श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) ते शेवचे १४ वे महाराज यशवंतराव होळकर यांच्या कालखंडातील होळकरशाहीच्या निगडित शिलालेखांचे, ताम्रपटांचे व जुन्या पत्रांचे येथे Collection दिले आहे.
जेजुरीचे शिलालेख :
- प्राप्तीस्थळ – जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे(महाराष्ट्र)
- शिलालेख क्रं.१ – जेजुरी गडाच्या उत्तेरकडील नगारखान्याच्या डाव्या बाजूला हा शिलालेख आहे.
- शिलालेखाचा आशय –
“श्री शके १६७८ धाता
नाम स्वंछर श्री मा
र्तंड भैरव चरणी
खंडोजी सुत मल्हा
रजी होळकर णीरंतर” - वाचन करणारे – होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग-१, पा.२३
- फोटो –
- प्राप्तीस्थळ – जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे(महाराष्ट्र)
- शिलालेख क्रं.२ – जेजुरी गडाच्या पश्चिमी तटाकडील म्हाळसाबाई मंदिराशेजारी हा शिलालेख आहे.
- शिलालेखाचा आशय –
“श्री शके १६६४ दुदु
भी नाम सवत्सरे
श्री मार्तंड भैरव
चरणी खंडोजी सु
त मल्हारजी होळकर” - वाचन करणारे – होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग-१, पा.२३
- फोटो –
- प्राप्तीस्थळ – जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे(महाराष्ट्र)
- शिलालेख क्रं.३ – जेजुरी गडाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूला, चोथऱ्याशेजारील खांबावर हा शिलालेख आहे.
- शिलालेखाचा आशय –
“श्री मार्तंड चरणी तत्पर
मल्हारजी सुत तुको
जी होळकर नीरंतर श
के १६९२ वीकृती नाम
संवत्सरे श्रावण शुद्ध
प्रतीपदा सोमवार का
रखाना कीला व तळे मा
रफत शामजी ना
रायण राजापूरक
र परगणे दीगरज” - वाचन करणारे – होळकरशाहीचा इतिहास भाग-१, पा.४१२
- फोटो –
नेतळेचा शिलालेख
- प्राप्तीस्थळ – नेतळे ता.निफाड जि.नाशिक(महाराष्ट्र)
- शिलालेख – नेतळे गावातील राणी अहिल्यादेवींनी बांधलेल्या बारवेत हा शिलालेख आहे.
- शिलालेखाचा आशय –
- वाचन करणारे –
- फोटो –