तेजस्वी गौतमाबाई या खानदेशातील तळोदे गावच्या साबाजीबाबा बारगळ चौगुले यांची नात होती. तर गौतमाबाईच्या वडिलांचे नाव भोजराज व आईचें नांव मोहिनीबाई बारगळ असे होते. आई मोहिनीबाई यांच्या पोटी तेजस्वी कन्या ‘गौतमाबाई’ यांचा जन्म १६ जून १६९४ ला झाला. त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांच्याशी झाला.
गौतमाबाई या धैर्यवान, साहसी, चतुर, स्पष्ट वागणारी, हुशार, दयाळू व राज्यकारभाराची जाणीव असलेली बुद्धीमान स्त्री होती. पत्नी गौतमाबाई यांच्या नावे पेशव्यांकडून खाजगी जहागिरीची सनद इ. स. १७३४ ला बाजीरावाने आपल्या अनेक सरदारापैकी केवळ एकमेव होळकर संस्थानांतील सुभेदार मल्हारराव होळकर यांनाच खाजगी जहागीर दिली. त्याचे उत्पन्न सात लाख रूपये आहे.
सुभेदार मल्हाररावांस सतत विविध युद्ध मोहिमावर गेल्यास इन्दौर राज्याचा खाजगी व सरकारी कारभार गौतमाबाईच पाहत असत. अहिल्याबाईनाही गौतमीबाईने आपल्या तालमीत तरबेज केले होते. त्याचप्रमाणे अहिल्याबाईला आदर्श प्रशासिका बनविण्यात गौतमीबाईचा व सुभेदार मल्हारराव या दोघांचा सिंहाचा वाटा होता. परगणे इंदूरी मौजे पिंपळयाराव येथे सौभाग्यवती गौतमीबाईचा २१ सप्टेंबर १७६१ मृत्यू झाला. तेथेच त्यांची समाधी आहे.