदीघाट(गंगा घाट).
- ओझर :- चार बारवा व होळकर कालीन भुयारे(काही बारवांमधून भुयारी मार्ग थेट चांदवडच्या होळकर वाड्यात जातो), संपूर्ण गावाला तटबंदी व अनेक वेशी.
- सिडको :- बारव.
- आडगाव :- ५ बारवा. संपूर्ण गावाला तटबंदी व अनेक वेशी.
- बेलगाव ढगा :- बारव.
- नांदूर :- बारव.
- गंगापूर :- नदी पात्रामध्ये महादेव मंदिर.
४. मालेगाव तालुका:
- चंदनपुरी :- बाणाई मंदिर, खंडोबा मंदिर, बारवा.
- गाळणा :- किल्ले गाळणा.
- निमगाव :- बारव.
- गिरणारे :- बारव.
५. येवला तालुका:
- चिचोंडी :- शिव मंदिर व संलग्न बारव.
- पाटोदा :- बारव.
- मुखेड :- महादेव मंदिर व चारी बाजूने किल्ले सदृश्य तटबंदी.
६. निफाड तालुका:
- निफाड :- होळकर वाडा, कृष्ण मंदिर व चारी बाजूने किल्ले सदृश्य तटबंदी, दर्गाह, बारव.
- लासलगाव :- अहिल्यादेवींचा किल्ला, हेमाडपंथी मंदिरे, बारावा.
- करंजी(खुर्द) :- गोदावरी नदीघाट, महादेव मंदिर, मल्हार तुकेश्वर महादेव मंदिर, धर्मशाळा.
- चांदोरी :- गोदावरी नदीच्या पात्रातील बारा वेगवेगळी शिव मंदिरे, पंचमुखी महादेवाचे दुर्मिळ मंदिर.
- भेंडाळी :- बारव.
- महाजनपूर :- बारव.
- सोनगाव :- बारव.
७. सिन्नर तालुका:
- सोनांबे :- बारव.
- डुबेरे :- महादेव मंदिर व शेजारी बारव.
- वावी :- बारव.
- वडांगळी :- अहिल्यादेवींची गढी, बारव.
७. दिंडोरी तालुका:
- राजापूर :- बारव.
- तळेगाव(गोसाव्यांचे) :- ५ बारवा.
- वणी(सप्तशृंगीगड) :- शिवतिर्थ कुंड, अहिल्यादेवी बारव,धर्मशाळा.
- वणी गावठाण :- जगदंबा माता मंदिर व ३ कुंड किंवा तलावे.
- जऊळके पो.वणी :- बारव.
E. धुळे जिल्हा:
१. धुळे(अमळनेर) तालुका:
- देवपूर :- एकवीरा माता मंदिर, २ दिपस्तंभ, धर्मशाळा, पायविहीर.
- पाडळसरे :- नाटेश्वर महादेव मंदिर.
२. सिंदखेडा तालुका:
- मुडावद :- कपिलेश्वर महादेव मंदिर, तापी-पांझराच्या संगमावर नदीघाट, धर्मशाळा, टेहळणी स्तंभ.
- मालपूर :- गणपती विहीर व तळाला गणपतीची मूर्ती स्थापना, भटाई मंदिर व शेजारी विहीर(भटाई विहीर).
- मेथी :- पायविहीर(विष्णू मंदिराशेजारी).
- विखरण :- २ पायविहीर.
- चौगाव(बुद्रुक) :- पायविहीर.
- सुरनदी(सिंदखेडा-वर्शी दरम्यान) :- पायविहीर.
- वर्शी :- पायविहीर व त्यामध्ये महादेवाच्या पिंडीची स्थापना.
- विरदेल :- पाचमजली अहिल्यादेवी बारव/पायविहीर.
- कलमाडी फाटा :- चोर बावडी/पायविहीर.
- वरूळ :- पायविहीर.
- रामी :- महादेव मंदिर व शेजारी पायविहीर.
३. शिरपूर तालुका:
- शिरपूर :- आसरामाता मंदिर व शेजारी पायविहीर, पाताळेश्वर मंदिर व शेजारी पायविहीर, म.गांधी शॉपिंग सेंटर मध्ये पायविहीर शेजारी पाण्याचा हौद व कुंड, ठाणसिंग भास्करराव पाटील यांच्या शेतात पायविहीर(धवळीविहीर), बारव, कुंड.
- अहिल्यापुर :- पाचमजली अहिल्यादेवी बारव/पायविहीर.
- विखरण :- पाचमजली अहिल्यादेवी बारव/पायविहीर, भवानी मातेचे मंदिर व बुरुज.
- चांदपुरी :- पाचमजली अहिल्यादेवी बारव/पायविहीर, कुंड.
- नागेश्वर-बंगला :- नागेश्वर मंदिर, तलाव व गोमुख.
४. साक्री तालुका:
- जेताणे :- पायविहीर(“साखर झिरा” नावाने प्रसिद्ध).
- माळमाथा :- पायविहीर.
F. बीड जिल्हा
१. बीड तालुका:
- बीड :- खांडेश्वरी माता मंदिर, धर्मशाळा, तटबंदी व शेजारी सासू-सुनेची बारव.
२. परळी तालुका:
- परळी :- वेजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर, ३ बारावा.
३. अंबाजोगाई तालुका:
- अंबाजोगाई :- बारव.
४. गेवराई तालुका:
- राक्षसभुवन :- श्री विज्ञान गणेश मंदिर.
G. जालना जिल्हा:
१. अंबड तालुका:
- अंबड :- होळकर वाडा, मत्स्योदरी देवीचे मंदिर, खंडोबा बिल्केश्वर मंदिर, जंगी तलाव, २५ पेक्षा अधिक बारवा(पुष्करणी बारव, कावेंदी बारव,आदी), चार वेशी(महाराष्ट्र वेस).
२. जालना तालुका:
- जालना :- अम्रतेश्वर शिव मंदिर व शेजारी बारव, पलंग बारव.
- वाघ्रळ :- मंदिर, धर्मशाळा, भव्य बारव.
२. घनसावंगी तालुका:
- जांब समर्थ :- बारव.
- पारडगाव :- बारव.
H. नंदुरबार जिल्हा:
१. नंदुरबार तालुका:
- नंदुरबार :- राणी अहिल्यादेवींची विहीर व मंदिर.
२. शहादा तालुका:
- सुलतानपूर :- बारव.
- जयनगर :- अष्टभूजा भवानी माता मंदिर, हेरंभ गणेश मंदिर.
- प्रकाशे :- संगमेश्वर शिव मंदिर, पुष्पदंतेश्वर शिव मंदिर, गौतमेश्वर शिव मंदिर.
३. तळोदा तालुका:
- तळोदा :- कंकालेश्वर शिव मंदिर व शेजारी पायविहीर.
I. जळगाव जिल्हा:
१. जळगाव तालुका:
- जळगाव :- राम मंदिर.
- तरसोद :- गणेश मंदिर, ३ बारवा.
- नशिराबाद :- गणेश मंदिर.
२. रावेर तालुका:
- रावेर :- केश्व कुंड, नागझिरी तलाव.
३. मुक्ताईनगर(एदलाबाद) तालुका:
- अंतुर्ली :- भव्य बारव.
४. चोपडा तालुका:
- लासूर :- भव्य पायविहीर(१२५ पायऱ्याची) व गणपती मंदिर.
५. यावल तालुका:
- यावल :- मनुमाता मंदिर.
J. सोलापूर जिल्हा:
१. पंढरपूर तालुका:
- पंढरपूर :- होळकर वाडा, श्रीराम मंदिर, पेशवे बारव, रुक्मिणीला लाखों रुपयांचे दागिने वाहिले.
- बोहाळी :- बारव. पक्षांसाठी राखीव कुरणांची सोय केली होती, ती जमीन विठ्ल-रुक्मिणी ट्रस्ट,पंढरपूर यांच्या मालकीची आहे.
- वाखरी :- बाजीराव विहीर.
- कोर्टी :- बारव.
२. माळशिरस तालुका:
- माळशिरस(घुले वस्ती) :- बारव.
३. करमाळा तालुका:
- करमाळा :- ९६ पायऱ्यांची बारव.
K. रत्नागिरी जिल्हा:
१. संगमेश्वर तालुका:
- बुरबांड :- आमणेश्वर शिवमंदिर व शेजारी ४ जलकुंड, देवळापासून गावाकडे जाणारा रस्ता.
- कळंबस्ते :- रामेश्वर पंचायतन शिवमंदिरे व तलाव.
L. रायगड जिल्हा:
१. कर्जत तालुका:
- भिवपुरी :- ५ एकरात भव्य अष्टकोनी अहिल्यादेवी होळकर तलाव.
२. श्रीवर्धन तालुका:
- हरिहरेश्वर :- भव्य तलाव.
३. अलिबाग तालुका:
- नागाव :- वंखनाथ मंदीर व बारव.
- चौल :- रामेश्वर पुष्करणी.
M. पालघर जिल्हा:
१. पालघर तालुका:
- केळवा :- शितला देवी मंदिर व शेजारी जलकुंड.
N. हिंगोली जिल्हा:
१. औंढा नागनाथ तालुका:
- औंढा नागनाथ :- औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर व शेजारी जलकुंड.
O. सातारा जिल्हा:
१. सातारा तालुका:
- पाटेश्वर :- पाटेश्वर शिव मंदिर.
२. माण तालुका:
- शिखर-शिंगणापूर डोंगर :- विहीर.
P. उस्मानाबाद जिल्हा:
१. कळंब तालुका:
- चोराखळी :- पापनाश मंदिर व जलकुंड.(राणी अहिल्यादेवी यांचे आजोळ).
- येरमाळा :- येडेश्वरी माता मंदिर.
२. तुळजापूर तालुका:
- तुळजापूर :- राणी अहिल्यादेवी विहीर व तुळजामाता मंदिराची पूजा सोया केली .
Q. सांगली जिल्हा:
१. मिरज तालुका:
- भोसे :- भव्य बारव व धर्मशाळा.
२. सांगली तालुका:
- सांगली :- गणपती पंचायतन मंदिरामधील संगमरवरी सर्व मुर्त्या.
R. बुलढाणा जिल्हा:
१. लोणार तालुका:
- लोणार :- भव्यगायमुख कुंड व धर्मशाळा.
S. लातूर जिल्हा:
१. रेणापूर तालुका:
- रेणापूर :- रेणुकादेवी मंदिर, भव्य तटबंदी, हालती दिपमाळ.
२. औसा तालुका:
- किल्लारी :- निळकंठेश्वर महादेव मंदिर व शेजारी बारव.
T. परभणी जिल्हा:
१. सोनपेठ तालुका:
- मुद्गल :- मुद्गलेश्वर महादेव मंदिर.
U. यवतमाळ जिल्हा:
१. उमरखेड तालुका:
- मुळावा :- रेणुकादेवी मंदिर व शेजारी बारव.
अहिल्यादेवींच्या काळातील होळकरशाहीतील गडकिल्ले, भुईकोट व वाडे:
- होळकर राजवाडा (जि.इंदोर म.प्र)
- किल्ले महेश्वर (जि.खरगोण म.प्र)
- किल्ले खरगोण (जि.खरगोण म.प्र)
- किल्ले मांडू (जि.खरगोण म.प्र)
- किल्ले महिंदपुर (जि.उज्जेन म.प्र)
- किल्ले सेंधवा (जि.बडवानी म.प्र)
- किल्ले असीरगड (जि.बुऱ्हाणपूर म.प्र.)
- किल्ले हिंग्लाजगड (जि.मंदसोर म.प्र)
- किल्ले जामगाव (जि.इंदोर म.प्र)
- किल्ले कुशालगड (जि.इंदोर म.प्र)
- भानपुरा गढी (जि.मंदसोर म.प्र)
- किल्ले वाफगाव(जि.पुणे महा.)
- किल्ले लासलगाव (जि.नाशिक महा.)
- किल्ले लळींग (जि.धुळे महा.)
- किल्ले गाळणा (जि.नाशिक महा.)
- किल्ले थाळनेर (जि.धुळे महा.)
- किल्ले सुलतानपूर (जि.नंदुरबार महा.)
- रंगमहाल : चांदवड (जि.नाशिक महा.)
- होळकर वाडा : निफाड (जि.नाशिक महा.)
- होळकर वाडा : खडकी-पिंपळगाव (जि.पुणे महा.)
- होळकर वाडा : काठापूर बु. (जि.पुणे महा.)
- होळकर वाडा : काठापूर खु. (जि.पुणे महा.)
- होळकर वाडा : मंचर (जि.पुणे महा.)
- होळकर वाडा : पुणे (जि.पुणे महा.)
- होळकर वाडा : पंढरपूर (जि.सोलापूर महा.)
- होळकर वाडा : खामगाव (जि.सातारा महा.)
- होळकर वाडा : मांडवगण (जि.अ.नगर महा.)
- पळशीकर वाडा : पळशी (जि.अ.नगर महा. – होळकरांचे दिवाण)
- रांझेकर वाडा : रांझे (जि.पुणे महा. – होळकरांचे दिवाण)