Skip to content

धनगर समाज

धनगर समाजाचा वेदकाळा पासूनचा प्राचीन इतिहास, वंश, कुळी, गोत्र व प्रवर:

सूर्यवंशात मूळ पुरूष आदिनारायण म्हणजे विष्णू –विष्णूपासून ब्रम्हदेव व ब्रम्हदेवाचा पुत्र मरिची, मरिचीचा पुत्र कश्यप सर्व जीवांचा आदि कश्यपपासून देव, दैत्य सर्व लोक व प्रा‍णिमात्र त्यांची उत्पत्ती झाली. कश्यपाच्या ३६ राण्या होत्या.

त्यांचेपासून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती झाली. कश्यपाच्या ३६ राण्यापैकी २८ वी राणी सुंदरा ही हटकर म्हणजे धनगर समाजाची होती. (मूळ संभ) सुंदराचा बाप खरऋषी माता अधृती व मुलगा माधवी नावाचा होता.

३६ मुळ ऋषी पैकी ताप ऋषी धनगर जातीचा व मणीमहंत हटकर जातीचा होता(मूळ स्तंभ)

वेद दर्शन :

उत्तर ध्रुवावरुन  दक्षिणेकडे येतांना आर्य लोकांनी सैबेरीयामध्ये उरल पर्वत व अलताही प्रदेशामध्ये बराच काळ वस्ती केली. त्या प्रदेशात मेंढ्या वन्य प्राणि होत्या. त्यांना आर्य लोकांनी माणसाळवीले.

प्राणि शास्त्राचा तसा एक सिध्दांत आहे की, ज्या प्रदेशात एखाद्या प्राण्याची रानटी जात आढळते त्या त्या प्रदेशात त्या प्राण्यांना मानसाळवीले जाते. या आर्य लोकांची एक टोळी सुमारे ५००० वर्षापूर्वी भारतात आली. त्यांनी मेंढ्या भारतात आणल्या. त्यापूर्वी मेंढ्या भारतात असलेला उल्लेख कोठे आढळत नाही.( भारतीय संस्कृती कोष भाग -१ पान – ४७२).

भारतात आर्य संस्कृतीचा प्रवेश होण्यापुर्वी असूर दैत्य, दानव नाग असे अनेक संस्कृतीचे समाज नांदत होते. आर्य व द्रविड हे भारतातले दोन समाज सोडून त्यांच्याही पुर्वी भारतात असलेल्या ‍किंवा आदिवासी असे म्हणतात.

काही विद्वान अभ्यासक म्हणतात की, धनगर लोक हे भारतातील आदिवासी किंवा वन्य जमाती दिल्या आहेत. त्यामध्ये धनगर जमातीचे नांव नाही. तसेच धनगर समाजाचे जे पोटभेद दिले आहेत. त्यामध्ये आदिवासी व वन्य जमातीचे नाव नाही.

काही अभ्यासक म्हणतात की, धनगर समाज हा द्रविड वंशातील आहे परंतू द्रविड वंशातील पोटभेद तामीळ, तेलगू, कन्नड, मल्याळी, तुळू असे आहेत. त्यात धनगर समाज नाही.

धनगर समाजामध्ये अहीर असल किंवा मराठा बनगी बरगेबंद किंवा मेटकरी, डंगे, गडगे, गवळी, हटकर किंवा झेंडे, होळकर, कंबर, क्षित्री, खिलारी किंवा भिलारी खुठे किंवा खुटेकर, लाड, मेंढे, म्हसकर, सनगर, शेगर, शिरोटया, उटेकर, असे पोट भेद आहेत. त्यामध्ये आदीवासी वन्य जमाती  किंवा द्रविड वंशाचे नाव नाही.

वेदात ‍लिहिले आहे:

” उन्नी सुत्रेण कवयो वयंति.
याचा अर्थ विद्वान लोक लोकरीचे कपडे स्वत: तयार करुन वापरतात.

प्रत्याधिर्व ज्ञानामश्व हयोरथायामे
ऋषि: सयोमनुर्द‍ियी विप्रस्य् यावय पत्ससख:/
आधीसमानाया : पति शुचदायश्या शुचसम्च
वासवायो : वीनामासांसि मर्मजात/
(सूक्त सवि ऋ. मंडळ १०, सूची २६)

याचा अर्थ ऋषि यज्ञांचा प्रसार करणारे आहेत, रथासंबंधी विद्या जाणणारे आहेत. असे हे ऋषि मनुष्याचे हित करणारे आहेत व विद्वानांचे दु:खाचा नाश करणारे मित्र आहेत. पिले देणाऱ्या शुध्द मेंढ्याचे पालक आहेत मेंढ्याचे लोकरीचे वस्त्र बनविणारे व वस्त्राचे परिशालन करणारे आहेत.

ऋग्वेद कालात ऋषिमुनी आपले आश्रमात मेंढ्या पाळत असत व त्यांचे शिष्य मेंढ्यांना चारणेस नेत असत.

ज्योतिष शास्त्रात मेष राशीला प्रमुख स्थान असून त्यावरुन भवष्यि वर्तविलेजाते. ऋग्वेद मंडळ 10- 26

भूतलावर प्रथम झाडांचे सालीचा उपयोग कपडे म्हणून केला जात असे. त्यानंतर एका धनगराने टकळीवर लोकरीचे सूत काढून कांबळा तयार केला..

संस्कृत भाषेमध्ये धांग असा शब्द आहे धांग याचा अर्थ डोंगर पर्वत असा आहे. लढवय्या जातीतील काही लोक अडचणीचे वेळी आपली मेंढरे गायी व इतर जनावरे घेऊन जंगलात राहत असत. त्यांनाच धनगर म्हणतात..

आर्य लोक भारतात आले त्यांनी मेंढ्‌या भारतात पाच हजार वर्षापूर्वी आणल्या  व पाळल्या व ते लोक म्हणजे आर्य लोक धनगर आहेत.

आर्य लोकांप्रमाणे धनगर लोकात महालय व श्राध्दाविधी आहे. (भा. सांस्कृतीक कोष)(यजुर्वेद अध्याय 19 ऋचा 36-37)

शेंडी राखणे हे आर्यत्वाचे मुख्य चिन्ह आहे धनगर लोकांमध्ये शेंडी राखणेची वहिवाट आहे. (ऋग्वेद मंडळ 1 तृत्पा 75 ऋचा 17 खंड 9 पान 282) ऋजाश्वा नावाचा एक ऋषि मेंढ्या राखत होता. त्याची मुलेही तोच उद्योग करीत होते (ऋग्वेद मंडळ : ऋचा 1ल6/117 भा स कोष खंड 8 पान 26)

आर्य लोक आपले लहान मुलाचे कान टोचत असत. (ऋग्वेद मंडळ 1 सुक्त 81) धनगर लोकामध्येही लहान मुलाचे कान टोचण्याची पध्दत आहे.

तरंत राजा याची राणी शशीयशी हिने शावाश्वा ऋषीला शतावधी बकरी दान दिली (ऋग्वेद मंडळ 5 सुक्ता 61  ऋचा 5)

राजा पौरकृत याने पषधू काण्वा ऋषीला 100 बकरी दान दिली. (ऋ मं 1 8 सुक्ता 56 सु.3)

बकरी दान देणारे राजे व दान घेणार ऋषी मेषपाल होते.

लोकरीचे वस्त्र परिधान करणारे मेघोदेद्ध्क मस्तदेव परुष्णी म्हणजे रावी नदीकाठी गर्जना करीत आहे (ऋग्वेद मंडळ 5 सुक्ता 50 ऋचा 9 ) याचा अर्थ रावी नदी काठी राहणारे मेषपाल मरुत देवाला लोकरीचा कांगला अर्पण करीत असत व मस्तदेव पाऊस पाडत असत. यावरुनच धनगराने कांबळा झाडला म्हणजे पाऊस पडत असे ही म्हाण अस्तीत्वात आली असावी.

लेखक : कै.गणपतराव बापूराव कोळेकर
मु.लाट, ता.शिरोळ, जि.सोलापूर


काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


राणी अहिल्यादेवी होळकरांनी भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कार्यांची यादी पहा.
अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी कार्य